मायबोली दिवाळी अंक २०१४ - संपादक मंडळ स्वयंसेवक हवेत

Submitted by Admin-team on 10 April, 2014 - 02:47

मायबोलीच्या अनेक उपक्रमांपैकी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे मायबोलीचा दिवाळी अंक. आंतरजालावरचा हा पहिला दिवाळी अंक. गेली अनेक वर्षं सातत्यानं मायबोलीकरांच्या सहभागामुळे उत्तम दिवाळी अंक जगभरातल्या वाचकांसमोर आपण ठेवत आलो आहोत.

दरवर्षी दिवाळीच्या एक-दोन महिने अगोदर आपण अंकाच्या कामाला सुरुवात करतो. मात्र हा वेळ संपादकमंडळाला, लेखकांना आणि मायबोली प्रशासनाला अनेकदा अपुरा पडतो. या मागची कारणं अनेक असली आणि आपण दरवर्षी ही कारणं दूर करण्याचा प्रयत्न करत असलो, तरी ऐन वेळी उद्भवणार्‍या अडचणी असतातच.

त्यामुळे यंदा आपण संपादकमंडळाला दिवाळी अंकाच्या निर्मितीसाठी भरपूर वेळ मिळावा यासाठी साधारण मे महिन्याच्या अखेरीपर्यंत मंडळाची स्थापना करणार आहोत. जेणेकरून मंडळाला पुरेसा वेळ मिळेल आणि मायबोलीकरांसमोर नेहमीप्रमाणे उत्तम अंक ठेवता येईल.

२०१४ सालच्या मायबोली दिवाळी अंकासाठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे, त्यांनी या धाग्यावर आपली नावं कळवावीत. अंकासाठी अंक प्रकाशित होईपर्यंत, म्हणजे दिवाळीपर्यंत संपादकमंडळाच्या गरजेप्रमाणे वेळ द्यावा लागेल.

दिवाळी अंकात काम करणार्‍या प्रत्येक सदस्याकडे घरी इंटरनेट सेवा असणं अत्यावश्यक आहे.

तसंच संपादकमंडळात सहभागी झाल्यावर सगळ्या संपादकांनी संपादनाच्या बाफंवर नियमित हजेरी लावणं (काही कारणास्तव गैरहजर राहणार असल्यास मुख्य संपादकांना तसं आधी कळवणं), चर्चांमध्ये सक्रीय सहभाग घेणं, अधूनमधून होणार्‍या स्काइप मीटिंगांना हजेरी लावणं, मुख्य संपादकांनी दिलेल्या जबाबदार्‍या वेळेवर पार पाडणं इत्यादी अपेक्षित आहे.

दिवाळी अंकासाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत लागते. खालीलपैकी कुठल्या विभागात आपल्याला काम करायला आवडेल ते कृपया याच बाफवर कळवा. प्रत्येक विभागात काय काम करणं अपेक्षित आहे, हे थोडक्यात दिले आहे.

१. दिवाळी अंक संपादन

दिवाळी अंकासाठी एखादी संकल्पना, मुखपृष्ठ निवडण्यापासून ते आलेल्या साहित्यातून अंकासाठी योग्य साहित्य निवडणं, गरज पडेल तसे त्यावर संस्कार करणं, तसंच इतर कामं करणार्‍या सदस्यांबरोबर (रेखाटन, सजावट, मुद्रितशोधन, टेम्प्लेट इ.) लागेल तसं काम करुन शेवटी दिवाळी अंक पूर्ण करणं व वेळेत प्रकाशित करणं.

२. दिवाळी अंक रेखाटन

दिवाळी अंकासाठी निवड केलेल्या साहित्याला साजेशी रेखाचित्रं (वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करून) काढणं.

३. दिवाळी अंक साचा (Template)

यासाठी ड्रुपलमध्ये वेबसाईट टेम्प्लेट / थीम तयार करण्याचा अनुभव असावा. तसंच उत्तम ग्राफिक कौशल्य असणं अपेक्षित आहे.

४.दिवाळी अंक सजावट (Page layout)

एचटिएमएल वापरून वेबपेज डिझाईन करणं आणि पेज लेआऊट करणं यांत कौशल्य असणं अपेक्षित आहे. पेज लेआऊट करण्याच्या प्रक्रियेत टेम्प्लेटमधील रंगसंगती, फॊण्ट, पार्श्वभूमीवरची चित्रं यांचा समावेश आहे.

अंकाचा साचा तयार करणारी टीम आणि पेज लेआऊट करणारी टीम एकत्र काम करतील.

५. मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे)

दिवाळी अंकासाठी निवड केलेल्या साहित्याचं मुद्रितशोधन वेळेत करून संपादक मंडळाकडे सोपवणं.

६. दृक्‌-श्राव्य विभाग
यात ध्वनिमुद्रणं व ध्वनिचित्रमुद्रणं यांचं गरजेप्रमाणे संपादन व संकलन करणे, त्यांचा दर्जा सुधारणे ही कामं अंतर्भूत आहेत.

संपादकमंडळात समावेश केलेल्या सर्व मायबोलीकरांना उपक्रमाच्या कालावधीत आपली खरी नावं स्वतःच्या मायबोलीच्या व्यक्तिरेखेत लिहिणं, तसंच आपला संपर्क-क्रमांक प्रशासनाला कळवणं बंधनकारक आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा !
आधी वाटलं चुकून हा बाफ आला की काय ! Happy

दिवाळी अंकाच्या निर्मितीसाठी भरपूर वेळ मिळावा यासाठी साधारण मे महिन्याच्या अखेरीपर्यंत मंडळाची स्थापना करणार आहोत. जेणेकरून मंडळाला पुरेसा वेळ मिळेल. >>>> चांगला प्रयत्न आहे.. एकदम छापील अंकांसारखं!! भरपूर वेळ सगळ्यांनाच आणि ऐनवेळची घाई टळेल.

मागे एकदा केलेलं आहे त्यामुळे परत चालणार असेल तर संपादक मंडळात काम करायला आवडेल.

मागील वर्शी इछा असूनहि जमले न्हवते. यावर्‍षी नक्किच सहभागी होन्यास आवडेल. मला द्रुक श्राव्य (हे कस लिहीतात?) विभागात काम कराय्ला आवडेल.

वाचायला आवडेल ;), एव्हढी आधी तयारी चाललेय म्हणजे अंक चांगला व्हायची शक्यता आणि अपेक्षा बरीच वाढलीय

मुद्रितशोधन ह्या विभागात मी काम करू शकेल. मला त्याची आवड आहे आणि जमेलसुद्धा. फक्त मी रोजचा वेळ १५ ऑगस्ट पासूनच देऊ शकेन; तोपर्यंत आठवड्यातून एकदा एक-दोन तास!

ssमला दिवाळी अंकात कसलं हि काम करायला आवडेल ...मी फेस बुक वर अलका डी भोसले या नावाने आहे ..माझी कार्यक्षमता पडताळून पाहण्यासाठी आपण चेक करू शकता Happy

अरे वा! लवकर काम सुरू होतंय ते बरं आहे. Happy

पराग, तुझा उत्साह दांडगा आहे. Wink Light 1

आगावा, तुझ्यासोबत मंडळात इतर कोण कोण सूट होतील याचा मनातल्या मनात विचार केला. Proud

अरे वा!! यावेळी मंडळाला वेळ मिळेल छान प्लान करायला. Happy

काहीही मदत लागली तर करायला तयार आहे. (काम करायला तयार आहे लिहिणार होते. पण यावेळी मोह आवरतेय.) Happy शुभेच्छा.

मलाही मुद्रितशोधन मधे काम करायला आवडेल. आधी केलेले आहे (२०१२). बाकी काम मला जमण्यासारखे नाही. फक्त माझा प्रॉब्लेम असा की ऐन दिवाळीत मी मदत करू शकणार नाही.

मंडळात काम करायला आवडेल. दिवाळी अंक वगळता इतर बहुतेक सगळ्या उपक्रमांसाठी काम केलेलं आहे.

मंडळात काम करायला आवडेल.
(पराग आणि सिंडी पण असतील तर, संयोजक मंडळ रियुनीअन होईल). Happy

पराग सिंडी आरजे असतील तर मीही येते की मग. संयोजन गटग. Proud

जस्ट किडिंग. मला नाही जमणार यावेळेस. इच्छा खूप आहेच एका तरी दिवाळीअंकात काम करायची. असो..
खूप आधीपासून संपादक मंडळ तयार करण्याच्या निर्णयाचे स्वागत.

' आलेल्या साहित्यातून अंकासाठी योग्य साहित्य निवडणं, गरज पडेल तसे त्यावर संस्कार करणं,' हे व इतर लागेल तसे काम करायला आवडेल. आत्मविश्वास कमी आहे पण सांभाळुन घेतलेत तर काम करता येईल. मुलांच्या सुट्ट्यांमुळे जुलैपासुन पुढे उपलब्ध असेन.

मला आवडेल काम करायला
पण मी एका पण विभागात अनुभव नाहीये... Sad
अ‍ॅडमीन काही कुठे गरज पडलीच तर हाक द्या मला...
शेवटी जिथे कमी तिथे आम्ही ह्या तत्वावर काम करायला तयार आहे

इतक्या आधीपासून दिवाळी अंकाचे संपादक मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अ‍ॅडमिन्-टीमचे अभिनंदन!

बरीच थोर्-थोर नावं जमली आहेत की! इतक्या नावांत पुढच्या दोन्-तीन वर्षांचे अंक निघतील. अ‍ॅडमिन्-टीम, बघा. विचार करा.

Pages