आल्याची चटणी

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 5 April, 2014 - 12:14
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आल्याची चटणी
आमच्याकडे आंध्रात इडली, दोसा केला कि त्याच्या बरोबत आल्याची चटणी पण करतात. मला माझ्या एका तेलुगु मैत्रिणीने सांगितली ही कृती. अगोदर कुणी ह्याची कृती दिलीहि असेल. मला माहित नाही. करायला सोपी आणि चवीला खूपच छान. रंगही छान असतो.
कृती :

१००ग्राम आलं
१००ग्राम चिन्च
१००ग्राम लाल तिखट
१००ग्राम गुळ

क्रमवार पाककृती: 

प्रथम आलं स्वच्छ धुवुन त्याची साल काढुन घ्यावी.बारीक तुकडे करावेत. चिन्च थोडसं पाणी घालुन भिजवावी. गुळ किसून ठेवावा. चिन्च चांगली भिजली कि आलं मिक्सर मधे बारीक करावं.त्यातच भिजलेली चिन्च घालुन बारीक करावी. चांगली बारीक झाली कि त्यातच तिखट, मीठ (लोणच्याला घालतो तसे भरपूर) घालुन मिक्सर मध्ये एकजीव करून घ्यावं त्यातच किसलेला गुळ घालावा आणि एकदा मिक्सरमध्ये फिरवुन घ्यावं. थोडीशी घट्ट होते. पण बाटलीत भरुन ठेवावी. जेंव्हा हवी असेल तेंव्हा थोडेसे पाणी घालुन फोडणी घालुन वाढावी. खूप छान लागते. ही चटणी फ्रीजमध्ये वर्षभरही रहाते. मीठ मात्र कमी पडता कामा नये. मी एवढीच चटणी करते. तर लहान बाटली भरून होते. पण आलं उष्ण असते त्यामुळे बेताने खावी.

अधिक टिपा: 

इडली दोशा बरोबरची चटणी

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

माझ्या ओळखीतले तेलुगु लोक हिरवी मिरची घालून करतात . जहाल तिखट, जबरदस्त आंबट आणि हे दोन्ही जरासेच टोन डाउन होतील एवढी गोड असते. फ्रीझ मधे १०-१५ दिवस तरी टिकते - तेवढी उरतच नाही.
आता मिरचीपूड घालून करुन पाहीन. इडली डोसे हे नित्य नेमाने होणारे प्रकार आहेत. पण त्याबरोबर चटण्या मात्र वेगवेगळ्या लागतात .

छान कृती आहे..
अद्रक आवडतच.. नक्की करुन बघते Happy
एखादा फोटो डकवा ना.. रंग आणि टेक्शर लक्षात येईल आणि मोटिवेशन पन मिळेल.. Proud

मी केली ही चटणी थोड्या प्रमाणात अर्थात. संकष्टीचा उपास सोडायचा होता तर हे तोंडीलावणे केलं, डाव्या बाजूला.

मी आल्यापेक्षा चिंच आणि गुळ कमी घेतलं आणि मीठ तिखट अंदाजे घातलं. नवऱ्याला perfect वाटली, मला थोडी खारट वाटली, तो जरा मिठखाऊ आहे, मी कमी खाते. बाकी तिखट छान लागत होती, आल्याची चव पुढे येत होती मस्त मला हवी तशी. मग अगदी थोडी साखर घातली, त्याने समहाऊ खारटपणा कमी झालेला जाणवला. आता अंदाज आलाय, पुढच्यावेळी जास्त करेन.

तीन वर्षांनी प्रतिसाद मिळाला त्यामुळेआनन्द झाला. माझ्याकडे चटणी थो डीच राहिली आहे. मी ह्या आठवड्यत करणार आहे तेंव्हा नक्कि फोटो पाठवीन. चिन्चेला पर्याय लिम्बु असु शकत. पण चवीत फरक पडेल आणि किती दिवस रहाते माहित नाही. मी विचारून सांगेन. सर्वाना धन्यवाद.