डीसीहून नायगरा धबधबा

Submitted by हर्ट on 7 March, 2014 - 10:28

नमस्कार, ,

मला वाशिंंगटन डीसीहून नायगरा धबधबा बघायला जायचे आहे. बस वा ट्रेननी किती तास लागतात? चांगला पर्याय कुठला आहे? तिथे रहायचे असल्यास चांगले स्वस्त हॉटेल सुचवेल का कुणी? धन्यवाद मी ट्रिप अ‍ॅडवायसर सवड मिळताच बघेल तोवर तुमचे अनुभव मांडा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकाळची मुक्तपिठ नावाची पुरवणी येते, त्याची आंतरजालावरदेखील आवृत्ती सापडेल. त्यात अनेक जण आपले अमेरिकावारीचे अनुभव लिहितात व त्यातले बहुतेक नायाग्राला भेट दिलेले असतात. ते तू वाच, त्यात तुला फर्स्ट हँड माहिती मिळेल नक्की.

टण्या Proud
डिसीहून माहित नाही. पण नायगर्‍याच्या आसपास भरपूर हॉटेल्स आहेत. सिझन प्रमाणे रेट बदलतात. हिल्टन वगैरे नेहमीची आहेतच. 4th July वगैरे पीक सिझन आहे. फॉल्सच्या जवळचे हॉटेल घेतल्यास कारची गरज पडत नाही.

टण्या Lol

पण नायगर्‍याच्या आसपास भरपूर हॉटेल्स आहेत. सिझन प्रमाणे रेट बदलतात. हिल्टन वगैरे नेहमीची आहेतच. 4th July वगैरे पीक सिझन आहे. >> +१ week days ला गेलास तर गर्दी कमी असेल.

टण्या Lol

न्यू यॉर्क वरून ७-८ तास लागतात ट्रेनने. सकाळी निघणारी एक गाडी आहे पेन स्टेशन वरून. दुपारी तीन च्या सुमारास पोहोचते. बस ई ही असेल, माहीत नाही. आम्ही ट्रेन ने गेलो होतो. तेथून विमानाने बे एरियात परत आलो त्यामुळे परतीची ट्रेन केव्हा आहे ई. माहीत नाही.

टण्या,
सर्वात उत्तम उपाय, कार रेंट करुन ड्राईव्ह कर - ७-८ तास लागतील.
बाल्टीमोर किंवा ड्यूलेसहून बफेलोला फ्लाईटने जाण्याचा पर्यायही चांगला आहे. १५०$ पर्यंत रिटर्न तिकीट मिळून जाईल आणि बराच वेळ वाचेल.
नायगरा पाहण्यास आख्खा एक दिवस राखून ठेव.

बी, कृपया अ‍ॅडमीनना सांगून तुमचे एकेका विषयावरचे धागे 'स्टेप-बाय-स्टेप' गाईड अशी नविन मालिका सुरू करून त्या अंतर्गत घाला.

जायची का गरज नाही?:फिदी: तू जाच रे बी तिथे. अशा गोष्टी याची देही याची डोळा पहाव्यात.

ते यु ट्युब वर आणी बाकी लोकान्चे फोटो पाहुन जीव भकाभका जळतो, मग हा अनूभव आपण का घेऊ नये.

बी सरखे माबोबर विचारण्यापेक्षा गुगल बाबालाच विचार, तिथे १७६० रस्ते मिळतील जाण्याचे.

धावत जा/ पळत जा/ उडत जा ( विमानाने ) पण जाच तिथे. ( सिरीयसली लिहीतेय, चेष्टा नाही. कारण मला जमले तर जायचे आहेच कधीतरी)

नायगाराला जाणार असाल तर 'मेड ऑफ द मिस्ट' ही बोटीची राईड अवश्य घेणे. आधीच तिकिटे बुक करता येतात, दरडोई $१७ फक्त ! ४ एप्रिल रोजी तुम्ही तेथे असाल तर आपली गाठ पडू शकेल !

आम्ही न्यू जर्सी येथून सहा तासात कारने पोहोचलो होतो. त्या ठिकाणी वर सुरेश शिन्दे यांनी लिहिल्याप्रमाणे " मेड ऑफ द मिस्ट ' ही बोटीची राइड आवश्यक आहेच , पण तेथील एकच तिकिट १७ डॉलरचे घेण्यापेक्षा १) मेड ऑफ द मिस्ट " २) नायगारा फिल्म शो ३) नायगारा संग्रहालय ४) ब्रायडल वेल व ५) नायगारा हिस्टरी शो अशा एकूण पाचही ठिकाणे बघण्याचे एकत्रीत तिकीट फक्त ३८ डॉलर्स असते , ते स्वस्त पडते.तेच घ्यावे हे उत्तम.
त्यासाठी मात्र वेळ भरपूर हवा.एकतर अगदी सकाळी सुरवात करून , सायंकाळ पर्यन्त सर्व काही पाहून घ्यावे
नाहीतर दुपारी २ वाजेपर्यन्त तेथे पोहोचून दुसर्‍या दिवशी ३ वाजेपर्यन्त सर्व पाहुन परत यावे. म्हणजे एक रात्र तेथे
मुक्कामी काढावी.

Bee,
I don't know about tour busses or other options to go to Niagara Falls.
I Wondl highly recommend getting a Canadian visa and seeing it from the Canadian side too. If you have an international drivers permit from India or a valid drivers license from INdia, you can rent a car and drive. It will probably cost the same as train or bus tickets, but you will have flexibility in your schedule.

I would recommend at least one full day on the American side, and half a day on the Canadian side- you can go behind the falls from Canadian side, take an elevator ride to the top of the Panasonic tower, there is also a small butterfly garden close to the falls which is really nice. Sometimes there are light-laser shows , or fireworks over the falls. See if you can time your visit to coincide with those special shows. In is an incredible experience

There are many Indian restaurant there these days, and you can even get Jain food, so you will have lots of options in terms of food.

I would skip all of the casinos in that area however. You can see far better casinos and shows in Atlantic city -approximately 2-3 hours away from DC area.

Hope you have a great trip.

आम्ही न्युयॉर्कहून ग्रेहाउंड बसने गेलो होतो नायागराला. चांगला रात्रभर झोपेत प्रवास करून सकाळी पोचलो. मी रेकमंड करीन..

गो-टू बस चा पर्याय चांगला आहे, न्यू यॉर्क हून ७-८ तास लागतात, त्यांच डिसीहून देखिल पॅकेजेस आहेत. यात हॉटेल, गाईड, प्रवास सगळ ईंल्कूड आहे, फक्त जेवणाचा खर्च वरुन करायचा.

http://www.taketours.com/new-york-ny/4-days-philadelphia-washington-d-c-...

बी IDP वर ड्राइव्ह करून DC हून नायगराला जाणार हे वाचून मनात अनेक प्रश्ण आले.. त्याला हा पर्याय सुचवणारे अर्थातच बी प्रश्णांएव्ह्डेच निरागस असावेत असे वाटते. Happy
बी,
तू सरळ करडा डबा (greyhound) पकड आणि आरामात बसून जा. थेट मुक्कामी पोचशील. शिवाय, वाटेत कुठे थांबावे वगैरे प्रश्ण ऊद्भवणार नाहीत. आणि करड्या डब्याचे परतीचे तिकीट काढ नाहीतर पुन्हा प्रश्ण पडेल आता नायगरा हून DC ला कसे जायचे. करड्या डब्याचे क्रमांक, मार्ग, वगैरे त्यांच्या संकेतस्थळावर सापडेल. ते संकेतस्थळ मात्र तेव्हडे तू शोधून काढ्शीलच.

पुढील सर्व प्रवासासाठी शुभेच्छा!

करड्या डब्याचे तिकीट कसे काढावे? तिकीट ऑनलाइन काढले तर ड्रायवर ते तिकिट व्हॅलिड धरतो की नवीन तिकीट काढायला लावतो? करड्या डब्यात माझ्या आरक्षित सीटवर दुसरे कुणी बसले असल्यास मी काय करू?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे करड्या डब्याच्या बसस्टँडपासून नायाग्रा धबधब्यापर्यंत कसे जायचे?

हे ग्रेहाउंडचे स्कज्युल :

https://www.greyhound.com/farefinder/step2.aspx?SessionId=ab1d98df-97fc-...

रात्री दोन वाजता निघते बस ती दुसर्‍या दिवशी संध्याकाळी पोहोचते. साडेसातला. एक संध्याकाळी साडेपाचला निघते ती पहाटे साडेसातला पोहोचते. परतीची बस सकाळी साडेसात वाजता आहे किंवा दुपारी दोनला.

ब्रेकफास्ट व पाणी बरोबर ठेवता आले तर मध्ये उतरावे लागणार नाही. ठेपला, खाकरा, राजगिर्‍याचे लाडू, चिवडा, पार्ले जी/मारी इत्यादी बरोबर हातपिशवीमध्ये असू द्या. प्रवासात फार कुणाशी बोलावे लागू नये. बिस्लेरी किंवा किन्ले सील्ड बघूनच घ्या. महत्त्वाचे कागद पत्र व पारपत्र बेल्ट्ला लावून ठेवा म्हणजे झोप लागली तरी चोरीस जाणार नाही. क्यामेर्‍याची जास्तीची बॅटरी, चार्जर आणि मेमरी कार्ड नक्की घ्या. फोटो घेण्यासारखी जागा आहे.

>>सर्वात महत्त्वाचे म्हणजे करड्या डब्याच्या बसस्टँडपासून नायाग्रा धबधब्यापर्यंत कसे जायचे?
एखादी टपरी असेल वाटेत तिथे विचारायचे, अगदी एव्हडेही काही मागासलेले नाहीये ते शहर!
(माणसे पण असतात रसत्यावर.... आणि ती बोलतात देखिल... )

बी maid of the mist, journey behind the fall (कॅनडा)व्बघच पण cave of the winds विसरू नकोस. ह्या सगळ्या राईड्स विंटर किंवा स्प्रिंग मधे सुरू असतात का हे चेक कर.

बी भाऊ धबधब्याला गेल्ते का न्हाय , गेला असाल तर कशे गेलात ,काय काय पायलं त्ये बी लिवा की राव. धागा काडला तर अपडेट बी कराया नग का ?