'आजोबा'च्या पुण्यातील शुभारंभाच्या खेळाची तिकिटं उपलब्ध आहेत

Submitted by माध्यम_प्रायोजक on 8 May, 2014 - 00:16

'आजोबा' या चित्रपटाचा शुभारंभाचा खेळ शुक्रवार दि. ९ मे, २०१४ रोजी पुण्याच्या सिटीप्राईड,कोथरुड, चित्रपटगृहात संध्याकाळी आयोजित केला आहे.

चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ व अनेक मान्यवर या खेळाला उपस्थित राहणार आहेत.

मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या चित्रपटांच्या शुभारंभाच्या खेळांना मायबोलीकर उपस्थित असतात. त्याप्रमाणे 'आजोबा'च्या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.

या खेळाची अगदी मोजकी तिकिटं आपल्याकडे शिल्लक आहेत.

या खेळास उपस्थित राहू इच्छिणार्‍यांनी कृपया chinmay@maayboli.com या पत्त्यावर आपल्या दूरध्वनीक्रमांकासह इमेल पाठवावी.

या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहून नेहमीप्रमाणेच मायबोलीकर या खेळाबद्दल व चित्रपटाबद्दल भरभरून लिहितील, ही खात्री आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभा१,
मला तुमची इमेल मिळालेली नाही.

मोजकीच तिकिटं असल्यानं इमेल केलेल्या सर्वांनाच तिकिटं देता येतील, असं नाही. Sad

शोभा१,
मला तुमची इमेल मिळालेली नाही. >>>>>>>>>>>परत केलेय. मिळाली का सांगा.

मोजकीच तिकिटं असल्यानं इमेल केलेल्या सर्वांनाच तिकिटं देता येतील, असं नाही. अरेरे>>>>>>मला तिकीट नक्की मिळेल का ते सांगा. नाहीतर उगीच हेलपाटा नको. Happy

शोभा१,
तुम्हांला तिकीट मिळणार असेल, तर उद्या सकाळपर्यंत इमेल येईल.

आणि तुमची इमेल अजूनही मिळालेली नाही. वर दिलेल्या पत्त्यावरच करताय ना?

आणि तुमची इमेल अजूनही मिळालेली नाही. वर दिलेल्या पत्त्यावरच करताय ना?>>>>>>>>>>>त्या पत्त्यावरची मिळाली नाही. म्हणून संपर्कातून पाठवली. Uhoh

आर्या, तुझ्या मेल आयडीवरून माझी इमेल पाठव ग. Happy

चिनुक्स! शोभा१ ची ईमेल मिळाली नसेल तरी माझ्या ईमेलमधे मी आम्हा तिघींचं तिकीट बुक करायला सांगितलय!! प्लिज तेच कन्सिडर करा.