हाऊस ऑफ कार्ड्स (विथ स्पॉयलर्स)

Submitted by राजसी on 25 February, 2014 - 00:12

ह्या सिरियलबद्द्ल गप्पांसाठी हा धागा काढलेला आहे. आत्तापर्यंत ह्या सिरियल दोन सिझन झालेले आहेत.

स्पॉयलर्स असू शकतात, तेव्हा आपापल्या जबाबदारीवर हा धागा वाचावा.

धन्यवाद. Happy

माझा डाऊट :
दुसर्‍या सिझन्च्या शेवटून तिसर्‍या-चौथ्या भागात, मिचम - फ्रँकचा personal security guard - now a personal secret service agent काय लफडं आहे? फ्रँक-क्लेयर बरोबर? का?

पुढच्या सिझनमधे फ्रँकची अधोगती दाखवायला सुरुवात करतील का? (ही शंका नाही, स्पेक्युलेशन आहे) पण ती तरी कशी होणार? रेचल वगळता कोणी खून करायला उरले नाही. डग नक्की मेला असेल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिसरा सीझन फार काही इंटरेस्टिंग नाही. आज तो सातवा एपिसोड (wedding vows पुन्हा जाउन घेतात तो) बघितला. भयानक बोअर. काही सीन्स उगाचच घातलेले आहेत. त्यात ते सतत ग्लूमी वातावरण. अंधारे सीन्स. कायच्या काय उगाचच. सीनिकल पणाचा ओव्हरडोस. आता केविन स्पेसी सुद्धा खिळवून ठेवू शकत नाही.

तिसरा सीझन बिंज वॉच करून दोन दिवसात संपवला रिलीज झाल्या झाल्या पण दुसर्‍या सीझनइतकी मजा आली नाही. ४था सीझन बघीनच याची खात्री नाही.

काय योगायोग .. दुसरं काही सुचलं नाही म्हणून तिसरा सीजन बघायला सुरूवात केली आहे .. तर हा बघून होईस्तवर पुढचा येईल वाटतं ..

अंडरवूड जोडपं इतकं रुथलेस, टोकाचं सेल्फिश आणि फीअरलेस का आहे आणि त्यांची अशी भगवान बनाए जोडी कशी काय झाली ह्याचं राहून राहून आश्चर्य वाटतं ..

तीसर्या सीजन मधे डग ला नको तेव्हडे फूटेज मिळालंय.
पहिल्या दोन सीजन मधला भयंकर पताळयन्त्रि फ्रँक प्रेसिडेण्ट झाल्यावर थोडा मवाळ झाल्यासारखा वाटतोय का?
हा सीजन थोडा स्लो होता पण पुढचा फारच मस्तं रंगणार आहे. फ्रँक वर्सेस क्लेयर!!!

चौथ्या सीझन बद्दल बोला की Happy आम्ही बघायला सुरुवात केली आहे, ६ भाग झालेत.
हा सीझन इन्टरेस्टिंग वाटतोय खूपच. बरेच करन्ट रेफरन्सेस आहेत यात.

#####spoiler alert ##### don't read if you have not started watching this season (4)

Recorded. Watched till 6th episode. I am really hoping for some different story than Claire becoming president at the end, else will there be Stamper, then Rachel in forthcoming seasons

#####spoiler alert ##### don't read if you have not started watching this season (4)

काल बघायला सुरूवात केली .. मला वाटलं नव्हतं ल्युकस अजून जिवंत असेल स्टोरीत ..

तर ह्या सीजन मध्ये त्याला फूटेज मिळणारसं दिसतंय ..

त्याला बघितलं (स्टोरीत) की कायम मला एक गर्ली, नाईव्ह प्रश्न पडतो .. त्याला ती झोई बार्न्स् इतकी का आवडली तिच्यापायी (आणि मग सत्याचा तपास म्हणूनही) हा स्वतःला असं धोक्यात घालतो ..

Happy

होना .. पण त्याच्या अ‍ॅल्कोहोलिजम आणि माणूसघाण्या स्वभावाशी काही अ‍ॅसोसिएशन असू शकते .. आणि ऑफ कोर्स त्याचं स्वतःचं अ‍ॅम्बिशन आहेच की .. त्याच इर्ष्ये ने तर तो चीफ ऑफ स्टॅफ बनतो (पाताळयंत्री बनून) ..

तो रिब्ज् जॉइन्ट वाला एक आहे ना ब्लॅक माणूस तोही दाखवलाय की लॉयल .. पण तो जास्त प्रॅक्टिकल दाखवला आहे (तिसर्‍या सीजन मध्ये तो नातवाबरोबर दिसला आणि नातवाला जे त्याने चार समजुतीचे शब्द सांगितले त्यावरून) ..

तिसरा इतकासा आवडला नव्हता. चौथा जास्ती चांगला जमलाय. तो जो स्लोनेस आला होता तिसर्‍यात तो गेलाय आणि पहिल्यातला फास्टनेस परत आलाय. घटना पटापट घडत आहेत. या विकांतापर्यंत संपेल

तिसरा फार इंटरेस्टींग नव्हता याच्याशी सहमत. चौथा जास्त कॅची वाटतोय.
लुकस जेलमध्ये का दाखवलाय ह्याचा संदर्भ मी विसरलेच आहे.

सायो, ल्युकस केविन स्पेसी विरुद्ध पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न करतो (दुसर्‍या सीजन मध्ये) .. तो मांजर पाळलेला एजन्ट अस तो त्याच्या मदतीने कुठली (टेलि कॉम) सिस्टीम ब्रीच करण्याच्या प्रयत्नांत तो पकडला जातो ..

>>तो रिब्ज् जॉइन्ट वाला एक आहे ना ब्लॅक माणूस तोही दाखवलाय की लॉयल<<

तो फ्रेडि - "यु स्टेप्ड ऑन ए राँग मदर*** रॅटल स्नेक" वाला. या सिझन्मध्ये त्याची क्रांतीकारी भुमिका आहे. Proud

मोस्ट लायक्ली पाच्वा सिझन शेवटचा असेल...

लीअ‍ॅन >> मी जरा वेगळेच वाचले, आणि पटक्न नेफिकडे निघालो होतो. पण मग विचार केला जरा नीट वाचू Happy

**** स्पॉयलर अलर्ट ****

सहावा एपिसोड नुकताच सुरू केलाय .. पण आता लास्ट एपिसोड पासून कायच्याकै वाटतंय .. व्हाईट हाऊस आहे की अंडरवर्ल्ड!!!

First season magic is not coming back. This season is boring too. In first season there was a logic to their madness now they are just mad Sad

चौथा चांगला आहे म्हणून पुन्हा अर्ध्यावर सोडलेला तिसरा बघायला सुरूवात केली आहे. बर्‍याच दिवसांनी पाहात असल्याने जरा इंटरेस्ट आहे. पण ठिकठिकाणी इतक्या वरच्या लेव्हल च्या राजकारणासाठी आवश्यक असलेली डेप्थ दिसत नाही. इथला चीफ ऑफ स्टाफ आणि वेस्ट विंग मधला, यातूनही जाणवेल.

हा सीझन बघून झाला. आता पुन्हा वाट बघा. तिसर्‍या सिझनमध्ये ग्रीप अगदीच सुटली होती ती परत आल्यासारखी वाटली ह्या सीझनला.

आमचा पण झाला बघून सीझन.
***************
स्पॉयलर

अ‍ॅक्चुअली लास्ट एपिसोड लॉजिक शी फटकून वाटला. अमादीशी डील करणे सगळाच पार्ट , टॉम ने आर्टिकल छापायच्या आधी येऊन उगीच व्हाइट हाऊस, कॅथी इ. ला धमकी देऊन जाणे (व्हॉट्स द पॉइन्ट ?छापायचेच होते ना ते एवीतेवी)
आधीचे सगळे भाग इन्टरेस्टिंग होते या सीझन मधे.
****************

@राजसी …. बरोबरच आहे त्याला थोड विदाउत लॉजिक म्याड दाखवलाय ते …४ सिझन प्रोमो मध्ये असा काहीस नव्हता का … Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely … आता तो प्रेसिडेंट म्हटल्यावर मग काय …

मी सात भाग बघून संपवले .. पण अजूनही मला म्हणावा तसा "राम" दिसत नाही ह्या(ही) सीजन मध्ये .. Wink

आणि ह्या सीजन मधल्या क्लेअर, ली अ‍ॅन, आणि जॅकी च्या टेलर्ड सुट्स/ड्रेसेस च्या आणि स्टेलेटोज् च्या अतिरीक्त वापराचा कंटाळा ही यायला लागला आहे ..

Pages