परदेसाई (विनय) याने काढलेला पहिला हिंदी चित्रपट.. 100: The Tribute

Submitted by परदेसाई on 1 May, 2014 - 12:07

https://www.youtube.com/watch?v=7r3iB5qXtII&sns=em
https://www.youtube.com/watch?v=DTx5DVo8FWE#t=205
https://www.youtube.com/watch?v=ypQW9TN8Dv0&list=PL8uFpWSltvzNfi9JEwZ06n...

१९१३ साली आलेल्या पहिल्या हिंदी चित्रपटाला आता १०० वर्षं पूर्ण झाली. या काळात चित्रपट कृष्णधवल मूक चित्रपटापासून रंगीत बोलपटापर्यंत पोहोचला. आता तर चित्रफित (फिल्म) राहिलीच नाही कारण डिजिटल माध्यम सुरू झालं.

या शंभर वर्षांमधे चित्रपटात वेगवेगळ्या प्रकारचे बदल आले. म्हणजे संगीत बदललं, नृत्य बदललं, गायक गायिका बदलले, नायक नायिका बदलले, अभिनय बदलला. सगळं काही वेगळंच झाल.

राशी देसाई आणि सिध्दी सुंदर या दोन चित्रपटाच्या विद्यार्थिनी. हिन्दी चित्रपटाचं प्रेम, गाण्यांची , नृत्याची आवड आणि १०० वर्षं पूर्ण झाल्याची जाणीव. मग तोच विषय घेऊन त्यावर एक पटकथा लिहून त्यावर एक short film काढावी असं ठरलं .

या चित्रपटामागे ३०+ NYU/SVA विद्यार्थ्यांची मेहनत आहे..
चित्रपटाची गाणी प्रशांत गिजरे (माबोकर) यानी संकलीत केली आहेत.. ( Tribute असल्याने गाणी त्या त्या चित्रपटातूनच घेतलेली आहेत).
रोहित गिजरे आणि राशी देसाई यानी नॄत्य दिग्दर्शन संभाळलंय.
आताच मायामीला पार पडलेल्या IIFA मधे रोहित सिनेकलाकरांबरोबर नाचूनही आलाय.
या चित्रपटातही तो २/३ दृश्यात दिसतो...

माधवी आणि प्रतीक देवस्थळी हे तर या सगळ्यांचे नृत्यशिक्षक.. त्यानी आणि त्यांच्या विद्यार्थ्यानी या चित्रपटासाठी नाच बसवलेत.... त्याच बरोबर Rutgers Sapa Group चे नर्तकही यात आहेत...

येत्या १६ मे ला हा चित्रपट पूर्ण होतोय, आणि त्याचे Premier आहे New York मधे.

https://www.facebook.com/100yearstribute
https://www.youtube.com/watch?v=2HyBJjw7Yks
https://www.youtube.com/watch?v=ldg4CTSHSAw

चित्रपट Student film Tribute असल्याने थेटरवर लावून तिकीटविक्री नाहीय, पण सगळ्यांना Youtube वर पहाता येईल.

100-Years-Poster.jpgविनंती: तुमच्या माबोकर नसलेल्या मित्रानीही हा चित्रपट पाहिला तर आम्हाला आनंद होईल. तेव्हा तुमच्या Email , Facebook इत्यादी माध्यमातून त्यानांही ह्या Link पाठवा...

आता अजून ठिकाणी...

http://urbanasian.com/bollywood/2014/05/a-tribute-to-100-years-of-hindi-...
https://www.youtube.com/watch?v=NgPl6vZViXA&feature=youtu.be
http://www.storypick.com/beautiful-tribute-100-years-bollywood-cinema-19...
http://www.pinkvilla.com/trending/bollywood/these-38-wonderful-facts-abo...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या कुलराजचं व्हिलन च्या जागेसाठी अ‍ॅप्लिकेशन रिजेक्ट झालंय ना <<< त्याचे Deposit जप्त झाले, तर आता तो काय करणार?

Proud

हा धागा मी आजच बघितला... Time Zone Difference मुळे असे बरेच धागे बघायचे राहुन जातात... असो...
चित्रपटा बद्दल 'राशी आणि टीम'चे अभिनंदन केलेले आहेच, सोबत तुझेही अभिनंदन केले आहे...

आता चित्रपट आणि स्टेज कलाकार आणि इतर मंडळीं कडे जमेल तशी 'तोंडी जाहीरात'बाजी सुरु आहेच (घरातलं पहिलंच फिल्म प्रॉडक्शन ना... Happy ...) ... आता पुढच्या (चित्रपटाच्या) कामाला लागा, हि विनंती...
Happy

धागा वाहता आहे... तेव्हा बर्‍याच प्रतिक्रिया नंतर वाहून जातात...
३२,००० ? हे कुठून आले? कमावले नाही म्हणुन जास्त आश्चर्य... Happy