अ‍ॅगाथा ख्रिस्ती - फॅन क्लब

Submitted by गजानन on 12 March, 2014 - 12:54

अ‍ॅगाथा ख्रिस्तीचे चाहते आहेत का? Happy

तुम्ही कोणती पुस्तके वाचली? सगळ्यात आवडते कोणते? याबद्दल वाचायला नक्कीच आवडेल.

आवश्यक तिथे कृपया स्पॉयलर वॉर्निंग द्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक थोडे विषयांतर. अ‍ॅगाथा वा अगाथा असा उच्चार केल्यामुळे बरीच टिंगल सहन करावी लागली आहे. हा खास मराठी वा भारतीय उच्चार आहे का नक्की माहित नाही. पण अमेरिकेत व इंग्लंडमधे ह्या नावाचा उच्चार अ‍ॅगथा असा काहीसा होतो.
ही क्लिप बघा:
https://www.youtube.com/watch?v=a5k0wsjT8tM

सुरवातीला मला ख्रिस्तीबाईंच्या गोष्टी भलत्याच आवडायच्या. पण नंतर ती आवड थोडी कमी झाली. प्रत्येक पुस्तकातले रहस्य अगदी छोटे असते आणि त्याभोवती मोठी गोष्ट गुंफलेली असते असे वाटू लागले. तरी हर्क्युल पॉय्रो आवडतो एक पात्र म्हणून आवडतो. त्याचे ते फ्रेंच पूर्वी बरेच अगम्य असायचे ते आता थोडेथोडे कळू लागले आहे.

अगाथा ख्रिस्तीची बरीच पुस्तके वाचली आहेत. पण त्यांच्या "द माउसट्रॅप" नाटकाचा प्रयोग मागच्या वर्षी पहिला. खूप छान अनुभव होता. ह्या नाटकाचे ब्रिटिश रंगभूमी वर 1952 पासून सतत प्रयोग होत आहेत.

आजच बॉडी इन द लायब्ररी वाचली, अफलातून रहस्य.
१ छोटासा डाउट आहे त्याबद्दल, कुठे विचारू, कुणाला विचारु? कुणाला आठवतीये का ती स्टोरी?

रहस्य उकल होण्याची हिंट मिळेल असं वाटलं म्हणुन नाही विचारले.
पण रीफ्रेज करते. बेसिल बेक आणि खूनी ह्यांच्यातला संबन्ध काय असतो, बेसिल वर बालंट का आणू बघत असतात ते पुर्ण पुस्तक वाचूनही उमगलं नाही, शेवटचा चाप्टर परत वाचून पाहिला तरी नाही कळलं Sad

बासिल ब्लेक वर बालंट आणण्याचे विशेष कारण नसते, तो गावत नवा आणि चित्रपटाशी संबंधित लफडेवाला इ.इ. त्यामुळे पचून जाईल असे वाटले म्हणून.
अगाथाच्या दोन मुलींचे खून आणि एकीच्या जागी दुसरीचे प्रेत ठेवणे (त्यामुळे खुन्याला त्या वेळी अ‍ॅलाबाय मिळते) या संकल्पनेवर आधारीत दोन कादंबर्‍या आहेतः बॉडी इन लायब्ररी आणि नेमेसिस.
क्रुकेड हाऊस वाचली नसेल तर नक्की वाचा. ट्विस्ट चांगला आहे.

मी अनू, धन्यवाद.
मी सुद्धा हाच गेस (only for the sake of alibi) केला होता, पण तरी असं वाटलं की काही निसटतय का..
Happy

मी अर्ध्यात सोडलेली: द सिक्रेट अ‍ॅडवायजरी (सोडून चूक केली का? Sad )

द सिक्रेट अ‍ॅडवायजरी
ही पण बोअर झाली. मला टॉमी आणी टपेन्स मुख्य पात्रं असलेल्या कादंबर्‍या बोअर होतात.
आवडलेल्या:
१. मर्डर ऑन ओरियंट एक्स्प्रेस (ही खूपच जबरदस्त आहे)
२. कर्टन (जरा कंटाळवाणी पण ज्याला पॉयरॉ माहित आहे त्याला रोचक वाटू शकते.)
३. मर्डर अ‍ॅट व्हिकारेज (यात मिस मार्पल ची एंट्री आहे)
४. मर्डर इज अनाउन्सड (यात ग्रामीण आयुष्याचं खूप चांगलं चित्रण आहे.)
५. मिरर क्रॅक्ड फॉम साईड टु साईड
६, सॅड सायप्रेस
७. मर्डर ऑफ रॉजर अक्रॉईड
८. देन देअर वेअर नन

मध्यंतरी Agatha christie's poirot ह्या सिरीयलचे वेडच लागलेले. मस्त आहे. जमलं तर जरूर बघा.

त्यातले - Evil under the sun, murder in mesopotemia, death on the nile खूप आवडले.

murder of Roger ackroyd पण छान आहे - पण पुस्तक वाचण्याचा अनुभव जास्त जबरदस्त आहे बघण्यापेक्षा!

मला टॉमी आणी टपेन्स मुख्य पात्रं असलेल्या कादंबर्‍या बोअर होतात.>> हो मला पण.

पॉयरो आवडतो, पण मधेच आलेले फ्रेंच शब्द कळत नाहित Sad किंचित रसभंग होतो, असं वाटतं की गेली... हूकली हिंट

मला कायमच मिस मार्पलच्या कथा पॉयरो पेक्षा जास्त आवडतात. पॉयरोच्या कथांमध्ये नंतर नंतर रेड हेरिंग्जचा (फसवे धागेदोरे, वाचकांना गुन्हेगार गेस करता येऊ नये म्हणून) अतिरेक आहे. मिस मार्पलच्या कथांमध्ये त्या मानाने काहीतरी जेन्युईन/बुद्धिला भयंकर मेहनत करावी लागेल असे रहस्य असते. पॉयरोच्या अखेरच्या कथांमध्ये तर बळंच वेळकाढूपणा केलेला आहे, फक्त सर्वांवर संशय यावा असे प्रसंग निर्माण करायचा अट्टाहास म्हणून! एकंदरीतच पॉयरोच्या कथांची हाताळणी आवडत नाही (अपवाद : मर्डर ऑन ओरिएंट एक्स्प्रेस). ख्रिस्तीबाईंना मार्पलकथा मात्र चांगल्या जमल्यात.
त्यापेक्षा तिच्या कोणताही ठरलेला डिटेक्टिव नसलेल्या कथा खूप जास्त भारी आहेत. अ‍ॅन्ड देन देअर वेअर नन ही माझी सर्वात आवडती कथा आहे. द मॅन इन ब्राऊन सूट आणि माऊसट्रॅप (नाटक) हेही खूप छान आहेत.

ख्रिस्तीकथेत एक गोष्ट जरा रिपीट होते.
श्रीमंत आणि विधवा/विधुर्/अविवाहित वृद्ध/वृद्धा आणि त्यांचे मानलेले भाचा भाची,घरात नर्स इ.इ.
मला पायरो ची पहिली कथा 'मिस्टीरियस अफेअर अ‍ॅट स्टाइल्स' फारशी झेपली नव्हती. वॉर इकॉनमी म्हणून इतकं सॉलीड पत्र फाडायचं नाही? मी असते तर निदान खाऊन तरी टाकलं असतं किंवा फ्लश केलं असतं. आणि पत्रात इतकं स्पष्ट स्पष्ट लिहायचं? कदाचित त्या जुन्या काळात गेले तर कळेल खरंच असं होतं का ते. आणि ख्रिस्तीकथांमध्ये नवरा बायको वेगवेगळ्या खोल्यांत का झोपतात ते मला अजूनही कळलेलं नाहीय. Happy
मला कर्टन मधल्या घाऊक प्रमाणातल्या योगायोगांचीही गंमत वाटते.

मर्डर ओरीएंट एक्स्प्रेस म्हणजे शॉन कॉनरीचा का? प्राईमवर खुप दिसताहेत म्हणुन म्हटले विचारावे.

डेव्हिड सुशे चा पॉयरो सिरीज मधला एपिसोड आधी बघा.तो जास्त प्रभावी आहे.मूळ कथेत थोडे बदल केलेत पण त्याने फार नुकसान होत नाही.

नुकतेच Downtown Abby चे सिझन संपविले , त्यावरून आठवले.
मर्डर ऑन ओरियंट एक्स्प्रेस मध्ये मला एखाद्या घरात इतके नोकर चाकर का लागतात ते इमॅजिन करता येत नव्हते. हाऊसमेड, लेडीज मेड, वॅलेट, बटलर, कूक, ड्रायवर इ.इ. एकच व्यक्ती लेडिज मेड आणि कूक चे काम करू शकत नाही का किंवा वॅलेट आणि ड्रायवर एकच का नाही? असे वाटायचे. पण Downtown Abby पाहिल्यावर एकंदरीत त्या काळातील अतिश्रीमंतांचे कल्चर लक्षात आले.

नवीन Submitted by चैत्रगंधा on 28 September, 2020 - 08:32 >> चैत्रगंधा
ह्या बटलर संस्कृती आणि काळाबद्दल अजून माहिती हवी असेल तर काझुओ ईशिगुरो चे बुकर प्राईझ विनर 'रिमेन्स ऑफ द डे' ही कादंबरी वाचू शकता. ऊच्चभ्रुंच्या जगात माल्कांच्या सावलीसारखे हे लोक सेकंड क्लास सिटीझन असल्यासारखे आणि तरीही आपल्या मालकाएवढा स्वाभिमान मान सन्मान बाळगून कसे राहू शकतात.. मालक (काऊंट्स, लॉर्ड्स नाईटशिप वगैरे मिळालेले लोक) त्यांच्या सेवेत असलेल्यांना किती अबदीने वागवतात...अगदी सीक्रेट सोसायटी वाटावी असे त्यांचे प्रोटोकॉल्स, सवयी वगैरे अफलातून प्रकरण आहे सगळं.
कादंबरी न जमल्यास... त्यावरच बेतेलेला आणि झाडून सगळे ऑस्कर नॉमिनेशन्स मिळवलेला अ‍ॅथनी हॉफकिन्स आणि एमा थॉम्प्सन ह्यांचा त्याच नावाचा सिनेमा सुद्धा बघू शकता.

हायला , सध्या पायरो आणि मिस मार्पल ची सिरिज बघतेय .
त्यामुळे काही नाव ओळखीची वाटतायत. काही एपिसोड पाहिले आहेत .

मर्डर ऑन ओरियंट एक्स्प्रेस (ही खूपच जबरदस्त आहे) - बघायची आहे . प्राईमवर भारतात दिसत नाही.
death on the nile - आता नविन सिनेमा येतोय .
२. कर्टन (जरा कंटाळवाणी पण ज्याला पॉयरॉ माहित आहे त्याला रोचक वाटू शकते.) - अजून बघितली नाही
३. मर्डर अ‍ॅट व्हिकारेज (यात मिस मार्पल ची एंट्री आहे) - ही मला जाम आवडलेली . visiual treat . घरं , चर्च, जंगल सगळच नयनरम्य.
४. मर्डर इज अनाउन्सड (यात ग्रामीण आयुष्याचं खूप चांगलं चित्रण आहे.) - ही पण नयनरम्य .
५. मिरर क्रॅक्ड फॉम साईड टु साईड - नाही पाहिली .
६, सॅड सायप्रेस -नाही माहित.
७. मर्डर ऑफ रॉजर अक्रॉईड - नाही पाहिली .
८. देन देअर वेअर नन - ना!
बॉडी इन द लायब्ररी - बघितली .
व्हाय डिडन्ट दे आस्क इव्हान्स? -- बघितली .आवडली .
२. ४:५० फ्रॉम पॅडिंग्टन - हे पण आवडली .
नेमेसिस -- त्या mystery adventrure trip च्या मी प्रेमात पडले . मस्त कन्सेप्ट Happy .

अवांतरच :
मी पुस्तकं नाही वाचलीत . पण सीरीज मध्ये ती मार्पल आजी एक्दम मस्त आहे . सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेउन असणारी , सतत काहीतरी वीणकाम चालू हाताने . सुरुवातीला खोचक-भोचक वाटली पण नंतर नंतर आवडली Happy
प्वारो , बराचसा विनोदी आहे . डेविड सुशे मस्तच . कॅ. हेस्टीन्ग्स , चीफ एन्स्पेक्टर जॅप आणि मिस लेमन - सगळे कलाकार छान आहेत.
मला फ्रेन्च कळत नाही . पण लेकाला आणि नवर्याला थोड थोड येत . त्यामुळे काही काही शब्द कळले .

५. मिरर क्रॅक्ड फॉम साईड टु साईड - नाही पाहिली .
६, सॅड सायप्रेस -नाही माहित.
७. मर्डर ऑफ रॉजर अक्रॉईड - नाही पाहिली .
८. देन देअर वेअर नन - ना!

हे चारही नक्क्की बघा.
मिरर मध्ये खूप वेगळीच संकल्पना आहे. एखाद्याने इम्पल्स मध्ये केलेली एखादी अत्यंत हार्मलेस गोष्ट आणि दुसर्‍या एका आयुष्यावर त्याचे कायमचे परीणाम.
सॅड सायप्रेसः ही आवडू शकेल. थोडी संथ वाटेल.
रॉजर अक्रॉईड त्या काळाच्या मानाने खूप क्रांतीकारी लेखन कल्पना.
देन देअर वेअर ननः ही सुद्धा शेवट पर्यंत खिळवून ठेवेल. (आधी गुमनाम बघू नका)

मिनी सिरीज सगळ्या नाही बघितल्यात पण पुस्तके सगळी वाचली आहेत.

माझे टॉप टेन!

१. मर्डर ऑफ रॉजर अक्रॉईड
२. देन देअर वेअर नन
३. मर्डर इज अनाउन्सड
४. मर्डर ऑन ओरियंट एक्स्प्रेस
५. हर्क्युल पॉयरोज ख्रिसमस
६. क्रूकेड हाऊस
७. कर्टन
८. डेड मन्स फॉली
९. पेरिल अट एन्ड हाऊस
१०. डेथ ऑन नाईल

कादंबरी न जमल्यास... त्यावरच बेतेलेला आणि झाडून सगळे ऑस्कर नॉमिनेशन्स मिळवलेला अ‍ॅथनी हॉफकिन्स आणि एमा थॉम्प्सन ह्यांचा त्याच नावाचा सिनेमा सुद्धा बघू शकता. <<<<< अगदी. पुस्तक आणि सिनेमा दोन्ही उत्तम आहेत.


नवीन Submitted by mi_anu on 28 September, 2020 -
>> मी_अनु, कुठं बघता येतील हे?

अगदी. पुस्तक आणि सिनेमा दोन्ही उत्तम आहेत. >> सिनेमात मिस झालेली (अर्थात दाखवणे शक्यच नाही म्हणा) एक मोठी गोष्ट म्हणजे स्टीवन्सचे मोनोलॉग्ज...
खासकरून 'लॉयल्टी' आणि देशहिताचे राजकारण.... रँडच्या अ‍ॅटलास श्रग्ड मधल्या ऑब्जेक्टिविझम संदर्भातले लांबच्या लांब तत्वज्ञानपर ऊतार्‍यांसारखे ऊतारे न देता वाचकाच्या मनावर मोठा आणि खोल परिणाम साधणारे स्टीवन्सच्या आठवणींतून आलेले लॉयल्टी बद्द्लचे पॅसेजेस नकळत वाचकाला आत्मपरिक्षण करायला लाऊन लज्जित करतात..असा परिणाम साधणारे लेखन आजिबात पाल्हाळिक वगैरे न वाटता फारच गुंतवून ठेवणारे आणि म्हणून ऊच्च वाटले.
असो पुस्तकाबद्दल लिहिणे ईथे अवांतर होईल त्यामुळे थांबतो.

स्वस्ति पायरोची सिरीज कुठे बघताय ? >>> sony Liv.
Poirot and Ms Marple , both

> मी_अनु, कुठं बघता येतील हे? >>> +10000 . मला , एक एपिसोड , mirror चा दिसतोय.

Pages