नमस्कार,
महिन्यातून साधारण चार वेळा, प्रत्येकी १-२ तासाच्या वापरासाठी पोर्टेबल प्रोजेक्टर कुठला घ्यावा? पुर्णपणे सेवाकार्यासाठी वापरायचा असल्यामुळे साधारण खालीलप्रमाणे गरजा आहेत -
१) इथे शहरात आणि खेडोपाडी, दुर्गम भागातही इतर सामानाबरोबर किंवा अगदी लाल डबा गाडीतूनही सहज नेता येईल इतका हलका असावा. वापरात नसताना कुणाच्या तरी घरीच ठेवावा लागणार असल्याने वापर करण्यासाठी ने-आण करावी लागेल.
२) खूप हायफाय नको असला तरी सीडीज व्यवस्थित दाखवू शकू असा पाहिजे आहे. डिझास्टर मॅनेजमेंट अभ्यासक्रमाचे विडिओज, लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स अश्या शैक्षणिक हेतूसाठी व इतर महत्वाच्या सीडीज चालवता येतील असा असावा.
३) कमी मेन्टेनन्स लागावा.
४) लँपची किंमत पुरेपूर वसूल होईल इतकं त्याचं लाईफ असावं.
५) ग्रामिण भागातील व्होल्टेज फ्लक्च्युएशनला पुरुन उरणारा असावा.
६) वापरण्यास सोपा हवा कारण लेक्चर्स देणारे, तो घेऊन प्रवास करणारे अथवा शहरातच वापर करणारे वॉलंटिअर्स स्वतः सहजपणे तो वापरु शकले पाहिजेत. वापरताना छोटी मोठी अडचण आल्यास स्वतःच ती दूर करु शकले पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी कुणी टेक्निशिअन उपलब्ध असेलच असं नाही. काही ठिकाणी प्रोजेक्टर ही गोष्ट एक अजूबा असू शकते.
७) नॉन प्रॉफिट कारणांसाठी वापर असल्यामुळे (प्रसंगी, पदरमोड करुनही) वरच्या गरजा भागतील असा परंतु कमीतकमी किंमतीत असावा.
सद्ध्या आम्हाला घासाघिस करुन रुपये १५००/- १-२ तासांसाठी अश्या भाड्याने घ्यावा लागतो. पण अजून फार दिवस एवढ्या पैश्यांत मिळणार नाही. पैसे वाचवणे आणि तरीही जरा आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांद्वारे चांगली सेवा दुर्गम ग्रामिण भागातही देता यावी असा दुहेरी हेतू पोर्टेबल प्रोजेक्टर वॉलेन्टिअर्स काँट्रिब्युशनमधून (शक्यतो) विकतच घेण्यामागे आहे.
कुणाला ह्या बाबतीत माहिती असेल, वापर करत असतील तर कृपया ब्रँड, किंमत, मॉडेल आणि फिचर्स सुचवा. गूगलवर जे प्रोजेक्टर्स दाखवले गेले त्यात किंमतीची रेंज खूप मोठी आहे, अगदी काही हजारांपासून लाखाच्या घरात. त्यामुळे काही अंदाज येत नाहिये. लाखाच्या घरातला तर परवडणारच नाहिये. वर लिहिलेल्या गरजा पुरे करणारा प्रोजेक्टर नाही मिळाला तर आत्ता ज्या पद्धतीने (कधी भाड्याने आणलेला प्रोजेक्टर वापरुन तर कधी न वापरता इतर पद्धतीने) काम चालू आहे ते चालू ठेवूच.
धन्यवाद.
२०-२५ हजारांपर्यंत नवा
२०-२५ हजारांपर्यंत नवा चांगला, मिळतो.
उदा. http://www.snapdeal.com/products/electronics-projectors
आमच्या हपिसात सोनीचा वापरतात
आमच्या हपिसात सोनीचा वापरतात त्याला लॅपटॉप जोडतात. नक्की काय ब्रँड आहे ते बघून मंगळवारी सांगते. अगदी हलका आहे वजनाने. वेगळा लँप लागत नाही पण एक स्पाइक बस्टर पॉवर सॉकेट लागते म्हणजे त्यात लॅप टॉप आणि प्रोजेक्टर दोन्ही एका वेळेस जोडता येतात. तुम्ही काय आरोग्य विषयक चित्रपट वगैरे दाखवता का?
शोर्ट फिल्म्स बनवायच्या आहेत का? मुलांमुलींसाठी? मी त्या बनवू शकेन तू विशय दिलास तर. जसे हात नीट धुवावे, स्वच्छता इत्यादी.
धन्यवाद इब्लिस आणि अमा
धन्यवाद इब्लिस आणि अमा ब्रँड्सबद्दल अधिक कळलं तर बरं होईल. सोनी, एप्सन, एलजी बद्दल शंकाच नाही. पण Aiptek किंवा अजून काही कंपन्या दिसत आहेत. त्याबद्दल काही खात्रीचं माहित नाही. चायना मेकची भितीच वाटते.
शोर्ट फिल्म्स बनवायच्या आहेत का? मुलांमुलींसाठी? मी त्या बनवू शकेन तू विशय दिलास तर. जसे हात नीट धुवावे, स्वच्छता इत्यादी.>>>> अमा, खूप खूप धन्यवाद तुझ्या सहकार्याच्या तयारीबद्दल कधी काही मदत लागली तर नक्की सांगेन. शॉर्ट फिल्म्स वगैरे नाही बनवत. संस्थेकडून अप्रूव्ह झालेल्या काही सीडीज येतात त्या दाखवाव्या लागतात. उदाहरणार्थ सेंद्रीय शेती, पशुपालन वर्ग, गांडूळ खत प्रक्रिया, वृक्षारोपण, बोन्साय स्पोर्ट्स, मेडिकल अँड सर्विसेस कँप, रक्तदान शिबिर, AADM तर्फेच्या समाजाला दिलेल्या क्राऊड मॅनेजमेंट/पूरपरिस्थितीतल्या/दुर्घटना सेवा. ह्या व इतर अनेक सेवांसंदर्भात सद्गुरुंनी/संस्थेने केलेले मार्गदर्शन, तसेच प्रत्येक सेवा जास्त चांगल्या रितीने कशी करता येईल त्या दृष्टीने स्पॉट्सवर केलेले शूटिंग (काय चुकलं/कुठे सुधारणा करायला हवी/काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात इत्यादि), तसेच काही लेक्चर्सच्या दरम्यान वापरावा लागतो. काही सीडीज खास ग्रामिण भागासाठी आहेत (AIGV अंतर्गत). एकंदरच ठाणे ग्रामिण आणि ठाणे शहर अश्या दोन्ही भागात वापरला जाईल.
माझ्याकडे एप्सन चा ईबी एस९
माझ्याकडे एप्सन चा ईबी एस९ आहे
माझ्या घरी टिव्ही नाहिये आणि आम्हीह्या प्रोजेक्टरवर (लॅपटॉपला जोडून) जवळपास दर शुक्रवार शनिवार हवे ते सिनेमे पाहतो.
घेतल्यापासून गेली ३.५ वर्षे काहीही प्रॉब्लेम नाही. पुण्यामुंबैत विक्री नंतर्ची सर्व्हिस पण चाम्गली मिलते.
वजनाला हलका, आकार लहान आहे, त्याच्याबरोबर एक पॅडीग्ग वाली बॅग पण आहे. ने आण करायला सोपा आहे त्यामुळे. किंमत घेतला तेव्हा२४,००००/
इन्ना पिक्चर क्वालिटी कशी
इन्ना पिक्चर क्वालिटी कशी आहे? वेस्टर्नपट पाहायला चांगला आहे का? आणि आवाजाचं कसं काय? स्क्रीनचं काय करता?
धन्यवाद इन्ना असे रिपोर्ट्स
धन्यवाद इन्ना असे रिपोर्ट्स मिळाले की निर्णय घ्यायला सोपं जातं.
पिक्चर झकास दिसत. आवाज बरेच
पिक्चर झकास दिसत. आवाज बरेच दिवस लॅपटोप वर्च ऐकायचो. आता स्पिकर जोडून ऐकतो.
आणि ही आयडीया घरच्या इतरांच्या गळी उतरवायला, मी हा प्रोजेक्तर भाड्यानी आणून मॅकॅनाज गोल्ड दाखवला. रेस्ट इज हिस्टरी
स्क्रीन म्हणजे भिम्त.
आमच्या हाफ तिकिटाला
आमच्या हाफ तिकिटाला वेस्त्र्न पट, आनि देवानंद च फ्यान बनवल आता.
अश्विनी, माझ्याकडे egate
अश्विनी,
माझ्याकडे egate कंपनीचा P512 प्रोजेक्टर आहे. किंमत २३०००/- मार्केटेड इन इंडिया.
LED ल्याम्प. ३५०० ल्युमेंस. hdmi विथ १०२४ रेसोल्युशन. पिक्चर थ्रो १० मीटर्स. ३D capable.
तुम्हाला हवा असा प्रोजेक्टर सुमारे ६००० रुपयांपर्यंत निश्चित मिळेल.
LED च घ्या. वरील परमिटरस मध्ये कोम्प्रोमयीज करावे लागेल पण तुमचे काम होईल. वेळाने अधिक माहिती देतो.
धन्यवाद इन्ना
धन्यवाद इन्ना
तुम्हाला हवा असा प्रोजेक्टर
तुम्हाला हवा असा प्रोजेक्टर सुमारे ६००० रुपयांपर्यंत निश्चित मिळेल.>>>
सुरेशजी.. मलाही माहिती हवी आहे.
This person is in Thane. PC
This person is in Thane.
PC Clinic India
Mr. Pramod Shinde (Director)
Gadrewadi, Uthalsar, Opposite Muncipal School, No. 7, Opposite Jogila Market
Thane - 400601, Maharashtra, India
Call Us: 08377800029
He has not given prices. Check and see demo.
Your choice should take into consideration,
Size of crowd,
Time of the day/night,
Usually they donot require servicing but local person is better.
You can see on amazon.in for portable projectors but seeing a demo is advisable as some of them are mere toys.
Once you buy, there will be plenty of time for repenting ! Hence do your research before buying, donot be in hurry !
Search olx and quikr, you might strike a good deal !
Good luck.
धन्यवाद सुरेशजी
धन्यवाद सुरेशजी
पूर्ण अंधार करून पडद्यावर
पूर्ण अंधार करून पडद्यावर सादरीकरण करणार आहात का? मग अगदी साधाही चालेल. अगदी साडेसात हजारांत येईल.
http://www.shopclues.com/5-inch-mini-led-projector.html
पण जर का दिवसा उजेडी पाहणार असाल तर जरा जास्त चांगल्या दर्जाचा घ्यावा लागेल.
http://www.grabmore.in/products/31131223/ASUS-P2E-Portable-LED-Projector...
लॅम्पचा प्रोजेक्टर घेऊ नका, त्यापेक्षा एलईडी प्रोजेक्टर केव्हाही चांगला.
जरा हे परीक्षणही वाचावे.
http://www.anandtech.com/show/5552/asus-p1-portable-led-projector
One concern that people will have when they see this is the 200 lumens
rating, as that seems quite small in comparison to other projectors.
Since the P1 uses an LED light source, you can expect those lumens to
be very constant throughout the life of the projector, unlike
conventional projection bulbs that can easily lose 25% or more
brightness in less than 500 hours of usage. Also, the P1 is likely to
be used in smaller rooms and settings than a 2,000 lumen monster, and
typical screen size will be closer to 60" than 150", so for business
use you will probably find this to be enough light.
Why LED Projectors instead of conventional lamp technology projectors?
Features of LED Projector
http://www.infibeam.com/Computers_Accessories/portronics-pico-projector/...
Here it is clearly written that the LED lamp Life of Over 20,000 hours
and Power Consumption is 13 W only.
Features of conventional lamp technology projector
http://www.dell.com/ed/business/p/dell-1210s/pd
Whereas here it is given that Lamp Life Cycle:
Up to 4500-hour Normal Mode
Up to 5000-hour Eco-Mode
and
Power Consumption Operational:
Normal mode: 225W ± 10% @ 110Vac
Eco mode: 200W ± 10% @ 110Vac
Power saving mode: ≤14W (fan speed at minimum)
So LED Projector means less power consumption and more LED life over
conventional lamp technology.
LED PROJECTORS in Indian Market
http://www.grabmore.in/products/31131223/ASUS-P2E-Portable-LED-Projector...
http://www.naaptol.com/projectors/viewsonic-pled-w500-projector/p/536321...
http://www.ibhejo.com/InFocus-IN1144-LED-Projector.html?utm_source=Troot...
http://www.snapdeal.com/product/aiptek-t20-pocket-cinema-projector/12570...
http://www.snapdeal.com/product/lg-microportable-led-projector-pa70g/179...
http://www.infibeam.com/Projectors/i-BenQ-Projector-Joybee-GP2/P-CA-A-Be...
http://www.infibeam.com/Computers_Accessories/portronics-pico-projector/...
They say this one is LED Projector but I am doubtful as its brightness
is 3500 lumens
http://www.tradus.com/3d-hd-led-home-theater-projector/p/PRJMIKJIAD2SRP4I
Imported LED Projectors
http://www.amazon.com/Optoma-EP-PK-101-Pico-Pocket-Projector/dp/B001L4L7AQ
http://shopping.yahoo.com/914439580-technologies-led-showtime-3d-micro-p...
http://www.amazon.com/Optoma-ML550-Lumens-3D-Ready-Projector/dp/B00CY9PWKI
http://www.bhphotovideo.com/c/product/819983-REG/Viewsonic_PLED_W500_PLE...
http://www.casioprojector.com/products/Pro_Models/XJ-H2650
Review on LED Projectors
http://www.anandtech.com/show/5552/asus-p1-portable-led-projector
एकदमच तगडं बजेट असेल तर हे पाहा:- कॅसिओ अर्थात सर्वोत्तम
Pro Models
XJ-H2650
http://www.casioprojector.com/products/Pro_Models/XJ-H2650
Power Source AC100~240V, 50/60Hz
Casio Lamp Free Projectors' Technology:-
http://www.casioprojector.com/news/Misc/800720470/CASIO_CONTINUES_TO_PRO...
डॉक्टर आणि चेतन, Thank you
डॉक्टर आणि चेतन, Thank you very much
डॉक्टर, प्रमोद शिंदेंना संपर्क करुन बघते. फोन नं नोट केला आहे.
अश्विनी के, तुम्ही घेतलात का
अश्विनी के, तुम्ही घेतलात का प्रोजेक्टर. मला ही तातडीने घ्यावा लागेल असे दिसते. इकडे कोणत्याच शाळेत प्रोजेक्टर नाहिय, त्यामुळे घेणे मस्टच आहे. पदरमोड करुनच घ्यायचा आहे. पण काही ठिकाणी लाईटच (वीज) नाहि आहेत. त्यामुळे कारच्या १२ वोल्ट बॅटरीवर इन्व्हर्टर वर / किंवा लॅपटॉप ला युएस्बी वर चालणारा शोधतोय. कृपया कुणी घेतला असेल तर माहिती शेअर करा. धन्यवाद.
निवांत, तेव्हा घेणं झालं नाही
निवांत, तेव्हा घेणं झालं नाही काही कारणाने, नाहीतर इथे लिहिलंच असतं. आता थोडी सवड मिळाली की त्या पेंडिंग इश्यूकडे पहायचे आहे. मिटिंग्जमध्ये दुसरेच महत्वाचे आणि वेळ घेणारे इश्यूज प्राधान्याने घ्यावे लागत आहेत.
http://www.naaptol.com/projectors/xelectron-advanced-led-cinema-projecto...
इथे एक कमी किंमतीत दिसतोय बघ. त्याबाबत विचार करणार आहोत.
फ्लिपकार्ट, अलिबाबा ,
फ्लिपकार्ट, अलिबाबा , अलिएक्सप्रेक्स या ऑनलाईन दुकानात ६००० रु पासून प्रोजेक्टर मिळतो. पॉवरपॉइंट प्रेझेनेटेन्शन्स आणि साधारण सीडीजसाठी ठीक आहे. लँपचं लाईफ, गॅरण्टी याबद्दल माहीती नाही.
२५००० च्या आसपास एलसीडी प्रोजेक्टर्स मिळतात ते जड असतात. एलईडी प्रोजेक्टर्सचं थोडे हलके असतात.
५०००० रु च्या आसपास मिळणारे ब्ल्यू टूथ रेडी एचडी प्रोजेक्टर्स कुठेही मिळतात.
हे
हे पहा
http://www.portronics.com/pico-por-315-pocket-projector.html
http://www.portronics.com/ilume-mini-portable-projector.html
Acer P1163 हा देखिल चांगला पर्याय ठरु शकतो.
गण्या., सडेतोड,
गण्या., सडेतोड, धन्यवाद.
एकहाती वापर नसेल. त्यामुळे खूप पैसे टाकण्यात अर्थ नाहिये.
धन्यवाद लोक्स.... नेटवर भरपुर
धन्यवाद लोक्स....
नेटवर भरपुर व्हरायटी मिळाली. फक्त एक प्रश्न राहिला आहे. ब्राइटनेस किती लुमेन्स असावा म्हणजे दिवसा पडदे न लावता एखाद्या वर्गात शेवटच्या बेंचवर बसलेल्या मुलांना स्क्रिनवरचे व्यवस्थित वाचता येइल.?
निवा पडदे न लावता ? लॅम्प
निवा
पडदे न लावता ?
लॅम्प लवकर जाईल. त्याचाच खर्च सर्वात जास्त असतो.
आपल्या साठी पडदे कोण लावणार?
आपल्या साठी पडदे कोण लावणार? बरेचदा खोल्या इतक्या छोट्या असतात कि व्हरांड्यात मुलांना बसवावे लागते. त्यामुळे त्या कंडीशन ला पण चालला पाहिजे असाच शोधतोय. प्रॉब्लेम हा अहे कि कुणीतरी वापरलेले रिव्ह्युज मिळत नाहिय्त. एकदा कॉन्फिडन्स आला कि वर्स्ट कंडीशनलाही चालतोय मग काही प्रॉब्लेम नाही.
म्हणुन तर ते ६ हजार ते २० हजार पर्यंतचे घ्यायला मन धजावत नाहीय. त्यात त्याचे ट्रान्सपोर्टेशन प्रचंड असणार आहे.
निवांत, कुणाचा चांगला चालणारा
निवांत, कुणाचा चांगला चालणारा टिव्ही व डेक (डिव्हिडी प्लेअर) दिला तर चालेल का? माझा आधीचा टिव्ही व प्लेअर असाच एका आदिवासी भागातल्या शाळेला दिला होता. आताचा पण द्यायचा आहे. पण जिथे वीज पोहोचली असेल तिथेच उपयोग होईल.
टिव्ही नाही हो चालत. मी फक्त
टिव्ही नाही हो चालत. मी फक्त एका शाळेत एकदा जातो. त्याची उचलाउचल किती करावी लागेल. आणि ८ ते १० चे विद्यार्थी एकत्र असतात. त्यामुळे स्क्रिन मोठाच हवासा वाटतो त्या क्राउड पुढे.
बरं बरं शाळेतच ठेवता आला
बरं बरं शाळेतच ठेवता आला असता. पण स्क्रिन मोठा हवा हे खरं आहे. माझा २९ इंची आहे.
पण जिथे वीज पोहोचली असेल
पण जिथे वीज पोहोचली असेल तिथेच उपयोग होईल. >> स्वदेस सारखं करा काहीतरी म्हणजे टिव्हीचा उपयोग होईल.
स्वदेस सारखं म्हणजे?
स्वदेस सारखं म्हणजे?
गावासाठी छोट्या प्रमाणात वीज.
गावासाठी छोट्या प्रमाणात वीज. सिरीयसली. या विषयवर बाफ असेल तर कळवा.
@निवा
तुमच्यासाठी एक प्रोजेक्ट सुचवतो.
तुम्हाला स्लाईड प्रोजेक्टर कॅरी करायला अडचण येत नसेल तर त्याच्या सहाय्याने तुम्ही स्वस्तात मस्त, टिकाऊ आणि खोलीतल्या प्रकाशात चालणारा प्रोजेक्टर बनवू शकाल. एलईडी टीव्हीची स्क्रीन काढून तिला कनेक्शन्स देऊन ती जर स्लाईड प्रोजेक्टरवर ठेवली तर फक्त आरसा अॅडजस्ट करून तुम्ही तुमचं काम भागवू शकता.
हे कसं करायचं याचं प्रात्यक्षिक तुम्हाला युट्यूब वर पहायला मिळेल. गुगळून पहा.
गावासाठी छोट्या प्रमाणात वीज.
गावासाठी छोट्या प्रमाणात वीज. सिरीयसली. या विषयवर बाफ असेल तर कळवा.>>> तूच उघड ना. हिमाचल प्रदेशमध्ये गावांगावांपुरते जलविद्युत प्रकल्प आहेत ना?
Pages