कूकिज् एन् क्रिम आईसक्रिम

Submitted by मंजूडी on 12 May, 2014 - 01:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ कप दूध
२ कप मिल्क पावडर
१ कप अमूल फ्रेश क्रिम
ओरीओ बिस्किटांचा व्हॅनिला फ्लेवरचा मोठा पुडा (२० रुपयेवाला)
चवीप्रमाणे साखर
२-३ थेंब व्हॅनिला एसेन्स

क्रमवार पाककृती: 

दूध आणि मिल्कपावडर एकत्र करून एकदम गुळगुळीत ब्लेंड करून घ्या. ओरीओ बिस्किटं एकेक उघडून त्याचं क्रिम काढून या मिश्रणात घाला. ब्लेंड करा. आता अमूलचं फ्रेश क्रिम आणि व्हॅनिला इसेन्स घालून मस्तपैकी पाच-सहा मिनिटं ब्लेंड करा. मिक्सरपेक्षा ब्लेंडरने केलं तर आईसक्रिमचा पोत जास्त छान येईल. मिश्रणाची चव बघून आवडीप्रमाणे साखर मिसळा. ओरिओ बिस्किटांचा ओबडधोबड चुरा यात घालून चमच्याने ढवळून डीप फ्रिजमधे सेट व्हायला ठेवा. थोडा चुरा वरून टॉपिंगसाठी घाला.

सेट झाल्यावर गारेगार क्रिमी आईसक्रिम चाटूनपुसून खा. हा फ्लेवर अगदी अमूलच्या कूकिज् एन् क्रिम फ्लेवरसारखा लागतो.

cookies n creme.jpg
वाढणी/प्रमाण: 
अमूलचा एक लिटर आईसक्रिमचा टब भरून आईसक्रिम होते.
अधिक टिपा: 

मुग्धटलीच्या लोकप्रिय धाग्यावर प्रतिसादांनी ४०० चा टप्पा ओलांडलेला आहे. तिथे प्रतिसादात ही पाककृती लिहिली तर पुढच्या प्रतिसादांमधे हरवून जाईल. आणि मग मागची पानं शोधत बसावी लागतात. म्हणून हा वेगळा धागा. बाकीचेही मायबोलीकर जे असा वेगळा फ्लेवर करून पाहतील त्यांनी स्वतंत्र धाग्यावर त्याची पाककृती लिहावी ही विनंती.

मी पहिली बॅच केली तेव्हा त्यात फ्रेश क्रिम घातलं नव्हतं. त्यामुळे ते सेट व्हायला खूपच (२४ तास) वेळ लागला. मग पुढची बॅच केली तेव्हा कविन, मेधा२००२ सावलीने सुचवल्याप्रमाणे फ्रेश क्रिम घालून केली आणि ती फारच छान झाली.

माहितीचा स्रोत: 
मुग्धटली - http://www.maayboli.com/node/45309
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिस्किटांमधलं क्रिम काढून ते ब्लेंड करायचं काही खास कारण आहे का?>> एकतर क्रिम वाया घालवायचं नाही Wink आणि दुसरं कारण म्हणजे मिश्रणाला चांगला स्मूथनेस येतो.
क्रिमसकट बिस्किटं चुरून घातली तर चिकट होतात.

काल रात्रीच केलं आणि सेट करायला ठेवलयं. सकाळी गडबडीत टेस्ट करायला जमलं नाही पण करायला एकदम सोप्पी आहे आणि बहुतेक चांगलच झालं असणार Wink

Pages