पिकल्या केळ्याचे (गोड) आप्पे

Submitted by pltambe@yahoo.co.in on 26 March, 2014 - 12:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य : एक वाटी जाड पोहे (कांदा पोहयाचे), बारीक रवा दोन वाट्या बारीक रवा , एक वाटी दूध , अर्धी वाटी खवलेला ओल्या नारळाचा चव , तीन पिकलेली केळी , एक वाटी किसलेला गूळ , अर्धा चमचा वेलची पूड,अर्धा चमचा कायचा सोडा (किंवा इनोजही चालेल) , अर्धे लिंबू व आप्पे घालण्यासाठी थोडे साजूक तूप.

क्रमवार पाककृती: 

कृती : पोहे,दूध , रवा , ओल्या नारळाचा चव,गूळ ,केळी,वेलची पूड हे सर्व मिक्सरमध्ये घेऊन त्यात सोडा घालून व लिंबू पिळून मग दोन मिनिटे मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे व एका बाउलमध्ये काढून पांच मिनिटे झाकून ठेवावे. नंतर निर्लेपचे आप्पे पात्र गॅसवर ठेऊन साजूक तूप घालून हे मिश्रण घालून ५ मिनिटे झाकून लगेच काढावे.
डिशमधून गोड घट्ट दहयाबरोबर हे गोड आप्पे सर्व्ह करावेत.

वाढणी/प्रमाण: 
चार व्यक्तींसाठी
अधिक टिपा: 

डिशमधून गोड घट्ट दहयाबरोबर हे गोड आप्पे जास्त चांगले लागतात

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस आप्पा इज बॅक Rofl

कांद्याचे हा पण शब्द काढा (कांदा घालायचा की काय या शंकेने जरा ग्रासले ना म्हणून)

लिंबु कशाला पिळायचे??

बाकी पदार्थ छान आहे. लागेलही मस्त. करुन बघेन नक्की.

नावातली इतकी टिंबे आहेत ती काढा.. लेखांची अनुक्रमणिका पण वेगळीच दिसायला लागते.

हो पदार्थ चान्गला आहे, पण पोह्यात कान्दा वाचुन जरा दचकायला झालेच होते. लिन्बाने आम्बट लागणार नाही का?:अओ:

लोक इतकी कावलीत का?(टींबामुळे का?)
लिंबू व सोड्याने एक रासायनिक क्रिया होवून पदार्थाला जाळी पडेल. आंबट लागायला पेलाभर थोडीच ना टाकायचा लिंबु ज्युस. Happy

पिकल्या केळयांची रवामैदा आंबट करून त्यातली भजीही छान लागतात .
अजून एक केळा-चपाती प्रकार :मैदा अधिक केळे फेटलेले मिश्रण तव्यावर टाकून त्याला जाळी पडते .ते छोटे गोल वरती थोडासा गुळाचा पाक टाकून खायचे .खाल्ले आहे पण कृती माहीत नाही .

मी रव्यामधे दही केळी साखर खोबरं (ऑप्शनल), १ छोटा चमचा तुप घालून भिजवते. करताना चिमुटभर सोडा/इनो घालून करते. अप्पेपात्रात तेला ऐवजी तुपाचे थेंब घालते.

आता वर दिलेय तसे साखरे ऐवजी गुळ आणि पोहे घालून करेन. लिंबा ऐवकी दह्याचा पर्याय वापरेन

आज सकाळी नाष्ट्याला केले --मस्त झाले होते. फक्त पोह्याबरोबर थोडे ओटस घातले.

मायबोली वर आल्यापासून नेहमीचे खाणे विसरलो आहोत -- रोज काहीतरी नवीन इथले बघून Happy