Submitted by bedekarm on 4 March, 2014 - 01:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
तुपाची बेरी
रवा
साखर
खाण्याचा सोडा
क्रमवार पाककृती:
तुपाची बेरी हाताने कुस्करून बारीक करून् घ्या.
बेरीपेक्षा थोडा ज्यास्त अंदाजे दीडपट रवा त्यात घाला.
थोडे ताक घालून मिश्रण सरसरीत करा, एक तास ठेवून द्या.
चिमूटभर सोडा व रव्यापेक्षा थोडी कमी सा़खर घालून मिश्रण ढवळून एकजीव करा.
नॉनस्टिक किंवा जाड भांड्यात मिश्रण ओतून मंद गॅसवर ठेवा.
२ ते३ मिनिटानंतर गॅसवर तवा तापत ठेवून त्यावर केकचे भांडे ठेवा,
४ ते ५ मिनिटांनंतर केक नीट भाजला गेलाआहेयाची खात्री करून गॅस बंद करा.
वाढणी/प्रमाण:
बेरी किती आहे त्यावर अवलंबून
अधिक टिपा:
तुपाखाली किती बेरि निघेल त्यानुसार केक करावयाचा असल्याने विशिष्ट प्रमाण दिले नाही.
सोडा फार थोडा घालावा नाहीतर केक मोडतो.
यात तुप किंवा लोणी घालावे लागत नाही.
माहितीचा स्रोत:
माझी विहणबाई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला कधीची ही रेसिपी हवी होती.
मला कधीची ही रेसिपी हवी होती. धन्यवाद
नेहमीच्या केक इतकाच हलका होतो का हा केक?
रवा कच्चाच ना घालायचा?
रवा कच्चाच ना घालायचा?
बेरीचा छान उपयोग.
बेरीचा छान उपयोग.
अरे, मीनाकाकू. किती दिवसांनी
अरे, मीनाकाकू. किती दिवसांनी दिसलात.
आता परत काहीतरी जबर्दस्त लेखन-रेसिपी येऊ देत. वेलकम बॅक.
खुपच छान.यात वनिला /रोज
खुपच छान.यात वनिला /रोज एसेन्स --रुफ आफजा/गुलाब सरबत घातले तर.!
हा केक खूप हलका होतो.रवा
हा केक खूप हलका होतो.रवा कच्चा घालायचा. दिनेशजी बेरीचं काय करायच हा प्रश्ण पडतो म्हणूनच हा केक.
नंदिनी धन्यवाद, सुलेखा तुझी
नंदिनी धन्यवाद, सुलेखा तुझी सूचना छान आहे.
धन्यवाद.(रवाची शंका दूर
धन्यवाद.(रवाची शंका दूर झाली). वास खूपच झकास असेल ना?
बेरीचे लाडू इतके मस्त लागतात ना... त्याची आठवण झाली...(कळवळला जीव... )
बेरी मऊ पांढरी घ्यायची की जरा
बेरी मऊ पांढरी घ्यायची की जरा भुरी झालेली खमंग?
रेसिपी लिहिण्याची पद्धत एकदम टिपिकल 'आई' लोकांची आहे. याच्यापेक्षा ते थोडं कमी, त्याच्यापेक्षा हे थोडं जास्त. आमच्यासारखे गडबडतात की मग पदार्थ करताना
हा केक खूप भारी होतो. यात इतर
हा केक खूप भारी होतो. यात इतर काही इसेन्स किंवा फ्लेवर घालू नये. मी याच्यात बदामाचे तुकडे घालते ते छान लागतात.
ताक घालायच? ते किती? आम्बुस
ताक घालायच? ते किती? आम्बुस चव अपेक्शित आहे का?
माझ्याकडे जवळपास ३-४ वाट्या
माझ्याकडे जवळपास ३-४ वाट्या बेरी आहे, त्याचा साधारण किती मोठा केक होईल? आणि हा केक ओव्हनमध्ये भाजला तर चांगला बनेल कां?
मनी, खूपच मोठ्ठा केक होईल.
मनी, खूपच मोठ्ठा केक होईल. चार वाट्या बेरी + दिडपट म्हणजे सहा वाट्या रवा
भाजायलाही खूप वेळ लागेल. त्यापेक्षा आत्ता एक वाटी बेरी घेऊनच केक करून बघावास असं मी सुचवेन. ओव्हनमधे छान होतो.
खुपच छान उपयोग बेरीचा.
खुपच छान उपयोग बेरीचा. मला तर तशीच थोडी साखर घालुन खायला आवडते. पण वजनाचा काटा डोळ्यासमोर येतो. आणि बेरीच भांड दूर साराव लागत. आता हा केक नक्की करेन.
खुपच छान उपयोग बेरीचा.
खुपच छान उपयोग बेरीचा. मला तर तशीच थोडी साखर घालुन खायला आवडते. पण वजनाचा काटा डोळ्यासमोर येतो. आणि बेरीच भांड दूर साराव लागत. आता हा केक नक्की करेन.
ठीक आहे मंजूडी, मी एखाद वाटी
ठीक आहे मंजूडी, मी एखाद वाटी बेरीचा केक बनवून बघते.