(हे संपूर्ण लिखाण अनन्यानेच केलं आहे मी (विनार्च) फक्त तिला टाईप करुन द्यायला मदत केली आहे)
काही दिवसांपूर्वी आई म्हणाली " अगं बघ मायबोलीवरचा हा वाघोबा... रंगव पटकन . कारण त्याचं बक्षीस काय आहे सांगू? " मी लगेच म्हणाले "सांग ना आई "
" आजोबाच्या प्रिमियरची तिकीट "
"आई हे प्रिमियर काय असतं?" मी आईला विचारलं
ती म्हणाली " अगं पिक्चरचा पहीला शो. पिक्चरच्या संबंधीत काम केलेले सगळेजण येणार तिथे."
मी म्हटलं " मग! वाघोबा पण येणार का तिथे?
" हो..... कदाचित येइलही"
मग मी मनाशी ठरवल की काही झालं तरी ही स्पर्धा जिंकायचीच आणि रंगवून टाकला मस्त "आजोबा"....
दुसर्याच दिवशी आई म्हणाली ,"अगं, आपल्याला प्रिमिअरला जायचय" .
मी परत खात्रीकरुन घेतली " नक्की येणार ना वाघोबा???"
आई म्हणाली,"जाऊन बघ तर "
मंगळवारी संध्याकाळी मी पटापट तयारी करुन बाबाबरोबर निघाले..... शेवटी प्रश्न वाघोबाचा होत ना
तिथे पोहचल्यावर मला माझ्याच एवढ्या मुली खेळताना दिसल्या, मी ही त्यांच्यात सामील झाले. सानिका, नुपूर, देविका यांच्याशी कधी गट्टी जमली ते कळलच नाही :-)... मग काय सॉल्लीड धम्माल. खेळता खेळता आम्हाला वाघोबा दिसला..... चष्मेवाला . मी आणि देविकाने जाऊन त्याला मिठीच मारली. कस्ला मऊ मऊ होता तो
पण घाबरला बहूतेक तो आम्हाला.... कारण लगेच बाय करुन निघून गेला. नंतर तिथे एक एक टिव्ही मध्ये पाहीलेली लोकं दिसायला लागली. त्यांच्याबरोबर आमचे जिप्सी काकाने भरपूर फोटो काढले.... वाघोबा बरोबर पण बर का
आणि हो...त्याला वाघोबा म्हणून हाक मारायची नाही कारण तो बघतच नाही मग आपल्याकडे , आजोबा म्हटल की लगेच बघतो आता पर्यंत त्याची भिती चेपली होती बहूदा कारण तो आमच्या बरोबर खेळू लागला.
इतक्यात कविता मावशीने आम्हाला गेट जवळ उभं केल आणि आत घेऊन गेली पिक्चर बघायला आणि चालू पण झाला लगेच पिक्चर.... सगळीकडे काळेख आणि संपूर्ण स्क्रीनवर गवतच गवत.. त्यातून फक्त वाघोबाच्या मिशा दिसत होत्या. इतक्यात वाघोबाच्या डरकाळीचा मोठ्ठा आवाज आला..... मी कसली दचकले ... पुढच्याच क्षणी जंगलातला वाघोबा दिसायला लागला.
खूप मस्त होता पिक्चर ....मधे मधे वाघोबाचे कार्टून सीन्स होते ते ही खूप आवडले.
फक्त एक सीन नाही समजला, ज्यात ज्ञानोबा पूर्वाला विचारतो की " तुमच्या घरातले कुठे आहेत? त्यावर ती म्हणते ," तुम्हाला हे काम जे तुम्ही करताय ते आवडत का?
तो म्हणतो,"हो"
ती : "मग तुमच्या घरातले नातेवाईक पण आवडतात का ?"
तो : "हो तर"
ती : "तुला जर ह्या दोघांपैकी एकाला सोडाव लागल तर तू काय सोडशील ?"
यावर तो एकदम गप्प बसतो.तिला काय म्हणायच होत ते मला कळलच नाही.
घरी आल्यावर आईला सीन समजाऊन सांगून तिला विचारल तर ती म्हणाली ," अरे बाळा, बिबट्यासाठी ती तिचे नातेवाईक सोडते.... इतक ती तिच्या कामावर प्रेम करत असते "
हा पिक्चर पाहून इतक मात्र पूरेपूर पटल की वृक्षतोड थांबवली पाहिजे.....जंगलं वाचवली पाहिजेत .... भरपूर झाड लावायला हवीत म्हणजे कधी कोणत्या प्राण्यावर स्वतःच घर सोडून बाहेर पडायची वेळ येणार नाही.
थिएटरच्या बाहेर येऊन पाहतो तर आजोबा आमच्या स्वागताला ऊभा....आम्ही धावत जाऊन पहिलं काम काही केल असेल तर त्याच्या शेपटीला सिमकार्ड शोधल
मी त्याला सांगणार पण होते की नेक्स्ट टाईम तू वोडाफोनच सिमकार्ड घे, तुला चांगल नेटवर्क मिळेल ....
पण बाबा म्हणाला ," बस झाल आता , घरी जायचय"
ही सगळी मजा मजा मला मायबोलीमुळे करता आली .थॅन्क यु "मायबोली"
ओह अनन्या, कसलं गोड
ओह अनन्या, कसलं गोड लिहिलंयस.. कालचे सर्व सीन डोळ्यासमोर आणलेस परत!!! शाब्बास!!!
गोड लिहिलं आहे
गोड लिहिलं आहे
गोड लिहिलयस तू अनन्या
गोड लिहिलयस तू अनन्या
क्या बात है अनन्या!!! मी
क्या बात है अनन्या!!!
मी त्याला सांगणार पण होते की नेक्स्ट टाईम तू वोडाफोनच सिमकार्ड घे, तुला चांगल नेटवर्क मिळेल ....
पण बाबा म्हणाला ," बस झाल आता , घरी जायचय">>>>>>
Godul ahe pillu agadi
Godul ahe pillu agadi
shabbas ananya! mast lihilayes
ani mayboliwar amhi tuzi sagali chitra suddha baghato bar ka
khup mast chitr kadhates tu
ashich shahani shahani raha kayam
आ़ज सकाळ पासून सुरु होता हा
आ़ज सकाळ पासून सुरु होता हा लेखनाचा कार्यक्रम .... सुटलो बाबा .... दिवस भर शांत शांत घर सहनच होत नाही
मायबोलीचे तसेच माबोकरांचे अगदी मनापासून आभार___/\___ माझ्या लेकीचे कलागूण खूलवण्यात तुमचा खूप मोठा वाटा आहे
मस्त लिखाण आहे! आवडलं आम्ही
मस्त लिखाण आहे! आवडलं
आम्ही धावत जाऊन पहिलं काम काही केल असेल तर त्याच्या शेपटीला सिमकार्ड शोधल
मी त्याला सांगणार पण होते की नेक्स्ट टाईम तू वोडाफोनच सिमकार्ड घे, तुला चांगल नेटवर्क मिळेल ....
पण बाबा म्हणाला ," बस झाल आता , घरी जायचय"
अनन्या, अगदी गोड लिहिलंयस...
अनन्या, अगदी गोड लिहिलंयस...
छानच लिहिलंय !
छानच लिहिलंय !
क्युट लिहिलंय !
क्युट लिहिलंय !
अरे वा, किती छान लिहिलंय.
अरे वा, किती छान लिहिलंय. शाब्बास अनन्या.
कसलं गोड लिहीलयस तू अनन्या.
कसलं गोड लिहीलयस तू अनन्या. एक मोठ्ठ चॉकलेट तुला माझ्याकडून
अरे व्वा! मस्त सूंदर लिखाण.
अरे व्वा! मस्त सूंदर लिखाण.
खरच कसलं गोड लिहिलंय
खरच कसलं गोड लिहिलंय
काय उच्च लिहिलंय अनन्याने,मजा
काय उच्च लिहिलंय अनन्याने,मजा आली
मस्त लिहिलं आहे
मस्त लिहिलं आहे
मस्त लिहलंय..
मस्त लिहलंय..
गोड लिहिलयस तू अनन्या. keep
गोड लिहिलयस तू अनन्या.
keep it up !!
कसलं गोड लिहिलंयस.. शाब्बास!
कसलं गोड लिहिलंयस.. शाब्बास!
छान. किती वर्षाची आहे
छान. किती वर्षाची आहे अनन्या?
वा, अनन्या, मस्तच लिहिलंय
वा, अनन्या, मस्तच लिहिलंय अग्दी ....
अनन्या मस्त लिहीलयस
अनन्या मस्त लिहीलयस गं...
आजोबाला भेटायलाच हवं असे वाटु लागलयं....
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
खुप छान अनन्या. प्रिमियरच्या
खुप छान अनन्या.
प्रिमियरच्या फोटोत या छोट्या बाहुल्या पाहील्या. वैयक्तिक ओळख सांगितली नसल्याने तुला चेहर्याने नाही ओळखत पण एव्हढ्या लहान वयातही खुप सुंदर लिहलयस अनन्या. तुला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
अरे वा मस्त ग अनन्या.
अरे वा मस्त ग अनन्या.
माझ्या लेकीचे भरभरुन कौतुक
माझ्या लेकीचे भरभरुन कौतुक केल्याबद्द्ल सगळ्यांचे खूप खूप आभार
वरच्या लेखनात एक चूक आहे जी आज सकाळी तिच्या बाबाने दाखवली.... ज्या संवादाबद्दल तिने लिहील तो उर्मिला आणि शिंदे मध्ये झाला नसून उर्मिला आणि ज्ञानोबा ( ॠषिकेश जोशी ) मधे झाला आहे. मी चित्रपट पाहिल्या नसल्यामुळे माझ्या ते ध्यानात आले नाही ... सॉरी .
पात्रांची नावे सांगितल्याबद्द्ल कविनचे आभार
कांदेपोहे, अनन्या दहा वर्षाची आहे.
निल्सन, त्या बाहुल्यांमधली पिंक बाहुली माझी आहे
अनन्या सध्या तिच्या त्वायकान्डोच्या बेल्ट एक्झाम मधे बिझी आहे, ती संपली की एक दोन दिवसात इथे येऊन सगळ्यांशी बोलेलच
वरील लेखनात योग्य तो बदल केला
वरील लेखनात योग्य तो बदल केला आहे ...
जिथं सीन टु सीन हॉलीवुड कॉपी
जिथं सीन टु सीन हॉलीवुड कॉपी करण्याचे दिवस सुरु आहेत,
मराठी मरणासन्न अवस्थेत पोहचली त्याची जबाबदारी कोणाची यावर वादंग माजताहेत,
...
...
पण एका मराठी तरुणाला असा सिनेमा बनवता येतो,
मायबोली त्याच्या प्रमोशन मधे धमाल आणते,
तो तुम्ही मुलांना दाखवता,
तुमची दहा वर्षाची मुलगी तो सिनेमा संपूर्ण पाहून समजवून घेते,
त्यावर मराठीत विचार करते, नि ते विचार मराठीत लिहू पाहते.
हे त्या शुभवर्तमान धाग्या सारखे काही तरी चागलं आहे ही जाणीव होते.
विनार्च... तुमंच मनापासून अभिनंदन,
संदीप, प्रतिसाद आवडला.
संदीप, प्रतिसाद आवडला.
संदीप, प्रतिसाद आवडला. +१
संदीप, प्रतिसाद आवडला. +१
Pages