रवा-काजू बर्फी (फोटोसहीत)

Submitted by गायू on 30 April, 2014 - 03:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

बारीक रवा-१ वाटी, साखर- २ वाट्या, दूध- १ वाटी (गायीचे,म्हशीचे कोणतेही), पातळ केलेले साजूक तूप- अर्धी वाटी, नेस्टले एव्हरीडे मिल्क पावडर- २ टेबलस्पून, खायचा रंग आणि इसेन्स जोडीने (म्हणजे गुलाबी खायचा रंग= रोझ इसेन्स, हिरवा रंग = पिस्ता इसेन्स, ह्याप्रमाणे), १०-१५ काजूंची पूड (दाण्याच्या कुटासारखी जाडसर)

क्रमवार पाककृती: 

रवा+साखर+दूध+तूप पातेल्यात एकत्र करून दीड तास ठेवावे. नंतर कढईत एकत्र करून गॅस वर मंद आचेवर सतत ढवळत राहावे. सुरुवातीला खूप तूप कडेने दिसेल
20140420_113602.jpg
पण साधारण १५ मिनिटांनी तूप एकत्र होऊन मिश्रण घट्टसर' व्हायला सुरुवात होते 20140420_114319.jpg.
जसजसे मिश्रण घट्ट होईल तसतसे बाजूने साखर दिसायला लागेल. समजा साखर दिसली नाही तरी साधारण २०-२५ मिनिटांनी मिश्रण घट्टसर होईल पण गोळा नाही होणार. नंतर गॅस वरून खाली काढून घट्ट मिश्रणात मिल्क पावडर,रंग आणि इसेन्स घालून पुन्हा नीट एकत्र करावे.20140420_115018.jpg
ताटाला तूप लावून गोळा थापावा.20140420_115845.jpg
हा गोळा गरम असतानाच थापावा लागतो त्यामुळे हातात प्लास्टिक ची पिशवी घालून थापावा,त्यावर लगेच काजूची पूड पसरवावी आणि परत थापावे म्हणजे पूड थोडी आत जाईल आणि मिश्रण आळून येईल. थोडे गार झाल्यावर वाटीच्या तळाने लेव्हलिंग करून घ्यावे आणि अर्ध्या-एक तासाने वड्या पाडाव्यात!
20140430_120410.jpg

वाढणी/प्रमाण: 
वरील मिश्रणाच्या साधारण १५-२० वड्या होतात.
अधिक टिपा: 

मी लाल रंग पावडर फॉर्म मध्ये आणि रोझ इसेन्स वापरला. पण त्यामुळे त्यांना केशरी रंग आला. खायचे रंग शक्यतो लिक्विड च वापरा, जास्त छान दिसतात.
मिल्क पावडर आणि काजू पूड ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. काजू पूड नसेल तर मिश्रण आळत नाही आणि वड्या पडत नाहीत. अनुभवावरून सांगते. Uhoh
ह्या वड्या जरा वेळखाऊ आहेत पण मस्त लागतात आणि आठवडाभर बाहेरही मस्त टिकतात.
समजा काही कारणाने भट्टी बिघडली, मिश्रण आळलेच नाही आणि वड्या पडल्या नाहीत तर सगळे मिश्रण पुन्हा कढईत थोडे तूप सोडून गरम करा, खाली उतरवून मिल्क पावडर आणि काजू पूड एकत्र घाला आणि थापा, सुटून येतील पण मऊ पडतील, तेंव्हा डब्यात घालून, वर टिशू पेपर नि झाकून फ्रीज मध्ये ठेवा आणि खायच्या वेळेस काढून परत डबा फ्रीज मध्ये ठेवा.
एवढ्या टीपा का दिल्यात ते कळलं असेलंच Rofl

माहितीचा स्रोत: 
वाहिनीची आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान दिसतायेत शूम्पी! पण नारळाच्या वड्याइतका पांढरा रंग नव्हता मिश्रणाचा! ह्या मस्त दिसतायेत पण एकदा रंग घालून ट्राय करून बघच!!

Pages