या छुप्या जाहिराती नव्हेत काय ?

Submitted by दिनेश. on 14 February, 2014 - 06:10

आजपासून मला इथे बीजेपीच्या जाहिराती मायबोलीच्याच पानावर दिसू लागल्या आहेत. या जाहीराती अर्थातच गूगलतर्फे प्रकाशित होत असतील आणि तो पक्ष त्याचे पैसेही देत असेल.

पण मायबोलीकर सभासद "सचिन पगारे" गेले कित्येक महीने सातत्याने एका राजकीय पक्षाची भलावण करणारे लेख लिहित आहे. त्या छुप्या जाहिराती आहेत असे मायबोली प्रशासनाला वाटत नाही का ? याबाबतही काही धोरण असावे, असे मायबोली प्रशासनाला वाटत नाही का ?

मी स्वतः त्यांचा एकही लेख वाचत नाही, पण शीर्षकावरुनच लेखाच्या विषयाची कल्पना येतेय. निवडणुक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांना सोशल नेटवर्किंग साईटवरील त्यांच्या खात्याचीही माहिती देणे बंधनकारक आहे. त्या नियमात हे लेख बसत नाहीत का ?

हा धागा केवळ मायबोली प्रशासनाने आणि सभासदानी विचार करावा म्हणून उघडत आहे. श्री सचिन पगारे या नावाने लिहिणार्‍या सभासदाबद्दल मला कसलाही आकस नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजकिय चर्चा हा मराठी संकेतस्थळांचा 'USP' आहे. ज्या संकेतस्थळांनी राजकिय चर्चांना फाटा दिला ती संस्थळे परलोकवासी झाली आहेत.तस्मात राजकिय विषय येऊ द्यात बिनधास्त.कसलिही शंकाकुशंका काढू नये.

चर्चा विचर्चा बरीच झाली आहे
अनेकांचे मुद्दे योग्य आहेत.
पण एक मुद्दा कोणी लक्षात घेत नाहीयेत तो पगारेंच्या बाबतीत ! की पगारे काँग्रेस ची टिमकी वाजवतात हे खरे नाही / त्या पक्षाकरता काही करत आहेत असे कही नाही ...मुळात ते बीजेपी निवडून यावी यासाठी वातावरण निर्माण करत आहेत ..त्याना माहीत आहे की परिस्थिती मतदाराना एज्यूकेट करायच्या पलिकडची आहे तरी पचवीतल्या पोरांनी परिक्षेत निबंध लिहावेत तसे लेख ते लिहितीत मुद्देही न पटणारे असतात मग साहजिकच ही ढिम्म भषा वाचकांच्या असंतोषाला खत्पाणी घालते आणि अपण काँग्रेसला ला मत द्यायचेच नाही असे प्रत्येक्वेळी मनात ठरवून लोक अपापल्या उद्योगाला लागतात ..सोबत मनोरंजन फुकटात होते ते वेगळेच !

असे होते .! ..म्हणून पगारे काँग्रेसदहनासाठी जमीन पोळवत आहेत हे लक्षात घ्या व त्यांच्यावरचा राग दूर करा असे माझे आपल्याला सांगणे आहे !!!

मायबोलीवरती छुप्या जाहीराती वेगवेगळ्या प्रमाणात आणि पातळीवर चालत आल्या आहेत. फक्त राजकीयच नव्हे तर इतर विषयांवर/उद्योगांवर्/वैयक्तीक गोष्टींसाठी चालू असतात. इतकच नाही तर काही गटगलाही प्रत्यक्ष भेटीत हे होत असते. आणि जेंव्हा एखादी व्यक्ती इथे लेखन प्रसिद्ध करून मायबोलीवरच इतरत्र लिंक देते तेंव्हाही ती जाहिरातच असते. अगदीच खूप उघड उघड, अनेक वेळेला जेंव्हा जाहिरात केली जाते किंवा मुद्दाम मायबोलीबाहेरच्या वेबसाईट चा प्रचार केला जातो. तेंव्हा ती बंद केली जाते पण काही वेळा हे ठरवणे तितके सोपे नसते.
जाहिराती वजा लिहिलेले लेख न वाचण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक मायबोलीकराला आहे. एकच व्यक्ती नेहमी अशा छुप्या जाहिराती लिहत असेल तर त्या लेखांना टाळणेही तितकेच सोपे आहे. दुसर्‍या कुणाला अशाच छुप्या पद्धतीने दुसर्‍या राजकीय पक्षाबद्दल लिहायचे असेल तर तेही स्वातंत्र मायबोलीवर आहे.

>>दुसर्‍या कुणाला अशाच छुप्या पद्धतीने दुसर्‍या राजकीय पक्षाबद्दल लिहायचे असेल तर तेही स्वातंत्र मायबोलीवर आहे. Happy

वेबमास्तरांशी अगदी सहमत आहे. पण हल्ली ज्या जाहिराती थेट असतात त्यांचा मारा इतका असतो कि कधी कधी तुम्हाला त्या जाहिराती न बघण्याचे , न पाहण्याचे, न ऐकण्याचे स्वातंत्र्य रहातच नाही.

दुसर्‍या कुणाला अशाच छुप्या पद्धतीने दुसर्‍या राजकीय पक्षाबद्दल >>>>>>>>>>

दामोदर पंत त्यानंतर मी भास्कर ......हे तेच करत होते...........तेव्हा मुद्दा का उचला गेला नाही ? Uhoh

छे छे उदयन. असं कसं? ते विचारप्रवर्तक लेख लिहित होते. जाहिरात नव्हेच की ती!

अन वैवकु, महेश म्हणतात त्याप्रमाणे जिथे तिथे गांधीवाद, समाजवाद, धर्मनिरपेक्षता वा गेला बाजार कम्युनिस्टांना गालिप्रदान करणारे यांचे वा लिंटी/गापै इ.चे लेखन/प्रतिसाद हे अ‍ॅक्चुअली या गोष्टींच्या प्रचारासाठीच असतात हे ज्ञान मला आज प्राप्त झाले!

वैवकु आणि मंदार यांच्या म्हन्यानुसार मलाही इब्लिस जामोप्या भरत मयेकर ग्रेटथिन्कर उदयन यांचे संघ भाजप अंधश्रद्धा गोबेल्स ई ई च्या विरोधात दिलेले प्रतिसाद हे खरेतर या गोष्टींच्या प्रचारासाठीच असतात याची epiphany(feeling) अनुभवास आली.
(Inverted mode on) Proud Biggrin

मी प्रचार करत नाही कुणाचा...................... विरोध करतो ..............

मला विरोधी पक्षात बसवले गेलेले आहे..........मी फक्त आणि फक्त विरोधच करतो आणि करत राहणार Happy

उदयन तुमाला मायबोलीचे'विरोधभुषण' हा आंतरराष्ट्रीय सन्मान प्रदान करावा अशी वेमांना मी विनंती करतो.
त्याचप्रमाणे खालील सन्मान ज्येष्ठ आयडींना देण्यात यावेत.
झक्की- जगनमिथ्या जीवनगौरव पुरस्कार
इब्लिस - राष्ट्रस्पष्टकिल्ष्ट सन्मान
गापै - छिद्रान्वेषीमित्र
लिंबुटिंबु - कोराभुषण
मास्तुरे -मरणोत्तर 'राष्ट्रमास्तुरे' पदक
श्री. अशोक पाटील- राष्ट्रमामा पुरस्कार
बेफीकिर -महिलामित्र( दलितमित्रच्या धर्तीवर)
दामोदरसुत -पाणीभुषण(काळे)
जामोप्या -माबोचे भगतसिंग (कितीदा ते शहीद होतात)
जिप्सि -सचित्ररत्न पुरस्कार
दिनेश -राष्ट्रबल्लव...
(या पुरस्कारांवर सुचना व हरकती मागवलेल्या नाहीत याची नोंद घ्यावी-हुकुमावरुन(आमच्याच)

Proud

ग्रेटथिन्कर, आयला, मला छिद्रान्वेषीमित्र कशाला केलाय? नुसतं छिद्रान्वेषी चालणार नाही का? बाकी यादी मस्त आहे.
आ.न.,
-गा.पै.

दामोदर पंत त्यानंतर मी भास्कर ......हे तेच करत होते...........तेव्हा मुद्दा का उचला गेला नाही ?

तुम्ही आम्ही खाल्ले तर त्याला शेण म्हणतात.

त्यानी किंवा त्यांच्या गटाने खाल्ले तर त्याला श्रावणी म्हणतात.

भयानक आंधळा द्वेष भिनला आहे अनेकांच्या मना मनात ! Angry
समतेच्या नावाखाली कोणी तरी कोणाचा तरी सतत द्वेषच करत असतो.
आजवर जे कोणी महान समाज कार्य करून गेले त्या सर्वांचे आत्मे तळतळत असतील.
एकजण सुद्धा पुर्वीचे सारे विसरून एकजुटीने एकदिलाने प्रगतीसाठी कार्य करू असे म्हणत नाही.
बस करा हे भिंती उभारणे !!!

महेश,

>> एकजण सुद्धा पुर्वीचे सारे विसरून एकजुटीने एकदिलाने प्रगतीसाठी कार्य करू असे म्हणत नाही.
>> बस करा हे भिंती उभारणे !!!

या लोकांसोबत प्रगतीयुक्त कार्य करण्याची कल्पनाही अशक्य आहे. यांच्याशी एकदिली साधायला गेलो तर आपल्यांत बेदिली माजेल. या लोकांना पूर्वीच्या उखाळ्यापाखाळ्या काढून आपल्याला सतत अपमानित करायचं आहे.

भिंतींचं म्हणाल तर, या भिंती आहेत म्हणूनच हे लोकं ओळखू येतात!

असो.

ही झाली माझी मतं. तुमची मतं वेगळी असू शकतात.

आ.न.,
-गा.पै.

>>भिंतींचं म्हणाल तर, या भिंती आहेत म्हणूनच हे लोकं ओळखू येतात!
माफ करा पण अतिशय असहमत !!! Sad

म्हणून पगारे काँग्रेसदहनासाठी जमीन पोळवत आहेत हे लक्षात घ्या व त्यांच्यावरचा राग दूर करा असे माझे आपल्याला सांगणे आहे !!! >>>
वैवकु :- मला "खरं सांगायचं तर..." हे नाटक आठवलं. अगदी असच असेल असं वाटुन गेलं.

Pages