Submitted by स्वाकु on 24 February, 2014 - 01:33
जगणे कठीण होता माझ्याच प्रेषिताचे
गेले चुकून ठोके माझ्याच काळजाचे
मी एकटाच होतो कोणी न ओळखीचे
सांगू कसा कुणाला ऐकू अता कुणाचे
नाहीस तू तरीही होतात भास वेडे
हे कोणते कवडसे माझ्याच या मनाचे
मरणे अखेर माझे वाटे हवेहवेसे
पण टाळता न आले मज खेळ जीवनाचे
झिडकारले जगाला सोडून श्वास माझे
केले मला हवे ते ऐकून त्या जगाचे
---
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाहीस तू तरीही होतात भास
नाहीस तू तरीही होतात भास वेडे
हे कोणते कवडसे माझ्याच या मनाचे<<< वा वा
धन्यवाद बेफिकीरजी.....
धन्यवाद बेफिकीरजी.....
काही ओळी खूप आवडल्या शुभेच्छा
काही ओळी खूप आवडल्या
शुभेच्छा
वैभवजी... आभार... जसजसे
वैभवजी... आभार...
जसजसे बारकावे कळतील आणि त्रुटी समजतील तसतसे अजून चांगले लिहिण्याचा प्रयत्न करेन....
भास मस्तच
भास मस्तच