बालि सहल - भाग ६अ - किंतामणि आणि बालि बर्ड पार्क

Submitted by दिनेश. on 26 February, 2014 - 14:22

पुढच्या दिवशी आमचा प्लान होता किंतामणि ला जायचा. अतिशय रम्य असे हे ठिकाण आहे. इथे एक निद्रिस्त ज्वालामुखी आहे. त्याच्या पायथ्याशी एक सरोवर आहे.
पण फोटोमधून जाणवणार नाही अशी एक गोष्ट म्हणजे इथला सुखद गारवा. हे ठिकाण डोंगरावर असल्याने
पायथ्याचे तपमानापेक्षा इथले तपमान किमान १५ अंश सें ने कमी असते. दुतर्फा फळांच्या बागा आहेत. शिवाय याच भागात स्ट्रॉबेरीची पण शेती आहे.

१) तर हा किंतामणि

२) हा त्याच्या बाजूचाच

३) किंतामणिच्या पायथ्याशी असलेले जंगल

४) काही वर्षांपूर्वीच त्याचा उद्रेक झाला होता. मधल्या काही पट्ट्यात लाव्हाचे थर आहेत/

५) त्याच्या समोरच अशी खास जागा आहे आणि तिथे कपडे वगैरे विकायला असतात. रस्त्यावर भरपूर फळेही असतात.

६) जरा झूम करून

७) परतीच्या वाटेवर आम्हाला मुसळधार पावसाने गाठले. वाटेत दिसलेली बालितली पायर्‍यांची भातशेती.
याला युनेस्कोने जागतिक वारसा ठेव म्हणून मान्यता दिलेली आहे. पावसामुळे मात्र एवढेच फोटोत येऊ शकले

८) बालि लोक दिवसातून तीन वेळा असा नेवैद्य दाखवातात. यातले तबक ते लोक रोज स्वताच्या हाताने तयार करतात. ( नारळाच्या कोवळ्या पानांपासून ) त्यात फुले, समुद्री शेवाळे आणि घासभर का होईना खाऊ असतोच.
अशी तबके जागोजाग दिसतात. घरोघरच्या स्थंभांवर, दुकानाच्या समोर इतकेच नव्हे तर आमच्या हॉटेलच्या
समोर अगदी विमानतळावरच्या ड्यूटी फ्री शॉपमधेही हे होतेच.

९) त्या रस्त्यावर तर प्रत्येक दुकान असे खास कलाकृतींचे होते.

१०) त्यांच्या कलाविष्कारासाठी कुठलेही माध्यम त्यांना वर्ज्य नाही.

११)

१२) माझी न्याहारी सोबर कलिंगडाचा ज्यूस आणि आले घातलेले दही

१३) हॉटेलचा खाजगी समुद्रकिनारा

१४) बीचवरची निवांत जागा

१५ )

१६) परत वॉटर लिलीच

१७) हॉटेलमधलीच वेगळी फुले

१८) तिथल्या बर्ड पार्कचा देखणा दरवाजा

१९) बरेचसे पक्षी तिथे मोकळेच होते आणि ते धटिंगण होते. फोटो काढताना मुद्दाम टक लावून बघत असत.

२०)

२१)

२२)

२३)

२४)

२५)

२६)

२७) पर्वान्गी घेत्लीय

२८)

२९)

३०)

हा पक्षी खुप देखणा होता पण मला त्याचा प्रोफाईल मधला फोटो मिळाला नाही

अजून बरेच पक्षी दाखवायचे आहेत, तेव्हा

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा... किंतामणी .. माझा फेव स्पॉट....

खूप सुरेख, हिरवेगार फोटो आलेत.. मन भरून आलेय जुने हाँटिंग स्पॉट्स बघताना..

एखाद्या सारोंग क्लॅड ललनेचा फोटू नाही का काढला, डोक्यावर ती ऑफरिंग ची बास्केट घेऊन देवळात चाललेल्या..

(या बायांना पाहून तेंव्हा असच वाटायचं कि या ,' मै तुझसे मिलने आई ,मंदिर जाने के बहाने .. हे गाणं मनातल्यामनात म्हणत असाव्यात.. Proud )

दिनेशदा,
आपले पु. ल. देशपांडे १९६० मधे गेले होते किंतामणी अर्थात चिंतामणीला तेंव्हा हा ज्वालामुखी बर्‍यापैकी जिवंत होता. आता फक्त धग उरली आहे. अगदी पहाटे कोवळ्या किरणात धुर दिसतो. मी सकाळी २ वाजता उठून सुरु केला होता माझा प्रवास किंतामणीच्या माथ्यापर्यंत चढायचा. इथेच जवळ गरम पाण्याचे उष्ण तळे आहेत. तिथे मी स्नान देखील केले होते. कसले उन उन पाणी होते तळ्याची. आई गं!!!

ह्या ज्वालामुखीच्या मातीपासून गणपतीची मुर्ती घेतली होती. घरी येऊन तिची अंघोळ घातली तर छान छान सुरु सुर आवाज येत होता कारण मुर्ती सच्छिद्र होती. खूप वर्ष पुजा केली तिची. मग मागच्या वर्षी घर बदलतना माझे मलाच आवरता सावरता आले नाही. १४ वर्षाचा पसारा बांधाबांध करताना जीवाची खूप वाताहात झाली. अनेक वस्तू टाकून दिल्यात. देवघरातील सगळे देव, पोथ्या समुद्रात विसर्जीत केल्या. त्यात गणपतीची ही मुर्ती देखील शिरवली. खूप दु:ख झाले होते. पण माझ्याकडे तोच एक पर्याय होता.

दिनेश, मस्त चाललीये मालिका.

ह्या मालिकेत एक लेख 'बालीतल्या भाज्या / फळे / मसाले' आणि एक लेख 'बालीतली खाद्यसंस्कृती' यावरती हवेतच!

दिनेशदा मस्त फोटोज Happy

ह्या मालिकेत एक लेख 'बालीतल्या भाज्या / फळे / मसाले' आणि एक लेख 'बालीतली खाद्यसंस्कृती' यावरती हवेतच!>>>>>माधव +१ Happy

बी, माझा तिथून पाय निघत नव्हता. खुप मस्त जागा आहे. खरं तर तूला आणि वर्षूलाच नीट कल्पना येईल.
फोटोमधे ते वातावरण पकडणे शक्यच नाही.
२४ वाला केनयात खुप दिसतो. राणीच्या बागेत पण आहे.

दोस्तांनो आणखी बरेच फोटो आहेत. आज पण बघतो टाकता येतात का ते.

<<<<माधव. मसाले घेऊन आलोय. त्याचे पदार्थ केले कि लिहीनच >>>> मला वाटलं तुम्ही म्हणताय
"मसाले घेऊन आलोय, आपापले गिफ्ट घेऊन जा " Wink