कि...र्र...र्र...तन

Submitted by शाबुत on 11 April, 2014 - 07:56

एका किर्तनात एक बाबा सांगत होता की
जग हे असेच आहे....
... ते बदलायला निघालेले कितीतरी बदलेले,
(..कारण ते मुळ प्रवाहात सामिल झाले.)
... कारण बोलणे सोपे - करणे अवघड! हे त्यांनाही माहिती आहे,
.... तरीही ते बोलत आहेत, अगदी वेगवेगळ्या पध्दतीने,
.... त्यांना वाटते की आम्ही काहीही बोललो तरी
.... त्यावर लोक विश्वास ठेवतात, कारण ते माना हलवतात,
(...आता माना हलविणारे रोजाने मिळतात.)
.... कारण ते भ्रमात जगतात, नाईलाजाने जगतात,
(...काहींना फक्त जिवंत राहायचं आहे... तेही दुसर्‍याच्या जिवावर.)
.... खरे तर जिवनाची तत्वे आम्हालाच ठाऊक आहेत,
.... असे ते म्हणतात!
कारण - आम्हालाच व्यवहार कळतो!
म्हातारा थोडा वेळ थांबला....
....ज्याला व्यवहार कळतो, तोच कुठेही यशस्वी होऊ शकतो
>> कारण ते जो बोलते - ते कधीच करत नाही
>> जे करतो - जे कोणाजवळ बोलत नाही
....
.... व्यवहार!
.... त्यात भावनांचाही व्यवहार आलाच!
.... आजकाल भावनांचाही व्यवहार करुन लोकं गंडगंज संपत्ती कमवत आहेत.
>> कारण त्यांना हवेत शब्दांच्या इमारती उभ्या करता येतात!
>> वास्तवापासुन दुर नेऊन तुमची करमणुक करता येते!
>> शेवटी महत्वाचे... कोणाकढुनही कमिशन काढता येते!

*****

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टेक्स्ट फाईल मायबोलीवर एक्स्पोर्ट केलीय अश्या फॉर्मेटमध्ये आलेय.
निवडणूकीसंबंधित काही आहे का?

मला पण वाटले की किर्र म्हणजे घनदाट अरण्य किन्वा वन/ जन्गल. आणी तन म्हणजे शरीर.

तर घनदाट जन्गलात चूकुन लेखक हरवला त्यामुळे लेखकाचे तन/ तनु उर्फ शरीर भीतीने थरथर कापु लागले आणी त्यातुन लेखकाला कुणी रहस्यमय, गुढ असे व्यक्तीमत्व भेटले. आणी त्यातल्या अनूभवातुन ही किर्र..र्र र्र... तन कथा जन्माला आली.:अओ:

वाचुन प्रतिसाद दिल्या बद्दल सगळ्यांचे आभार!
....
रश्मी... तुम्ही किर्र... चा अर्थ जवळपास बरोबर शोधलाल तो म्हणजे दाट... घनदाट नाही.... तन च्या बाततीत साफ चुकतात... याचे असे कारण मला वाटते की तुम्हाला शेतीचा अनुभव नसावा.... अहो.... तन म्हणजे गवत.
>>>> किर्र...तन म्हणजे दाट गवत... जे शेतात एवढं वाढतं की महत्वाचं पिक त्यात दिसत नाही... हाच आशय घेऊन वरचं लिहण्याचा प्रयत्न केला.