चुरमुरयाचा चटकदार झटपट चिवडा

Submitted by प्रमोद् ताम्बे on 5 April, 2014 - 11:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य : अर्धा किलो चुरमुरे,एक वाटी मिक्स फरसाण,मूठभर भाजलेले शेंगदाणे,अर्धी मूठ काजूचे तुकडे,थोडेसे बेदाणे,मूठभर डाळींबाचे दाणे,मूठभर मक्याचे दाणे,एका मोठ्या काकडीचा कीस,एक मोठा कांदा व एक मोठा टोमॅटो बारीक चिरून, मूठभर नारळाचा चव,मूठभर कोथिंबीर बारीक चिरून,थोडीशी चिंचेची चटणी,थोडासा चाट मसाला,चवीपुरते मीठ व साखर,फोडणीसाठी तेल,जिरे,म्होरी,हिंग,हळद व कढीपत्त्याची पाने

क्रमवार पाककृती: 

कृती : एका मोठ्या स्टीलच्या पातेल्यात चुरमुरे, फरसाण, शेंगदाणे, डाळींबाचे दाणे, अर्धी मूठ काजूचे तुकडे,थोडेसे बेदाणे, मूठभर मक्याचे दाणे, मूठभर नारळाचा चव, काकडीचा कीस, बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो, थोडीशी चिंचेची चटणी,थोडासा चाट मसाला,चवीपुरते मीठ व साखर घालून चांगले एकजीव होईपर्यंत हलवा.वरुन गरम फोडणी करून घाला व पुन्हा हलवा.
सर्व्ह करतेवेळी सजावटीसाठी वर थोडीशी बारीक शेव व बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

वाढणी/प्रमाण: 
५ व्यक्तींसाठी
अधिक टिपा: 

खूपच चटकदार !

माहितीचा स्रोत: 
माझी सून शीतल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चटकदार दिसतेय. हिरवी मिरची नाहीये का? तिखट पाहिजेच. मग एक कप चहा. संध्याकाळी स्वर्गात जायला मोकळे. Happy

करून मिळाली तर मजा.

भेळेला कोणी फोडणी देतं का? त्यामुळे चिवडाच!
ओल्या भेळच्या तालावर तुम्ही ओला चिवडा असं वाचा... हाकानाका

तोंपासू एकदम.
चटकदार दिसतेय. हिरवी मिरची नाहीये का? तिखट पाहिजेच. मग एक कप चहा. संध्याकाळी स्वर्गात जायला मोकळे. >> आल्याचा मस्त चहा आणि अशी चटकदार तोंपासू रेसिपी.... आहा खरंच स्वर्ग!! घरी आल्या आल्या असं आयतं कोणी करून दिलं तर क्या बात!!

फोटोही देखणा आणि चटकदार आलाय. हा चिवडा कमी भेळ जास्त वाटतेय. >> अगदी अगदी. चिवड्याची भेळ म्हणता येईल. पदार्थ वाचता वाचताच पाणी सुटलं तोंडाला. मक्याच्या दाण्यांऐवजी मक्याचा चिवडाही चालेल का मस्त लागेल कुरकुरीत Happy आणि सध्या सिझन आहे तर कैरीही बारीक चिरून टाकली तर मस्त लागेल...

प्रमोद, तुमचे विशेष आभार तुम्ही पौष्टिक तरीही चविष्ट आनि मुख्य म्हणजे झटपट रेसिपीज देताय. रोज काय करावं या विचारातच खूप वेळ जातो. आता खूप सोप्पं झालंय. इथे एक झटपट पाकृ वाचायची. घरी असलेल्या साहित्यातूनच ती अ‍ॅटजस्ट करून झटपट काहीतरी करून थोडा निवांत वेळ स्वतःसाठी काढता येतो. Happy खरंच मनापासून आभार Happy

माझ्या घरी आई नेहमीच मला म्हणायची की तू जर इंजिनीअर झाला नसतास तर उत्तम स्वयंपाकी नक्कीच झाला असतास.
त्यात आता मी ७३ वर्षांचा निवृत्त इसम असल्याने केवळ वेळ जाण्यासाठी स्वयंपाकघरात काही तरी खुडबुड करत असतो. नित्या नवे करायची जबरदस्त इच्छा स्वस्थ बसू देत नाही,मग जे काहीतरी करेन त्याचेच फोटो काढतो,रेसिपी लिहून काढतो व फेस बुकवर "आम्ही सारे खवय्ये " या पेजवर शिवाय माझ्या "स्वच्छंद " ब्लॉगवर आणि आता मायबोली व ग्लोबल मराठी वर पोस्ट करत असतो. कारण आपण जे काय करतो ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे.
माझा ब्लॉग "स्वच्छंद" ची लिंक : http://pltambe.blogspot.in/
फेसबुकवरील माझे पेज "आम्ही सारे खवय्ये " ची लिंक : https://www.facebook.com/AmhiSareKhavvaye?ref=hl

sunder

तांबेजी,
>>त्यात आता मी ७३ वर्षांचा निवृत्त इसम असल्याने केवळ वेळ जाण्यासाठी स्वयंपाकघरात काही तरी खुडबुड करत असतो.<<

तुमची सौ नशिबवान आहे.

------
(बाकी, मला तर रोज वाटते, घरीच असा चेफ रोज स्वंयपाक बनवेल तर किती मजा. आमचा शेफ मनात येइल तेव्हा(च) बनवतो)

प्रमोद धन्यवाद ब्लॉग आणि फेसबूक पेजच्या लिंकसाठी. लाईक केलय. नवनवीन रेसिपीज साठी शुभेच्छा Happy फॉलो केलेय फेसबूकवर त्यामुळे डायरेक्ट सगळ्या रेसिपीज तिथूनच घेता येतील...

तुमचा उत्साह केवळ वाखाणण्यासारखा!!! _____________/\____________

खरं तर जेवण बनवण्याची आवड आणि सवय मला माबोमुळे लागली. आता बर्‍याचपैकी बरं जेवण आणि इतर सटरफटर खाऊ बनवता येतो. (अ‍ॅड ऑन म्हणून थोडीफार सजावटही Wink ) इथल्या हौशी शेफ्सचं मला नेहमीच कौतुक वाटत आलंय आणि त्यांच्या रेसिपीज मुळे प्रोत्साहनही मिळालेय की आपणही करून बघुया... त्या इन्स्पायरिंग लिस्टमध्ये प्रमोद तुमचंही नाव अ‍ॅड झालंय Happy

ह्या भेळेत काकडी घातलेली मला आवडत नाही पण डाळिंबाच्या दाण्यांची आयडिया ज्जाम ढासू खूप आवडली
टीप : फोडणीत लसूण हवाच चिवडा म्हटल्यावर !!

यात लाह्या ताक, लोणचे , हिरवी मिरची घातली की गोपाळकाला तयार होतो.<<<
गोपाळकाल्याची पद्धत कंप्लीटली वगळीये लक्षुमीअक्का

तुमच्यासारख्यांनी केलेल्या कौतुकामुळेच उत्साह द्विगुणित होतो.
दुसरे असे की माझ्या पत्नीलाही माझी अशी ही स्वयंपाकघरातील लुडबूड अजिबात आवडत नाही,कारण तिचे म्हणणे मी जो पसारा घालून ठेवत असतो तो तिलाच अखेर निस्तरावा लागतो, शिवाय मी एखादी रेसिपी करत असतांना तिला माझ्याहाताखाली जे काम करावे लागते त्यापेक्षा तिचे म्हणणे असे की तिने एकटीने तो पदार्थ केला असता तर तिला कमी श्रम पडले असते.
नवीन पदार्थ सुचण्याबद्दल असे सांगता येईल की रोज सकाळी मी प्रथम फ्रीज उघडून त्यात काय काय शिल्लक आहे ते बघतो व जे साहित्य शिल्लक असेल मग ते आदल्यादिवशीचे उरलेले अन्न असो किंवा कच्या भाज्या,कडधान्ये असोत यातून आपण आज नाश्त्याला व जेवणासाठी काय बनवू शकतो व तेही पारंपारिक पद्धतीने नव्हे तर जरा ' हटके' आपल्या स्टाईलने याचा विचार एकदा पक्का झाला की मग एका ताटात लागणारे सर्व साहित्य प्रथम मांडून घेतो, याचा एक फायदा म्हणजे ऐनवेळी एखादा पदार्थ विसुरून / चुकून घालायचा रहात नाही व आपण काय बनवणार आहोत व ते कसे बनवणार आहोत याचे गणित डोक्यात पक्के झालेले असते
कधी कधी एखाद्या दिग्दर्शकासारखे मी ते सर्व माझ्या पत्नीला समजावून सांगतो व माझ्या दिग्दर्शनाखाली तीच तो पदार्थ नवीन ' हटके ' पद्धतीने करते.

तुमच्यासारखा उत्साही शेफ असता तर मी आवरलं असतं दहा वेळा आणि वर नवनवीन फर्माईशही केली असती हक्काने Happy आणि मनमुराद तारीफही Happy आयतं चमचमीत खाण्यातला आनंद अवर्णनीय असतो. Proud
पण तुमची पत्नी जेवढी लकी आहे तेवढेच तुम्हीसुद्धा! लुडबूड न आवडूनही तुमच्या उत्साहाला तिने अजून शाबूत ठेवलंय... एवढेच नव्हे तर तुमच्या मार्गदर्शनाखाली ती तुमच्या हटक्या आयडियाज ना मूर्तरूप देते. Happy लक्की यू बोथ!! मस्त रोमँटिक लंच डिनरचा आस्वाद घेता येतो... Happy

भेळ आणि सुशीला या दोन पदार्थांचा संकर म्हणजे हा पदार्थ वाटतोय. नक्की करणार. फोटो एकदम तोंपासु बरं का!

आवडला चिवडा, करुन बघण्यात येईल.

कारण तिचे म्हणणे मी जो पसारा घालून ठेवत असतो तो तिलाच अखेर निस्तरावा लागतो, >>> मग तुम्ही पसारा आवरण्यात देखील उत्साह दाखवून आणखी दुवा मिळवू शकता. Happy