नवे सरकार - नवे मंत्रीमंडळ

Submitted by हायझेनबर्ग on 16 May, 2014 - 10:00

निवडणुकांचा निकाल काय लागला हे काही आता वेगळे सांगायची गरज नाही. कुणाचा निकाल लागला तेही कळाले आहेच. तर ते सोडा!!

तुमच्या मते नवे मंत्रीमंडळ कसे असेल. कोण कुठली पदे भुषवेल. कुठले नवे चहरे दिसतील? जेटली, ईराणीं सारख्या मातब्बर पण शहीद झालेल्यांना मंत्रीमंडळात कसे सामावून घेणार?

घटक पक्षांच्या दगाबाजीचा आता काही धोका नाही पण अंतर्गत बंडाळीची शक्यता(सध्यातरी अतिशय कमी) आणि काही नाराजांचे ऊपद्रव मुल्य बघता भाजप पक्ष म्हणून काय ऊपाययोजना करणार?

लोकसभा स्पीकर, पक्ष प्रवक्ते, संघटक वगैरे अश्या बिनखात्याच्या पण महत्वाच्या भुमिका कोणाच्या वाट्याला येणार?

येणार्‍या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजप आणि प्रादेशिक घटकपक्ष समीकरण कसे असेल?

पहिल्या काही महिन्यांत कुठली महत्वाची पाऊले सरकार ऊचलेले? कुठले विषय चर्चिले जातील?

आणि महत्व्वाचे 'अपोझिशन पार्टी आणि तिचा लीडर वगैरे कोण असेल?

हे सगळे चर्चिण्यासाठी हा धागा. !!!

अपोझिशन मध्ये बसणार्‍यांच्या जागा पलिकडे आहेत. Proud

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यशवंतराव चव्हाण तर अवघे चौथी पास होते. याची संगती कशी लावायची?

>़काँग्रेस द्वेषाने पैलवान इतके आंधळे झालेत की यशवन्तराव चव्हान लॉ ग्रॅज्युअट होते हेही त्याना माहीत असून बिनदिक्कात पणे खोटी माहीती देऊन नव्या पिढीची दिशाभूल करीत आहेत . अर्थात त्यांची ज्या विचारसरणीशी बांधीलकी आहे ते लोक अशा व्हिस्परिंग कॅम्पेन राबवण्यासाठी प्रसिद्धच आहेत. लंडनमध्ये माहिती मिळत नसेल तर नेट वर बघा. पैलवाना किती खोटे बोलशील? यशवन्तराव चव्हाण राजकारणात गेल्याने महाराष्ट्र एका साहित्यिकाला मुकला असे आम्हाला पाठ्यपुस्तकात त्यांचा परिचय देताना म्हटले होते. अर्थात नागपूर विद्यापीठात यशवन्तरावांचे साहित्य वाचायला बन्दी आहे. Happy केवळ बहुजन समाजातील आहेत म्हणून यशवन्तरावांचा एवढा द्वेष?

रॉबिनहूड, तुमचा गैरसमज झालेला आहे.

पैलवान म्हणत आहेत की कमी शिक्षण असून कर्तृत्ववान माणूस होता तो. म्हणजेच शिक्षण आणि राजकीय कर्तृत्वाचा काय संबंध असे ते म्हणत आहेत. यात त्यांनी त्यांचे कौतुकच केलेले आहे.

यशवंतराव व वसंतदादा पाटील यात त्यांची गल्लत झाली त्याचे स्पष्टीकरणही दिलेले आहे त्यांनी वरच्याच पोष्टीत. ते तरी वाचायचे कष्ट घ्या. कोण कुणाच्या द्वेषाने आंधळं झालंय ते तुमच्या पोष्टीने समजलंच हुडा.

>>अर्थात नागपूर विद्यापीठात यशवन्तरावांचे साहित्य वाचायला बन्दी आहे. >>

आता दिशाभूल कोण करत आहे? अशी कुठलीही बंदी नाही. अर्थात, संघद्वेषाची कावीळ झालेल्यांना काय आणि किती समजावणार!!!

नेहरुच्या खुशमस्कर्याचे एवढे कौतुक कशाला?
राज्य स्वतंत्र झाल्यानंतर ते मराठा राज्य होणार कि मराठींचे ? या प्रश्नावर त्यांनी मराठी राज्य होईल असे आश्वासन दिले होते. पूढे त्याचे काय झाले सर्वांना ठाऊक आहे.त्यांच्या तालमीत तयार झालेल्या दादा व नंतर साहेब यांनी राज्याची कशी वाट लावली हे आपण बघितलेच आहे. कशाला या धाग्यावर त्यांचे कौतुक..
मटामध्ये एक लेख आला होता त्यात जातीयवाद करुन ब्राह्मणांचे खच्चीकरण, दलित ओबिसींचे खच्चीकरण करुन एकजात सत्ता आपल्या हातात ठेवण्याचे कसब व संस्कृती चव्हाणाने कशी रुजवली याचा उहापोह आहे. जरुर वाचा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5876622.cms?prtpage=1

विचारवंत धन्यवाद. वरती जी खुषमस्कर्याची वाहवा चालली आहे त्यांना हे कळावे कि वास्तवात हे लोक किती क्षुद्र मानसिकतेचे असतात. या असल्या चाटुगिरी करणार्यांना जेव्हा महाराष्ट्राचे शिल्पकार वगैरे म्हणतात तेव्हा प्रचंड हसायला येते. संयुक्त महाराष्ट्रासाठी कसलेही प्रयत्न केले नाहीत, एकाजातीची सत्ता राखुन ब्राह्मण ओबिसी दलित वगैरेंना सत्तेत वाटा दिला नाही, उलट त्यांचे पंख कापायचे सतत प्रयत्न केले व ती संस्कृती रुजवली. असे टीनपॉट लोक महाराष्ट्राचे शिल्पकार.हसा... जोरात हसा...

दशकांपूर्वीच्या भूतकाळाबद्दल गरळ ओकण्याने आणि हयात नसलेल्या व्यक्तींचे चारित्र्यहनन होईल असे शेरे मारल्याने काय समाधान लाभते हे न कळण्यापलिकडे आहे.
हा धागा फक्त मोदींचे मंत्रिमंडळ, मुद्दे आणि त्याला धरूनचे राजकारण ह्याबद्दलच आहे, तेवढ्यापुरतेच बोला.

एकाजातीची सत्ता राखुन ब्राह्मण ओबिसी दलित वगैरेंना सत्तेत वाटा दिला नाही)))

मोदीनीही मुसलमानाना वाटा दिला नाही ना?

तुमचे परममित्र झक्की अमेरिकेला बोलावतील ना तुम्हाला वेळ पडल्यास
अनेकदा बोलावले होते, पण त्यांना माहित आहे की ते आले आपले एक ए. वे. ए. ठि. होणार नि तिथे बागराज्यातल्या बायका येणार म्हणून ते घाबरतात. काय एकेक पावरबाज लोक! Light 1 Happy
बाकी रॉबिनहूड तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव आहे सरकारचा, तुम्ही लिहाल ते मी खरे मानतो.
कोंग्रेस असो वा इतर कुणि, हुषार नि ज्ञानी माणसांचा आदर झाला पाहिजे.

>>हा धागा फक्त मोदींचे मंत्रिमंडळ, मुद्दे आणि त्याला धरूनचे राजकारण ह्याबद्दलच आहे, तेवढ्यापुरतेच बोला.>>

याला मात्र अनुमोदन. इतर चर्चेसाठी वेगळे धागे काढता येतील.

लोकसत्ताच्या निष्ठा कुठे वाहिल्या आहेत ते जगजाहीर आहे. त्यात कुबेर तरी काय करणार? बरं ते एक वेळ राहू दे बाजूला.

तथाकथित सुशिक्षित आणि उच्चशिक्षित काँग्रेस मंत्र्यांनी काय दिवे लावले आत्तापर्यंत?
उच्चशिक्षित अर्थतज्ञ पंतप्रधान होते, त्यांनी १० वर्षात काय केले? घंटा!
कुबेर यांना मंत्र्यांचे शिक्षण भाजप सरकार आल्यावरच बरे आठवले?
त्यात त्यांच्या अग्रलेखातले शेवटचे वाक्य तर घाणेरडे म्हणावे इतके खोडसाळ आहे. इतके खोडसाळ लिहायला जाम हुशारी लागते हो, असा माणूस मूर्ख असूच शकत नाही!
गेल्या ६० हून अधिक वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसला अशा प्रकारचा जाब कधी कुबेर यांनी विचारला आहे का?
असे पूर्वग्रहदूषित आणि पक्षपातीच लिहायचे असेल तर कुबेर यांची हुशारी काय कामाची?

सर्व पक्षांचे अनेक मंत्री आत्तापर्यंत कमी शिक्षण असून चांगल्या कामाबद्दल प्रसिद्ध आहेत. तेव्हा शिक्षण नव्हे तर व्यवहारिक हुशारी महत्वाची. त्याहीपेक्षा आणि सर्वाधिक महत्वाचे ते त्यांनी केलेले काम. स्मृती इराणी यांनी अजय माकन यांना अतिशय संयत भाषेत "आधी काम बघा आणि मग बोला" असे उत्तर दिले आहे. मला वाटते तेच करावे, आधी काम बघावे आणि मग खुशाल टीका करावी.

केतकरांच्या निष्ठा वाहिलेल्या असायच्या होत्या हो.
कुबेरांचे अग्रलेख, विशेष लेखन वाचून त्यांच्या निष्ठा कमळात ठेवल्या होत्या असा माझा समज झाला. म्हणजे ते आजवर जे काही लिहीत होते ते पूर्वग्रहदूषित आणि पक्षपाती होते?
स्मृती इराणींच्या शिक्षणाचा मुद्दा सर्वप्रथम बहुतेक मधू किश्वर यांनी उचलला होता. त्यांची साक्ष यापूर्वी मायबोलीवर काढली गेल्याचे स्मरते. कोणी बरे? Wink

आधारकार्डासाठी आधीच एवढी यंत्रणा उभी करण्यासाठी बरेच मनुष्यबळ, आणि इतर रिसोर्सेस खर्ची घातलेले आहेत. त्यातून काही प्रमाणात का होईना नागरिकांचा डेटाबेस तयार झाला आहे. त्याला पुन्हा ऐरणीवर आणून, यंत्रणेत आवश्यक ते बदल करून, त्यातल्या त्रुटी दूर करून, हा डेटाबेस परिपूर्ण करून मोदींनी त्याचा उपयोग इतर सुविधांसाठी करून घेतला तर बरे होईल. तुम्हाला काय वाटते?

मयेकर, वरची पोस्ट नीट वाचा. "लोकसत्ताच्या निष्ठा" असे लिहीले आहे. कुबेरांच्या नव्हे. आणि सगळी पोस्ट आणि त्यातले इतर मुद्दे सोडून तेच दिसले तुम्हाला? क्या बात है. याला म्हणतात कॉंग्रेसनिष्ठा Wink मुद्द्यांवर बोलायचे नसेलच Proud

मधु किश्वर बोलल्या तेही चूक, आणि अजय माकन बोलले ते ही चूकच.

वरची पोस्ट नीट वाचा. परत. मराठीतच लिहीली आहे. त्यातला शेवटाचा पॅरा पुन्हा पुन्हा वाचा. जमल्यास Wink

स्म्रुती इराणीने शैक्षणिक अर्हता खोटी दिली असेल तर तिचा राजीनामा घेतला पाहिजे.

शैक्षणिक अर्हता कमी असणे हा गुन्हा नाही.

पण तो लपवुन आपली बनावट अर्हता दाखवणे हा गुन्हाच आहे.

अख्ख्या प्रतिसादात कुबेरांचे नाव स्वतः च किती वेळा लिहिले आहेत ते वाचा. कुबेर लोकसत्तेत आल्यापासून काँग्रेस सरकारवर त्यांच्या त्याच त्याच लाडक्या शब्दांचे घाव घालताहेत. मोदी सरकारविरोधात एक अवाक्षर लिहिताच त्यांना शेलक्या शिव्या मिळू लागल्या?

मधु किश्वर काय म्हणतात बघा.
I earned the right to criticise Modi 4 ill advised appointment coz I had honesty to praise him for great work as GujCM despite facing abuses

HRD needs a head who can steer dextrously between Left &Right extremists in academia to define sensible course unfettred by partisan agandas

Smriti Irani's appointment not the only one disappointing or controversial but its like an avoidable grahna on a bright &shining rising sun!

Smriti Irani defenders please note:My sentiments echoed with great fervor within BJP circles.BJP insiders saying much harsher things than me

>> कुबेर लोकसत्तेत आल्यापासून काँग्रेस सरकारवर त्यांच्या त्याच त्याच लाडक्या शब्दांचे घाव घालताहेत.>>

अरेवा, सुंदर. तसे असेल तर वरचे माझे विधान मागे घ्यावेच लागेल.
पण मला एखादे उदाहरण द्याल का. सिरिअसली विचारतोय.

आणि सगळ्यात महत्वाचा मुद्द्दा. राजकारणात शिक्षण चांगले असावे मान्य, मात्र शिक्षण नसेल तर तो मंत्री कामच करु शकत नाही हे लॉजिक मात्र मधु किश्वर, अजय माकन, आणि कुबेर यांचेही चुकलेच आहे.

पुन्हा एकदा एक पॅरा टाकतो इथे. तुम्ही वाचतच नै म्हटल्यावर काय करा:

सर्व पक्षांचे अनेक मंत्री आत्तापर्यंत कमी शिक्षण असून चांगल्या कामाबद्दल प्रसिद्ध आहेत. तेव्हा शिक्षण नव्हे तर व्यवहारिक हुशारी महत्वाची. त्याहीपेक्षा आणि सर्वाधिक महत्वाचे ते त्यांनी केलेले काम. स्मृती इराणी यांनी अजय माकन यांना अतिशय संयत भाषेत "आधी काम बघा आणि मग बोला" असे उत्तर दिले आहे. मला वाटते तेच करावे, आधी काम बघावे आणि मग खुशाल टीका करावी.

लोकसत्ताचाही रोख चुकीचा असू शकतो, खोडसाळ ई नसला तरी. अधेमधेच शिक्षण सोडायला लागलेल्या मुलामुलींपुढची आव्हाने उच्चशिक्षित पांढरपेशा व्यक्तीपेक्षा बारावीनंतर शिक्षण सोडलेल्या व्यक्तीलाच जास्त माहीत असण्याची शक्यता आहे. जगातील टॉप १०० विद्यापीठांत भारत नाही याइतकेच कोट्यावधी मुले शालेय शिक्षण पूर्ण करत नाहीत, त्यांना शाळेत खेचण्याकरिता आवश्यक असलेल्या सुविधा, जेवण इ योग्य रीतीने मिळते की नाही याबद्दलची आस्था ही पदव्युत्तर शिक्षणापेक्षा महत्त्वाची आहे. ती स्मृती इराणी यांना आहे की नाही ते काही दिवसांत कळेल. तोपर्यंत एक चान्स द्यायला काय हरकत आहे?

भारतातील शिक्षणासंदर्भात, मनुष्यबळ विकास संदर्भात हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा नाही का? आणि तो समजण्याकरिता बारावी पुढे शिक्षण न घेतलेली व्यक्ती लायक नाही असे का वाटते?

स्मृती इराणि यांची भाषणे, त्यांच्या मुलाखती कुणी पाहिल्या आहेत का. उच्चशि़क्षित लोकांपेक्षा त्यांना समस्यांची आणि प्रश्नांची जाण अधिक आहे. त्या निश्चितच चांगले काम करतील. न केल्यास टी़का जरूर करावी.

रॉबीनहूड,

कुबेरांचा लेख वाचला. त्यात वर्णिलेली परिस्थिती मला मान्य आहे. लेखातलं हे विधान कळीचं आहे :

>> इतक्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत स्मृती इराणी यांना या खात्याचा कार्यभार सांभाळायचा आहे. प्रश्न मुळापासून
>> समजून घेतानाच अनेकांची दमछाक होते, तेव्हा या बाईंना ते कितपत कळतील, याबद्दल शंका घेण्यास वाव आहे

एकवेळ हा युक्तिवाद ग्राह्य धरूया. कुबेरांच्या म्हणण्याप्रमाणे स्मृतीबाईंनी पदवी घ्यायचं ठरवलं. तर मग कुठली पदवी घेतल्याने हे प्रश्न त्यांना मुळापासून समजावून घेता येतील? पदवीधर असल्याने वा नसल्याने या परिस्थितीत नक्की काय फरक पडणार आहे? पदवीवर अडून बसायला हवंच का?

आ.न.,
-गा.पै.

भरत मयेकर | 29 May, 2014 - 11:45
<पण मला एखादे उदाहरण द्याल का. सिरिअसली विचारतोय.> शोधा की.
आता पाच वर्षे वेळच वेळ आहे ना . डोळा मारा

मी का शोधू?
>> कुबेर लोकसत्तेत आल्यापासून काँग्रेस सरकारवर त्यांच्या त्याच त्याच लाडक्या शब्दांचे घाव घालताहेत. >>
हे तुमचेच वाक्य आहे ना. त्यावर मी म्हणालो तसे त्यांनी केल्याचे उदाहरण द्या.

याचा अर्थ तुमच्याकडे उदाहरण नाही Happy

परत परत चर्चेचा सूर 'काँन्ग्रेसने/भाजपने केले तेंव्हा कुठे गेला तुझा धर्म' याच लाईनीवर जाणार असेल तर मोदी सरकारच्या कोणत्याच निर्णयावर उहापोह शक्य होणार नाही.
बारावी पास व्यक्तीची क्षमता आहे की नाही ते कळायला जरा वेळ तर द्या! तसेही प्रत्येक पॉलिसी डिसिजन पीएमओच्याच संमतीने होणार अशी रचना केलेली आहे त्यामुळे प्रत्येक महत्वाचा निर्णय मोदींच्या मताप्रमाणेच होणार आहे. http://indianexpress.com/article/india/politics/a-first-pmo-empowers-its...

फारएण्डः
>>लोकसत्ताचाही रोख चुकीचा असू शकतो, खोडसाळ ई नसला तरी. >>
मान्य. तसे असू शकते नक्कीच.

>>अधेमधेच शिक्षण सोडायला लागलेल्या मुलामुलींपुढची आव्हाने..................त्यांना शाळेत खेचण्याकरिता आवश्यक असलेल्या सुविधा, जेवण इ योग्य रीतीने मिळते की नाही याबद्दलची आस्था ही पदव्युत्तर शिक्षणापेक्षा महत्त्वाची आहे. ती स्मृती इराणी यांना आहे की नाही ते काही दिवसांत कळेल. तोपर्यंत एक चान्स द्यायला काय हरकत आहे?>>>>

शाब्बास फारएण्ड, हे सुद्धा बरोब्बर. दुर्दैवाने ही जाण अनेकांना नाही हे दिसतच आहे. बॅलन्स्ड विचारांबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.

आगाऊ:
>>बारावी पास व्यक्तीची क्षमता आहे की नाही ते कळायला जरा वेळ तर द्या! >>
तुमचेही अभिनंदन. अत्यंत योग्य विचार.

Pages