सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची

Submitted by वैवकु on 28 February, 2014 - 09:30

दिशांनो सज्ज व्हा पेलायला ताज्या विचारांची
सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची

जश्या फुटतील पारंब्या तसे फोफावुनी झाले
मुळे रुजतात का पाहू सरळसाध्या विचारांची

फुलवणे रंग भरणे गंध भरणे ही तुझी किमया
फुले वाहू न शकलो मी फुलुनआल्या विचारांची

जसा चाले कुणी हत्ती तसे चालायला बंदी
मनाची चाल उंटाचीच तिरफाट्या विचारांची

मला बोलायचे थोडे.... तुलातर फार थोडेसे....
कधी जमणार गट्टी दोन मितभाष्या विचारांची

विकासाच्या सुगीमध्ये 'इमारत' होत गेल्याची
व्यथा अपुलेपणाला पारख्या 'वाड्या -विचारांची'

किती आलोचना, अपमान, ईर्ष्या, ओरडे, अफवा
तरी मी राखतो बडदास्त लोकांच्या विचारांची

इथे मी डुंबलो आजन्म पण माहीत नाही ..ही..
नदी जाते कुठे नक्की तुझ्या 'काळ्या' विचारांची

बुडव तू वैभवा येथे गझलगाथा तुझी आता
उथळता संपली आहे तुझ्या गाढ्या विचारांची

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी...

किती आलोचना, अपमान, ईर्ष्या, ओरडे, अफवा
तरी मी राखतो बडदास्त लोकांच्या विचारांची

इथे मी डुंबलो आजन्म पण माहीत नाही ..ही..
नदी जाते कुठे नक्की तुझ्या 'काळ्या' विचारांची <<<

मस्त शेर, छान गझल

वैवकु

छान गझल.

जश्या फुटतील पारंब्या तसे फोफावुनी झाले
मुळे रुजतात का पाहू सरळसाध्या विचारांची

सुंदर..

छान आहे. तुमच्या गझलांमधे crafting नसल्यामुळे originality का नूर बना रहता है|
काही शेर थोडे वीक वाटले पण काही अगदी "वा!" च आहेत . दुसरा आणि शेवटचे तीन आवडले. Happy

मला बोलायचे थोडे.... तुलातर फार थोडेसे....
कधी जमणार गट्टी दोन मितभाष्या विचारांची

बुडव तू वैभवा येथे गझलगाथा तुझी आता
उथळता संपली आहे तुझ्या गाढ्या विचारांची

वा ! वा ! बेस्ट .

सहमत पारिजाता.
अनेक खयाल आवडले.
किती आलोचना, अपमान, ईर्ष्या, ओरडे, अफवा
तरी मी राखतो बडदास्त लोकांच्या विचारांची ..

हा सर्वात.

किती आलोचना, अपमान, ईर्ष्या, ओरडे, अफवा
तरी मी राखतो बडदास्त लोकांच्या विचारांची

इथे मी डुंबलो आजन्म पण माहीत नाही ..ही..
नदी जाते कुठे नक्की तुझ्या 'काळ्या' विचारांची

बुडव तू वैभवा येथे गझलगाथा तुझी आता
उथळता संपली आहे तुझ्या गाढ्या विचारांची

वरील शेर सुरेखच झाले आहेत…