गवार लाल भोपळा भाजी

Submitted by प्रमोद् ताम्बे on 16 April, 2014 - 20:20

गवार लाल भोपळा भाजी
 पांढरा भोपळा भाजी xxx_0.jpg
साहित्य : २५०ग्राम (पाव किलो) गवार , एक वाटी लाल भोपळ्याचे ( हयालाच काशिफळकिंवा डांगर असेही नांव आहे) बारीक चौकोनी आकाराचे तुकडे , फोडणीसाठी तेल, १०-१२ मेथी दाणे,मोहोरी, जिरे, हिंग, हळद, चवीनुसार लाल तिखट , ओल्या नारळाचा खवलेला चव , तीन चमचे शेंगदाण्याचे कूट , चवीपुरता गूळ , एक चमचा गोडा मसाला , चवीपुरते मिठ.
कृती : गवार स्वच्छ धुवून घ्यावी. प्रत्येक गवारीची दोन्ही बाजूची देठं मोडावीत आणि शिरा असेतील तर काढून टाकाव्यात. गवारीचे पेरभर तुकडे मोडून घ्यावेत. गॅसवर कुकरमध्ये गवार दोन शिट्ट्या करून वाफवून घ्यावी. वाफवताना गवारीमध्ये पाणी घालू नये. (वाफवण्यासाठी कूकरच्या तळाशी १ इंच पाणी असावे. गवार कूकरच्या आतील डब्यात ठेवावी व या डब्यात पाणी घालू नये)
गॅसवर एका कढईत तेल गरम करावे. मेथीदाणे घालून थोडे लालसर होवू द्यावे. मग मोहोरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. प्रथम भोपळ्याच्या फोडी फोडणीस टाकाव्यात. २-३ वाफा काढून भोपळा शिजू द्यावा. भोपळा बर्या पैकी शिजला कि वाफवलेली गवार घालावी. निट मिक्स करावे,मग लाल तिखट, गोडा मसाला, नारळ, दाण्याचा कूट आणि थोडे मिठ घालावे. मध्यम आचेवर १-२ वाफा काढाव्यात. नंतर गूळ घालून अजून एक वाफ काढावी.

टीप : लाल भोपळा व गवार हे एकमेकास पूरक असल्याने त्यास वैंजण असे म्हणतात,व हे कॉम्बिनेशन फारच चविष्ट लागते. तरीही कधी कधी गवारीची भाजी करताना आपण भोपळ्या ऐवजी शिजवलेला बटाटाही वापरलयास हरकत नाही. फक्त बटाटा शिजवून थोडावेळ तरी फ्रिजमध्ये ठेवावा. तसेच गवार आणि बटाटा एकत्रच फोडणीस घालावे, बटाटा शिजलेला असल्या कारणाने अजून शिजवायची गरज नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोळपाटावर बशी, बशीत वाटी, वाटीत भाजी वैंजणाची
****राव माझे पुरवा डोहाळे, हौस करत्ये पैंजणांची

Wink

क्या फोटू है बॉस!
रच्याकने : फोटोतील वस्तूंना नावे द्यायची अभिनव पद्धत उत्तम आहे.

सर,

ही भाजी तशी बर्‍याच मोठ्या प्रमाणावर केली जातेही. मी स्वतः लाल भोपळा खात नाही पण लाल भोपळा अतिशय न्युट्रिशियस असतो. त्याच्या बिया तर अत्यंत गुणकारी असतात. पण ह्या खालील वाक्याबाबत एक शंका:

>>>लाल भोपळा व गवार हे एकमेकास पूरक असल्याने <<<

ह्यात आपल्याला गवार व भोपळा हे आहाराच्या संतुलनाच्या दृष्टिकोनातून पूरक असतात असे सुचवायचे आहे का, तसे असल्यास त्याची कारणे कोणती असावीत.

मला वाटते आपल्याकडील पाककृती इतक्या 'स्वाद-ओरिएन्टेड' असतात की त्यातील पोषक गुणधर्म नाहीसेच होत असावेत, जसे पालेभाज्या वगैरे!

लाल भोपळा व गवार हे आहाराच्या संतुलनाच्या दृष्टिकोनातून पूरक आहेत की नाही हयाबद्दल मी नाही काही अधिकारवाणीने भाष्य करू क्षणार पण एकूणच स्वादाच्या पूरक आहेत हे मात्र नाकी. याच प्रमाणे श्रावण घेवडा व मटकी हे कॉम्बिनेशन तसेच पडवळ+वाल(डाळिंबी) हे कॉम्बिनेशन सुद्धा तितकेच चांगले आहे.त्यामुळे त्यांनाही त्या त्या भाज्यांचे वैंजणच संबोधले जाते.

भोपळा गोडसर तर गवार कडवट...म्हणून कदाचित चवीच्या दृष्टीकोनातून ही जोडी जमलेली असेल...मलाही ही भाजी आवडते
एरवी आरोग्याच्या दृष्टीने पाहिल्यास..दोन्हीही वातुळ आहे...असे वाचल्याचे आठवते.

हे पारंपारिक कॉम्बो आहे. मस्त होते ही भाजी. आणि पिवळा केशरी भोपळा व हिरव्या ग. शेन्गा.
यात मेथी दाण्यांबरोबर थोडा ओवा सुद्धा फोड्णीत टाकतात. छान स्वाद येतो.

ह्या कॉम्बो बद्दल वाचलय पण करुन बघीतली नव्हती किन्वा खाल्ली पण नाहीये. मात्र करुन बघणार. वातुळ असली तरी फोडणीत मेथ्या आणी ओवा घालायच्या, हाकानाका.

इब्लिसान्चा उखाणा भारी.:फिदी: