हाऊस ऑफ कार्ड्स (विथ स्पॉयलर्स)

Submitted by राजसी on 25 February, 2014 - 00:12

ह्या सिरियलबद्द्ल गप्पांसाठी हा धागा काढलेला आहे. आत्तापर्यंत ह्या सिरियल दोन सिझन झालेले आहेत.

स्पॉयलर्स असू शकतात, तेव्हा आपापल्या जबाबदारीवर हा धागा वाचावा.

धन्यवाद. Happy

माझा डाऊट :
दुसर्‍या सिझन्च्या शेवटून तिसर्‍या-चौथ्या भागात, मिचम - फ्रँकचा personal security guard - now a personal secret service agent काय लफडं आहे? फ्रँक-क्लेयर बरोबर? का?

पुढच्या सिझनमधे फ्रँकची अधोगती दाखवायला सुरुवात करतील का? (ही शंका नाही, स्पेक्युलेशन आहे) पण ती तरी कशी होणार? रेचल वगळता कोणी खून करायला उरले नाही. डग नक्की मेला असेल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरा स्लो आहे पण तिसर्‍या भागापेक्षा बराच चांगला आहे.
क्लेयरचे तर नाईट ड्रेसेस पण फॉर्मलच वाटतात. Happy

मनी, तुला क्लेअर चे सॅटिनी पीजेज् म्हणायचे आहे का?

तीचे पीजेज् ही भलतेच उच्च टेस्ट चे, महागडे आणि फॅशनेबल असे म्हणता येऊ शकतील .. सगळे प्लेन असतात .. म्हणून फॉर्मल वाटू शकतात ?

----spoiler alert ----- मी पूर्ण सिझन बघितलेला आहे. खालील संदर्भ कोणत्याही भागातील असू शकतात.

मी पहिल्या सिझनमधली खिडकी खूप मिस करते. दोघांची केमिस्ट्री किती छान असायची त्या सीन्समध्ये. सिगरेट फुंकायचे तो भाग मी कानाडोळा करायचे किंवा कॉफी पीत असतील असं समजायचे Happy

बाकी तिघांनी Morning after night ला बसून एकत्र चहा - ब्रेकफास्ट करणे जरा टू मच वाटले. फ्रँकचा अगदीच म्हातारा सिंह झालाय. आणि क्ल्येयर Cancer survivor पण आहे ना. तरी अजून अभी तो मै जवान हूं टाईप्स वागणं. ह्या अमेरिकन लोकांना दु:ख झालं की लगेच समोर दिसेल त्याच्या / तिच्याबरोबर सुरू ....

दुसरीकडे, अगं जरा तोंड धू, दात घास आणी मग Proud

>> ----spoiler alert -----

आता अकराव्या भागात फ्रेडी अवतरलेला आहे .. तो थेट एकदम रेसिडन्स मध्ये प्रेसिडन्ट ला अर्वाच्य शिवी देत!

प्रेसिडन्ट थेट ओव्हल मध्ये मॅडम सेक्रेटरी ला थ्रेटन करतो पेपर नाईफ दाखवून!!

आ आणि अ च अजूनही ..

जिथे लोगो मध्येच अमेरिकेचा फ्लॅग उलटा दाखवला आहे तिथे फ्रँक आणि क्लेअर ची अधोगती ते बहुतेक कधीच दाखवणार नाहीत .. अधून मधून अडसर निर्माण होत रहातील ज्यावर ते अधिकाधिक निष्ठूरपणे आणि पाताळयंत्री होऊन मात करणार असंच दाखवणार ते शेवटपर्यंत ..

खरे तर कंटाळा आला आहे. चारही सिझन संपलेत पण व्हॉट नेक्स्ट असा प्रश्न नाही. वी मेक द टेरर ह्यात नविन काय आहे?

संपवला एकदाचा चौथा सीजन ..

प्रत्येक सीजन ला ते जास्तीत जास्त अ आणि अ व्हायला लागले आहेत ..

आणि मी बर्‍याच पेशन्टली "त्यांनां राजकारणातली डार्क साईड च दाखवायची आहे" ह्या समजुतीवर बघत राहिलेय .. पण आता त्यात काहीच तथ्य दिसत नाही .. म्हणजे "महत्वाकांक्षेत वाममार्गाचा अवलंब टोटली ओके आहे" आणि जे लोक तो रोखू पाहतात त्यांनां हे दोघे कसे चिरडून टाकतात हेच आता किती दिवस बघायचं? केदार म्हणतो तसं "व्हॉट नेक्स्ट"? Uhoh

हल्लीच बघायला सुरुवात केल्येय म्हणत म्हणत सी४.ए.३ वर आलोय. वर सशल म्हणत्येय तसं अ. आणि अ. होत चाललय. सगळे रिप्लाय वाचले नाहीयेत. आत्ता धागा वर आला म्हणुन राहावलं नाही.
मे ३० पर्यंत उडवून टाकतो आता Happy म्हणजे सीझन ५ वेळेत बघता येईल.
नेटफ्लिक्स स्टॉक प्लॅटू होईल यावर्षी नवीन ओरिजिनल न आल्याने असं मध्ये वाचलेलं. सध्याची रॅली याच्याच मुळे होत्येय का?

>> वर सशल म्हणत्येय तसं अ. आणि अ. होत चाललय. <<

रियली? हॅव यु वॉच्ड ऑल सिझन्स?

**** स्पॉयलर अलर्ट ****
पांचवा सिझन बघायला सुरुवात केली (किंवा बघुन संपवला) असेल तर हाऑका कॅरेक्टर्स आणि रियल लाइफ पोलिटिशियन्स आणि त्यांच्या संबंधित घटनां मधलं साधर्म्य (सँझ थिअ‍ॅट्रिकल ड्रामा) यावर तुमचं मत मांडा. (ट्रस्ट मी, यु डोंट हॅव टु बी ए पोलिटिकल जंकि टु फिगर दॅट आउट... Happy )

Pages