Submitted by pltambe@yahoo.co.in on 26 March, 2014 - 09:35
दोन भेंड्या घ्या. त्यांची दोन्ही बाजूंचे शेवटचे तुकडे कापून टाका. मध्ये एक उभा छेद घ्या. एका ग्लासमध्ये पाणी घ्या व त्यात ह्या दोन्ही भेंड्या टाकून रात्रभर ग्लास झाकून ठेवा. सकाळी उठल्यावर भेंड्या काढून टाका व ग्लासमधील पाणी पिऊन टाका. हे पंधरा दिवस करुण पहा तुमच्या साखरेच्या प्रमाणात किती लक्षणीय घट होते ते !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंडळी इथे नव्या रेस्पी तयार
मंडळी इथे नव्या रेस्पी तयार करू नका, भेंडीस चिकटून रहा....
पाहिजे तर भेन्डी चिरुन
पाहिजे तर भेन्डी चिरुन पाण्यात टाका. त्या पाण्यात मेन्दी भिजवा, मस्त तार येऊन कोन काढणे सोपे होईल.:फिदी:
असो, नवीन् शोध होतच रहाणार. पण चटकन पी हळद आणी हो गोरी असे तर होत नाही ना?
भेन्डीने साखर कमी होईलही कदाचीत पण व्यायाम आहारावर नियन्त्रण नसेल तर काय होईल? योग्य आहार, व्यायाम, नेहेमीची औषधे यातुनच कमी होईल की हे.
दुसरे असे की अती तेथे माती, या नुसार कुठलीही भाजी वा फळे, पेये किन्वा बाहेरचे खाणे याचा अतीरेक झाला तर तब्येत बिघडणारच. पालक खूप आवडतो म्हणून रोज खाल्ला आणी योग्य त्या प्रमाणात पाणी प्यायले नाही तर किडनी स्टोन चा विकार असणार्याला त्याचा त्रास होणारच की.
त्यापेक्षा आहारात सर्व प्रकारच्या भाज्या, सलाद, फळे, पाणी याचे योग्य प्रमाण ठेवा आणी ताणमुक्त जगण्याचा प्रयत्न करा.:स्मित:
एवढे बोलुन माझे लेक्चर सम्पवते.:फिदी:
सुमारे ३५ वर्षांपूर्वी
सुमारे ३५ वर्षांपूर्वी माझ्याकडे एक पेशंट येत असे, त्याचे नाव 'वनस्पती मेहता' ! डायबेटीस साठी अनेक प्रकारच्या वनस्पतींचा स्वतः वर प्रयोग करून माझ्याकडे येवून शुगर कमी होते कि काय हे पडताळून पाहत असे. मेथी, शेवगा, भेंडी हे सर्व प्रकार झाले पण काही फारसा शोध नव्हता. माझ्या गोळ्या खाण्याला पर्याय नव्हता. एकदा 'जितं मया' मुद्रेने स्वारी माझ्याकडे आली. यावेळी मात्र शुगर चांगलीच कमी झाली होती. त्याने मला एक वनस्पती दाखवली, 'माकड शिंगी' ! मी त्या वनस्पतीची चौकाधी केली असता त्याने ती माहूर गावाजवळच्या डोंगरावरून आणल्याचे सांगितले. मी बीजे मेडिकल मधील औषध शास्त्र प्राध्यापक डॉ. डांगे यांना घेवून मेहतासह माहूर येथे गेलो आणि ती वनस्पती घेवून आलो. किर्तीकर-बसू नावाच्या पुस्तकातून जास्त माहिती घेतली आणि बीजे मध्ये सहा महिने उंदरांवर प्रयोग केले. या वनस्पतीमध्ये शुगर कमी करण्याचे गुणधर्म सापडले पण ते त्यातून गोळी तयार करण्या इतपत नव्हते. एक पेपर तयार करून प्रसिद्ध ही झाला. या वनस्पतीचे नाव 'carallumma fimbriata' असे होते. भारतामध्ये अशा २३ वनस्पतींवर संशोधन झालेले पण असेच गुणधर्म असूनही व्यापारी उपयोग नसल्यामुळे पुढे प्रउगती झाली नाही. मी ही वनस्पती आणि मेहता दोघांनाही विसरून गेलो.
तीन वर्षांपूर्वी सहज नेटवर पाहताना ह्या काराल्लुम्माचे नाव दिसले उत्सुकतेने वाचले तर त्यावर्षी भारतातून सर्वात जास्त export झालेली ती वनस्पती होती आणि उपयोग होता 'वजन घटवण्यासाठी' ! म्हणजे ह्या वनस्पतीमुळे भूक कमी होते आणी त्यामुळे साखर कमी होत असते. म्हणजे आमचे निरीक्षण योग्य होते पण त्याचा मेक्यानिझम मात्र आम्हाला कळला नव्हता आणि आमची चिकाटी कमी पडली होती. ती आमची उणीव कोणी तरी भरून काढली आणि आता त्या वनस्पतीचा व्यापारी तत्वावर उपयोग सुरु झाला होता, होत आहे. असो ! त्या डोंगरा जवळ राहणार्या लोकांनी हे औषध गुडघेदुखीसाठी उपयुक्त असल्याचे आम्हाला सांगितले होते त्याचेही कारण आत्ता समजले, वजन कमी झाले कि गुडघेदुखी थांबते हा नेहमीचाच अनुभव !
हे सर्व लिहिण्याचा उद्देश हाच कि भेंडीमध्ये असे गुणधर्म निश्चितच असावेत. नेहमीच्या औषधाला पूरक म्हणून डॉक्टरांना सांगून रोज भेंडी खावून पहावी जरूर , कदाचित थोडा फायदा होईलही पण डायबेटीस पूर्ण बरा होईल अथवा इन्शुलिन पूर्ण बंद होईल या भ्रमात राहू नये. अगदी नुकताच टाईप टू मधुमेह असणाऱ्या आणि स्थूल प्रकृती असलेल्या व्यक्तींना काही दिवस उपयोग होईल असे मला वाटते. तरी ज्यांना मधुमेह आहे त्यांनी अलोपथिची साथ सोडू नये हे उत्तम !
सर, तुमच्या प्रतिसादातील
सर,
तुमच्या प्रतिसादातील शेवटचा पॅरा पूर्ण दुर्लक्षित केला जाईल. व पहिल्या पॅराग्राफमधील वाक्यांवरून, 'इंग्रजांनी सांगितले तरच आम्हाला समजते' असा निष्कर्ष काढला जाईल, हे सविनय निदर्शनास आणू इच्छितो
धन्यवाद!
सर, अशाच एका मधुपर्णी
सर,
अशाच एका मधुपर्णी नावाच्या वनस्पतीचे पाणी माझी कलीग घेत आहे. फक्त ती वनस्पती वडगाव येथल्या आयुर्वेदिक डॉ.ने तिला दिली आहे.तिच्या म्हणण्यानुसार ह्या औषधाने,डायबेटिस नलीफाय होतो.परत तिची
नेहमीची अॅलोपथीची डायबेटिसची औषधे चालू आहेच.६-७ महिन्यांचा अवधी दिला आहे.
मी स्वतः डायबेटिक पेशंट
मी स्वतः डायबेटिक पेशंट असल्याने हा उपयोग वाचल्याबरोबर स्वतःवर करून अनुभव घेतला आहे. अर्थात माझ्या नेहमीच्या गोळ्या चालू ठेऊनच हा ' प्रयोग ' सुरू केला व सहा महीने सातत्याने शुगर टेस्ट करून त्यात सकारात्मक बदल झालेला पाहून मगच आता हा उपयोग इतर डायबेटिक लोकांनाही माहिती व्हावा याच उद्देशाने येथे माहिती दिली.मीही त्यावेळी असाच विचार केला की ' बघू या आपण हे करून झाला तर होईलही उपयोग ,आणि नाही झाला तरी यामुळे काही अपाय तर नक्कीच होणार नाही. '
इब्लिस हे सुरेश शिंदेंना सर
इब्लिस हे सुरेश शिंदेंना सर म्हणत आहेत व देवकी प्रमोद तांबेंना!
मी प्रमोद तांबेंना कधीपासूनच सर म्हणत आलो आहे.
तर सर,
जांभळाचा ज्यूस मिळतो. तो दोन्ही जेवणांनंतर २० मिलीलीटर (जरूर पडल्यास थोडे पाणी घालून) घेतल्यास साखर नियंत्रीत होते. पण हा उपाय रामबाण असला तरी भेंडीच्या तुलनेत महागडा व योजण्यास अवघड आहे. त्यामुळे भेंडीचा उपाय सांगून तुम्ही बरे केलेले आहेत. धन्यवाद!
(साती - प्रतिसादांमधील साखरेचे प्रमाण वाढल्यास काय करावे?)
सुरेश शिंदेंना सर म्हणत आहेत
सुरेश शिंदेंना सर म्हणत आहेत व देवकी प्रमोद तांबेंना! ???????
मी डॉ.सुरेश शिंदे यांना, त्यांच्या प्रतिसादावर म्हटले आहे.
असे आहे होय, क्षमस्व, मी आधी
असे आहे होय, क्षमस्व, मी आधी नीट वाचायला हवे होते.
(No subject)
देवसाहेबांनी असे काय लिहिलेय
देवसाहेबांनी असे काय लिहिलेय ज्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे हे मला कळले नाही..
मला त्यांच्या कॉमेंटमधे पुढील वाक्ये कुठेही दिसली नाहीत"
१. अलोपथी भंपक आहे त्यामुळे अलोपथी औषधे बंद करा आणि भेंडीचे पाणी प्या.
२. हे पाणी पिउन मधुमेह सपुर्ण बरा होतो.
३.सगळ्या मधुमेहीना हा उपाय करायची जबरदस्ती आहे.
काही चुकीचा मुद्दा लिहिला आणि त्यावर टीका झाली तर समजु शकतो पण न लिहिलेल्या मुद्द्यांवर एवढा गदारोळ पहिल्यांदा पाहतो आहे.
मानसी एकदम बरोबर आहे तुमचे.
मानसी एकदम बरोबर आहे तुमचे. तांबेकाका या उपायाने शुगर नियमित करायला मदत होते एवढेच फक्त सांगत आहेत. करायचे किंवा नाही हे डापे. स्वत: ठरवू शकतात.
आभार या माहितीबद्दल.
आभार या माहितीबद्दल.
प्रयत्न करून बघितला. २/३ दिवस
प्रयत्न करून बघितला. २/३ दिवस सतत भेंडीचे पाणी प्यालो. काहीही फरक पडला नाही. अजून ४/५ दिवस प्रयोग चालू ठेवेन.
त्यानंतर इथे पोष्ट टाकेन.. (नियमित इन्सूलिन घेतो, आणि नियमित साखर चेक करतो).
परदेसाई
परदेसाई
लिहा नक्की.
काकडी, आलं ,पुदीना आणि लिंबाच्या फोडी अस घातलेल पाणी असचं प्रयोग म्हणुन पिवून पाहिल. (डॉक ला विचारल तर ती म्हणाली तोटा तरी काही दिसत नाही. )डिटॉक्स वॉटर म्हणुन. आवडला एकदम. डायबेटीसशी काही संबध नाही. पण फ्रेश वाटत आणि स्किन खुप छान झाली आहे.
पण फ्रेश वाटत आणि स्किन खुप
पण फ्रेश वाटत आणि स्किन खुप छान झाली आहे.>>>>> वॉव! किती दिवस प्यायलंत?
काहीही फरक पडत नाही , भेंडी
काहीही फरक पडत नाही , भेंडी चे पाणी 6 महिने घेतले , जांभळाचा रस 3 महिने , आणि इतर बरेच आयुर्वेदिक औषधें शप्प फरक पडत नाही वयाच्या 30 वर्षी मधुमेह झाला आत्ता वय 50 आहे , नियमित अलोपॅथी औषधे , व्यायाम , योगा याने शर्करा पातळी मर्यादित ठेवता येते ,यात सर्वात महत्वाचं शर्करा पातळी आज 120 उद्या 200 परवा 123 आणखी दोन दिवसांनी 350 अशी असू नये माझी fasting नेहमी 150 असते तर इतर वेळेस 180 असते , fasting 120 खाली गेल्यास अगदी 110 चक्कर येणे अथवा खूप झोप येणे असे होते , वर्ष्या तुन एकदा फुल्ल बॉडी चेकअप करतो सुदैवाने अजून कुठलाही इतर त्रास नाही , सो असे मेसेज वाचावे आणि सोडून द्यावे आणि फक्त आपल्या डॉ. सल्ला ऐकावा , उदा एकाच्या घरी गेलो त्याने त्याचा 4 रूम चा बंगला दाखवला आणि म्हणाला हा प्लॅन मी आणि गवंडी मिळून केलंय स्टील आणि इतर बाबी सुद्धा कश्याला पाहिजे इंजिनिर , नंतर त्याला समजावले की बाबा या साठी गवंडी पुरेसा पण जेव्हा 20-25 मजली इमारत बांधायची त्या वेळेस इंजिनिर हवाच लोड calculation , steel estimate साठी
तसेच मधुमेहाचे आहे त्या साठी तज्ञ हवाच
Pages