मराठीमध्ये सध्या वाचकप्रिय (Mass Appeal) असलेले लेखक/लेखिका कोण आहेत?

Submitted by बोबो निलेश on 6 March, 2014 - 23:57

काहींना हा प्रश्न बाळबोध वाटेल. पण गेली काही वर्षे वाचनाशी संबंध काहीं तुटला होता. पुन्हा वाचायला सुरुवात करतो आहे. मला जाणून घ्यायला आवडेल -
पुल, वपु , मतकरी , कणेकर ,सुशि यांच्याप्रमाणे मराठी भाषेमध्ये सध्या वाचकप्रिय (Mass Appeal) असलेले लेखक/लेखिका सध्या कोण आहेत?
माझ्या अगोदर आधी कुणी अशी पोस्ट केली असल्यास मला त्याची लिंक द्यावी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफीकिर - हे कौटुंबिक नाट्यांसाठी प्रसिध्द आहेत

कवठीचाफा - हे भुतकथा विज्ञानकथेसाठी प्रसिध्द आहेत

कौतुक शिरोडकर - हे गुढ्कथा, रहस्यकथा हेरकथे साठी प्रसिध्द आहेत

विशाल कुलकर्णी - हे रहस्य आणि हेरकथे साठी प्रसिध्द आहेत ( क्रमशः साठीही Wink )

सचिन पगारे - हे राजकिय कथेंसाठी प्रसिध्द आहेत

लिंबुभाउ - ज्योतिषकथांसाठी प्रसिध्द आहेत

डॉ. सुरेश शिंदे - हे वैद्यकिय कथेंसाठी प्रसिध्द आहेत

दाद - या मनाला भिडणार्या कथेंसाठी प्रसिध्द आहेत

नंदिनी - प्रेमकथेंसाठी प्रसिध्द आहेत..

मुंगेरीलाल, अमित, - हे विनोदी कथेंसाठी प्रसिध्द आहेत

स्पार्टाकस, शा. गंधर्व, रोहीत- हे भटकंती गिर्यारोहण कथेंसाठी प्रसिध्द आहेत.

( वरील लिस्ट वाढवण्यात कृपया हातभार लावा Happy )

>>> ते मायबोली.कॉमवर इब्लिस म्हणून एक लिहितात. आमच्या माहितीनुसार भयंकर पॉप्युलर आहेत. डोळा मारा <<<<
अगदी अगदी, मी हेच्च सान्गायला आलो होतो की मायबोलिवरील प्रसिद्ध / अपील असलेले लेखक हवे असल्यास सान्गु शकतो लग्गेच! Happy
मी तर अ‍ॅडमिनपाशी केव्हापासून विनंती करतोय की पूर्वीसारखा "ट्री व्ह्यू" सुरू करा म्हणजे असे अपील असलेले लेखकू आयडींच्या चालू लेखनाचा पाठपुरावा करता येतो.... कालपरवाच "खाजगीत" जाऊन त्यान्ना तसे सान्गुन आलोय, आता पाहुयात, काय होते ते.

उदयन ने तर यादीच दिली आहे वरती. (त्यात माझे नाव ज्योतिषकथांशी का जोडलय कायकी, मी तर कधीच कथावगैरे लिहीत नाही, फक्त प्रतिसाद लिहीतो, पण असो...... नाव तर लक्षात आहेना? Proud )

फक्त प्रतिसाद लिहीतो, >>>>>>>>>> अहो तो प्रतिसादच इतका मोठा असतो आणि त्यात विविध कंगोरे असतात की त्या एक "कथा" म्हुणुनच वाचल्या जातात.. Wink

पण धागाकर्त्याने फक्त माबोचेच असं काही लिहीलेलं नाहीये... त्यांना तर पुल, वपु , मतकरी , कणेकर ,सुशि यांच्याप्रमाणे मराठी भाषेमध्ये सध्या वाचकप्रिय (Mass Appeal) असलेले लेखक/लेखिका हवेत. बहुदा गौरी देशपांडे, सानिया, आशा बगे इ. इ. अपेक्षित आहेत. माबोवरील लिस्ट परफेक्टच!

चिंतनपर लेख/ललित - मुग्धमानसी
कौटुंबिक नातेसंबंध - सुपरमॉम (सध्या बहुदा मधुरिमा) आणि दाद
बालकथा - मितान (अनुवादीत बालकथा) आणि पुरंदरे शशांक

जुन्या दिलेल्या यादीतले एकपण कामाचे नाहीत .७०सालांतच सद्दी संपली त्यांची .
विजय तेंडुलकर ,गडकरी ,जी ए कुलकर्णी हे नदीकाठावरचे घाट आहेत ,पुर येवो अथवा पाणी पार आटो कायमच महत्त्व राखतील .

नवीन दमदार जेसीबी लेखक मालिकांकडे वळले आहेत .दोन बायका तीन नवरे जशी बिल्डरची डिमांड तशी धडाधड माती ओतायची .

>>>>> त्यांना तर पुल, वपु , मतकरी , कणेकर ,सुशि यांच्याप्रमाणे मराठी भाषेमध्ये सध्या वाचकप्रिय (Mass Appeal) असलेले लेखक/लेखिका हवेत. <<<<<

माफ करा ड्रीमगर्लजी, पण
>>>पुल, वपु , मतकरी , कणेकर ,सुशि <<<< ही लोकं त्यान्चे त्यान्चे जागी असुद्यात की ......

>>> यांच्याप्रमाणे मराठी भाषेमध्ये ....... वरील मायबोलीकर लेखक नाहीत का त्यान्चेप्रमाणे? मराठीतच लिहीतातना? स्वतःच लिहितात ना? अखण्ड लिहितात ना?
उलट हे माबोकर तर त्यान्चेपेक्षा कित्येकबाबतीत सवाई आहेत असे माझे मत.

>>> सध्या वाचकप्रिय (Mass Appeal) असलेले लेखक/लेखिका हवेत <<<< अहो माबोवर इतका काळ इतके लोक पडीक असतात ते या लोकांच्या लेखनामुळेच की..... इतकी लोकप्रियता पुरेशी नाही का?
की दरवेळेस "वाचकान्च्या पत्र्यव्यवहारात" वगैरे वृत्तपत्रातच लिखाण प्रसिद्ध व्हायला हवे? अहो तुमय्चा त्या दैनिकांपेक्षा जास्त (वाचनासहितचे) सर्क्युलेशन मायबोलीचे होत असावे Wink
उगाच नै हल्ली नेते मण्डळी (डिपार्टमेण्टांसहित) सोशल मिडीयातील लेखनाची व लेखकुंची दखल घेऊ लागले आहेत.
घेतली होती का डिपार्टमेण्टने अशी दखल कधी वर्ल्या त्या पुल वपु मतकरी वगैरे लोकांची? मग? Proud

एसार्डी...... आख्खी पोस्ट भारी.... Happy
>>>>> नवीन दमदार जेसीबी लेखक मालिकांकडे वळले आहेत .दोन बायका तीन नवरे जशी बिल्डरची डिमांड तशी धडाधड माती ओतायची . <<<<<< Rofl

बर, चित्रकला अन फोटूचे अन शेतीचे राहिले बर्का... नाव येऊद्यात पटापट

मिलिंद बोकील, भारत सासणे, सानिया, राजन खान, मंगला गोडबोले, मीना प्रभू, उमा कुलकर्णी, आशा बगे, मेघना पेठे. दर वर्षी भारतात गेलं की या लेखकांचं एखादं नवं पुस्तक आलेलं दिसतं. हमखास भेटीत मिळतात यांची पुस्तकं.

श्याम मनोहर, नेमाडे यांना 'मास अपील' आहे की नाही कल्पना नाही.

इथे 'मी वाचलेले पुस्तक' धाग्यावर नियमीतपणे नवीन अथवा नव्याने माहिती झालेल्या पुस्तकांबद्दल लिहिले जाते. तिथे लक्ष ठेवायचे, तिथून नावं उचलून 'विश लिस्ट' मध्ये टाकायची. दुकानात जाताना ती यादी सोबत घेऊन जायची.

सगळ्यांची आवड सेम असेलच असं काही नाही Happy
मला वपूंचं लिखाण अजिबात आवडत नाही तर अनेकांना खुप आवडतं त्यामुळे तुमची आवड सांगा मग तशी नावं सुचवता येतील Happy

मिलिंद बोकील, भारत सासणे, सानिया, राजन खान, मंगला गोडबोले, मीना प्रभू, उमा कुलकर्णी, आशा बगे, मेघना पेठे. दर वर्षी भारतात गेलं की या लेखकांचं एखादं नवं पुस्तक आलेलं दिसतं. हमखास भेटीत मिळतात यांची पुस्तकं.>>>>

काहीतरीच मेघना पेठेंनी गेला सहा सात वर्षात एकही पुस्तक लिहिलेल नाही. दर वर्षी जर एक पुस्तक लेखक लिहित गेले तर साहित्य पाडण्याचा कलंक लागेल त्यांना.

इथंच हितगुज मध्ये वाचू आनंदे ग्रूप आहे, तो सगळा वाचून काढा. बर्‍याच थोर पुस्तकांबद्दल थोर वाचकांनी तिथं लिहिलं आहे. सरळ यादी करून फडशा पाडायला चालू करा. तुमची वाचनप्रकृती कशी आहे ते माहिती नाही, पण कधीकधी असंही होतं, की बरीच वर्षं काय वाचावं- हे सांगणारं कुणी नसतं. आणि तो जीवनमरणाचा निकराचा प्रश्न नसल्याने आपण आपल्याला फारसं न आवडणारं निव्वळ वाचनप्रेमापोटी किंवा वाचनाच्या व्यसनापायी वाचत राहतो. तर या वाचू आनंदे सारख्या ग्रुपात चांगलं लिहिलं गेलेली पुस्तकं वाचताना आपली वाचनप्रकृती आपल्यालाच अवचित सापडते. तुमच्याबाबतीतही असं होऊ शकेल.

काही वेळेला 'लोकप्रिय लेखकांचं लिखाण' आणि 'आपल्याला आवडणारं/ भावणारं लिखाण' हे म्युच्युअली एक्स्क्ल्युजिव्ह निघतात. बर्‍याच वेळेला नवीन लिखाणापेक्षा कित्येक वर्षांपुर्वी लिहिली गेलेली पुस्तकं जास्त हलवून टाकतात. त्यामुळे 'सध्या वाचकप्रिय' असा निकष ठेवला तर किंचित फसगत होईल अशीही धूसर का होईना शक्यता असतेच.

मास अपीलमधल्या सिंडरेलाच्या यादीत लेखकांत अवचट, अनुवादित चेतन भगत, अच्युत गोडबोले इ. देखील अ‍ॅड करा.

नेमाडे, मनोहर यांना मास अपील नाही. पण सर्वसामान्यांच्या जगण्याबद्दल इतकं अस्सल लिहिणारं अजून कुणी डोळ्यासमोर दिसत नाही. हा विरोधाभास गमतीचा आहे. Happy (यामुळेच बहुधा नेमाडे लिखाणापेक्षा इतर गोष्टींबद्दलच जास्त चर्चेत राहाय्ला लागले आहेत. त्याबाबतीत मास अपील भरपूर आहे त्यांचं. Proud )

बोबा, एक सांगा आधी की कधीपासून तुम्ही वाचन थांबवले आहे. जुनी पुस्तके वाचून झाली आहेत का तुमची? तुम्ही जुन्याची यादी द्या मी तुम्हाला अलिकडच्या पुस्तकांची यादी देतो. ठिके?

अभुभव मासिकाने दोनेक वर्षांपुर्वी 'आजचे निवडक लिहिते लेखक' या विषयावर मालिका प्रकाशित केलेली. त्यात खालील लेखकांचा समावेश होता.

भारत सासणे
श्याम मनोहर
राजन खान
सदानंद देशमुख
रंगनाथ पठारे
सानिया
राजन गवस
मोनिका गजेंद्रगडकर
मिलिंद बोकील
मेघना पेठे
जी. के. ऐनापूरे

युनिक फीचर्सने मागल्या वर्षी ई-साहित्य-संमेलन भरवलं होतं. त्यात ही मालिका पुनःप्रकाशित केली. युनिक फीचर्सच्या साईट्वर ई-संमेलन या लिंकवर या सार्‍ञा लेखकांची ओळख सापडेल. (याच ई-साहित्य-संमेलनात मायबोलीबद्दलची ओळख असलेलाही लेख आला होता असं आठवतं.)

काही तथ्य नसतं ह्या याद्यांमधे. पुर्वी मी मुर्खासारखा यादीमधले पुस्तके घरी घेऊन यायचो तर तद्दन भिक्कार वाटायची ती निवड. प्रत्येकाची आपली अशी एक निवड असते. कुणी सांगून ते पुस्तक आवडेल अस होत नाही. त्यामुळे प्रत्येक वाचकानी आपला आपला असा शोध घेणे उत्तम. काही पुस्तके कुणालाही आवडावी अशी असतात पण अशी पुस्तके खूप कमी असतात.

बी, वरती हेडरमध्ये 'सध्या वाचकप्रिय' असं विचारलं आहे, म्हणून मला ते आठवलं. ऑदरवाईज तू "त्यामुळे प्रत्येक वाचकानी आपला आपला असा शोध घेणे उत्तम" असं म्हणतोयस तेच मी देखील वरच्या पोस्टम्ध्ये म्हटलं आहे.

बाकी 'काही तथ्य नसतं ह्या याद्यांमधे' हे झालं तुझं मत. इतरांचं / अनुभव मासिकाचं / युनिक फीचर्सचं तसं असेलच असं नाही ना. Proud तू तुझी यादी प्रसिद्ध कर. 'आजचे निवडक लिहिते' अशी. त्यात काय. Happy

साजिरा धन्यवाद. बोबडे बोलने चांगला प्रश्न विचारलाय. अनेकांचे वाचन एखाद्या ठिकाणी थांबलेले असते. अनेक कारणे असू शकतात. कुटुंब-व्यवसाय इत्यादीत व्यस्त होणे, वेळ न मिळणे, महाराष्ट्र-देशातून बाहेर असणे ज्यामुळे मराठी ग्रंथालयाची उपलब्धता नसणे. मग कधी पुस्तकाच्या दुकानात, प्रदर्शनात जे लेखक-लेखिका माहितीचे असतात ते एकतर वाचून झालेले असतात किंवा बरेच जुन्या काळातले असतात. नवीन लेखकांची माहिती नसेल तर पुस्तक निवडणे सोपे नसते.

तुझ्या यादीतले सासणे-खान-गवस-पाठारे-सानिया प्रभृती देखील आता २०-२५ वर्षे लिहीत आहेत. अगदी नवीन ताज्या दमाचे कादंबरी-कथा लेखक कोण?

वाचकांची आवड वेगळी आहे त्यामुळे एकच लेखक सर्वाँना पसंत नाही .
मान्य .
जुन्या लेखकांचे विषय आणि चौकटीही नाहीश्या झाल्या .
उदा :१पुलं .विनोद ,कामगार विश्व ,गिरणगाव चाळी ,गावांतून मुंब ईत आलेले गरीब लोक .पर्यटन ,त्यांनी पाहिलेले देश यामध्ये जी ७०च्या अगोदर उत्सुकता आणि अपुर्वाई होती ती नंतर गायब .
२वपु .मध्यमवर्गीय मुंबई पुण्याकडचे ,चौकोनी कुटुंबातले त्रिकोणी प्रश्न .आता काय ?
३व्यं माडगुळकर आणि शं खरात .गावरान गोष्टी .आता गावं आहेत पण गावरानपणा गेला .
४थोडक्यात मास अपील जो काही यांना त्यांच्या चौकटीत होता ती चौकट उरली नाही .
इतरांनीही साहित्यात अपेक्षा टेवू नये ."तीन महिन्यात दुप्पट
"करणारे सोडून .

माझे आवडते
नेटवरचे झरे : टण्या ,यो रॉक्स आणि यशोधरा .
वीस एक तलाव :मांडी ठोकून समीक्षात्मक लेखन करणारे संपा मं तील एक धरून.वाहातील तर बरे होईल .

तुझ्या यादीतले सासणे-खान-गवस-पाठारे-सानिया प्रभृती देखील आता २०-२५ वर्षे लिहीत आहेत. >>+१.

अगदी नवीन ताज्या दमाचे कादंबरी-कथा लेखक कोण? >> गेल्या काही वर्षांमधले दिवाळी अंक चाळून तुम्हाला कोणाचे लिखाण आवडते ते बघा नि त्यांची पुस्तके घेऊन बघा. बरेह जण दिवाळी अंकातले लिखाण रतिब घातल्यासारखे देत असले तरी त्यांच्या आवाक्याचा नि आपल्या आवडीचा अंदाज येतो.

पु.ल., आचार्य अत्रे हे कालातीत. विषय आणि संदर्भ बदलले तरीही आजही त्यांच्या पुस्तकांची पारायणे करावीशी वाटतात.

पु.ल., आचार्य अत्रे हे कालातीत.
>>>
तुमचा प्रतिसाद ह्या धाग्याला अत्यंत समर्पक आहे.

"नव्या दमाचे लेखक"मध्ये गणेश मतकरींचे नाव घ्यायला हवे. त्यांनी मागच्या वर्षी अनुभवमधे बिन शेवटाच्या गोष्टी म्हणून एक कथामालिका लिहिली होती. मला तरी त्यातल्या बहुतेक कथा आवडल्या होत्या. त्या कथांचे पुस्तक पण आलेले आहे.

Pages