जगणे कठीण होता..

Submitted by स्वाकु on 24 February, 2014 - 01:33

जगणे कठीण होता माझ्याच प्रेषिताचे
गेले चुकून ठोके माझ्याच काळजाचे

मी एकटाच होतो कोणी न ओळखीचे
सांगू कसा कुणाला ऐकू अता कुणाचे

नाहीस तू तरीही होतात भास वेडे
हे कोणते कवडसे माझ्याच या मनाचे

मरणे अखेर माझे वाटे हवेहवेसे
पण टाळता न आले मज खेळ जीवनाचे

झिडकारले जगाला सोडून श्वास माझे
केले मला हवे ते ऐकून त्या जगाचे
                          ---

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैभवजी... आभार...

जसजसे बारकावे कळतील आणि त्रुटी समजतील तसतसे अजून चांगले लिहिण्याचा प्रयत्न करेन....