कुरडयांसाठी इन्स्टंट चीक

Submitted by तृप्ती आवटी on 22 May, 2014 - 17:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

_१ वाटी बारीक रवा
_पाणी

क्रमवार पाककृती: 

रवा पूर्ण बुडून थोडं वर पाणी राहील अशा हिशेबाने एक पूर्ण दिवस भिजत ठेवावा. दुसर्‍या दिवशी वरचं पाणी काढून टाकावं. एक वाटी पाणी आधणास ठेवावं. त्यात अंदाजाने मीठ घालावं. रवा पाण्यात घालून नीट घोटून घ्यावा. मिश्रण फार दाट झाल्यास अंदाजानं गरम पाणी घालावं. झाकण ठेवून वाफ आणावी. लगेचच चीक तयार होतो.

वाढणी/प्रमाण: 
एक-दीड वाटी चीक होतो.
अधिक टिपा: 

_नुसता खाण्यासाठी तसा झटपट आणि वासविरहीत वातावरणात चीक तयार होतो
_या चिकाच्या कुरडया पण होतात
_चिकास आंबटपणा येत नाही पण आपल्या त्या ह्या गावी कुरडयांसाठी असा आंबट नसलेलाच चीक करतात

माहितीचा स्रोत: 
मावशी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मावेत झाकण टाकून हाय पॉवरवर ३ मिनिटं शिजवला. पण आधी हा.पॉ.वर १ मिनिट शिजवून, ढवळून पुन्हा २ मिनिटं हा.पॉ.वर शिजवलेला अधिक बरा पडेल असं वाटतंय. (मी मावेचं दार उघडलं तर वाफेनं झाकण ढकलून दिलं होतं आणि चीकाचं पाणी उसळून थोडं बाहेर सांडलं होतं.)
नंतर भांडं बाहेर काढून, चीक चांगला हलवून १० मिनिटं तसाच झाकून ठेवला.

चव बर्‍यापैकी आंबूस आली होती. काल रात्री रव्याचं पाणी बदललं होतं. आज सकाळी ते पाणी ओतल्यावर रवा हुंगला, तर सेम टू सेम आंबलेल्या गव्हाचा वास आला. म्हटल्यावर माझा हुरूप जो काही वाढला म्हणता... Lol

मावेतून काढल्या काढल्या घेतलेली चव आणि १० मिनिटांनंतर घेतलेली चव यात आंबटपणा वाढल्याचं लक्षात आलं. Happy

मावेत झाकण वरून कुठेतरी खमंग चर्चा झालेली दिसतेय (जी मी वाचलेली नाही. Proud 'मावेत पुन्हा झाकणं काय घालता? - असं काही आहे का? Wink )

आज करून पाहिला. जबरी झाला होता. चव अगदी गव्हाच्या चीकासारखी आलेली. अगदी बारीक रवा वापरला मी.
धन्यवाद तृप्ती . मावशीनाही धन्यवाद सांग.

स्वाती, एकदम तोंपासु फोटो. आता करून बघितलाच पाहिजे.

सिंडे, तुला धन्यवाद.. मावशींच्या वतीने माझ्यासारख्या अनेकींचे दुवे घेतले असशीलच आत्तापर्यंत, त्यात माझीही भर Happy

त्यापेक्षा कुरड्या विकतच आणा की! एकदम इन्स्टंट कुरड्याच!,
नि २४ तास भिजवणे, पाणी गरम करणे, अंदाजे मीठ, वाफ आणणे यात इंस्टंट काय?
हे असले उद्योग करायला वेळ कसा मिळतो तुम्हाला? का मला भरपूर वेळ आहे, काय करायचे हे सुचवायला माझ्या फाञद्यासाठी हे लिहीता??

तुला चीक आवडतो की नाही ही अतिशयच दुय्यम/तिय्यम बाब आहे इथे Proud

तरीही 'जे जे आपणांस ठावे..' या उक्तीचं पालन केल्याबद्दलही धन्यवाद Wink

अ‍ॅक्च्युअली सांगायचं राहिलं, मी आधणात रवा ओतून नाही केला - सरळ वरवरचं पाणी काढून बाकी मीठ घालून शिजायला ठेवला. लगेच शिजायला लागतो, पटापट घोटत रहायचं. चकचकीत झाला की झाला तयार.

आणि मी बारीक रवाच वापरला, त्यामुळे गाळावं लागलं नाही अजिबात.

मोत्यांचं पिठलं
>> मला तर खळीसारखा वाटला. पण मी सिंडी कॅटेगरी आहे तव्हा माझं मनावर घेउ नका Happy

चांगली खळ चिकासारखी दिसते पण कितीही चिकासारखी दिसली तरी खाऊ नका टाळ्याला चिकटेल.
>> Proud

नावातच चीक आहे तरी चिकटणार नाही म्हणता? हा चीक चिकटलो तर नाव बदलीन असं म्हणतो का?
बदललेलं नाव खळ अर्थात Happy
आता मला चिक्प्रेमी लोकांच्या लाथा मिळायच्या आत मी चालू पडते.

फारच कामाला लावता ब्वा तुम्ही लोक्स...(ते पण ही डीश कशी लागते ते अजाबात माहित नसताना ;))

स्वातीने टाकलेला फोटो सॉलिड टेम्पिटंग आहे Happy

मोत्याचं पिठलं>> अरारारारारा!! Lol

चीक चिकटला नाही तरी तो चिकटच असतो, चिकाचं भांडं घासायला खूप कष्ट पडतात.

केला केला शेवटी चीक केलाच!! Happy

2 वाट्या रवा भिजत घातला. आंबट वासासाठी ओव्हन मधे ठेवला. (ओव्हन बंदच होता. केवळ उबदार जागा असावी म्हणून तिथे ठेवला) ४८ तास तरी ठेवायचाच असा संकल्प केला. २४ तासांनी पाणी बदलण्यासाठी म्हणून पाहिलं तर छान मंद वास येत होता. <लाळ गाळणारी बाहूली> मग अगदीच राहावलं नाही म्हणून डावभर सत्त्व घेऊन चीक शिजवला. थोडी जिरेपूड आणि मीठ घातलं. वरून तीळ आणि कच्चं तेल. गरमागरम मटकावला. चव अगदी डिक्टो तशी नव्हती पण बरीच सारखी होती. आणि बरेच दिवसांनी खाल्ला म्हणून जास्त आनंद. Happy

Pages