नमस्कार,
महिन्यातून साधारण चार वेळा, प्रत्येकी १-२ तासाच्या वापरासाठी पोर्टेबल प्रोजेक्टर कुठला घ्यावा? पुर्णपणे सेवाकार्यासाठी वापरायचा असल्यामुळे साधारण खालीलप्रमाणे गरजा आहेत -
१) इथे शहरात आणि खेडोपाडी, दुर्गम भागातही इतर सामानाबरोबर किंवा अगदी लाल डबा गाडीतूनही सहज नेता येईल इतका हलका असावा. वापरात नसताना कुणाच्या तरी घरीच ठेवावा लागणार असल्याने वापर करण्यासाठी ने-आण करावी लागेल.
२) खूप हायफाय नको असला तरी सीडीज व्यवस्थित दाखवू शकू असा पाहिजे आहे. डिझास्टर मॅनेजमेंट अभ्यासक्रमाचे विडिओज, लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स अश्या शैक्षणिक हेतूसाठी व इतर महत्वाच्या सीडीज चालवता येतील असा असावा.
३) कमी मेन्टेनन्स लागावा.
४) लँपची किंमत पुरेपूर वसूल होईल इतकं त्याचं लाईफ असावं.
५) ग्रामिण भागातील व्होल्टेज फ्लक्च्युएशनला पुरुन उरणारा असावा.
६) वापरण्यास सोपा हवा कारण लेक्चर्स देणारे, तो घेऊन प्रवास करणारे अथवा शहरातच वापर करणारे वॉलंटिअर्स स्वतः सहजपणे तो वापरु शकले पाहिजेत. वापरताना छोटी मोठी अडचण आल्यास स्वतःच ती दूर करु शकले पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी कुणी टेक्निशिअन उपलब्ध असेलच असं नाही. काही ठिकाणी प्रोजेक्टर ही गोष्ट एक अजूबा असू शकते.
७) नॉन प्रॉफिट कारणांसाठी वापर असल्यामुळे (प्रसंगी, पदरमोड करुनही) वरच्या गरजा भागतील असा परंतु कमीतकमी किंमतीत असावा.
सद्ध्या आम्हाला घासाघिस करुन रुपये १५००/- १-२ तासांसाठी अश्या भाड्याने घ्यावा लागतो. पण अजून फार दिवस एवढ्या पैश्यांत मिळणार नाही. पैसे वाचवणे आणि तरीही जरा आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांद्वारे चांगली सेवा दुर्गम ग्रामिण भागातही देता यावी असा दुहेरी हेतू पोर्टेबल प्रोजेक्टर वॉलेन्टिअर्स काँट्रिब्युशनमधून (शक्यतो) विकतच घेण्यामागे आहे.
कुणाला ह्या बाबतीत माहिती असेल, वापर करत असतील तर कृपया ब्रँड, किंमत, मॉडेल आणि फिचर्स सुचवा. गूगलवर जे प्रोजेक्टर्स दाखवले गेले त्यात किंमतीची रेंज खूप मोठी आहे, अगदी काही हजारांपासून लाखाच्या घरात. त्यामुळे काही अंदाज येत नाहिये. लाखाच्या घरातला तर परवडणारच नाहिये. वर लिहिलेल्या गरजा पुरे करणारा प्रोजेक्टर नाही मिळाला तर आत्ता ज्या पद्धतीने (कधी भाड्याने आणलेला प्रोजेक्टर वापरुन तर कधी न वापरता इतर पद्धतीने) काम चालू आहे ते चालू ठेवूच.
धन्यवाद.
गण्या तुमचा सल्ला भारीच आहे.
गण्या तुमचा सल्ला भारीच आहे. पण तो सगळा सेट अप कॅरी करण खुप जिकिरेचे होइल. म्हणुन हवाय पोर्टेबल. हा प्रकार वेगवेगळ्या खेडोपाडी असलेल्या शाळांमधुन ८ ते १० वी च्या मुलांशी संवाद साधने (संशोधनाच्या दृष्टीने विचार क्षमता निर्माण करणे) असा आहे. आपण किती उलगडुन सांगितले तरी स्लाइड आणि क्लिप्स चा परिणाम नाही साधु शकत. एक स्लाईड १५ मिनेटाचे बोलणे एक्विव्हॅलंट करु शकते आणि फक्त बोलण्यासाठी समोर बसलेल्या सगळ्यांच्या इमॅजिनेशन पॉवर वर अवलंबुन रहावे लागते. आणि हि पिढी लय नशिबवान आहे कारण यांच्या काळात अशी उपकरणे आहेत.
किंवा लॅपटॉप ला युएस्बी वर
किंवा लॅपटॉप ला युएस्बी वर चालणारा शोधतोय>>
प्रोजेक्तरला लॅपटॉपच्या व्हीजीए पोर्ट मधुन व्हिडिओ ऑडिओ आउटपुट देता येते. (ही माहिती लॅपटॉप विक्रेत्याने दिलेली आहे)
त्यासाठी लॅपटॉपमध्ये व्हिजीअ पोर्ट हवा.
पॉवर देता येइल का माहिती नाही.
@ निवा स्लाईड प्रोजेक्टर +
@ निवा
स्लाईड प्रोजेक्टर + एलईडी (किंवा एलसिडी) टीव्हीची स्क्रीन असा सेट अप आहे तो. तुम्हाला छोटी स्क्रीन लागेल. मोठा पसारा नसणार. फक्त स्लाईडस नाहीतर मूव्ही, डिव्हीडी, टीव्हीचे कार्यक्रम सगळं दाखवता येतं.
गुगळून पाहील्यावर तुम्हाला कल्पना येईल.
निपा, कोल्हापुरच्या पंचगंगे
निपा, कोल्हापुरच्या पंचगंगे साठी वॉटर ट्रीटमेंट , वेस्ट वॉटर ट्रीटमेंट अन वीज निर्मीती असा प्रकल्प सादर केला होता. लाल फीती, आणि नेहेमीची यशस्वी कारणे यांत तो बारगळला. स्वदेस मधे ठीके. पण आप्ल्या देशात हे जमण अशक्य. असो हा ह्या धाग्याचा विषय नाही त्यामुळे राहुदेत.
मोअर प्रॅक्टीकली , इन्व्हर्टर वर चालणारा प्रोजेक्टर शोधला तर बरय.
शक्य आहे. अनेक उपाय आहेत.
शक्य आहे. अनेक उपाय आहेत.
एमएसईबी वर कावळे असतांना
एमएसईबी वर कावळे असतांना त्यांना एक उपाय टिव्हीवर सांगितला होता. त्यांनी शक्य आहे असं म्हटलं. पण काहीच केलं नाही. काही वर्षांनी त्याच कल्पनेवर एक प्रकल्प सुरू झाल्याची बातमी वाचली.
अहो गण्या दादा, वीज कोण तयार
अहो गण्या दादा, वीज कोण तयार करतय ? ती वीज ग्रीड ला कनेक्ट होणार का ऑनलाइन तयार होते तिथेच वापरली जाणार? त्या विजेची क्वालीटी कशी आहे, क्वान्टीटी किती आहे? डिपेन्डेबीलीटी कीती आहे ? अतिरिक्त निर्मित वीज साठवता येणार का? कशी? ह्याप्रश्नांचा साधक बाधक विचार केल्यावर नॉट व्हायेबल एकॉनॉमिकली अॅन्ड प्रॅक्तीकली अशी उत्तरे येतात. तसच निर्मीती डिसी अन वापर अॅसी असल्यानी वाया जाण्याचे प्रमाण जास्त आहे.
हा माझा अनुभव आहे. कोणालाही डिस्करेज करण्याचा हेतू नाही.
रॉकेल/डिझेलवर चालणारा छोटा
रॉकेल/डिझेलवर चालणारा छोटा जनरेटर गाडित घालून सोबत नेता येईल.
कोणताही प्रोजेक्टर इन्व्हरटरवर चालणाराच असतो. कारची बॅटरी वापरून इन्व्हरटर तयार करता येतो. कार सुरू ठेवून चार्जिंग सुरू ठेवता येते.
सेकंडहँड गाड्यांचे इंजिन वापरून गॅसवर चालणारा जनरेटर बनवणारा कारागिर मला ठाऊक आहे
इन्ना मॅडम मी या क्षेत्रात
इन्ना मॅडम
मी या क्षेत्रात काम केलं आहे (तज्ञ नव्हे). सध्या इतकं पुरे.
बाफ भरकटतोय गण्याजी, आपल्य
बाफ भरकटतोय
तो अधिकार फक्त महा-डीस्कोला . त्यामुळे तुम्ही ऑनसाइट वीज तयार करुन वापरु शकता पण शेजारच्याला पण देता येत नाही असा नियम आहे. तुम्हालाच ती दुसरीकडे हवी असल्यास ती महा वितरण ला द्यायची आणि त्यांच्याकडुनच दुसरीकडे घ्यायची असा नियम आहे (मला माहित असलेला, आताश्या काही बदल झाला असेल तर माहित नाही).
गण्याजी, आपल्य इथे वीज तयार करता येते पण त्याची वाहतुक करता येत नाही.
इन्ना पंचगंगे साठी १०० कि २०० कोटी मंजुर झालेत मागच्या वर्षी पण त्याचा एंड युजर ( आपणच दुर्दैवी) ला काही फायदा होइल असे वाटत नाही.
इब्लिस, सध्याचा इन्व्हर्टर गाडीच्या बॅटरीवरच चालतोय
पण यात तो इतका गरम होतो कि १५ -२० मी. त्यातुन वास येवु लागतो. कारण तो एल्सीडी आहे. मग भाषण आणि नंतर शो असा प्रकार होतो.
मला अगदी सुटसुटीत एकाच वेळी लॅपटॉप आणि प्रोजेक्टर खांद्यावरुन नेता येतील असा आयटम हवाय. त्या ८००० च्या ने मला बरीच भुरळ घातलीय पण कोणाचा तरी रिव्ही यायची वाट बघतोय
धन्यवाद
निवांत, तो नॅपटोलवरचा बघ ना.
निवांत, तो नॅपटोलवरचा बघ ना.
अरे हो ते लिहायच राहिलंच...
अरे हो ते लिहायच राहिलंच... नापतौल चा अनुभव लै चांगला नाहीय.
आमच्या काकाश्रींनी एकदा ऑर्डर केले होते. येते सगळे व्यवस्थीत पण क्वालिटी अशी कि त्याचे नाव तेच. नापतौल....
Mobile with projector can be
Mobile with projector can be an option.
@ निपा मी लडाख मधे १० मेवी
@ निपा
मी लडाख मधे १० मेवी क्षमतेचा पवनचक्की वीजप्रक्ल्प उभा केला आहे. ती वीज तिथेच वापरली जाते. ह्युंडेर मधे १५ वर्षांपूर्वी एक जनरेटिंग सेट बसवला होता ६२.५ केविए चा. आणि दुसरा ३० केव्हिएचा . या भागातल्या प्रयत्नांबद्दल यापेक्षा इथे जास्त माहीती देणे योग्य होणार नाही म्हणून थांबतो..
गुजरात मधे आमच्या एका मित्राकडे सोलर रेजचं कॉन्सट्रेशन करून त्यावर हाय प्रेशर स्टीम बनवून त्यावर स्टीम टर्बाईन रन करण्याचे प्रयोग यशस्वी होत आलेत. हे सध्या तरी खर्चिक असल्याने या मुद्यावर देखील कुणाचे समाधान करणे शक्य नाही.
काही कल्पना सोप्या आणि स्वस्तातल्या आहेत. वीज ग्रिडमधेच दिली पाहीजे असं काही बंधन नसतं. वीज पिकवण्यासाठी जी जागा लागते ती स्वस्तात मिळवून तिथे प्रकल्प उभारून ति ग्रीडला जोडला की शहरातल्या कारखान्यासाठी ग्रिडमधून त्याच प्रमानात वीज घेता येते म्हणून तसं करतात.
आम्हाला तसं काहिच करायचं नसेल तर ?
यु ट्युब वरचे हे पेज पहा
यु ट्युब वरचे हे पेज पहा ज्यात ५ डॉलर्स पासुन घरच्या घरी प्रोजेक्टर बनवायच्या कृती आहेत.
http://www.youtube.com/results?search_query=home+made+projector+mobile
दुसरे पेज पहा
http://www.youtube.com/results?search_query=home+made+projector+lamp
होम मेड प्रोजेक्टर असे सर्च केल्यास यु ट्युब वर बरेच काही मिळेल.
मोबाईल प्रोजेक्टरचा ऑप्शन
मोबाईल प्रोजेक्टरचा ऑप्शन पाहीलात का? असा
साध्या मोबाईलमधे असलेला प्रोजेक्टर किती प्रकाश देतो माहित नाही पण कदाचित चालेल. आणि जास्त पॉवरचा प्रोजेक्टर घेण्यापेक्षा साधारण काळ्या जाड कापडाचे दोन मी बाय दोन मी आकाराचे पाच सहा तुकडे न्या. त्याबरोबर क्लिप्स, पीना आणि दोर्या नेल्यात की तात्पुरती अंधारी खोली तयार होईल.
हुस्शार आयडिया @ सावली
हुस्शार आयडिया @ सावली
घेतला एकदाचा पोर्टेबल
घेतला एकदाचा पोर्टेबल प्रोजेक्टर. प्रोजेक्टर व पडदा असं सगळं मिळून जवळपास २८ हजारांना पडला. लई भारी वाटतं बघायला....भाड्याचा नाही ना!
कोणता घेतलाय?
कोणता घेतलाय?
Epson चा घेतलाय. मॉडेलचं नाव
Epson चा घेतलाय. मॉडेलचं नाव एक्झॅक्टली आठवत नाहिये. बार्गेनिंग केलं आहे.
मित्रहो, कांही दिवसांपूर्वीच
मित्रहो,
कांही दिवसांपूर्वीच एक अफलातून पोर्टेबल प्रोजेक्टर घेतला.
कंपनी : egate K९००
LED ३६०० ansi lumens
HD १०८०i , ३D , android support with wifi ,
२GB MEMORY EXTENDABLE UPTO ३२GB + ३२gb microSd card , USB ,
शिवाय वायरलेस कीबोर्ड व मावूस जोडता येतो.
डायरेक्ट इंटरनेट वापर.
वजन फक्त ४०० ग्राम
आकार ५०० पानांच्या पॉकेट बुक एव्हडा !
किंमत फक्त ४००००/-
एक वर्षाची warranty.
गुगल करून पहा.
five stars !
२०१४ नंतरचे अपडेट्स यात आले
२०१४ नंतरचे अपडेट्स यात आले आहेत काय ? अलिकडच्या प्रोजेक्टर्सच्या किंमती आणि टेक्नॉलॉजी याबद्दल विवेचन आहे का ?
Pages