नवे सरकार - नवे मंत्रीमंडळ

Submitted by हायझेनबर्ग on 16 May, 2014 - 10:00

निवडणुकांचा निकाल काय लागला हे काही आता वेगळे सांगायची गरज नाही. कुणाचा निकाल लागला तेही कळाले आहेच. तर ते सोडा!!

तुमच्या मते नवे मंत्रीमंडळ कसे असेल. कोण कुठली पदे भुषवेल. कुठले नवे चहरे दिसतील? जेटली, ईराणीं सारख्या मातब्बर पण शहीद झालेल्यांना मंत्रीमंडळात कसे सामावून घेणार?

घटक पक्षांच्या दगाबाजीचा आता काही धोका नाही पण अंतर्गत बंडाळीची शक्यता(सध्यातरी अतिशय कमी) आणि काही नाराजांचे ऊपद्रव मुल्य बघता भाजप पक्ष म्हणून काय ऊपाययोजना करणार?

लोकसभा स्पीकर, पक्ष प्रवक्ते, संघटक वगैरे अश्या बिनखात्याच्या पण महत्वाच्या भुमिका कोणाच्या वाट्याला येणार?

येणार्‍या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजप आणि प्रादेशिक घटकपक्ष समीकरण कसे असेल?

पहिल्या काही महिन्यांत कुठली महत्वाची पाऊले सरकार ऊचलेले? कुठले विषय चर्चिले जातील?

आणि महत्व्वाचे 'अपोझिशन पार्टी आणि तिचा लीडर वगैरे कोण असेल?

हे सगळे चर्चिण्यासाठी हा धागा. !!!

अपोझिशन मध्ये बसणार्‍यांच्या जागा पलिकडे आहेत. Proud

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बै बओ. काय त्या रामसेतुबद्दल हिन्दुन्ना कळवळा हो!

सेतु समुद्र प्रकल्प करणे आणि त्यासाठी सेतुला भोक पाडणे हा वाजपेयी सरकारचाच प्रोजेक्ट होता.

तॅन्व्हा भगवे लोक गप्पबसबसए होते.
पण वर्शभरातच वाजपेयी सरकार गेलं

नन्तर कोम्ग्रेसने तोच प्रकल्प सुरु केला.

तर आता रामाचे भक्त चवताळुन उठले. आमच्या रामाच्या सेतुला भोक पाडता ? कीती ही भक्ती !

Proud

हे घ्या. My point is proved. हे लक्ष्मी गोडबोले उर्फ गजानन कागलकर डॉक्टर असून शीर्षकात दिलेल्या विषयाप्रमाणे पोष्टी ताकता येत नाहीत. काय संबंध शिक्षण आणि पात्रतेमधे?
कृपया विषयाला धरुन पोष्टी टाकाव्यात.

स्मृती इराणींच्या क्षमतेबद्दल मी काहीच लिहिलेले नाही. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेशी काहीही देणेघेणे नाही. पण एखाद्या निर्णयावर कोणी टीका करताच त्याच्या निष्ठा, डीएनए काढले जातात याला आक्षेप आहे. ज्यांनी इराणींच्या नियुक्तीबद्दल शंका घेतली आहे (वरची दोन उदाहरणे : कुबेर आणि मधू किश्वर) त्यांनी त्यांची कारणे मांडलेली आहेत. ती सगळ्यांना मान्य व्हायलाच हवीत असे नाही.
पण मग लगेच यांनी लिहिले कारण ते खोडसाळ, अमक्या ठिकाणी निष्ठा वाहिलेले, इ.इ. लिहिले जाते. मधू किश्वरही तेच म्हणताहेत.(त्यांच्या म्हणण्याचा अर्थ , आधी ज्यांनी मोदींची, त्यांच्या कठीण काळात स्तुती केली त्यांनाच मोदींच्या निर्णयावर टीका करण्याचा हक्क मिळतो असा लागतोय.) उमा भारती, तुमच्या बाईंचे शिक्षाण किती? असे विचारतात.
हे असले लिहिण्या/बोलण्यात नक्की कोणते 'विचार आणि मुद्दे' मांडले जातात?
स्मृती इराणींनी दिलेले उत्तर आवडलेच आहे.

विचारजन्ता तु ज्या लिन्का दिल्यात त्यावरील रिप्लाय आहे

शिक्षण आनि काम यात सम्बन्ध आहे असे मी म्हटले नाही.

पण खोटी अर्हतआ दाखवणे हा गुन्हाच आहे.

राफांचे ज्ञान..

पदवीचे शिक्षण 'स्मृति' तून हद्दपार झाले
'माकन'च्या हाती उगाचच कोलीत आले

>>स्मृती इराणींनी दिलेले उत्तर आवडलेच आहे.>>

धन्यवाद. लई उपकार झाले Wink

>>उमा भारती तुमच्या बाईंचे शिक्षाण किती? असे विचारतात.
हे असेल लिहिण्या/बोलण्यात नक्की कोणते 'विचार आणि मुद्दे' मांडले जातात?>>

हा मात्र उलटा कांगावा आहे. आधी दुसर्‍याचं शिक्षण काढायचं आणि मग तोच प्रश्न तुमच्याबद्दल विचारला की विचार आणि मुद्दे काढायचे. Proud मज्याय सगळीच!

असो. आता हा मुद्दा जुना झाला. दुसरं काहीतरी बोला Wink

जाऊ द्या हो, तुम्ही लिहिलेले सगळे मुद्दे पालथे पडलेत. आज तुमच्यासारख्याशी बोलून तुम्हाला उपकृत केले आहे . पुन्हा असा दिवस कधी उगवतो याची वाट पहा.

सकाळमधे आलेल्या बातमीखाली अत्रे नावाच्या गृहस्थांनी दिलेली कमेण्ट वाचनीय आहे.

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=N75TV

२००४ चे इराणी यांचे प्रतिज्ञा पत्र खोटे आहे असे आपण घटकेस मानून चालू.. कारण आत्ताच्या २०१४ च्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी शिक्षण कमी दाखवले आहे (शहाणा माणूस असेच करतो, पूर्वीची चूक आता दुरुस्त करतो, जसे की मोदी आत्ता लग्नाचा रकाना भरतात जो पूर्वी रिकामा होता).. त्या मुळात निवडणूक २०१४ ची निवडणूक हरल्या आहेत... असे असूनसुद्धा त्यांना पक्षकार्याची पावती म्हणून या मंत्रीपदी बसवण्यात आले आहे त्यामुळे कितीही सत्य या आरोपांमध्ये असले तरी आता निवडणूक आयोगसुद्धा त्यांचा केसही वाकडा करू शकणार नाही याची इराणी यांना आणि भाजपला पूर्ण जाणीव आहे... जनतेला यातली गोची कळत नसते की ही व्यक्ती खोटे प्रतिज्ञापत्र देऊन निवडणूक लढवते आहे का कसे... कारण त्यांना लोकसभेच्या सभागृहात यायचे नाहीच आहे. त्या २०११ पासून गुजरात मधून राज्यसभेच्या सभासद आहेत.. त्या २०११ च्या निवडणुकीत त्यांनी हे सदर प्रतिज्ञापत्र दिलेले नाही आहे. काँग्रेसने सुद्धा यामुळेच हा मुद्दा एका हद्दीपर्यंतच ताणावा यातच खरा शहाणपणा आहे...अजून ताणणे हे हसे करून घेण्यासारखे आहे...!

सकाळ मधे एक प्रतिसाद आलाय तो आवडला
"वाचकहो , मी भाजपला मत दिले आहे ते मोठ्या अपेक्षा ठेवून कि हे चांगला कारभार करतील, चांगले लोक आणतील सरकारमध्ये. सुषमा स्वराज सारख्या मातब्बर मंत्र्याबद्दल कोणी बोलत नाहीये. डॉ मनमोहन सिंघ यांनी आपल्या अर्थव्यवस्थेसाठी केलेल्या कामाची दाखल जगाने घेतली आहे. आक्षेप आहे तो इराणी यांच्या पात्रतेबद्दल. विमान वाहतूक मंत्री होण्यासाठी वैमानिक असावे लागत नाही हे खरे आहे - पण किमान त्या विषयाचे आकलन होईल इतकी आकलनशक्ती हवी ना! आज वर सुशिक्षित मंत्री नव्हते म्हणून असाच चुकीचा पायंडा पडत राहायचे का? भाजप च्या मनोहर पर्रीकर यांनी आज गोव्यामध्ये किती उत्तम प्रशासन दिले आहे हे आपण पाहत नाही का ?? सोनियांचे शिक्षण नव्हते म्हणूनच त्यांच्या हाताखाली उत्तमोत्तम मंत्री असूनही आपण काय मिळवले ? लालू रबडी शिकलेले नव्हते म्हून आज बिहारची ही गत आहे."
थोडे आकलन संबंधित विषयाचे हवे ही पात्रता कशी सिद्ध करायची?
इराणी बाई कसे सिद्ध करू शकतील संबंधित विषयाचे ज्ञान त्याना आहे की नाही?
खाते वाटप करताना काय विचार केला गेला असेल?

स्मृतीबाईचा मुद्दा आणि त्या अनुषंगाने आलेले इतर व्यक्तींचे मुद्दे (उदा. वसंतदादा, राबडीदेवी, इ.) जरा बाजुला ठेऊन एका सर्वसामान्य मुद्द्याकडे लक्ष वेधू इच्छितो. कृपया केवळ मुद्दे मांडावेत गुद्दे नाही. Wink

भारतीय राजकारणात (खरे तर जगातल्या कोणत्याही) लोकप्रतिनिधींना राज्यकारभारासंबंधी किमान शिक्षणाची पात्रता असावी काय ? भले ते पदवी स्वरूपाचे नसले तरी चालेल, पण निदान निवडणूकीला उभे राहिलेल्या माणसाला एखादा छोटा का होईना कोर्स करणे बंधनकारक असावे का ?

या विषयावर आधीच जर काही धागा असेल तर कळवावे, नसेल तर यासाठी वेगळा धागा चालू करावा काय ? Uhoh

महेश, मला वाटतं निवडून आलेल्या खासदारांवर एखादा पाठ्यक्रम (=कोर्स) ठराविक कालावधीत पुरा करायचं बंधन टाकावं. तो न केल्यास पुढील वेळी खासदारकीस उभं राहता येणार नाही अशी तरतूद असावी.
आ.न.,
-गा.पै.

कोर्स एकच व एकाच वेळेस नसावा, प्रशिक्षण वार्षिक व अनुषंगिक असावे.म प्रशिक्षणास वैयक्तिक हजर असण्याची सक्ती असावी.
मागील वर्षीच्या प्रशिक्षणाचा वर्षभरात काय व कसा उपयोग केला याचे विवेचन व्हावे.
मुळात खाते एकाच व्यक्तीकडे असल्याने असे प्रशिक्षण हे वैयक्तिक स्वरूपाचेच होईल

गोडबोले अहो जरा तुमच्या काँग्रेसकडे पहा. जर स्मृती इराणींनी राजीनामा द्यावा अस ठरलं तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची शैक्षणिक पात्रता काय! आणि काहीही शैक्षणिक पात्रता नसताना हे पंप्र चे उमेदवार कसे झाले! १० वर्ष सत्ताधारी आघाडीच्या अध्यक्षा हे पद कुठून भूषवलं? आणि एवढीच जर शिकलेली मंडळी आहेत काँग्रेसमध्ये तर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अशिक्षित का?

बरं शिकून- सवरून काय दिवे लावलेत! घोटाळे चांगले केले हेच कर्तृत्व.

नीट विचार करून प्रतिक्रिया द्या म्हणजे बर होईल. (त्या crimemaster Gogo सारख झालंय, आया हुं तो कुछ न कुछ लेकेही जाऊंगा, तसं तुमच आहे, आया हुं तो कुछ न कुछ बोलकेही जाऊंगा)

प्रशिक्षण आणि कोर्स गेले बोंबलत, इथे खासदारांची लोकसभेत उपस्थित राहण्याचीच बोंब असते.

हे पहा
राहुल गांधी यांची लोकसभेतील उपस्थिती

प्पिल्या,

पील्यागत बोलु नगस.

शैक्षणिक अर्हता व कर्तित्व यान्चा सम्बन्ध असतो असे मी म्हटले नाही.

खोटी शैक्षनिक अर्हता सान्गणे हा गुन्हा आहे असे मी लिहिले

इराणी बै चौथि पास असेल तर गुन्हा नाही.

पण चौथी पास असताना बी ए सान्गणे हा गुन्हा अse मी म्हटले.

पण,

वीस वर्शापुर्बी तुमचे वदील चातीत दुखले तर फ्यामिलि डॉ़टरक्दे जायचे.
पण आज तुम्हाला दुखले तर तुम्ही एम डी डॉ़टरकडे जाता ना?

त्यामुळे राज्यलर्त्यानाही काही किमान अर्हता असाय ल हवी. शिवाजी महाराज पदवीधारक नव्हते. अकबर निरक्षर होता. पण हा इतिहास झाला.
ही उदाहरणे आपल्या तोन्डावर फेकून लबाड लोकअर्हतेशिवाय पद भुशवायला पहातात तर आज आपण विरोध करायला हवा.

लगोशी सहमत. कधीकधी अगदि शहाण्या माणसा सारखं लिहीतो.

इराणी बाईंना मंत्रीपद का दिलं ते मोदिच जाणे. आजच्या जमान्यात असं घडणं "ये अच्छी बात नहि है"...

मोदींच्या कॅबिनेटमध्ये उमा भारती सर्वात कमी शिकलेल्या मंत्री आहेत. त्यांनी फक्त पाचवीपर्यंत शिक्षण घेतलंय. अनंत कुमार, अशोक गजापती राजू, अनंत गीते, हरसिमरत कौर बादल, आणि विष्णूदेव साई दहाव्या वर्गापर्यंत शिकले. तर मनेका गांधी आणि स्मृति ईराणी 12वीपर्यंत... गंमत म्हणजे स्मृति ईराणी आणि मनेका गांधी दोघींनी मॉडेलिंगसाठी आपलं शिक्षण सोडलं होतं

मोदी कॅबिनेटचे 16 मंत्री हे लॉ ग्रॅज्युएट आणि लॉमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. मंत्र्यांमध्ये 14 लॉ ग्रॅज्युएट, 2 लॉ पोस्ट ग्रॅज्युएट, 8 ग्रॅज्युएट, 5 पोस्ट ग्रॅज्युएट, 3 पीएचडी, 1 एम फिल, 1 एमबीबीएस, 1 इंजीनिअरही सहभागी आहे. नजमा हेपतुल्ला, जनरल व्ही.के.सिंह आणि संजीब बालियान हे पीएचडी आहेत. तर निर्मला सीतारमन या एम.फिल. आहेत. सोबतच दिल्लीचे खासदार आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन एमबीबीएस डॉक्टर आहेत. तर पूर्वांचलचे खासदार मनोज सिन्हा हे इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंगमध्ये एमटेक आहेत.

---------- इति झी मराठी न्युज चॅनल

अवघ्या ३० मिनिटांसाठी न्युजचॅनल्स च्या वेबसाईट वर बातमी झळकली होती मोदींसाठी काम चालु आहे ( काय अणि स्वरुप देखील सांगितलेले परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने इथे देणे या कुठे ही देणे योग्य होणार नाही कितीही मतभेद असेना पण ते देशाचे पंतप्रधान आहेत) नंतर मला कुठे परत सापडली नाही अथवा काढुन टाकली असेल

अश्या बातम्या देणार्या संस्थांवर कायदेशीर कारवाई का होत नाही. जी गोष्ट गोपनिय आहे आणि सुरक्षतेच्या दृष्टीकोनातुन अतिशय संवेदनशिल आहे अश्या बातम्या मिडीया पर्यंत जातात कशा आणि गेल्यातरी संपादकाची विवेकबुध्दी झोपेत असते का ? त्यांना अश्या बातम्यांचे गांभिर्य लक्षात येत नाही का ? कि फक्त ब्रेकिंग न्युज च्या नावाने काहीही आले तर त्याची गंभीरता न तपासता आधी माझ्या चॅनल वर कसे लागेल यावर लक्ष केंद्रीत ?

योग्य तो बदल केलेला आहे
आणि पोस्ट वाचुन बघावे मी देखील डिटेल्स दिलेले नाही आहे त्यात तर इतिपासुन ते इथ पर्यंत सविस्तर दिलेले

टनल बांधत आहेत यात गोपनीय काय आहे? जोपर्यंत टनलची सुरक्षा अबाधित आहे तोवर काळजी करायचं कारण नाहि.

बायदवे, टनलचं बांधकाम २०१० पासुन सुरु आहे असं वाचनात आलं.

(facepalm)

Pages