शिळोप्याचे थालीपीठ

Submitted by प्रमोद् ताम्बे on 9 April, 2014 - 02:10

शिळोप्याचे थालीपीठ
 थालीपीठ xxxx.jpg

काल आमच्याकडे शेपूची परतून भाजी व भाकरी आणि भात असा बेत होता. आज सकाळी त्यातील उरलेली भाकरी,भात व शेपूची परतलेली भाजी यांचा वापर करून नाश्त्याला थालीपीठ बनवावे असे ठरले. त्यामुळे कालचे सर्व शिळे अन्न संपणार होते व नाश्त्याचाही प्रश्न सोडवला जात होता. मग आम्ही जे थालीपीठ केले त्या शिळोप्याच्या थालीपिठाचाच फोटो व रेसिपी आज मी येथे देत आहे.
साहित्य : एक वाटी कालची उरलेली शेपूची भाजी,कालची उरलेली शिळी अर्धी भाकरी व अर्धी वाटी भात,दोन टेबलस्पून ज्वारीचे पीठ,एक टेबल स्पून डाळीचे (बेसन)पीठ , चवीनुसार लाल तिखट,मीठ,साखर व हळद ,एक चमचा कडकडीत तेल (मोहन)
कृती : एका मोठ्या परातीत वरील सर्व साहित्य एकत्र करून थोडे थोडे पाणी घालत भाजणीच्या थालीपीठासाठी भिजवतो तसे पीठ भिजवून घ्या व १० मिनिटे झाकून ठेवा. दहा मिनिटांनी गॅसवर तवा तापत ठेवा व त्यावर एक चमचा तेल घालून पिठाचा गोलाठेऊन थालीपीठ थापुन घ्या. चांच्याने सर्व बाजूंनी तेल सोडा व उलथन्याने उलटे करून दुसत्या बाजूने भाजून घ्या.
गरम थालीपीठ लोण्याबरोबर किंवा सायीच्या दहयाबरोबर खायला द्या. हे थालीपीठ अतिशय कुरकुरीत व खुसखुशीत झाले होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users