दिशांनो सज्ज व्हा पेलायला ताज्या विचारांची
सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची
जश्या फुटतील पारंब्या तसे फोफावुनी झाले
मुळे रुजतात का पाहू सरळसाध्या विचारांची
फुलवणे रंग भरणे गंध भरणे ही तुझी किमया
फुले वाहू न शकलो मी फुलुनआल्या विचारांची
जसा चाले कुणी हत्ती तसे चालायला बंदी
मनाची चाल उंटाचीच तिरफाट्या विचारांची
मला बोलायचे थोडे.... तुलातर फार थोडेसे....
कधी जमणार गट्टी दोन मितभाष्या विचारांची
विकासाच्या सुगीमध्ये 'इमारत' होत गेल्याची
व्यथा अपुलेपणाला पारख्या 'वाड्या -विचारांची'
किती आलोचना, अपमान, ईर्ष्या, ओरडे, अफवा
तरी मी राखतो बडदास्त लोकांच्या विचारांची
इथे मी डुंबलो आजन्म पण माहीत नाही ..ही..
नदी जाते कुठे नक्की तुझ्या 'काळ्या' विचारांची
बुडव तू वैभवा येथे गझलगाथा तुझी आता
उथळता संपली आहे तुझ्या गाढ्या विचारांची
गट्टी खूप आवडला... बाकीपण
गट्टी खूप आवडला...
बाकीपण आवडले
धन्यवाद सर
भारी...
भारी...
किती आलोचना, अपमान, ईर्ष्या,
किती आलोचना, अपमान, ईर्ष्या, ओरडे, अफवा
तरी मी राखतो बडदास्त लोकांच्या विचारांची
इथे मी डुंबलो आजन्म पण माहीत नाही ..ही..
नदी जाते कुठे नक्की तुझ्या 'काळ्या' विचारांची <<<
मस्त शेर, छान गझल
२, ३, ६, ७, ८ खूप आवडले.
२, ३, ६, ७, ८ खूप आवडले. सुन्दर रचना.
मनःपूर्वक आभार सर्वांचे
मनःपूर्वक आभार सर्वांचे
सुंदर...व्वा !
सुंदर...व्वा !
धन्स अरविंदजी
धन्स अरविंदजी
वैवकु छान गझल. जश्या फुटतील
वैवकु
छान गझल.
जश्या फुटतील पारंब्या तसे फोफावुनी झाले
मुळे रुजतात का पाहू सरळसाध्या विचारांची
सुंदर..
मस्त वैभव
मस्त वैभव
जोशी साहेब (अ.अ.) आणि पोरे
जोशी साहेब (अ.अ.) आणि पोरे साहेब धन्यवाद
सरळसाध्या, काळ्या आणि गाढ्या
सरळसाध्या, काळ्या आणि गाढ्या हे सर्वात छान वाटले.
धन्यवाद उकाका (हाय अल्ला !!
धन्यवाद उकाका
(हाय अल्ला !! चक्क ३ शेर आवडलेत आज !! ;))
किती आलोचना अपमान ईर्ष्या
किती आलोचना अपमान ईर्ष्या ओरडे अफवा
तरी मी राखतो बडदास्त लोकांच्या विचारांची !
छान आहे. तुमच्या गझलांमधे
छान आहे. तुमच्या गझलांमधे crafting नसल्यामुळे originality का नूर बना रहता है|
काही शेर थोडे वीक वाटले पण काही अगदी "वा!" च आहेत . दुसरा आणि शेवटचे तीन आवडले.
धन्यवाद अहीरराव पारिजाता
धन्यवाद अहीरराव
पारिजाता विशेष आभार
मला बोलायचे थोडे.... तुलातर
मला बोलायचे थोडे.... तुलातर फार थोडेसे....
कधी जमणार गट्टी दोन मितभाष्या विचारांची
बुडव तू वैभवा येथे गझलगाथा तुझी आता
उथळता संपली आहे तुझ्या गाढ्या विचारांची
वा ! वा ! बेस्ट .
धन्यवाद खुरसाले
धन्यवाद खुरसाले
जबरी गझल. तुझ्या खयालाबद्दल
जबरी गझल. तुझ्या खयालाबद्दल कय बोलवे वैभवा ! खूप खूप आवडली.
सहमत पारिजाता. अनेक खयाल
सहमत पारिजाता.
अनेक खयाल आवडले.
किती आलोचना, अपमान, ईर्ष्या, ओरडे, अफवा
तरी मी राखतो बडदास्त लोकांच्या विचारांची ..
हा सर्वात.
भारतीशी सहमत ! अत्तिशय आवडली
भारतीशी सहमत !
अत्तिशय आवडली गझल.
धन्यवाद !!
किती आलोचना, अपमान, ईर्ष्या,
किती आलोचना, अपमान, ईर्ष्या, ओरडे, अफवा
तरी मी राखतो बडदास्त लोकांच्या विचारांची
इथे मी डुंबलो आजन्म पण माहीत नाही ..ही..
नदी जाते कुठे नक्की तुझ्या 'काळ्या' विचारांची
बुडव तू वैभवा येथे गझलगाथा तुझी आता
उथळता संपली आहे तुझ्या गाढ्या विचारांची
वरील शेर सुरेखच झाले आहेत…
निशिकांत काका ,भारतीताई,
निशिकांत काका ,भारतीताई, सुप्रियाताई, फाटक साहेब मनःपूर्वक आभार