Veggie Soup

Submitted by बस्के on 11 March, 2014 - 20:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ टोमॅटो
२ गाजरं
५-७ पालकाची पानं
४-५ bok choy ची पानं
५-७ Romain व Iceberg Lettuce ची पानं
२-३ Red Cabbage/ Chicory ची पानं
अर्धी ढब्बू मिरची
१ मध्यम कांदा
४ लसणाच्या पाकळ्या
मीरपूड
थोडी कोथिंबीर
मीठ
(असल्यास) गार्लिक बटर. [ हे न वापरल्यास ही रेस्पी व्हीगन होईल.]

क्रमवार पाककृती: 

soup1.jpg

छोट्या कुकरमध्ये वरील सर्व भाज्या/ग्रीन्स (कांदा वगळून) व मीठ घालून २ शिट्ट्या काढाव्यात. [ भाज्या फार गाळ करायच्या नाही आहेत. माझा कुकर छोटा आणि जरा बिघडलेला आहे, सारख्या शिट्ट्या करतो. मोठा कुकर वापरला तर कदाचित एकच शिट्टी व प्रेशर बास होईल.]
तोवर कांदा जरा मोठा कापून घेणे.
गॅसवर भांड्यात गार्लिक बटर घालून कांदा मोठ्या फ्लेमवर परतून घेणे व अर्धाकच्चा शिजवणे. त्यातच कोथिंबीर घालून परतणे.
व कुकरमधील शिजवलेल्या भाज्या - त्यातल्या पाण्यासकट घालून गरम करणे.

व्हेजी सूप तयार!

soup2.jpg

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांना दोन सर्वींग्ज
माहितीचा स्रोत: 
मीच.
आहार: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझं आवडतं सूप. आठवड्याच्या शेवटी भाज्या संपत आल्य की उरल्यासुरल्या भाज्या घालून हमखास बनवलं जातं. सेल्व्ही मोडीफाईड कृतीमध्ये यात ती करी पावडर नाहीतर रस्सम पावडर घालते. बरं लागतं.

Pages