भाजणीचे थालीपीठ

Submitted by प्रमोद् ताम्बे on 20 April, 2014 - 22:14

भाजणीचे थालीपीठ
 थालीपीठ शेपू-भात-पोळी वापरुन.jpg
थालीपीटाचे साहित्य व कृती : थालिपीठ करतेवेळी थालीपिठाच्या भाजणीत खालील साहित्य कांदा,लसूण,कोथिंबीर,तिखट,मीठ,हळद,हिंग व पाणी घालून पीठ भिजवावे व त्याचे गोळे करून घ्यावेत व तव्यावर थोडेसे तेल घालून त्यावर भाकरीप्रमाणे थालिपीठ थापावे व बोटाने मध्यभागी एक व बाजूला तीन-चार भोके पाडावीत व त्यात चमच्याने थोडे थोडे तेल सोडावे व गॅसवर ठेवावे काही वेळानंतर थालीपीठ पलटावे व दुसर्याड बाजूने भाजून घ्यावे.
भाजणीचे गरमागरम थालीपीठ एका डिशमध्ये घेऊन त्यावर लोण्याचा गोळा किंवा साजूक तूप घालून कैरीचे लोणचे / खाराच्या मिरच्या किंवा गोड दहयासोबत खाण्यास द्यावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<थालिपिठे, आंबोळ्या, घावणे इत्यादी गोष्टी खुप हळूहळू बनतात. मोठी आणि मजबुत खाणारी फॅमिली असेल तर त्यांच्यासाठी हे पदार्थ करणारी व्यक्ती मेलीच समजा. >> +१

एकुणात सगळे (कोकणस्थ, देशस्थ, कायस्थ, कर्हाडे, मराठवाड्यातले, विदर्भिय.... इति) भाजणीचा(आपापल्या पद्धतीने) गोळा करुन तवा/कढई/पातेले इत्यांदीवर थापुन्/टाकुन/ वरुन फेकुन तेलावर खरपूस भाजुन खातात त्या पदार्थाला थालिपीठ म्हणतात हे सिद्ध झालय.

आमच्याकडे पातेल्यात ही करतात. अ‍ॅल्युमिनीयम्च्या , तव्यावर सुद्धा बाजुने तेल लावायचे मंद आचेवर झाकुन ठेवले की मस्त होते. जळाले की मात्र बेक्कार होते.

सायो प्लीज(च) आमट्यांच्या रेस्प्या लिही बरं. आमच्याकडे साधं किंवा फोडणीचं इतकी दोनच वरणं (घरात) माहितेत. आता त्या मैत्रीणींच्या आई कुठून आणू आमट्या खायला घालायला Proud

बाकी म्हणायचं तर तळ्कोकणात थालपीठ असू शकेल पण उत्तर कोकणात थापायच्या पाकॄ भाकरीचं प्रस्थ अधीक आहे.

पेथे च्या पॅल्स्टिक रिसायक्लींगला अनुमोदक Wink

आमच्या साबा, एक थालिपीट तव्यावर व दुसरे पितळेची परात असते त्याला आतील् बाजूने लावून ती परात तव्यावर झाकण लावून ठेवत असत. हे वरचे था. मउसर होते व जास्त छान लागते. घरातील मुलांना ते व
बाप्यांना तव्यावरचे खरपूस अशी विभागणी असे.

पेट थेरपी, नंदिनीच्या सज्जिगे रोटीवर गॅसवर डायरेक्ट थालिपीठ थापून नंतर तवा पाण्याखाली धरण्याबद्दल केवढी चर्चा झालीय ते तुम्ही वाचलेले दिसत नाही Proud
पण त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे त्यामुळे आता मीही प्लॅस्टीकवर थापून तव्यावर घालण्याचा प्रयत्न करते.

>>सायो प्लीज(च) आमट्यांच्या रेस्प्या लिही बरं. आमच्याकडे साधं किंवा फोडणीचं इतकी दोनच वरणं (घरात) माहितेत. >> वेका, मुद्दाम बीबी काढून कधी लिहीन ते माहीत नाही, पण काही तुझ्या विपुत लिहीते आज.

गॅसवर डायरेक्ट थालिपीठ थापून नंतर तवा पाण्याखाली धरण्याबद्दल केवढी चर्चा झालीय ते तुम्ही वाचलेले दिसत नाही >>> अगो, कश्शी गं बाई तू हुश्शार!!! Proud

Pages