मायबोली दिवाळी अंक २०१४ - संपादक मंडळ स्वयंसेवक हवेत

Submitted by Admin-team on 10 April, 2014 - 02:47

मायबोलीच्या अनेक उपक्रमांपैकी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे मायबोलीचा दिवाळी अंक. आंतरजालावरचा हा पहिला दिवाळी अंक. गेली अनेक वर्षं सातत्यानं मायबोलीकरांच्या सहभागामुळे उत्तम दिवाळी अंक जगभरातल्या वाचकांसमोर आपण ठेवत आलो आहोत.

दरवर्षी दिवाळीच्या एक-दोन महिने अगोदर आपण अंकाच्या कामाला सुरुवात करतो. मात्र हा वेळ संपादकमंडळाला, लेखकांना आणि मायबोली प्रशासनाला अनेकदा अपुरा पडतो. या मागची कारणं अनेक असली आणि आपण दरवर्षी ही कारणं दूर करण्याचा प्रयत्न करत असलो, तरी ऐन वेळी उद्भवणार्‍या अडचणी असतातच.

त्यामुळे यंदा आपण संपादकमंडळाला दिवाळी अंकाच्या निर्मितीसाठी भरपूर वेळ मिळावा यासाठी साधारण मे महिन्याच्या अखेरीपर्यंत मंडळाची स्थापना करणार आहोत. जेणेकरून मंडळाला पुरेसा वेळ मिळेल आणि मायबोलीकरांसमोर नेहमीप्रमाणे उत्तम अंक ठेवता येईल.

२०१४ सालच्या मायबोली दिवाळी अंकासाठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे, त्यांनी या धाग्यावर आपली नावं कळवावीत. अंकासाठी अंक प्रकाशित होईपर्यंत, म्हणजे दिवाळीपर्यंत संपादकमंडळाच्या गरजेप्रमाणे वेळ द्यावा लागेल.

दिवाळी अंकात काम करणार्‍या प्रत्येक सदस्याकडे घरी इंटरनेट सेवा असणं अत्यावश्यक आहे.

तसंच संपादकमंडळात सहभागी झाल्यावर सगळ्या संपादकांनी संपादनाच्या बाफंवर नियमित हजेरी लावणं (काही कारणास्तव गैरहजर राहणार असल्यास मुख्य संपादकांना तसं आधी कळवणं), चर्चांमध्ये सक्रीय सहभाग घेणं, अधूनमधून होणार्‍या स्काइप मीटिंगांना हजेरी लावणं, मुख्य संपादकांनी दिलेल्या जबाबदार्‍या वेळेवर पार पाडणं इत्यादी अपेक्षित आहे.

दिवाळी अंकासाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत लागते. खालीलपैकी कुठल्या विभागात आपल्याला काम करायला आवडेल ते कृपया याच बाफवर कळवा. प्रत्येक विभागात काय काम करणं अपेक्षित आहे, हे थोडक्यात दिले आहे.

१. दिवाळी अंक संपादन

दिवाळी अंकासाठी एखादी संकल्पना, मुखपृष्ठ निवडण्यापासून ते आलेल्या साहित्यातून अंकासाठी योग्य साहित्य निवडणं, गरज पडेल तसे त्यावर संस्कार करणं, तसंच इतर कामं करणार्‍या सदस्यांबरोबर (रेखाटन, सजावट, मुद्रितशोधन, टेम्प्लेट इ.) लागेल तसं काम करुन शेवटी दिवाळी अंक पूर्ण करणं व वेळेत प्रकाशित करणं.

२. दिवाळी अंक रेखाटन

दिवाळी अंकासाठी निवड केलेल्या साहित्याला साजेशी रेखाचित्रं (वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करून) काढणं.

३. दिवाळी अंक साचा (Template)

यासाठी ड्रुपलमध्ये वेबसाईट टेम्प्लेट / थीम तयार करण्याचा अनुभव असावा. तसंच उत्तम ग्राफिक कौशल्य असणं अपेक्षित आहे.

४.दिवाळी अंक सजावट (Page layout)

एचटिएमएल वापरून वेबपेज डिझाईन करणं आणि पेज लेआऊट करणं यांत कौशल्य असणं अपेक्षित आहे. पेज लेआऊट करण्याच्या प्रक्रियेत टेम्प्लेटमधील रंगसंगती, फॊण्ट, पार्श्वभूमीवरची चित्रं यांचा समावेश आहे.

अंकाचा साचा तयार करणारी टीम आणि पेज लेआऊट करणारी टीम एकत्र काम करतील.

५. मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे)

दिवाळी अंकासाठी निवड केलेल्या साहित्याचं मुद्रितशोधन वेळेत करून संपादक मंडळाकडे सोपवणं.

६. दृक्‌-श्राव्य विभाग
यात ध्वनिमुद्रणं व ध्वनिचित्रमुद्रणं यांचं गरजेप्रमाणे संपादन व संकलन करणे, त्यांचा दर्जा सुधारणे ही कामं अंतर्भूत आहेत.

संपादकमंडळात समावेश केलेल्या सर्व मायबोलीकरांना उपक्रमाच्या कालावधीत आपली खरी नावं स्वतःच्या मायबोलीच्या व्यक्तिरेखेत लिहिणं, तसंच आपला संपर्क-क्रमांक प्रशासनाला कळवणं बंधनकारक आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संपादक मंड्ळाला शुभेच्छा!
मुशोच्या कामाला मदत करता येऊ शकेल. जरूर कळवा.

सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. संपादक मंडळातील नावे वाचून अंकाबद्दल उत्सुकता, अपेक्षा (ही मुलींची नावे नाहीत) आहेत.

मंडळाला शुभेच्छा !
फ्रीहँड चित्रकलेची काही मदत लागली तर सांगा , फक्त सप्टेंबर महिन्यात मी भारतात असेन .
त्या आधी काही असल्यास आवडेल मदत करायला.

संपादक मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
काही मदत लागल्यास जरूर कळवा.
मुद्रितशोधन किंवा दृकश्राव्य विभागात ध्वनिमुद्रणाचं संकलन/ प्रत सुधारणे इ. पैकी काही काम करू शकेन.

removed

ह्या वर्षीच्या मायबोली दिवाळी अंकासाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल संपादक मंडळाच्या वतीने मायबोली प्रशासनाचे अनेक आभार! मायबोलीकरांनी भरभरून दिलेल्या शुभेच्छांनी आमचा उत्साह द्विगुणित झाला आहे. सर्व शुभेच्छुकांना मनःपूर्वक धन्यवाद!

मायबोलीचा दिवाळी अंक आंतरजालीय जगतातच नव्हे, तर अनेक छापील दिवाळी अंकांच्या तुलनेतदेखील सरस असावा, ह्या ध्येयाने आजवर मायबोलीने उत्तमोत्तम दिवाळी अंक सादर केले आहेत. ती परंपरा कायम राखण्यास संपादक मंडळ बांधील आहे, हे आम्ही नम्रतापूर्वक सांगू इच्छितो. मायबोलीकरांच्या सहकार्याशिवाय अंक पूर्णत्वास नेणं कठीण. स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा असणार्‍या मायबोलीकरांच्या नावांची नोंद करून घेत आहोत. वेळोवेळी तुम्हांला साद देऊच.

आपल्या सर्वांच्या शुभेच्छांसाठी व देऊ केलेल्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!

आपले स्नेहांकित,

- संपादक मंडळ

Pages