द रिटर्न ऑफ नौटंकी! आप का क्या होगा?

Submitted by केदार on 27 May, 2014 - 10:55

तर एकदाच गंगेत घोड न्हाल अन केजरीवालांनी बॉन्ड भरला आणि ते जेल मधून बाहेर आले एकदाचे ! आणखी एक यु टर्न केजरीवालांनी मारला.

आता परत काही दिवसात आणखी एक नौटंकी सुरू होणार ह्याची खात्रीच जणू !

कुणावरही आरोप केल्यावर पुरावे द्यावे लागतात, हे त्यांना मुळी मान्यच नव्हते. मै केजरीवाल हूं, असे त्यांनी न्यायालयालाच त्या दिवशी सुनावले होते. न्यायालय म्हणाले की तुम्ही बॉन्ड भरा व निघा, तर ही पद्धतच चुकीची आहे (बॉन्ड वर परोल) आणि मी त्याविरोधात लढणार असे काहीसे म्हणून त्यांनी जेल मध्ये जाणे स्विकारले.

आज त्यांना कोर्टाने परत एकदा सुनावले की हया केसला प्रेस्टिज इश्यू तुम्ही का बनवत आहात? भुषण पितापुत्रांनी मग तिहार कडे धाव घेऊन एकदाचे केजरीवालांना समजावून सांगीतले आणि ड्राम्यावर पाणी पडले.

ह्या चालीत त्यांना वाटले की ते जेल मध्ये जाऊन महात्मा गांधी होतील. भारतीय जनतेचे दुर्दैव की त्यांना केजरीवालसारख्या लोकांना डोक्यावर घ्यावे लागले कारण पुढे कोणीही नव्ह्ते.

दरम्यान आपच्या नेत्यांमध्ये बेबनाव झाला आहे आणि दोघांनी (शाजिया इल्मी आणि कॅप्टन गोपीनाथ) राजीनामे पण दिले.

"आप" प्रयोग फसणे हे दुर्दैवी आहे पण ज्या रितीने अण्णांपासून वेगळे होऊन आप निर्मिली गेली, त्यातच तिच्या अपयशाची बीजे रोवली होती.

तरी एवढे फुटेज का द्यायचे? तर भारतीय राजकारणात आप खरच आप सारखी वागली असती तर त्या पार्टीला खूप मोठे भविष्य होते.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages