(हे संपूर्ण लिखाण अनन्यानेच केलं आहे मी (विनार्च) फक्त तिला टाईप करुन द्यायला मदत केली आहे)
काही दिवसांपूर्वी आई म्हणाली " अगं बघ मायबोलीवरचा हा वाघोबा... रंगव पटकन . कारण त्याचं बक्षीस काय आहे सांगू? " मी लगेच म्हणाले "सांग ना आई "
" आजोबाच्या प्रिमियरची तिकीट "
"आई हे प्रिमियर काय असतं?" मी आईला विचारलं
ती म्हणाली " अगं पिक्चरचा पहीला शो. पिक्चरच्या संबंधीत काम केलेले सगळेजण येणार तिथे."
मी म्हटलं " मग! वाघोबा पण येणार का तिथे?
" हो..... कदाचित येइलही"
मग मी मनाशी ठरवल की काही झालं तरी ही स्पर्धा जिंकायचीच आणि रंगवून टाकला मस्त "आजोबा"....
दुसर्याच दिवशी आई म्हणाली ,"अगं, आपल्याला प्रिमिअरला जायचय" .
मी परत खात्रीकरुन घेतली " नक्की येणार ना वाघोबा???"
आई म्हणाली,"जाऊन बघ तर "
मंगळवारी संध्याकाळी मी पटापट तयारी करुन बाबाबरोबर निघाले..... शेवटी प्रश्न वाघोबाचा होत ना
तिथे पोहचल्यावर मला माझ्याच एवढ्या मुली खेळताना दिसल्या, मी ही त्यांच्यात सामील झाले. सानिका, नुपूर, देविका यांच्याशी कधी गट्टी जमली ते कळलच नाही :-)... मग काय सॉल्लीड धम्माल. खेळता खेळता आम्हाला वाघोबा दिसला..... चष्मेवाला . मी आणि देविकाने जाऊन त्याला मिठीच मारली. कस्ला मऊ मऊ होता तो
पण घाबरला बहूतेक तो आम्हाला.... कारण लगेच बाय करुन निघून गेला. नंतर तिथे एक एक टिव्ही मध्ये पाहीलेली लोकं दिसायला लागली. त्यांच्याबरोबर आमचे जिप्सी काकाने भरपूर फोटो काढले.... वाघोबा बरोबर पण बर का
आणि हो...त्याला वाघोबा म्हणून हाक मारायची नाही कारण तो बघतच नाही मग आपल्याकडे , आजोबा म्हटल की लगेच बघतो आता पर्यंत त्याची भिती चेपली होती बहूदा कारण तो आमच्या बरोबर खेळू लागला.
इतक्यात कविता मावशीने आम्हाला गेट जवळ उभं केल आणि आत घेऊन गेली पिक्चर बघायला आणि चालू पण झाला लगेच पिक्चर.... सगळीकडे काळेख आणि संपूर्ण स्क्रीनवर गवतच गवत.. त्यातून फक्त वाघोबाच्या मिशा दिसत होत्या. इतक्यात वाघोबाच्या डरकाळीचा मोठ्ठा आवाज आला..... मी कसली दचकले ... पुढच्याच क्षणी जंगलातला वाघोबा दिसायला लागला.
खूप मस्त होता पिक्चर ....मधे मधे वाघोबाचे कार्टून सीन्स होते ते ही खूप आवडले.
फक्त एक सीन नाही समजला, ज्यात ज्ञानोबा पूर्वाला विचारतो की " तुमच्या घरातले कुठे आहेत? त्यावर ती म्हणते ," तुम्हाला हे काम जे तुम्ही करताय ते आवडत का?
तो म्हणतो,"हो"
ती : "मग तुमच्या घरातले नातेवाईक पण आवडतात का ?"
तो : "हो तर"
ती : "तुला जर ह्या दोघांपैकी एकाला सोडाव लागल तर तू काय सोडशील ?"
यावर तो एकदम गप्प बसतो.तिला काय म्हणायच होत ते मला कळलच नाही.
घरी आल्यावर आईला सीन समजाऊन सांगून तिला विचारल तर ती म्हणाली ," अरे बाळा, बिबट्यासाठी ती तिचे नातेवाईक सोडते.... इतक ती तिच्या कामावर प्रेम करत असते "
हा पिक्चर पाहून इतक मात्र पूरेपूर पटल की वृक्षतोड थांबवली पाहिजे.....जंगलं वाचवली पाहिजेत .... भरपूर झाड लावायला हवीत म्हणजे कधी कोणत्या प्राण्यावर स्वतःच घर सोडून बाहेर पडायची वेळ येणार नाही.
थिएटरच्या बाहेर येऊन पाहतो तर आजोबा आमच्या स्वागताला ऊभा....आम्ही धावत जाऊन पहिलं काम काही केल असेल तर त्याच्या शेपटीला सिमकार्ड शोधल
मी त्याला सांगणार पण होते की नेक्स्ट टाईम तू वोडाफोनच सिमकार्ड घे, तुला चांगल नेटवर्क मिळेल ....
पण बाबा म्हणाला ," बस झाल आता , घरी जायचय"
ही सगळी मजा मजा मला मायबोलीमुळे करता आली .थॅन्क यु "मायबोली"
तुमची दहा वर्षाची मुलगी तो
तुमची दहा वर्षाची मुलगी तो सिनेमा संपूर्ण पाहून समजवून घेते,
त्यावर मराठीत विचार करते, नि ते विचार मराठीत लिहू पाहते.
हे त्या शुभवर्तमान धाग्या सारखे काही तरी चागलं आहे ही जाणीव होते. >>>> संदीप अगदी अगदी.....मला माझ्या मुलीला आपल्या भाषेची गोडी लावायचीच होती. मराठीतल्या दर्जेदार साहित्याचा आस्वाद तिला घेता यावा असं कायम वाटत आलय आणि माझ्या ह्या प्रयत्नात मायबोलीचा खूप मोठा वाटा आहे हे मला आवर्जून सांगावेसे वाटतय
सही ए... विनार्च , अनन्या...
सही ए... विनार्च , अनन्या... छान लिहिलाय ..... जुस्त एक गंमत , ते स्क्यान केलेले तीचे चित्र पण इथेच टाकता येइल का... काही जणांनी स्पर्धेचा धगा कदचित बघितल नसेल...
अनन्या, मस्त लिहिलयस!
अनन्या, मस्त लिहिलयस!
अरे कसल गोड लिहिसय शाब्बास
अरे कसल गोड लिहिसय शाब्बास अनन्या
अनन्याच खरोखर मना पासून खूप
अनन्याच खरोखर मना पासून खूप खूप कौतुक. खूप सुन्दर लिहिल आहेस.
खरच दहा वर्षाची मुलगी मराठीतून एवढा विचार करू शकते आणि तो शब्दात ही मांडू शकते ही खरचं मनाला खूप सुखावणारी, दिलासा देणारी गोष्ट आहे. विनार्च आपल्यासारखे पालक आणि अनन्या सारखी मुलं असतील तर आपल्या मराठीला अजून पुढच्या कित्येक पिढ्या मरण नाही.
अनन्या, शाब्बास, मस्तच
अनन्या, शाब्बास, मस्तच लिहिलंयस
अनन्या, खूप छान लिहिले आहेस!
अनन्या, खूप छान लिहिले आहेस!
संदीप, प्रतिसाद
संदीप, प्रतिसाद आवडला.
+७८६
असेच म्हणतो इथे
परीक्षण खूपच छान
Pages