हाऊस ऑफ कार्ड्स (विथ स्पॉयलर्स)

Submitted by राजसी on 25 February, 2014 - 00:12

ह्या सिरियलबद्द्ल गप्पांसाठी हा धागा काढलेला आहे. आत्तापर्यंत ह्या सिरियल दोन सिझन झालेले आहेत.

स्पॉयलर्स असू शकतात, तेव्हा आपापल्या जबाबदारीवर हा धागा वाचावा.

धन्यवाद. Happy

माझा डाऊट :
दुसर्‍या सिझन्च्या शेवटून तिसर्‍या-चौथ्या भागात, मिचम - फ्रँकचा personal security guard - now a personal secret service agent काय लफडं आहे? फ्रँक-क्लेयर बरोबर? का?

पुढच्या सिझनमधे फ्रँकची अधोगती दाखवायला सुरुवात करतील का? (ही शंका नाही, स्पेक्युलेशन आहे) पण ती तरी कशी होणार? रेचल वगळता कोणी खून करायला उरले नाही. डग नक्की मेला असेल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल सीझन १ मधला तो भाग बघत होते ज्यात त्या मीचम च्या आधीचा जो सिक्युरिटी डीटेल ऑफीसर असतो त्याचा भाग होता .. तो टर्मिनली इल् असतो आणि क्लेअर त्याला हॉस्पिओतल मध्ये भेटायला जाते तो ..

फ्रँक आणि तिचं रिलेशन कसं आहे आणि का आहे ते त्यात ती त्या स्टीव्हला सांगते ..

रेचल परवा 'दि ब्लॅकलिस्ट'मध्ये दिसली होती.

काल सीझन २ सुरु केला. २ च भाग झालेत पण छे!! अ बिग लेट डाउन !! Uhoh
फारच अ. आणि अ. वाटत आहे. नियमित थ्रिलर्स वाचणार्‍या /बघणार्‍यांना तर अगदीच एलेमेन्टरी चुका दिसतील

स्पॉयलर *************************************************************************************

१. झोईने एवढे मूर्ख असावे ? आपल्याला काय समजलंय ते सरळ फ्रँक ला सुरुवातीला सांगून टाकणे, तेही फ्रँक काय चीज आहे हे माहित असताना आपली सगळी कार्ड्स ओपन करणे. सो नाइव्ह!
२.फ्रँक ने सांगताच फोनमधली सगळी हिस्ट्री डिलीट करणे!! हे म्हणजे सुसाइडच झाली !! (तरी पण फोन रेकॉर्ड्स ट्रॅक करता येतातच. ते फ्रॅन्क ने लक्षात न घेता पुढचे पाऊल उचलणे पण तितकेच येडपट.)
३. सगळ्यात कहर म्हणजे फ्रॅन्क ने कुणाचा काटा काढण्या सारख्या गोष्टी स्वतःच्य हाताने एकट्याने करणे ?? फारच स्टुपिड वाटलं ते. कुठल्या कंपनीचा व्हिपी असता तरी मी ते म्हटलं असतं, इथे तर अमेरिकेच्या व्हिपीबद्दल बोलतोय आपण, आणि त्याची काही हँड्स ऑन क्रिमिनल बॅकग्राउंड पण नसते, व्हाइट कॉलर कॉन्ग्रेसमन असले काही आपल्या हाताने का करेल ? अजून कितीतरी सोफिस्टिकेड पद्धतीने करता आलं असतं की!! झोईला उडवण्याच्या केस मधे तर इतकी लूपहोल्स आहेत की सहज फसला असता तो अटेम्प्ट ! एवढी मोठी रिस्क अमेरिकेचा व्हिपी घेईल??!! का!!
४.क्लेअरवर ती एम्प्लॉयी लॉ सूट करते. अन क्लेअर ऑफेन्स म्हणून काय तर तिचा हेल्थ इन्शुरन्स ड्रॉप करते ??? दॅट वॉज अगेन व्हेरी एलेमेंटरी !! हे ईझीली एक्स्पोझ होण्यासारखं आहे आणि क्लेअर कॅन नॉट अफोर्ड टु टेक दॅट रिस्क !! तसेही इन्शुरन्स विना त्या एम्प्लोयीला ते कुठलं इन्जेक्शन आहे तेही घेता येऊ नये अशी परिस्थिती येणे हे शक्यताच फार फार फेच्ड ! शिवाय एकता कपूर छाप बच्चे के बाप की बीबी ला मधे घेऊन येते तेही असंच अ. आणि अ, !!

पुढचे भाग याहून जरा सोफिस्टिकेटेड असतील ही अपेक्षा !!

१ & २ : झोई over-confidence मध्ये गेली.
३ : कोणाला outsource करणार अशी कामं? त्याच्यासारख्या माणसासाठी outsourcing is major risk . उगीच नंतर blackmail,पर्दाफाश असं नस्त लटांबर मागे नको. मला तरी त्याने केलेला पहिला खून crime of passion and spur of the moment decision वाटल, दुसरा प्लान्ड मर्डर होता. दोन्ही वेळेची गरज होते. तो दोघांच पाणी चाचपून बघतो खून करायच्या आधी, पण अचानक पीटर आणि झोई होलियर दॅन दाऊ, right thing to do do, सदसत्विवेकबुद्धी वैगेरे मोडमध्ये जातात आणि मूर्खासारखे स्वतःचे सगळे कार्ड्स open करतात. काय होणार मग? त्या जगांत मूर्खांना जगायचा अधिकार नाही.
४. मला तर ते नाक दाबल की तोंड उघडत टाईप वाटल, अस होऊ शकतं. ती कुठेच कागदोपत्री अडकली नाहीये. क्लेअरने तिची सगळीकडून कोंडी केली आहे तिने सूट ड्रॉप करावी म्हणून. एम्प्लॉयी प्रेग्नंट आहे त्यामुळे vulnerability to hormones etc. is in play. अरे! जेव्हा त्या एम्प्लॉयीकडे साधे सर्दी-तापाच्या औषधासाठी पैसे नव्हते तेव्हा हिनी तिला नोकरी दिली. तिच्या व्हिजनला फंडिंग दिलं. She was supposed to be the running point, on the field person of water initiative; its her vision after all. And she went ahead and got herself pregnant जेव्हा ती हे करते तेव्हा शी कुड spoiler असल्यामुळे पुढचे काही सांगत नाही. आगे - आगे देखिए होता है क्या Happy असो.

>>३ : कोणाला outsource करणार अशी कामं? त्याच्यासारख्या माणसासाठी outsourcing is major risk . उगीच नंतर blackmail,पर्दाफाश असं नस्त लटांबर मागे नको.>> हे अजिबातच नाही पटलं. स्वतः अडकणं किंवा ब्लॅकमेल, पर्दाफाश ह्या रिस्क काहीही केलं तरी टळणार नव्हत्यच. फ्रँकने झोईला अंडरएस्टिमेट करायची चूक केली.
मै शी सहमत.

तो चायनीज इन्डस्ट्रियालिस्ट फेन्ग का कोण आहे तो इतका अमेरिकनाइज्ड का दाखवलाय !! तो चायनामधला असतो, त्याला थिक अ‍ॅक्सेन्ट्स दाखवायला हवे होते!! बिलिव्हेबल नाही वाटलं हे कॅरेक्टर. असल्या छोट्या चुका फार आहेत दुसर्‍या सीझन मधे.

पहिल्या दोन भागात त्यांना मूल नसण्याला जे फुटेज दिलंय त्यावरुन असं वाटतंय- फ्रॅंकला एखादया विवाहबाह्य संबंधातून अनौरस मूल झालं असेल जे त्याने क्लेअरपासून लपवलं असेल. वि.बा.सं. लपवण्याचा प्रश्न नाही कारण दोघांनीही ते एकमेकांबद्दल मान्य केलंय. पण जर मूल असेल कुठेतरी लपवलेलं तर क्लेअर भडकेल कारण त्याने तिला ॲबॉर्शन करायला लावलं आणि स्वत: मात्र मूल दुसऱ्या बाईबरोबर जन्माला घातलं. त्यात जर टेस्टमध्ये कळलं की क्लेअरला मूल होऊ शकत नाही तर आगीत तेल ओतलं जाईल.
आणि मग क्लेअर त्याच्याविरुध्द गेल्यावर त्याचा डाऊनफॉल अटळ.

>> फेन्ग का कोण आहे तो इतका अमेरिकनाइज्ड का दाखवलाय !! तो चायनामधला असतो <<
चायनीज बिझनेसमन अमेरीकन बाॅर्न्ड/रेज्ड असु शकत नाहि?

>>आणि मग क्लेअर त्याच्याविरुध्द गेल्यावर त्याचा डाऊनफॉल अटळ.<<
फर्स्ट फॅमीलीचा असंतोष कधी चव्हाट़्यावर आलेला पाहिला आहे? बेचाळीसाव्या कुटुंबाचं उदाहरण जास्त जुनं नाहि... Happy

<<फर्स्ट फॅमीलीचा असंतोष कधी चव्हाट़्यावर आलेला पाहिला आहे? बेचाळीसाव्या कुटुंबाचं उदाहरण जास्त जुनं नाहि...>>

अंडरवुड दोन डेम्सना क्लेअरकडे पाठवतो- तिने त्यांना बिलसाठी मत दयायला कन्व्हिन्स करावं म्हणून. पण क्लेअर उलट रेमीशी हातमिळवणी करते आणि त्या डेम्सना सांगते की तुम्ही मत देऊ नका. कारण तिला तिच्या प्रोजेक्टसाठी सॅनकॉर्पची मदत हवी असते. ही गोष्ट नंतर फ्रॅंकला झोईकडून कळते. त्याचं आणि क्लेअरचं भांडण होतं आणि क्लेअर चिडून न सांगता ॲडमकडे निघून जाते आणि फ्रॅंक तिला शोधत बसतो.

म्हणजेच ऑलरेडी क्लेअर एकदा फ्रॅंकच्या विरुध्द गेली आहे. आता परत जर तसंच काही मोठं सिक्रेट फ्रॅंकने लपवलं किंवा तिला importance दिला नाही तर ती परत त्याच्या विरुध्द काहीतरी नक्की करेल!

राजसी- मराठीत लिहा प्लीज Happy
फ्रॅन्कला मुलं नको असतात म्हणून तो क्लेअर प्रेग्नंट असताना तिला ॲबॉर्शन करायला सांगतो. क्लेअर त्याचं ऐकते. पण तिला स्वत:ला अजूनही नक्की कळलेलं नाहीये की तिला खरोखर मुलं नको होती की ती फक्त फ्रॅंकचं ऐकत होती.

>>परत त्याच्या विरुध्द काहीतरी नक्की करेल! <<
पण राजरोस (चव्हाटा) नाहि. या शोचं ब्रिटीश वर्शन बघा, नेटफ्लीक्सवरच आहे.

राज - हे अमेरिकन व्हर्जन बघितल्यावर ते स्वतंत्रपणे बघण्याएवढे इंटरेस्टिंग आहे का? मी अमेरिकन व्हर्जन चे दोन्ही सीझन पाहिलेत.

अभिनय आणि संवाद उत्कृष्ट आहेत पण सगळ्या लोकांना (प्रेसिडेंट, व्हीपी पासून ते बॉडीगार्ड पर्यन्त) फ्रॅंक आणि क्लेअर मॅनिप्युलेट करू शकतात हे जरा असंभवनीय वाटते. पण टाईमपास म्हणून ठीक आहे ही सिरीयल.

तिसरा सीझन केव्हा रिलीज होणार आहे हे कोणाला माहिती आहे का?

>> फ्रॅंक आणि क्लेअर मॅनिप्युलेट करू शकतात हे जरा असंभवनीय वाटते. पण टाईमपास म्हणून ठीक आहे ही सिरीयल.>> सहमत. बाकी सगळेच बाळू दाखवलेत फ्रँक, क्लेअरच्या तुलनेत.

>> फ्रॅंक आणि क्लेअर मॅनिप्युलेट करू शकतात हे जरा असंभवनीय वाटते. पण टाईमपास म्हणून ठीक आहे ही सिरीयल.>>अगदी प्रेसिडेन्ट्ला सुद्धा

अभिनय आणि संवाद उत्कृष्ट आहेत पण सगळ्या लोकांना (प्रेसिडेंट, व्हीपी पासून ते बॉडीगार्ड पर्यन्त) फ्रॅंक आणि क्लेअर मॅनिप्युलेट करू शकतात हे जरा असंभवनीय वाटते. पण टाईमपास म्हणून ठीक आहे ही सिरीयल.

मला सगळयात जास्त अभिनयच आवडला सर्वांचा. अगदी लीड्सच नव्हे तर सपोर्टिंग कास्टसुध्दा उत्तम आहे.

तिसरा सीझन केव्हा रिलीज होणार आहे हे कोणाला माहिती आहे का?

तिसरा सीझन यायला वेळ आहे. अजून शूट झालेला नाही.

>>हे अमेरिकन व्हर्जन बघितल्यावर ते स्वतंत्रपणे बघण्याएवढे इंटरेस्टिंग आहे का <<
आउट ऑफ क्युरॉसिटी पहायला हरकत नाहि. टोटल १२-१३ एपिसोड्स आहेत. मुळ कादंबरीचा लेखक एकच असुनसुद्धा नेटफ्लिक्सच्या शोचा दर्जा बीबीसीपेक्षा उच्च आहे; स्क्रीनप्ले, प्रेझेंटेशन स्गळ्या बाबतीत. विशेष म्हणजे अमेरीकेन शो सुपर एंगेजींग आहे... Happy

तिसरा सीजन - फेब '१५ आय गेस.

शक्यता:
सीझन १ - फ्रॅंक VP
सीझन 2 - फ्रॅंक President
सीझन ३ - फ्रॅंक downfall from presidency
सीझन 4 - क्लेअर rise up to be the President

मॅनिप्युलेट बद्दल +१. फ्रँक ने तिला ट्रेनखाली ढकलणं तर अ आणि अ.
मला बोअर झाला दुसरा सीझन, नेटाने संपवला, पण फारशी मजा आली नाही.
सध्या एक जुनी मॅड मेन नावाची सिरियल बघायला घेतलीय. सध्या तरी बरी वाटतेय.

फ्रँक ने तिला ट्रेनखाली ढकलणं तर अ आणि अ. >>> टोटली.

जुनी मॅड मेन? ती जॉन हॅम ची ना? बरीच नवीन आहे ती. मधे बरेच एपिसोड्स पाहून मग जरा तोचतोचपणा जाणवल्याने बंद केली होती. पुन्हा सुरू करायला हवी.

>> फ्रँक ने तिला ट्रेनखाली ढकलणं तर अ आणि अ. >>> टोटली

पण अ आणि अ प्रकार कुठे नसतात?

दुसरा भागच एकूण पहिल्यापेक्षा अ आणि अ वाटला तरी बघायला मजा येते .. मला पॉलिटिकल ड्रामाज् एकूण खूप आवडतात म्हणून ही असेल .. आणि वर म्हंटलंय त्याप्रमाणे, स्क्रिप्ट, सगळ्यांचं अ‍ॅक्टींग असं प्रेझेन्टेशन टॉप क्वालिटी वाटतं ..

>>तिसर्‍या सीझनमध्ये दाखवण्यासारखं आता काय उरलंय ते कळत नाहीये. <<
नाॅर्थ कोरीया, इराण, सिरीया आणी आता युक्रेन; बरंच मटेरीयल आहे... Wink

स्कॅन्डल बघतं का कोणी? पॉलिटिकल थ्रिलरच आहे पण दर एपिसोडला वेगवेगळी उपकथानकंही आहेत जी त्या त्या भागात सुरु होऊन संपतात. आणि मेन कथानक एकीकडे सुरु राहतं. सध्या तीन सीझन आहेत नेटफ्लिक्सवर.

Pages