अ‍ॅगाथा ख्रिस्ती - फॅन क्लब

Submitted by गजानन on 12 March, 2014 - 12:54

अ‍ॅगाथा ख्रिस्तीचे चाहते आहेत का? Happy

तुम्ही कोणती पुस्तके वाचली? सगळ्यात आवडते कोणते? याबद्दल वाचायला नक्कीच आवडेल.

आवश्यक तिथे कृपया स्पॉयलर वॉर्निंग द्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Poirot and Ms Marple , both >> acorn.tv पण सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. पॉरो २४ वर्षे चालली ज्यात १३ सीझन्स आणि ७० एपिसोड्स आहेत. मिस मार्पल चे १२ एपिसोड्स आहेत एवढे सगळे बघायला दोनेक महिने लागतील. तेव्हा सबस्क्रिप्शन घेतलेले बरे...निदान एचडी क्वालिटी मिळेल.
मग पुन्हा मिडसोमर मर्डर्स, एंडेवर मोर्स अशा अगणित एकसे एक मिस्ट्री सिरीज आहेत... थोडक्यात शेरलॉक जुने आणि नवे सोडून बहुतेक सगळे ब्रिटिश मिस्ट्री ड्रामाज आहेत acorn वर.
मंथली सबस्क्रिपश्न $५.९९ असावे. भारतात चालते की कसे माहित नाही.

मिरर मध्ये खूप वेगळीच संकल्पना आहे. एखाद्याने इम्पल्स मध्ये केलेली एखादी अत्यंत हार्मलेस गोष्ट आणि दुसर्‍या एका आयुष्यावर त्याचे कायमचे परीणाम. >> अनु , तुझ्या रेको वरून मुद्दाम शोधून पाहिली . छान आहे . आवडली . सत्य शोधन वगैरे प्रकार ईतका भारी नाही वाटला , पण मूळ गोष्ट खरच मस्त आहे.

ज्याप्रकारे मेडोना च्या पोर्ट्रेट च्या उल्लेखाने मार्पल शोधून काढते ते खरंच भारी आहे.
शिवाय क्रियापदाच्या उल्लेखाने झालेला गोंधळ.
अ मर्डर इज अनाऊन्सड मध्ये पण पूर्णपणे वेगळी कल्पना आहे.
आता आपण खूप थ्रिलर्स पाहत असल्याने कदाचित शेवट लक्षात येईल लगेच, पण ज्या काळात ती लिहिली त्या काळात प्रचंड ट्विस्ट असणार तो.

चीकू तुम्ही सगळी पुस्तकं वाचलीत ? ग्रेट!
मी बरीच वाचली आणि काही माझ्या संग्रही पण आहेत.
माझी सगळ्यात आवडती
Death comes as the end
Mirror cracked from side to side
Elephants can remember
Sleeping murder
4.50 from padington
Then there were none
The moving finger
Peril at endbhouse

मी शेवटचं सोडून सगळी वाचलीत
पाहिल्याची मात्र स्टोरी आठवत नाही
थोडा क्लू द्या
स्लीपिंग मर्डर मध्ये नव विवाहित बाईला जिन्याच्या रेलिंगमधून खून पाहत असल्याचं स्वप्न पडत असतं ना?
मला बेट्रॅम्स हॉटेल खूप आवडते.थोडी अचाट आहे पण त्यातली जुन्या काळच्या हॉटेल ची, खाण्याची वर्णनं मस्त आहेत.
अँड देन देअर वेअर नन शी साप्ताहिक सकाळ मधल्या पाषाण बेट सिरीज मुळे नॉस्टॅल्जिक नातं आहे.
अ मर्डर इज अनाऊन्सड सर्वात पहिली वाचलेली आणि सर्वात आवडती.
मिस मार्पल ची पहिली ओळख असलेली (मर्डर ऍट व्हिकारेज) पण चांगली आहे.
डेथ इन कॅरेबियन (की अशी काहीतरी) पण वेगळी आहे.त्यात धोत्र्याचा उल्लेख आहे.

पहिल्या कथेला इजिप्शियन (बहुतेक) कौटुंबिक पार्श्वभूमी आहे.मलाही आठवत नाहीए नीटशी. पण हे पुस्तक वाचूनच मी अगाथा ख्रिस्तीची पंखी झाले आणि तिची मिळतील ती पुस्तके वाचून काढली.
स्लीपिंग मर्डर मध्ये नव विवाहित बाईला जिन्याच्या रेलिंगमधून खून पाहत असल्याचं स्वप्न पडत असतं ना?>> हो तेच. लहानपणीची आठवण नायिकेची

येस! 'डेथ कम्स ऍज द एन्ड' मध्ये एका जुन्या काळातल्या ईजिप्शियन कुटुंबात घडणाऱ्या खुनाची उकल आहे.

मला या कथा वाचण्याबरोबरच त्यांचे मालिकारुपांतरही आवडते. विशेषतः डेव्हिड सुशेने साकारलेला प्वारो!

डेथ कम्स मध्येच तो पॉयरो भर वाळवंटात उन्हाळ्यात घट्ट पेटंट लेदर शूज घालून फिरत असतो ना?
कोणी अफेअर ऍट स्टाईल्स वाचलं आहे का?

स्पॉयलर
त्यात ते पत्र सोयीस्कर पणे सापडणं मला मजेशीर वाटलं.टाकता आलं नाही तरी भिजवता, चावून खाता आलं असतं ना Happy

डेथ कम्स मध्येच तो पॉयरो भर वाळवंटात उन्हाळ्यात घट्ट पेटंट लेदर शूज घालून फिरत असतो ना?<<<<<
नाही ती कथा प्राचीन काळात घडते. प्वारोचे वाळवंटात उत्खनन पार्श्वभूमीवरची दोन कथानकं म्हणजे - मर्डर इन मेसोपोटेमिया आणि अपॉइंटमेंट विथ डेथ.

कोणी अफेअर ऍट स्टाईल्स वाचलं आहे का?<<<< येस! मी अलमोस्ट सगळीच वाचली आहेत पुस्तकं. अफेअर ऍट स्टाईल्स म्हणजे प्वारोची पहिली कथा.

कोणी अफेअर ऍट स्टाईल्स वाचलं आहे का?

स्पॉयलर
त्यात ते पत्र सोयीस्कर पणे सापडणं मला मजेशीर वाटलं.टाकता आलं नाही तरी भिजवता, चावून खाता आलं असतं ना
>> अगदी बरोबर! छोटे तुकडे करून खाऊन टाकायचे, ते पत्र मिळालं नसतं तर खुनी सापडलाच नसता.

Elephants can remember मधे नायिकेला जुळी बहीण आहे हे समजल्यावर शेवट वाचायच्या आधीच सगळा उलगडा झाला Happy

पेटंट लेदर वाले शूज वाली कथा अपॉइंटमेंट विथ डेथ आहे.
अफेअर ऍट स्टाईल्स
पत्रात नुसतं फ्रॉम टू आणि काही महत्त्वाचे मुद्दे पेन ने खोडले असते तरी चाललं असतं.
शिवाय कपावर पाय ठेवून त्याचा पूर्ण चुरा कोणी करून पाहिला आहे का? कितीही जुना काळ असेल, न भाजलेला मातीचा कप असेल तरी शक्य नाही.

शिवाय कपावर पाय ठेवून त्याचा पूर्ण चुरा कोणी करून पाहिला आहे का? कितीही जुना काळ असेल, न भाजलेला मातीचा कप असेल तरी शक्य नाही.>>
बरोबर! पण मला आठवतं त्याप्रमाणे तो कप आधी टेबलवर असतो मग टेबल कलंडून तो खाली पडून फुटतो. म्हणजे त्याचे आधीच तुकडे झालेले असतात मग त्याच्यावर पाय देऊन चुरा केला जातो. अर्थात कप चांगलाच ठिसूळ असणार!
त्यात नवर्‍याबायकोची प्रत्येकाची स्वतंत्र खोली आणि नवर्‍याची पत्रं ठेवायची कुलूपबंद अलमारी बायकोच्या खोलीत असणे हे जरा नवलच वाटलं होतं Happy आणि खुनी व्यक्तीने पत्रामधे कारण नसताना विस्ताराने आपल्या कारनाम्याची माहिती लिहिणं जरा अनाकलनीयच होतं Happy
आता पॉयरोच्या इतर रहस्यकथांइतकी ही सरस नाही तरी पहिलं पुस्तक म्हणून चांगली आहे!

हिंदी सिरीयल मध्ये नाही का, लपून माहिती ऐकणाऱ्या व्यक्तीच्या सोयीसाठी सर्व प्लॅन नाव जागा सगळं सांगून सविस्तर सांगतात(फक्त प्रेमाचं मॅटर असेल तेव्हा मात्र अतिशय मोघम बोलून गोंधळ करणार).अर्थात प्रेक्षकांना कळायला असं चिटिंग करावंच लागतं

क्रुकेड हाऊसः
हे एक नक्की वाचावं असं पुस्तक आहे. यातल्या व्यक्तीरेखा खूप विचारपूर्वक बनवल्या आहेत.
कणखर, तत्वनिष्ठ आणि प्रॅक्टिकल सोफीया
हुशार पण भावनेच्या भरात वाहून जाणारा कथानायक
धूर्त, पण प्रेमळ मृत उद्योगपती अरीस्टाईड
घुम्या आणि मनात खंत बाळगून असलेला अयशस्वी लेखक फिलिप
प्रेमळ, प्रांजळ पण व्यवहारातलं काहीच कळत नसलेला रॉजर
प्रत्येक गोष्ट एक नाटक समजून सतत एका रोल मध्ये वावरणारी फिलिप ची अभिनेत्री बायको मॅगदा
श्रीमंती, बडेजावाचा मनस्वी तिरस्कार असलेली रॉजर ची बायको.
विधुर अरीस्टाईड च्या लहान मुलांची काळजी घ्यायला आयुष्यभर अविवाहीत राहिलेली, आणि तरीही अरीस्टाईड चा तिरस्कार करणारी त्याची मेहुणी एडिथ
तरुण, सर्वांच्या सतत नजरेत खटकणारी अरीस्टाईड ची दुसरी बायको ब्रेंडा
तरुण, गरीब आणि सतत गोंधळलेला मुलांचा ट्युटर आणि ब्रेंडाचा प्रियकर लॉरेन्स
अपंग आणि त्यामुळे सर्वांचा तिरस्कार करणारा लॉरेन्स चा विद्यार्थी, जोसेफाईन चा भाऊ
नको तिथे लुडबुड करुन, नाक खुपसून सतत जोखमीत सापडणारी जोसेफाईन

रहस्यकथा, वाचकांना पुरेसे क्लु देऊनही शेवटी धक्का देणारी एक उत्तम कादंबरी.
काही लोकांना अगाथा ख्रिस्ती आवडत नाही कारण ते चुकीच्या पुस्तकांपासून सुरुवात करतात (मला न आवडणारी टपेन्स अँड टॉमी वगैरे)

काही लोकांना अगाथा ख्रिस्ती आवडत नाही कारण ते चुकीच्या पुस्तकांपासून सुरुवात करतात (मला न आवडणारी टपेन्स अँड टॉमी वगैरे)>> खरं आहे मला ते दोघे अजिबात आवडत नाहीत.

माझी सुरवात क्रूकेड हाऊसपासूनच झाली. त्यात पॉयरॉ किंवा मार्पल नाही पण अतिशय उत्कृष्ट कथानक आहे. त्यानंतर वाचलेली म्हणजे मार्पलची मर्डर इज अनाउण्स्ड, माझ्या मते मार्पलची सर्वोत्तम कथा. मग पॉयरॉची कर्टन. मग बाकी सगळ्याच Happy

The mysterious Mr Quinn वाचली आहे का कोणी? त्यातल्या काही कथा चांगल्या आहेत.

मला पण मिस्टर क्वीन नाही आवडत.
'मिरर...' मध्ये मिस मार्पल चं वयस्क असणं, त्यातले इश्युज हे पण छान घेतलंय.
कर्टन ही पॉयरो ची लास्ट केस. तशी मिस मार्पल ची लास्ट कोणती आहे? मला माहित नाही.

Sad Cypress आणि death on Nile बघून झाल्या.
इथे सांगितलेल्या काही कथा आहेत सिरीजमध्ये.

डेव्हिड सुशे ची मर्डर ऑन ओरियंट एक्स्प्रेस चांगली जमलीय. त्यांनी मूळ कथेची बरीच मोडतोड केलीय पण कलाकार खूप चांगले आहेत. त्यामुळे बघायला चांगली वाटते.

The mysterious Mr Quinn वाचली आहे का कोणी? त्यातल्या काही कथा चांगल्या आहेत.>>>

माझ्याकडे हे पुस्तक आहे व त्यातल्या कथा मला फारच आवडलेल्या आहेत. कुठल्याही घटनेकडे बघताना काळ हा महत्वाचा घटक ठरतो. घटना घडताना ज्या गोष्टी लक्षात येत नाहीत त्या नंतर दृग्गोचर होऊ शकतात ही थीम एकदम इन्ट्रीग्यूइंग वाटली. मी खूप वेळा परत परत वाचल्यात या कथा.

डेव्हिड सुशे ची मर्डर ऑफ रॉजर अक्राईड बघितली पण नाही आवडली. शेवट काहीच्या काय केला आहे, पळापळी काय, गनफाईट काय :(.

ह्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये याआधी न वाचलेल्या लेखकाचं किमान एक पुस्तक वाचायचं असं ठरवलं होतं. वर्षाच्या सुरूवातीला जॉन ग्रिशमचं एक आणि वूडहाऊसची दोन अशी पुस्तकं आणली होती. तिनही पुस्तकांनी पकड घेतली नाही आणि मग ते राहूनच गेलं. मध्यंतरी हा बाफ वर आला. तो वाचून आणि मग लायब्ररीतून अगाथा ख्रिस्तीचं 'अ मर्डर इज अनाऊन्स्ड' हे पुस्तक मिळेपर्यंत वर्षाचा शेवटचा आठवडा उजाडला. अखेर हे पुस्तक काल वाचायला घेतलं आणि आज आत्ता वाचून संपलं. Happy
इथे लोकांनी लिहिलं तसं पहिली पंचवीस तीन पानं प्रचंड बोअर झाली पण नंतर इतकी भारी पकड आली की बसं. हे पुस्तक आवडलच आता ह्या बाफवर आलेली बाकीची पुस्तकंही वाचेन.

Pages