प्रवासात दूध कसे नेऊ?

Submitted by वृष on 18 March, 2014 - 07:19

एप्रिल मधे बाळाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर ला महालक्ष्मी च्या दर्शनासाठी जाण्याची योजना आहे. एका रात्रीचा प्रवास आहे. तो रात्रीतून एकदा दूध पिण्यासाठी उठतो. दूध न नासवता कसे नेता येईल?

परवा होळी च्या वेळेस त्याला विमानाने हैद्राबाद ला घेउन गेले (मुंबई - हैद्राबाद) तर ५-६ तासात दूध नासले. (मुंबईच्या घरातून निघून हैद्राबादच्या घरी पोचेपर्यंत चा वेळ.) दूध थर्मास मधून नेले होते. उकळवून थंड करुन. (कोमट पेक्षा कमी गरम) .

हैद्राबाद ला नातेवाईकांकडे जात असल्यामुळे पर्यायी दूध तयार होते. कोल्हापूरला होटेल वर उतरणार आहोत. त्यामुळे तो पर्याय नाही. तिथे ९.०० च्या आधी दुकाने उघडत नाहीत असे मागच्या वेळेस एका होटेल मधे सांगण्यात आले होते.

For safer side, १२ ते १५ तासापर्यंत दूध न नासवता न्यायचे आहे. काही अशी वस्तू ज्यामधे दूध नासत नाही किंवा काही प्रतीबंधात्मक उपाय??

प्लीज मदत करा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फॉर्म्युला मिल्क/ दुधाची पावडर आणि थर्मॉस मधे गरम पाणी असं घेऊन जाऊ शकाल.

प्रवासात दुध नासतं आणि रात्री बे रात्री पॅन्ट्रीवाल्यांना उठवून दादापुता करत कुणी दुध देता का दुध? असं म्हणायची वेळ येते, स्वानुभवाचे बोल Proud त्यावेळी परतीच्या प्रवासात मी वर दिलाय तोच उपाय कामी आलेला.

तुम्हि कोल्हापुर ला कसे जाणार आहात ?
रेल्वेने की खाजगी गाडी ने... गाडीने गेलात तर रस्त्यात काही हॉटेल लागतात.. तेथे तुम्ही पुन्हा दुध घेउ शकता..

ह्म्म.. ते आहेच डोक्यात. पण आत गाईच्या दूधाची सवय झाल्यावर ते दूध साहेब कितपत स्विकारतील हा प्रश्नच आहे... आधीपासून च द्यायला सूरुवात करायला हवी बहूतेक..

छानुली, प्रोत्साहन म्हणुन एक शतावरीयुक्त पावडर मिळते. माझा अनुभव - ती पावडर + गरम गरम दुध असे मिक्स नेल्यास दुध नासण्याची प्रोसेस लांबते. मी कित्येकदा असेच दुध न्यायचे.
अजुन एक दुध नेताना अगदी गरम दुध मी लॉक्च्या बाटलीतुन न्यायचे.
दुध नासण्याचा त्रास खुपच कमी झालेला.
पण हे सर्व घरी ट्राय करुन अनुभवानीच अंगीकारावे.

अजुन एक, चान्स मिळेल तेथे ते पावडर टाकलेले दुध उकळवुन घ्यायचे. बाटली / ग्लास नीट धुवुन परत त्यात तेच दुध भरुन पुढे जायचे.

मी नेहमी थर्मासमधून दूध नेते. आता पर्यंत कधीच खराब नाही झाल. माझ्याकडे मिल्टन आणि अजून एका कंपनीच आहे. दोन्ही स्टेनलेस स्टीलचे थर्मास आहेत. मी उकळत दूध थर्मासमध्ये भरते.
माझा ट्रेनचा बारा ते पंधरा तासांचा प्रवास असतो. रात्री झोपताना मला एक ग्लास दूध प्यायची सवय आहे. त्यामूळे मी नेहमी थर्मास कॅरी करते.

छानुली, तुमच्याकडे कोणत्या कंपनीचा थर्मास आहे???

आरती, माझ्याकडेही तोच आहे मिल्टन वाला स्टीलचा. पण त्यातही दुध नासलं होतं. हि गोष्ट लेक सव्वा वर्षांची असतानाची आहे. घरातून ४ वाजता बाहेर पडलेलो तेव्हा भरुन नेलं होतं आणि तिला झोपताना द्यायला गेलो तेव्हा लक्षात आलं नासलं आहे म्हणून. साधारण ७-८ वाजता चेक केलं होतं तेव्हा नासलं नव्हतं. मग पॅन्ट्रीवाल्याकडे धावा आणि बरच काही ...पळापळ करावी लागली होती

भलत्या ठिकाणी विकत घेतलेल्या दुधावर विश्वास ठेव्यापेक्षा formula + पाण्याची बंद बाटली. पाणी गरम करायचच असेल तर भांडं पण न्या. मायक्रोवेव मिळणे शक्य असेल तर सेफ भांडे. formula थंड पाण्यातही व्यवस्थित मिसळतो.
बाळाला दूध चांगले आहे का खराब होण्याच्या वाटेवर आहे हे कळत नाही आणि आपल्याला कळेपर्यंत फार उशीर झालेला असतो.

कविन व अमितव यांना अनुमोदन!

monalip

टपरवेअरच्या ग्लासात गरम दूध घालून हॉटेलच्या.वेटरने झाकण लावून दिले होते.झाकण उष्णतेने सैल झाले होते.त्यामुळे परत ते कधी वापरता आले नाही.

पाव पाव लिटरचे गायीच्या दूधाचे टेट्रापॅक न्या.
अ‍ॅज अँड व्हेन फोडून वापरा.
आमच्या मुलीला कोमट दूध प्यायची सवय आहे.
आम्ही हॉटेलात जे टी मेकर मिळतं त्यात पाणी उकळतो आणि मग तो टेट्रापॅक १५-२० सेकंद त्यात घालून ठेवतो.
नंतर तेच गरम पाणी बाटली धुवून ठेवायला वापरतो.

हॉटेलात फ्रीज असेल तर एकदा टेट्रापॅक उघडल्यास १-२ दिवस फ्रिजमध्ये ठेवता येतो.
अमूलचे अमर्याद टिकणारे गायीच्या दूधाचे पावलिटरचे टेट्रापॅक बर्यापैकी मोठ्या शहरात सहज उपलब्ध असतात.

कविन, ओह. मी पॅकेटच दूध नाही वापरत. मला रोज ताज गाईच आणि म्हशीच दुध मिळत. मी सकाळी ११ वाजता थर्मास भरते आणि रात्री ८.३० ला पिते.
माझा दुसरा थर्मास cello कंपनीचा आहे.
कृपया प्लास्टिक / टपरवेअरमध्ये, गरम / कोमट पदार्थ नका ठेवू.

अमूलचे अमर्याद टिकणारे गायीच्या दूधाचे पावलिटरचे टेट्रापॅक बर्यापैकी मोठ्या शहरात सहज उपलब्ध असतात.<<<साती, सगळीकडे उपलब्ध आहेत. मला रत्नागिरीत पण मिळाले होते. मी बर्‍याचदा तेच कॅरी करते. दुसरा एक पर्यात मिल्क पावडरचा.

सुनिधी खूप लहान होती तेव्हा फॉर्म्युला झिन्दबाद. फॉर्म्युला बंद केल्यापासून रात्री झोपताना दूध प्यायची सवयच मोडली.

आपल्याकडे टेट्रा पॅक्स मिळतात ना ? त्यातले दूध खराब होणार नाही. थर्मास मधेही रहायला हवे.
वाटेत ताजे मिळाले तर प्रश्नच नाही.
कोल्हापूरला अगदी पहाटे दूधकट्टा सुरु होतो. पण तापवून मिळणार नाही.
आपल्याकडे कोल्हापूरची बरीच माणसे आहेत आणि ती मनाने फारच चांगली आहेत याची ग्वाही मी देतो. त्या बीबीवर साद घालून ठेवा.

घरी सुद्धा बहुतेक 'दुधाची पावडर' यावर शिक्कामोर्तब होतय. पण टेट्रापॅक चं दूध उकळवता/ गरम करता येत का?

मी पुणे ते जळगाव दूध थन्ड नेले होते. तश्याच पिशव्या थेवल्या आनि बाजूने बर्फ टाकला होता खूप. जिथे थाम्बाल तिथे गरम करुन घ्या.
विद्या.

टेट्रा पॅकचे दूध गरम करता येते. नाही केले तरीही चालते.
प्रवास जर एसी डब्यातून करणार असाल तर टेट्रापॅक हा ओप्शन चांगला आहे. एसीच्या थंडाव्यात उघडलेला टेट्रापॅकही चांगला राहतो. ( जर लहान पॅक मिळाला नाही तर) मोठा पॅक घेऊन हवे तेवढे दूध काढून घेऊन पॅक उभ्या डब्यात ठेवावा. म्हणजे दूध सांड-लवंड होणार नाही.

अजून एक, रेल्वेमध्ये हे कॉफीवाले येतात त्यांच्याकडे बर्‍याचदा दूध असतं. पैसे देऊन विकत घेता येतं, पण त्यामध्ये त्यांनी भरमसाठ साखर घातलेली असते (पाणी तर मिक्स करतातच!!)

तुम्ही जर महालक्ष्मीच्या मंदिरा जवळ राहणार असाल तर सकाळी पाच / सहा नंतर गरम दुध मिळेल. तुम्ही कोल्हापुरला कोठे राहणार आहात ?

आपल्याकडे कोल्हापूरची बरीच माणसे आहेत आणि ती मनाने फारच चांगली आहेत याची ग्वाही मी देतो. त्या बीबीवर साद घालून ठेवा.>> दिनेशदा आभारी आहे.

हॉटेल राजपुरुष छान आहे. बरोबर स्टेशनच्या समोर आहे. (तिथे गुजराथी थाळी छान मिळते.)
तुम्ही जर सह्याद्री ने जाणार असाल (स. ६:१०) तर तुम्हाला तिथे सकाळी दुध नक्कि मिळेल. नसल्यास जवळच गोकूळ हॉटेल आहे. चालत जाउ शकता.

आपण ट्रेटापॅक घेवूनच जातो. कारण ते दूध चहात ओतुन मस्त वाटते.
छोटे छोटे घ्यायचे , डीप डीप वेलची वाला चहा घ्यायचा. गरम जेवण येतं. फक्त गरम पाणी घ्यायच व एखाद भांडं. त्यात बुडवून छान गरम होतात. कप, चमचे वगैरे घेवून जालाच.
Happy

दूध नासण्याच्या प्रॉब्लेमला नुकतंच तोंड दिलंय. माझ्याकडेही मिल्ट्न स्टील चा थर्मास आहे. साहेबांना सकाळी उठल्या उठल्या पेडीयाशुअर पावडर टाकून दूध प्यायची सवय आहे म्हणून उकळतं दूध भरलेलं. पण १२ तास नाही राहात हाच अनुभव. बाहेरचं दूध कुठलं पाणी वै. टाकलेलं असेल माहीत नाही. गावी असंच चांगलं ताजं म्हशीचं म्हणून मुलाला दिलं आणि घरी आल्यावर स्टमक इन्फेक्शन! उन्हाळ्यात पिशव्या किंवा गाईम्हशींचं दूध देणं म्हणजे भीतीच वाटते.

फॉर्म्युला दूधाचा पर्यायच उत्तम वाटतोय प्रवासात किंवा बाहेरगावी. पण चवीची सवय असल्यास मुलं खूप कंटाळा करतात पिताना...

मिल्टन स्टील थर्मासमध्ये दूध नासण्याच्या वरच्या सर्व अनुभवांना अनुमोदन...
पण फॉर्म्युला मिल्क/ दुधाची पावडरची सवय नसेल तर मुलं पित नाहीत.
एकदा दुध मिळणे अवघड झाले तेव्हा मी सेरेलॅकसुद्धा द्यायचा प्रयत्न केला पण सकाळी ६ ला ते खायची सवय नसल्याने फारसा यशस्वी नाही झाला Sad

Pages