मायबोली दिवाळी अंक २०१४ - संपादक मंडळ स्वयंसेवक हवेत

Submitted by Admin-team on 10 April, 2014 - 02:47

मायबोलीच्या अनेक उपक्रमांपैकी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे मायबोलीचा दिवाळी अंक. आंतरजालावरचा हा पहिला दिवाळी अंक. गेली अनेक वर्षं सातत्यानं मायबोलीकरांच्या सहभागामुळे उत्तम दिवाळी अंक जगभरातल्या वाचकांसमोर आपण ठेवत आलो आहोत.

दरवर्षी दिवाळीच्या एक-दोन महिने अगोदर आपण अंकाच्या कामाला सुरुवात करतो. मात्र हा वेळ संपादकमंडळाला, लेखकांना आणि मायबोली प्रशासनाला अनेकदा अपुरा पडतो. या मागची कारणं अनेक असली आणि आपण दरवर्षी ही कारणं दूर करण्याचा प्रयत्न करत असलो, तरी ऐन वेळी उद्भवणार्‍या अडचणी असतातच.

त्यामुळे यंदा आपण संपादकमंडळाला दिवाळी अंकाच्या निर्मितीसाठी भरपूर वेळ मिळावा यासाठी साधारण मे महिन्याच्या अखेरीपर्यंत मंडळाची स्थापना करणार आहोत. जेणेकरून मंडळाला पुरेसा वेळ मिळेल आणि मायबोलीकरांसमोर नेहमीप्रमाणे उत्तम अंक ठेवता येईल.

२०१४ सालच्या मायबोली दिवाळी अंकासाठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे, त्यांनी या धाग्यावर आपली नावं कळवावीत. अंकासाठी अंक प्रकाशित होईपर्यंत, म्हणजे दिवाळीपर्यंत संपादकमंडळाच्या गरजेप्रमाणे वेळ द्यावा लागेल.

दिवाळी अंकात काम करणार्‍या प्रत्येक सदस्याकडे घरी इंटरनेट सेवा असणं अत्यावश्यक आहे.

तसंच संपादकमंडळात सहभागी झाल्यावर सगळ्या संपादकांनी संपादनाच्या बाफंवर नियमित हजेरी लावणं (काही कारणास्तव गैरहजर राहणार असल्यास मुख्य संपादकांना तसं आधी कळवणं), चर्चांमध्ये सक्रीय सहभाग घेणं, अधूनमधून होणार्‍या स्काइप मीटिंगांना हजेरी लावणं, मुख्य संपादकांनी दिलेल्या जबाबदार्‍या वेळेवर पार पाडणं इत्यादी अपेक्षित आहे.

दिवाळी अंकासाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत लागते. खालीलपैकी कुठल्या विभागात आपल्याला काम करायला आवडेल ते कृपया याच बाफवर कळवा. प्रत्येक विभागात काय काम करणं अपेक्षित आहे, हे थोडक्यात दिले आहे.

१. दिवाळी अंक संपादन

दिवाळी अंकासाठी एखादी संकल्पना, मुखपृष्ठ निवडण्यापासून ते आलेल्या साहित्यातून अंकासाठी योग्य साहित्य निवडणं, गरज पडेल तसे त्यावर संस्कार करणं, तसंच इतर कामं करणार्‍या सदस्यांबरोबर (रेखाटन, सजावट, मुद्रितशोधन, टेम्प्लेट इ.) लागेल तसं काम करुन शेवटी दिवाळी अंक पूर्ण करणं व वेळेत प्रकाशित करणं.

२. दिवाळी अंक रेखाटन

दिवाळी अंकासाठी निवड केलेल्या साहित्याला साजेशी रेखाचित्रं (वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करून) काढणं.

३. दिवाळी अंक साचा (Template)

यासाठी ड्रुपलमध्ये वेबसाईट टेम्प्लेट / थीम तयार करण्याचा अनुभव असावा. तसंच उत्तम ग्राफिक कौशल्य असणं अपेक्षित आहे.

४.दिवाळी अंक सजावट (Page layout)

एचटिएमएल वापरून वेबपेज डिझाईन करणं आणि पेज लेआऊट करणं यांत कौशल्य असणं अपेक्षित आहे. पेज लेआऊट करण्याच्या प्रक्रियेत टेम्प्लेटमधील रंगसंगती, फॊण्ट, पार्श्वभूमीवरची चित्रं यांचा समावेश आहे.

अंकाचा साचा तयार करणारी टीम आणि पेज लेआऊट करणारी टीम एकत्र काम करतील.

५. मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे)

दिवाळी अंकासाठी निवड केलेल्या साहित्याचं मुद्रितशोधन वेळेत करून संपादक मंडळाकडे सोपवणं.

६. दृक्‌-श्राव्य विभाग
यात ध्वनिमुद्रणं व ध्वनिचित्रमुद्रणं यांचं गरजेप्रमाणे संपादन व संकलन करणे, त्यांचा दर्जा सुधारणे ही कामं अंतर्भूत आहेत.

संपादकमंडळात समावेश केलेल्या सर्व मायबोलीकरांना उपक्रमाच्या कालावधीत आपली खरी नावं स्वतःच्या मायबोलीच्या व्यक्तिरेखेत लिहिणं, तसंच आपला संपर्क-क्रमांक प्रशासनाला कळवणं बंधनकारक आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरीच थोर्-थोर नावं जमली आहेत की! इतक्या नावांत पुढच्या दोन्-तीन वर्षांचे अंक निघतील. >>> मामे, पर्फेक्ट ! Proud

मला खूप इच्छा आहे. वेळ आणि इंटरनेट दोन्ही आहे.

संपादनाचा अनुभव नाही. पण <<आलेल्या साहित्यातून अंकासाठी योग्य साहित्य निवडणं, गरज पडेल तसे त्यावर संस्कार करणं, तसंच इतर कामं करणार्‍या सदस्यांबरोबर (रेखाटन, सजावट, मुद्रितशोधन, टेम्प्लेट इ.) लागेल तसं काम>> आवडेल.

मु.शो. नक्कीच करेन.

दिवाळी अंकातली चित्रं मायबोली मेंबरानीच काढायची असतात का ? की इतर कोणाकडून काढून घेतली तर चालतात ? चालणार असेल तर त्या सेक्शन मधे पण मदत करू शकेन :ड

अर्रे वा! एवढ्या लवकर !!! सहिये. शुभेच्छा सगळ्यां (थोर) मंडळींना. Happy

पराग तुझं कौतुक रे बाबा Proud

यंदा मी पण नाव द्यावे का असा विचार करत इथे आले. पण इतके दिग्गज लोक आधीच पुढे आले आहेत कामाला तेव्हा माझ्यासारख्या असाहित्यिक लोकांचे हे काम नोहे.

दिवाळी अंक संपादन / मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे) ह्यात काम करायला आवडेल.

२०१४ मायबोली दिवाळी अंक संपादक मंडळ स्थापन झाले आहे.

पेशवा, अरुंधती कुलकर्णी, ऋयाम, आगाऊ, टण्या, तृप्ती आवटी, सुनिधी, देवा, योकु आणि rmd,

सर्वांचे हार्दिक अभिनंदन

पेशवा यंदाचे मुख्य संपादक आहेत आणि गेल्या वर्षी मुख्य संपादिका असलेल्या मंजूडी मंडळाच्या सल्लागार.

Pages