प्रवासात दूध कसे नेऊ?

Submitted by वृष on 18 March, 2014 - 07:19

एप्रिल मधे बाळाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर ला महालक्ष्मी च्या दर्शनासाठी जाण्याची योजना आहे. एका रात्रीचा प्रवास आहे. तो रात्रीतून एकदा दूध पिण्यासाठी उठतो. दूध न नासवता कसे नेता येईल?

परवा होळी च्या वेळेस त्याला विमानाने हैद्राबाद ला घेउन गेले (मुंबई - हैद्राबाद) तर ५-६ तासात दूध नासले. (मुंबईच्या घरातून निघून हैद्राबादच्या घरी पोचेपर्यंत चा वेळ.) दूध थर्मास मधून नेले होते. उकळवून थंड करुन. (कोमट पेक्षा कमी गरम) .

हैद्राबाद ला नातेवाईकांकडे जात असल्यामुळे पर्यायी दूध तयार होते. कोल्हापूरला होटेल वर उतरणार आहोत. त्यामुळे तो पर्याय नाही. तिथे ९.०० च्या आधी दुकाने उघडत नाहीत असे मागच्या वेळेस एका होटेल मधे सांगण्यात आले होते.

For safer side, १२ ते १५ तासापर्यंत दूध न नासवता न्यायचे आहे. काही अशी वस्तू ज्यामधे दूध नासत नाही किंवा काही प्रतीबंधात्मक उपाय??

प्लीज मदत करा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुकतंच या अनुभवातून गेलेय. परवा शिमग्यासाठी गावी जाताना मिल्टन च्या स्टील थर्मास मध्ये गाईचं दुध उकळून गार करून भरून ठेवलं होतं. गाडीत ए सी असूनसुद्धा ६ तासातच दुध नासलं. ( थर्मास च्या कवरवर गरम - १८ तास आणि थंड -२४ तास अशी क्षमता लिहिलि होती. )आतापर्यंत फॉर्म्युला मिल्क प्यायची सवय होती त्यामुळे असा काही त्रास झाला नव्हता. पण २ वर्षांनंतर lactogen मिळत नाही म्हणून गाईच्या दुधाची सवय केलीय गेले २ महिने.
पण त्यातही लेकीचे नखरे कि थर्मास मधून बाटलीत ओतलेलं दुध प्यायलीच नाही कारण ते तिला काहीतरी वेगळंच वाटलं. परतीच्या प्रवासात जेव्हा तिला दुध हवं झालं तेव्हा एका चांगल्या हॉटेलबाहेर गाडी थांबवली आणि त्यांच्याकडून तापवून थंड केलेलं गाईचं दुध बाटलीत भरून घेऊन दिलं तिला.

एक साधा नैसर्गिक ऑप्शन आहे तो नाही का चालणार? किंवा एखाद दिवस दुसरे काही दिले तर? उन्हाळ्याचे दिवस आहेत दूध खराब होणारच ना.

मुलं किती छोटी आहेत यावर पण हे अवलंबून आहे पण इथे माझ्या लेकीच्या डॉ ने तर अशा वेळी कॅल्शिअमच्या डेली डोसचा विचार करून मुलीने दूधाऐवजी दही-साखर-पोळी, आईस्क्रिम, श्रीखंड-पोळी, चीजस्टिक असं काही खाल्लं तरी चालेल असा मला सल्ला दिला होता.

अमेरिकेत बहुतेक ठिकाणी तसा फारसा त्रास होत नाही ( दूध विकत मिळायचा किंवा ते नासायचा पण) पण आम्ही उन्हाळ्यात कँपिंगला जातो तेव्हा हा प्रश्न येतोच. विशेषतः २-३ दिवसांच्या. मुलगी छोटी असताना मी तिला बिन्धास्त वरील प्रकार ब्रेकफास्टला दिले आहेत. आनंदाने खाते. Wink

दूधापेक्षा दही कूलरमधे जास्त टिकतं हा स्वानुभव.

स्टेनलेस स्टीलच्या कुठल्याही थर्मास मधे दूध, दूग्धजन्य पदार्थ टीकत नाही असे थर्मास विकत घेतांनाच मला पुण्याला दुकानदारने सांगितले होते.
Thermos flask with glass inner lining is best for milk products, those flask we use to have it in our childhood. आता सहजा सहजी मिळत नाहीत आतून काच असलेले ते थर्मास. खूप शोधाशोध करून मला अमॅझॉनवर मिळाला होता.

गावी असंच चांगलं ताजं म्हशीचं म्हणून मुलाला दिलं आणि घरी आल्यावर स्टमक इन्फेक्शन! >> ताज्या ( नॉन पाश्चराईज्ड ) दुधाची नेहेमीची सवय नसेल आणि असे दुध किमान १० /१२ मिनीटे उकळवलेले ( उकळयला लागल्यावर १० मिनीटे गॅसवर उकळणे ) नसेल तर पोटाचे इन्फेक्शन होऊ शकते असे डॉक ने सांगितले होते. मुलीला भारतात आल्यावर असे झाले होते आणि त्याचा त्रास तीन /चार महिने झाला होता .
दुधाचे पदार्थ सहसा लगेच खराब होतातच, उन्हाळ्यात जास्तच . त्यात प्रवासात दुध डुचमळले तर ते लगेच खराब होते. साधे दही / ताक किंवा मिल्क पावडर हे ऑप्शन चांगले आहेत.

थर्मॉस मधे खुप वेळ ठेवलेल्या गरम दुधाला खरच वेगळाच वास येतो, आपल्यालाही प्यायला नकोसे वाटते असा अनुभव आहे.

इब्लिस : ;P (स्माईली कशा देऊ??)

माझ्याकडे मिल्टन चाच थर्मास आहे. त्यातच दूध नासलं.

नैसर्गिक ऑप्शन नाहिये म्हणून तरी एवढा खटाटोप.

फायनली दुधाची पावडर नेण्यावर शिक्कामोर्तब.

सर्व माबो करांना मदतीसाठी खूप खूप खूप खूप धन्यवाद.

(परत एकदा स्माईली हवी)

गाय Happy

छानुली चा पुढचा प्रश्ण : प्रवासात गाय कुठे बांधू?.

अवांतरः छानुली, फोर्म्युला ईज बेस्ट...!!!

वो मालगाडी पकडा मग, मोप चारा असतो भरलेला.:फिदी: लालुला इचारा, रेलमन्त्री होता ना त्यो.:फिदी:

छानुली टेक केअर. प्रवास छान होऊ दे. आणी अम्बाबाईला आमचा नमस्कार सान्ग.:स्मित:( आमचे कुलदैवत, त्यामुळे हक्काने अम्बाबाईच म्हणतो)

@रश्मी ... आमचे पण कुलदैवत अम्बाबाई च.

बाकी सगळे: माझ्या मनातले प्रश्न ओळखुन आधीच उत्तरं दिल्याबद्दल धन्यवाद. Wink

माझ्या भावाला लहान असताना दुध प्यायल्याशिवाय झोप यायची नाही. ( आता वय २८). तर त्या काळी असे पिशवी वाले दुध हा पण पर्याय काही वेळा नसायचा. स्पे पाहुण्यांकडे गेल्यावर रात्री एक ग्लास दुध मागणे काही वेळा प्रशस्त नाही वाटायचा.

त्यावर आमचा उपाय... त्याला सहज बाहेर घेवुन जायचे चक्कर मारायला. आणि मग हॉटेल मधे दुध मागवायचे.

माझ्या लेकिला आम्ही सरळ स्टार बक्स मधे दुध घेवुन द्यायचो.( तिला कोमट लागायचे). आणि मला ते सोपे वाटले.

तुम्हि प्रवासात तेच करु शकता. अगदिच दुधाच्या क्वालिटी बद्दल शंका असल्यास सरळ एक पॅक विकत घ्या आणि हॉटेल मधे गरम करुन मागा.

माझ्याकडे कॅमलचा स्टीलचा थर्मॉस आहे. मी रोज त्यातून कोल्ड कॉफी किंवा लस्सी नेतो. आठ तास चांगली राहते. थर्मॉस रोज गरम पाण्याने व बॉटल ब्रश वापरून धुतो.

हेल्लो सगळे.... जाऊन आलो कोल्हपूर ला... मस्त झाली ट्रीप. पावडर नेली होती दूधाची. पण वापरायला लागली नाही. पिशवी च्या दूधाची व्यवस्था सगळीकडेच झाली. आणि महत्वाचे म्हणजे बाळाला काहीच त्रास झाला नाही.

सगळ्यांना थँक्यू सो मच मदतीसाठी. :स्मितः

अवांतर : देवळात अंबाबाई च्या बरोबरीने समस्त वहिन्यांच्या भावोजींचेही दर्शन झाले. त्यांनी बाळाच्या गालाला हात लावून पप्पी घेतल्याचा आजोबांना (माझे वडिल) विशेष आनंद / कउतूक. (अंमळ थोडं जास्तीच)

अरे वा! मस्त! बाळाला त्रास झाला नाही हेच महत्वाचे.:स्मित: अम्बाबाईने काळजी घेतली.:स्मित:

फिडबॅक दिल्याबद्दल तुझेच धन्यवाद.:फिदी:

भावोजीना माबो जॉईन करायला सान्गायचे ना, मज्जा आली असती.:फिदी:

Pages