या छुप्या जाहिराती नव्हेत काय ?

Submitted by दिनेश. on 14 February, 2014 - 06:10

आजपासून मला इथे बीजेपीच्या जाहिराती मायबोलीच्याच पानावर दिसू लागल्या आहेत. या जाहीराती अर्थातच गूगलतर्फे प्रकाशित होत असतील आणि तो पक्ष त्याचे पैसेही देत असेल.

पण मायबोलीकर सभासद "सचिन पगारे" गेले कित्येक महीने सातत्याने एका राजकीय पक्षाची भलावण करणारे लेख लिहित आहे. त्या छुप्या जाहिराती आहेत असे मायबोली प्रशासनाला वाटत नाही का ? याबाबतही काही धोरण असावे, असे मायबोली प्रशासनाला वाटत नाही का ?

मी स्वतः त्यांचा एकही लेख वाचत नाही, पण शीर्षकावरुनच लेखाच्या विषयाची कल्पना येतेय. निवडणुक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांना सोशल नेटवर्किंग साईटवरील त्यांच्या खात्याचीही माहिती देणे बंधनकारक आहे. त्या नियमात हे लेख बसत नाहीत का ?

हा धागा केवळ मायबोली प्रशासनाने आणि सभासदानी विचार करावा म्हणून उघडत आहे. श्री सचिन पगारे या नावाने लिहिणार्‍या सभासदाबद्दल मला कसलाही आकस नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशजी पगारेनी कित्तीही कुठल्याही पक्षाचा धडाडीने प्रचार करु दे. पण ज्याना ज्या पक्षाला मत द्यायचे आहे, ते त्यानाच देतील.

लिखाण स्वातन्त्र्य प्रत्येकाला असतेच. पण मला वाटते की ( माझे वै मत) पगारेन्चा तो अजेन्डा छुपा असो वा खुला, इथे त्याने कुणालाच काही फरक पडेल असे वाटत नाही. माझाही पगारेन्वर वैयक्तीक आकस नाहीच आहे, पण त्यान्च्या धाग्यानी आणी कॉन्ग्रेसच्या भलामणीच्या प्रचाराने करमणूक निश्चित होते.:फिदी:

रश्मी, एरवी नाही पण आता आचारसंहीता लागू होईल. एका पक्षाला जाहिरातींसाठी पैसे द्यावे लागत आहेत आणि दुसर्‍या पक्षाला मोफत सेवा.. !

ह! मग दिनेशजी याबाबत अ‍ॅड्मीननाच त्यान्च्या विपुमध्ये विचारावे लागेल. कारण आमच्यासारखे केवळ विरोध वा मत प्रदर्शीत करु शकतील, पण अन्तिम निर्णय अ‍ॅडमीन यान्चाच असेल ना!

सप भाजपचे की कॉंग्रेसचे? राहुल गांधींवरचा त्यांचा लेख ही मी वाचला.
मग दोन्ही पक्षांच्या जाहिराती माबो वर होत आहेत की काय?

अ‍ॅडमिन, सर्व बाफंवरच्या चर्चेकडे लक्ष ठेवून असते ना हल्ली, म्हणून वेगळा बाफ उघडलाय Happy

एकिकडे डॉ. शिंदे यांच्या नवीन लेखासाठी मायबोली उघडावी तर सचिन पगारेंचे डझनभर लेख दिसत राहतात.

विनिता, तूम्हीच सांगा ते नेमके कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते !

>>>>> त्या छुप्या जाहिराती आहेत असे मायबोली प्रशासनाला वाटत नाही का ? याबाबतही काही धोरण असावे, असे मायबोली प्रशासनाला वाटत नाही का ? <<<<<
याबाबत प्रशासन काय ते सान्गेलच. तसेच तुम्ही मान्डलेला मुद्दाही महत्वाचा आहे. तर....
असे लेख लिहीणे यात "जाहिरातबाजी केली आहे व त्याकरता मोबदला मिळवला आहे" हे सिद्ध व्हावे लागेल, जे अशक्य कोटीतील बाब आहे. अन मग कुणाला एखादी बाजु घेऊन काही एक लिहावयाचे असेल, तर त्यास बन्दीही घालता येणे अवघड आहे, शिवाय प्रत्येक मजकुर हा "जाहिराती"करताच आहे असेही मानता येणार नाही, या व्यतिरिक्त, जाहिरात आणि प्रचार यातिल फरक लक्षात घ्यावा लागेल. माझ्या मताचा मी प्रचार केला तर अशी गरज नाही की तो दरवेळेस राजकीय पक्षांच्या "जाहिरात खर्चात धरता येईल ". कारण नागरीक म्हणून मी जे करतो आहे त्यास रास्त मजकुराव्यतिरिक्त अन्य बन्दी असू शकत नाही.
जो पर्याय बीजेपीला गुगलथ्रू पेड अ‍ॅडव्हर्टाईजमेण्टसाठी आहे तो बाकी पक्षान्ना देखिल उपलब्ध आहेच.
हां, मात्र तुमचा हाच आक्षेप बर्‍याच अंशी, देशभरातल्या वॄत्तपत्रातून प्रदर्शित होणार्‍या " दहा वर्षातील प्रगतीच्या" जाहिरातींबद्दल मानता येईल, पण तिथेही कायद्याचि पळवाटा बघुन त्या जाहिराती पक्षाच्या नसुन भारतसरकारच्या स्वतःच्या कामगिरीबद्दल जनप्रबोधन व्हावे म्हणून आहेत हे सहज सिद्ध करता येते व त्यास आक्षेपही घेता येत नाही.
यामूळेच तुम्ही उल्लेखिलेल्या एक वा अनेक आयडीन्कडुन जरि अशा पोस्ट्स/मजकुर आला तरी त्यामुळे काहीही बिघडत नाही, कसलाही कायदा मोडला जात नाही, कुनाचिही सन्धी हिसकावलीही जात नाही असे माझे मत.
(अहो का आमच्या करमणूकीवर उठताय? Proud लिहूदेतना त्यान्ना, किती छान ओघवते लिहीतात, ती स्टाईल देखिल अभ्यासावी अशीच आहे)

हो एल्टी, त्यांना मोबदला मिळतो का, ते सिद्ध करणे कठीण आहे. मोबदला मिळत नसताना जर ते असे लेख लिहित असतील, तर त्या पक्षाला विनामोबदला असा धडाडीचा प्रचारक मिळाला, याबद्दल बाकी पक्षांना हेवा नक्कीच वाटेल.

स्वतः मोबदला घेऊन मायबोलीसारखे मोफत व्यासपिठ ते वापरून घेत असतील, तर आपण सर्वांनी अशा संधी शोधायला हव्यात. लिहिणे काय मायबोलीवर काही मिनिटापूर्वी जन्म घेतलेल्या आयडीला पण जमते.

आणि करमणुकीचे म्हणशील तर.. त्याची कधी कमतरता होती इथे ?

दिनेश,

माझ्यामते तुलना तशी गैर आहे. गूगलतर्फे येणार्‍या जाहिराती हा जसा माबोच्या पॉलिसीजचा एक भाग आहे तसेच योग्य भाषेत असलेले धागे उघडण्यास सदस्यांना स्वातंत्र्य असणे हाही! ह्याउप्पर, गूगलतर्फे येणार्‍या जाहिरातींवर इतर सदस्य मतप्रदर्शन करू शकत नाहीत आणि सदस्याने उघडलेल्या धाग्यावर ते करू शकतात. त्या मतप्रदर्शनालाही मूळ धाग्याइतकेच वेटेजही असते. शिवाय, सचिन पगारे ज्या पक्षाची बाजू घेतात त्या पक्षाच्या विरोधी पक्षाच्या बाजूनेही इतरांना धागे उघडता येतात. मुख्य म्हणजे, विशिष्ट पक्षालाच मत द्या असे पगारेंनी प्रत्यक्षात कधीच म्हंटलेले नाही.

ही माझी मते न पटल्यास राग नसावा.

धन्यवाद!

बेफी, राग कसला ? उलट मी तर म्हणेन जसे सरकारी माध्यमांत ( पुर्वी तरी ) सर्व राजकिय पक्ष्यांना समान वेळ दिला जात असे, तसे इथे हवे. जर हे मोफत माध्यम आहे तर सर्व पक्ष्यांना समान संधी मिळायलाच हवी. त्या बाफंवर विरोधी मते दर्शवून तिथली प्रतिसाद संख्या वाढवण्यापेक्षा दुसर्‍या पक्ष्यांची बाजू मांडावी.

नरेँन्द्र मोदीँच्या प्रचारार्थ एखादा आयडी घेणे ,जागोजागी ,धाग्याधाग्यावर चहाचे फ्लेक्स लावणे ,डोनेट टु बीजेपीची लिंक प्रोफाईवर डकवून माबोचे उत्पन्न बुडवणे, हे छुप्या जाहिरातीत येत नाही.त्यामुळे पगारेही काही वावगं करत नाहीत.

सचिन पगारे आपले फक्त मत मान्डत आहेत ... मला तरी त्यात वावगे असे काही वाटत नाही .. शेवटी मायबोली हे एक व्यासपीट आहे..

बेफिं शी सहमत. गूगल वरून येणार्‍या जाहिराती आणि पगारेंचे लेख ह्यांची तुलना करता येणार नाही. भाजपाच्या जाहीराती सरळ सरळ पेड अ‍ॅडव्हर्टाईजिंग आहे.

पगारेंचे लेख हे छुप्या जाहिराती आहेत हे माझेही पहिल्यापासूनचे मत आहे. राजकिय भाषणात असते तशी "पॉलिटिकली करेक्ट" भाषा वापरून ते लिहितात. आणि त्यात मतप्रदर्शनापेक्षा काँग्रेस व त्याच्या सहयोग्यांचे गुणवर्णन किंवा "डिफेन्स" असतो. पण तरीही सगळे "मतप्रदर्शन" ह्या प्रकारात सहज टाकता येते त्यामुळे अ‍ॅडमीन काही करू शकत नाहीत (ह्या लेखांमधे 'काँग्रेसलाच मते द्या' असे स्पष्ट म्हटले जात नाही तोपर्यंत तरी).

रच्याकने - ह्यातल्या बर्‍याचश्या जाहीराती आपल्या काँप्युटर वरील cache memory वरून येतात. आपण गेल्या काही दिवसात किंवा अगदी आत्ताही भाजपा शी संबंधीत काही शोधले असेल, त्या पक्षाची वेबसाईट बघितली असेल, तर गूगल cache मधून ते जाणून घेते व त्याच्याशी संबंधित जाहिराती डकवते. सोपे उदाहरण म्हणून गाडी विकणार्‍या डीलर च्या चार पाच वेबसाईट वर जाउन या. आणि मग जाहिराती कशा बदलतात बघा. अगदी 'सकाळ' च्या वेबसाईट वरही हेच होताना दिसेल तुम्हाला. तुमच्या ब्राउझरची history व cache डिलिट केलीत तरी फरक पडेल.

प्रश्नः सर्व पक्षांना समतोल जागा व वेळ जाहीरातीसाठी द्यायला पाहिजे असे मायबोलीवर बंधन आहे का?

इथे मी तर दोन्ही पक्षांच्या बाजूने लिहीलेले बघतो.

एकच फरक - पगारे सोडून बाकी लोक जास्त करून इतर पक्षांवर टीका करतात,त्यांच्या आवडत्या पक्षाने देशहितासाठी काय केले हे फार क्वचित दिसते.

पगारे जे काय श्रेय काँग्रेसला देतात त्यात काही चूक केल्याचे किंवा खोटे असल्याचे कुणि सप्रमाण सिद्ध केल्याचे स्मरत नाही.

जर काँग्रेसचे राज्य सतत टिकल्याने इतकी वर्षे देशात जे वाईट झाले ते काँग्रेसमुळे झाले असे असेल तर जे चांगले झाले त्याचे श्रेय काँग्रेसला का नाही?

मला स्वतःला काँग्रेसबद्दल मुळीच प्रेम नाही. तो पक्ष, त्यातले लोक, त्यांचे नेते यांच्याबद्दल मुळीच प्रेम नाही. कायम त्यांचा रागच होता व आहे.

पण भर लोकसभेत सुरा दाखवणारे व पेपर स्प्रे आणणारे, विधान सभेत गुंडगिरी करणारे असल्या विरोधी पक्षासाठी तरी का काही प्रेम असावे?

भाजपचे राज्य पाच वर्षे होते म्हणे. काय काय केले? आणिबाणी नंतर काही दिवस विरुद्ध पक्षांनी राज्यावर येऊन देशासाठी काय केले? नुसत्या वल्गना करून देश चालवता येत नाही. भल्या बुर्‍या ज्या कल्पना आपल्या मते देशहितासाठी आहेत त्या अंमलात आणायला अक्कल, व इतर गुण असावे लागतात.

मला म. गांधी यांच्या संघटना कौशल्याबद्दल कायम विस्मय युक्त आदर आहे. त्यांचे मुस्लिम प्रेम व अति अहिंसा हे अजिबात मान्य नाही. व्यक्ति नसेल पण त्या व्यक्तीचे गुण तर आपल्या अंगी बाणवता येतात ना?

पण भारतात कधीच तसे होत नाही. नेहेमी कुणितरी यावे नि काहीतरी करावे अशी इच्छा! स्वतः नुसते टीका करत बसायचे.


जर काँग्रेसचे राज्य सतत टिकल्याने इतकी वर्षे देशात जे वाईट झाले ते काँग्रेसमुळे झाले असे असेल तर जे चांगले झाले त्याचे श्रेय काँग्रेसला का नाही?
<<
झक्की म्हाराज बाराकर कीऽ...
जय!!!
talya.gif

आपले मत व्यक्त करण्याचा " लोकशाही " अधिकार प्रत्येकाला आहे , त्यात ' कोणाला ' सगळीकडे बीजेपी दिसत असेल तर त्याला नाइलाज आहे. उद्या अमुक एखाद्या नेत्याचे नाव कितिवेळा घेतले , म्हणुन कोणी आक्षेप घेतील ते योग्य नाही . आणि त्यानी 'असे ' का लिहिले असे वाटत असेल तर तुम्हाला ' तसे ' लिहिण्यास कोणी मनाई तर नाही ना केली ? तुम्हाला 'तसे 'लिहीण्यासाठी ' मुद्दा " मिळत नसेल , तर त्याला कोण काय करणार ?

रामलीलाच्या आंदोलनापासून अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, अंजली दमानिया बाई, रवी श्रीवास्तव बाबा हे मराठीत तर मनिष सिसोदिया, किरण बेदी, कुमार विश्वास, मनोरंजन भारती इ. इ. लोक २४ बाय ७ कुठल्याही वाहीनीवर दिसतात. या पक्षाचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मेडीयात हे सगळे झळकतात. विशेष म्हणजे अमिताभच्या सिनेमात अमिताभ स्वतःबद्दल काहीच बोलत नाही, पण त्याच्याबद्दल इतर पात्रं बोलत राहतात तसं हे सर्व जण अरविंद केजरीवाल बद्दल बोलत राहतात... या छुप्या जाहीराती नाहीत का ?

एका पेड शोजचे किती घेत असतील च्यानलवाले ? यांचं बिल काढा दोन वर्षाचं. पार्टीने दिल्ली सर केल्यावर तर देशभर मेंबरशीप ड्राईव्हही टीव्हीवरूनच झाला. फॉर्म कसा भरायचा, वेबसाईटचं नाव काय, पैसे कसे पाठवायचे, अपलोड कसं करायचं याचं व्यवस्थित शिक्षण च्यानलवाले देत होते..

हा सगळा प्रायोजित कार्यक्रम तर नाही ?

असिम, तुमचेही निरीक्षण अचूक आहे. Happy
पण मिडीयाच्या अशा सहभागात गैर काहीच नाही, फक्त मिडीयाने उगाच उठसुठ निरपेक्षतेचा आव आणित स्वतःस "लोकशाहीचा (म्हणे) चौथा आधारस्तम्भ" वगैरे म्हणवुन घेऊ नये. त्यान्चेही पाय मातीचेच आहेत. अन याच बरोबर मागल्या शतकाच्या उत्तरार्धात सत्ताधार्‍यान्नी विरोधी पक्षाचे हातातील वृत्तपत्रादिक मिडीयाची कशी अन कशाकशा प्रकारे वाट लावली, एकमेकान्वर कशा कुरघोड्या केल्यात हे ही विसरुन चालणार नाही.
पुण्यातील एका हिन्दुत्ववादी दैनिकास सम्पविण्यास कागदाच्या आयात परवाना/वाहतुकीतिल /वितरणातील अडथळ्यापासून पुण्यातीलच एका पूर्वीच्या समाजवादी दैनिकाचे पडद्या आडील मालक कसे प्रयत्न करत होते याच्या कहाण्या रन्जक आहे, पण सुरू केलेल्या कृतीचे वर्तुळ पूर्ण होते या नियमाने याच पूर्वीच्या समाजवादी वृत्तपत्रास झोपविण्याकरता नन्तरचे काळात मराठवाड्यातुन सुरू झालेले वृत्तपत्र कशा प्रकारे दोन वर्षे सतत फुकटात पेपर वाटत होते ते बघणे अविस्मरणीय होते. त्याचबरोबर दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील एक वृत्तपत्र तर सरळ सरळ पीएम्टीच्या गाडीवर "प्रातःकाळचे पहिले काम...." अशा जाहिराती करीत होते. यात व्यावसायिक स्पर्धेपेक्षाही राजकीयदृष्ट्या मिडीयाची साधने आपल्या हातात रहावित ही गरज उठून दिसत होती. असो.

माझ्यामते पगारेंच्या पोस्टी काहीही चूक नाहीत, व एकतर्फी वगैरे प्रचारही नाहीत. बाकीच्या पक्षाच्या लोकान्ना काय धाड भरलीये त्यान्नी केलेली/करत असलेली कामे भुमिका धोरणे वगैरे मान्डायला ? तसे कार्यकर्ते तयार करा की. त्यान्ना सुविधा / प्रशिक्षण पुरवा - यन्त्रणा उभ्या करा,
पण भिन्ती/रस्ते रन्गवायचा चूना अन बादली अन ब्रश देखिल कार्यकर्त्यान्नी स्वतची घरुन आणावी - अन पक्षनिधी वरच्यान्नी खावा, अन आपण आपले कार्यकर्त्यान्च्या जीवावर त्यान्च्या अर्ध्याचड्डीचे टोक धरुन होईल तितके/झेपेल तितकेच राजकारण करावे हे धोरण असलेल्या हिन्दुत्ववादी पक्षात अजुन वेगळे ते काय घडणार? असो.

लिटिं

पगारेंनी केलेली जाहीरात हा माझा मुद्दा नव्हता. छुपी जाहीरात या शब्दामुळे आपची प्रसिद्धी मोहीम आठवली. पगारेंचं म्हणाल तर त्यांनी उघड उघड जाहीरात केली किंवा सरळ टीका केली तर बरं राहील. मला तरी त्यांचं लिखाण हे उकसवणारं वाटतं. म्हणजे काँग्रेसबद्दल काय लिहीलं तर हल्ले होतील याचे त्यांचे आडाखे अचूक असतात असं वाटतं. चुभूदेघे.

इब्लिस, वरच्या अ‍ॅनिमेशनात दुसर्‍या रांगेतली उजव्या बाजुची बाई स्वमुख बडवून घेतेय असे वाटते. फिदीफिदी>>>:हहगलो: ती क्लिप फार फास्ट आहे, त्यामुळे वरवर पाहिले की मला तसेच वाटले.:फिदी: पण बारकाईने पाहिले की लक्षात येते तसे नाहिये. इब्लिस ना कुठे सापडली ही क्लिप काय माहीत? मला तर काही पण डाऊन लोड करताना भितीच वाटते.:फिदी:

>>>>>> म्हणजे काँग्रेसबद्दल काय लिहीलं तर हल्ले होतील याचे त्यांचे आडाखे अचूक असतात असं वाटतं. <<<<<
हो, अन त्यामुळेच माझ्यासारख्याच्या मनात अशीही शन्का येते की ते खरोखर कॉन्ग्रेसकरता लिहीतात की विरोधी मतान्ना प्रदर्शित व्हायला निमित्त मिळवुन देतात, की विरोधी मतान्चा व ते व्यक्त करणार्‍यान्चा सोशल मिडीयावर शोध घेण्याचे मोहिमेत सहभागी आहेत? Proud आयला इथुन पुढे पगारेन्च्या पोस्टीन्वर जरा जपुनच लिवले पायजे! Wink

मला तर वाटायला लागलंय... कि सर्व पक्षांना मायबोलीतर्फे आमंत्रण द्यावे... आणि सचिन पगारे यांना मोबदला मिळतो का याची चौकशी करण्याचे, निवडणुक आयोगाला सुचवावे.

Pages