जसे कंबरेवर तुझे हात..

Submitted by वैवकु on 7 May, 2014 - 02:53

असावीत त्यांच्या नशीबात दु:खे
पडावीत माझ्याच प्रेमात दु:खे?

मला भेटणार्‍या भिकारी सुखांनो
लुटा आज माझी अतोनात दु:खे

कितीवार त्यांची करू चौकशी मी
कथेनात काही खरी बात दु:खे

दिवाळेच काढून रब्बी निघाला
पुन्हा पेरली मी खरीपात दु:खे

उदासीन हा जीवनाचा उकाळा
नि गवती चहाची सुकी पात दु:खे

तुझ्या आणि माझ्या बखेड्यात दु:खे
तुझ्या आणि माझ्या सलोख्यात दु:खे

असा घालती घट्ट् विळखा मनाला
जसे कंबरेवर तुझे हात.. दु:खे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला भेटणार्‍या भिकारी सुखांनो
लुटा आज माझी अतोनात दु:खे

दिवाळेच काढून रब्बी निघाला
पुन्हा पेरली मी खरीपात दु:खे

उदासीन हा जीवनाचा उकाळा
नि गवती चहाची सुकी पात दु:खे

तुझ्या आणि माझ्या बखेड्यात दु:खे
तुझ्या आणि माझ्या सलोख्यात दु:खे <<< वा वा

आयला कमरे वाला शेर म्हणायचे होते वैभ्या ,,मायला तो इथे पेस्ट झाला वाटते ...असू देत

आता नव्याने विठ्ठला

असा घालती घट्ट् विळखा मनाला
जसे कंबरेवर तुझे हात.. दु:खे ला बेक्कार आवडला

सुंदर रचना. उकाळा हा शब्द माहित नव्हता पण अर्थ छान समजला पुढच्या मिसर्‍यामुळे.
खूप सहज, आशयगर्भ.