मधुमेहींसाठी औषध भेंडी

Submitted by प्रमोद् ताम्बे on 26 March, 2014 - 09:35

दोन भेंड्या घ्या. त्यांची दोन्ही बाजूंचे शेवटचे तुकडे कापून टाका. मध्ये एक उभा छेद घ्या. एका ग्लासमध्ये पाणी घ्या व त्यात ह्या दोन्ही भेंड्या टाकून रात्रभर ग्लास झाकून ठेवा. सकाळी उठल्यावर भेंड्या काढून टाका व ग्लासमधील पाणी पिऊन टाका. हे पंधरा दिवस करुण पहा तुमच्या साखरेच्या प्रमाणात किती लक्षणीय घट होते ते !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण तरीही प्रयोग करायला काही हरकत नाही, एकतर खर्चिक नाही, आणि दुष्परिणामही काही होण्याचा संभव नाही.. झाले तर चांगलेच होईल.
शिवाय काही गोळ्या थांबवून वगैरे पण करायचे नाहीय त्यामुळे सद्यस्थितीला बाधा होण्याचे कारण नाही.
अशा औषधप्रक्रियेत फायदा झाल्याचा क्लेम करता येईल अशी उदाहरणे फारशी पुढे येताना दिसत नाहीत. फायदा होत असेल पण नंतर ते मानणे हे देखील लोकाना महत्वाचे वाटत नसावे.
आयुर्वेदाची हीच खंत असावी.

दुष्परीणामाची भीती असेल तर भेंड्यांची भाजीही खाण बंदच करायला लागेल !!

आज पर्यंत भेंड्याची भाजी अपायकारक आहे अस वाचलेल आठवत नाहीबा !!

जर भेंड्याची भाजी चालत असेल तर भेंड्याच पाणी तर चाललच पाहिजेना ??

बाकी भेंड्याच्या भाजी असलेल्या पाण्यामुळे ( एक दोन भेंड्या मुळे) जर रक्तातील साखर कमी होत
असेल तर का नाही ?

आता तुमचा प्रश्न : भेंड्याच्या पाण्याने जर अस काही होत असेल तर त्यावर शोध का झाला नाही ?

कोण करणार शोधकार्य ? भेंड्यांच उत्पादन घेणारे शेतकरी ? त्यांना तर आत्महत्या करण्यापासुन वेळ नाही.

बर भेंडी म्हणजे अ‍ॅस्पिरीन नाही की त्यावर शोध करुन सध्याश्या अ‍ॅस्पिरिनला असाधारण बनवल गेल !!

राजु भाई,
भेंडी खाण्याचे दुष्परीणाम नसतात, पण माझी साखर कमी व्हावी म्हणुन मी इन्सुलिन बंद करुन भेंडी खाण्याचे असतात. आणि असे काहि लेख वाचुन त्याची तात्काळ अंमल्बजावणी करणारे आणि दुसर्‍यांना देखिल करायला लावणारे म्हाभाग असतात. आता १००० लोकांमधील एकाने देखिल असे केले तर नुकसानच ना?

वरती कुठे म्हटलेय की इन्सुलिन बंद करून भेंडीचे पाणी प्या म्हणून?

भेंडी कितपत उपयोगी पडेल व किती वर मधूमेह बरा होइल ह्याची टक्केवारी जरी काढता येत नसली आणि खात्री नसली तरी,

भेंडीचे बुळबुळीत पाणी(mucus) उपयोगी नक्कीच आहे असे मला तरी वाटतेय.
---------------------------------------------------------------------------------
भेंडीची भाजी आदल्या दिवशी खाल्ली असेल तर दुसर्‍या दिवशी नाही का फरक जाणवत... Proud

प्रमोद तांबे, तुमचे मुलखावेगळे छंद भन्नाट आहेत.(खास करून फुलझाडे, फळझाडे, खत उत्पादन, सौर उर्जा)

प्रमोदजी,
केवळ भेंडी खावून जर डायबीटीस बरा झाला असता आणि कोथिम्बिरिने किडनी फेल्युअर बरा झाला असता तर बरेचसे डॉक्टर्स 'राजीव गांधी रोजगार हमी योजने'मध्ये काम करताना दिसले असते !
आपल्या देशात गोमुत्र देवून किडनी फेल्युअर बरे करणारे सरकारमान्य 'डॉक्टर' देखील आहेत. पहा :

http://clinic.healthmailer.info/kidney-diseases.html?gclid=CNi42o7As70CF...

याचा अर्थ वनस्पतीमध्ये चांगले गुण नाहीत असा नाही. पण त्यावर संशोधन होवून मगच ते घेतले पाहिजे. अशा observations मधून अनेक शोध लागल्याची उदाहरणे आहेत. जीवाला धोका नसेल तर स्वतःवर प्रयोग करायला कायदेशीर हरकत नाही.

झंपी
भेंडीचे बुळबुळीत पाणी(mucus) उपयोगी नक्कीच आहे असे मला तरी वाटतेय.>>+११

भेंडीची भाजी आदल्या दिवशी खाल्ली असेल तर दुसर्‍या दिवशी नाही का फरक जाणवत...>>> आदल्यादिवशीची भाजी खाऊन बघायला हवी Rofl

Proud

ज्यांना मधुमेह आहे आणि ज्यांना अशा तर्‍हेचे उपाय करून पाहण्यात रूची असेल त्यांनी जरूर असे प्रयोग स्वतःवर करावेत...त्याचा खरोखरच काही उपयोग होतोय असे जाणवत असेल तर त्यासंबंधीची आपली निरीक्षणे आणि वेळोवेळी केलेले रक्तातल्या साखर तपासणीचे अहवाल इत्यादिंसहित माहीती एकत्रित करावी...आपल्यासारख्याच मधुमेही लोकांचे संघटन बनवून त्यांच्यापैकी जर असे कुणी करायला तयार असेल तर त्यांनाही अशीच त्यांची निरीक्षणे नोंदवण्यास प्रवृत्त करावे....ह्यातून मग काही तरी निष्कर्ष काढण्यास निश्चितच मदत होऊ शकेल. संशोधन शास्त्रज्ञांनीच केलं पाहिजे असा नियम कुठे आहे?

लक्ष्मी बाई,

कोथिंबीर आणि भेंड्याच्या औषधी गुणाबद्दल ऐकुन ऐवढा आनंद झाला ? आता तुमचा दवाखाना बंद करुन
बागकाम सुरु करा. Rofl

दिलेल औषध सोडुन कोथिंबीर व भेंड्याच पाणि घेण्याच सुचवतच नाही,

पण प्रश्न असा आहे की ह्या अश्या उपायावर संशोधन कोण करणार ?
फार्मा कंपन्या काय किंवा इतर कंपन्या काय. कोणीही फायदा असल्याशिवाय या अश्या उपायावर संशोधन
करण्यास पुढाकार घेणार नाहीत, भारतात अजुनही ३०-४०% जनतेला शिकलेल्या डॉक्टर कडुन अचुक निदान
करुन घेण्याच भाग्यच नाही. अश्या परिस्थीतीत अश्या लोकांना उपलब्ध असलेली महाग औषध
मिळतील / परवडतील ?

कालच माझ्या जवळच्या सिनियरने कलिगने सांगीतल की त्याला आतड्यात अल्सर झाल्याच
ऐंडोस्कोपी केल्या नंतर कळल. त्या अल्सरमुळे त्याच्या शरीरातील रक्त कमी झाल आणि त्याला तिन बॉटल
रक्त द्याव लागल, अल्सर कारण : ह्या माणसाला दुसर्या डॉक्टरांनी दर रोज अ‍ॅस्पिरिन घ्यायला सांगीतली
होती, हृदयासाठी !! ह्या अ‍ॅस्पिरीन मुळेच अल्सर झाला आणि निदान करणार्या डॉ. नी लगेच अ‍ॅस्पिरीन
बंद करुन टाकली. दुर्दैवाने ह्या माणसाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. अ‍ॅस्पिरिनचा या मध्ये
रोल नसला म्हणजे मिळवली !!!

जर भेंड्याच्या पाण्यामुळे खरच रक्तातील साखर आटोक्यात येत असेल तर भारतातील अश्या जनतेला
त्याचा फायदाच होईल ज्यांना अ‍ॅलेपॉथीच महागड औषध घ्यायला परवडत नाही. पण अश्या जनतेचा फायदा
लक्ष्यात कोण घेणार ? सरकार ?

अ‍ॅलोपथीखेरीज अन्य उपचारपद्धती : आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, इ.बद्दल संशोधन करणारी भारत सरकारने स्थापन केलेली मध्यवर्ती संशोधन संस्था

या संस्थेच्या छत्राखालील इतर संशोधन संस्था

सातींनी दिलेली लिंक वाचायचे कष्ट किती लोक घेतील?
स्वतःवर किंवा आपल्या जवळच्यांवर वेळ आली तर किती लोक वर सुचवलेला उपाय करून पाहतील?

If the way to make diabetes "go away" were truly as simple as drinking a glass of okra water every day, this would be a fact that doctors would advocate and every diabetic would know— it wouldn't an obscure "Did you know?" type of trivia item promulgated via social media.

मला नाही वाटत की डॉक्टरानी तरीही भेंडीचे पाणी प्या असे सांगितले असते.....

पुण्याची विनीता,....

१०००००००००००० +++

सातीनी दिलेल्या साईट वरुन ,.........

===There is a bit of truth to this claim in the sense that okra (also known as lady's finger, bendi, and gombo) does possess some anti-diabetic properties, namely that the viscosity of okra's carbohydrates helps to slow the uptake of sugar into the blood by reducing the rate at which sugar is absorbed from the gastrointestinal tract, thereby reducing the glycemic load of glucose in the blood that can disrupt the body's ability to properly process the sugars ====

तरीही लोकांना संशय आहेच,.....

संशोधन करणार्या संस्था असतीलही पण प्रश्न तो नाहीच, संशोधना अंती सिद्द झाले तरी ते संशोधन लोकांपर्यंत
पोहोचवण्यासाठी कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागेलच आणि अश्या स्वत्तातल्या उपायावर कोण पैसे लावणार ?? जगाच्या पाठीवर हाच सर्वात मोठा प्रश्न आहे,

मीही अश्या दुसर्या काही संस्थाची नावे देऊ शकेन ज्यातील एका संस्थेनी शेवग्याच्या शेंगांच्या औषधीय गुणावर संशोधन करुन सिद्द केल आहे आणि तेही १९९५-९६ ला, आता पर्यंत किती लोकांना या बद्दल माहीती आहे ? शेवग्याच्या शेंगांवर प्रमोशन करुन कोणाला फायदा होणार ? पण एखाद्या कंपनीने शेवग्याच्या शेंगांच एक्स्ट्राक्ट बनवुन बाजारात एखाद्या इंग्लिश नावाखाली आणल तर तुम्ही हसत हसत स्विकाराल !!
पण प्रश्न हा आहे की ईथे मुबलक मिळणार्या शेवग्याच्या शेंगाच एक्स्ट्राक्ट का बनवाव ? आणि लोकांनी ते कित्येक पटीनी पैसे देऊन का विकत घ्याव ?? कारण भारतात लोक असेही शेवग्याच्या शेंगा दररोजच्या आहारात खातात !!

दर वर्षी करोडो रुपये नोबेल शांती पुरस्कारात देणारा नोबेल ट्रस्टच्या नोबेल नावाच्या संस्थापकानी ईतके पैसे अमोनीयम नायट्रेट नावाच्या स्फोटकाच्या उत्पादनातुनच कमावलेला आहे.

स्वतःवर किंवा आपल्या जवळच्यांवर वेळ आली तर किती लोक वर सुचवलेला उपाय करून पाहतील?
पण समाजातल्या अश्यांना, ज्यांना कुठचाच उपचार मिळत नाही / परवडत नाही त्या लोकांच काय ??
त्या लोकांनी काहीच करायच नाही ? तरी बर भेंड्याच्या पाण्याने रक्तातील साख रेच प्रमाण कमी होत नाही हे
सिद्द झालेल नाहीय !!

जर सरकार अश्या लोकांची काळजी घेणार अस म्हणत असाल तर गेली ६० वर्ष आम्ही बघितलय !!

राजु ठाकरे, शेवग्याच्या शेंगांवर संशोधन करून आलेले औषध बाजारात केव्हाच आलेले आहे.
काही रेप्युटेड कंपन्या ते बनवित आहेत.
मात्र त्याचा पर्टिक्युलर अमुक आजारावर असा इलाज नसल्याने त्याला फूड सप्लिमेंट म्हणून भारतात मान्यता आहे.

मोरिंगा नावाने मिळते.

गंमत म्हणजे हे काहीतरी स्पेशल औषध आहे असे भासविण्यासाठी ड्रग कंपन्या डॉक्टरांना जे ब्रोशर दाखवितात त्यात झाडाचा लांबून फोटो, पानांचा उभा- आडवा छेद अशी चित्रे आहेत.
सगळे जण ओळखतात त्या शेवग्याच्या शेंगांचा फोटोच नाही.

मूळात ज्याला लोक अ‍ॅलोपथी म्हणून ओळखतात त्याचं आयुर्वेदाशी वैर नाहीच. होमिओपथीशी आहे. Wink
कित्येक औषधे अश्या झाडपाल्याच्या औषधातले यूजफूल केमिकल वेगळे करून मिळवलेली असतात.
आणी आम्ही आमच्या शाखेत ते औषध वापरण्यापूर्वी वय/ लिंग/ आजार आणि त्यानुसार प्रमाणित डोस अश्या शेकडो चाचण्या झालेल्या असतात त्यावर.

भेंडीचा खरच काही असा गुणविशेष असेल तर सध्या त्यातल्या उपयुक्त घटकाला वेगळे करून प्रमाणित डोस बनबिण्याचे काम
नक्कीच चालू होईल किंवा झालेले असेल.

कुणी का असेना! Wink

कळकळ दाखवतायत खूप पण त्यांना पुरेशी माहिती नाही.

विवेक नाईक, तुम्हाला अ‍ॅस्पिरीनची बाजारात काय किंमत आहे माहित्येय का?
पन्नास पैशाहूनही कमी आहे.
अ‍ॅस्पिरीनच्या गोळीमुळे कितीलोकांचे प्राण वाचले याचा व्यवस्थित डाटा मेंटेन आहे.
तसेच रिस्क बेनिफिट रेशोही डॉक्युमेंटेड आहे.
अशी बेपर्वा विधाने करून उगाच लोकाम्ना का कोड्यात पाडताय.
इथे ५० च्या वर वय असलेले कितीतरी सदस्य अ‍ॅस्पिरीन घेत असतील ते तुमच्या अश्या अर्धवट माहितीने घाबरून जाऊ शकतात.

'भेंडी आणि मधुमेह' या विषयावर भरपूर संशोधन सुरू आहे. शोध घेतल्यास अनेक पेपर सापडतील.
उदाहरणार्थ हा एक - http://www.sciencedirect.com/science/article/pii/S0955286314000515
आणि हा एक - http://en.cnki.com.cn/Article_en/CJFDTOTAL-XDJH201003004.htm

हाही एक - http://www.ijrpc.com/files/04.pdf

संशोधनाचे निष्कर्ष पटण्याजोगे असतील तर औषधकंपन्या औषध आणतीलच. पण नुसत्या भेंड्या खाऊन मधुमेह कमी होतो, या समजुतीत डॉक्टरांनी सांगितलेली औषधं बंद करू नका.

थँक्स सातीजी,

म्या पामराला पुरेशी काय , काहीच माहिती नाही !! मी असा दावाही केलेला नाही !!

बाकी कळकळ दाखवण्यात माझ्या धंदा मध्ये येत नाही.

चिन्नुक्स,

धन्स ,

भेंड्याच्या पाण्याच सोडा, लोक भेंड्याची भाजी खातातच की !! त्यामूळे लोकांना भेंड्यातील औषधी गुणाचा फायदा होणारच !!

< तरी बर भेंड्याच्या पाण्याने रक्तातील साखरेच प्रमाण कमी होत नाही हे सिद्द झालेल नाहीय !! >

Lol दोन नकार म्हणजे एक होकार का? म्हणजे भेंड्याच्या पाण्याने रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं तर! तसेही भेंड्याच्या पाण्याचा हा उपाय ज्यांना अन्य कोणताही उपाय परवडत नाही व ज्यांना सरकारनेही वार्‍यावर सोडलेय त्यांच्यासाठी आहे असे दिसते. Wink

रक्तात साखर शोषली जाण्याचा दर घटणे ही उपयुक्तता सातींनी दिलेल्या लिंकमध्ये मांडलेली आहे.
पण " हे पंधरा दिवस करुण पहा तुमच्या साखरेच्या प्रमाणात किती लक्षणीय घट होते ते !" याचा अर्थ भेंड्याच्या पाण्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते असाच अर्थ निघतो. आता भेंड्याच्या पाण्याच्या जोडीने नेहमीच्या गोळ्या/इन्सुलिन चालू ठेवले तर रुग्णाला हायपोग्लासमिया नाही का होणार?

चिन्नुक्सने म्हंटल्याप्रमाणे मधुमेह आणि भेंडी यावर संशोधन चालु आहे आणि अस संशोधन करण्याच कारण
त्यात काही तरी सापडण्याची शक्यता आहे म्हणुनच ना !! दिलेल्या लिंका वाचा की,.... तुम्ही निर्देश केलेल्या
सातीने दिलेल्या लिंकेतही There is a bit of truth to this claim असच म्हंटले आहे.

हायपोग्लासमिया होउ शकेल म्हणुन कोण्या डॉक्टरने मधुमेहासाठी औषध देताना, बाबा भेंड्याची भाजी जास्त खाउ नका असा सल्ला दिला, अस ऐकलेल नाही अजुन पर्यंत. कारण भेंड्याची भाजी खाणारा औषध म्हणुन भाजी खात नसतो.

जर भेंड्याच्या भाजीत असा काही औषधी गुणच नाही असा काही सुर असेल तर दिलेल्या लिंकेत बीट ऑफ ट्रू थ अस म्हणण्याच कारणच काय ? मुळातुनच मुद्दा खोडला असता !

माझा प्रतिसाद धाग्याच्या हेडरमधल्या (आणि त्या धाग्यास कारण होणार्‍या कुठून कुठून फिरत फिरत आलेल्या) "पंधरा दिवसांत साखरेच्या प्रमाणात लक्षणीय घट" होण्याच्या दाव्याबद्दल आहे.

"एकाची रक्तशर्करा ३०० वरून १५० वर, दुसर्‍याची १९५ वरीन ९४ वर आली. भेंडीचे पाणी इन्सुलिनसारखेच काम करते. ही माहिती तुमच्या पानावरही लावा. अनेकांना तिचा उपयोग होऊ शकेल"

Any volunteers?

Pages