विपश्यना - काही प्रश्न

Submitted by विजय देशमुख on 28 January, 2014 - 20:35

विपश्यना, या विषयावर अनेकदा हा आनंददायी अनुभव आहे, इतकच वाचल्या गेलं. पण एकदा तरी विपश्यना शिबिराला गेलं पाहिजे, असाही सल्ला बर्‍याच लोकांनी दिला आहे. त्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडले आहेत.

१. ह्या शिबिराला वेगवेगळ्या केंद्रात (उपकेंद्रात) काही फरक आहे का? असल्यास कोणता.
२. या शिबिरात शिकवल्या जाणार्‍या ध्यान-पद्धती बाहेर सांगू नये, असे वाचले होते, ते बरोबर आहे का? असल्यास त्याचे काय कारण असावे?
३. या शिबिरासाठी काही पुर्वतयारी असावी का? असल्यास कोणती ? उदा. काही विशेष कपडे, जसे योगासनांसाठी वापरतात तसे, वगैरे...
४. ज्यांना रोज काही औषधे घ्यावी लागतात (उदा. रक्तदाब, डायबेटिस, इ.) त्यांच्यासाठी काही विशेष सुचना.
५. या शिबिरातुन कोणत्या अपेक्षा असाव्या/ असू नयेत.
६. इतर काही माहीती.

येत्या मार्च महिन्यात १० दिवसांच्या कोर्सला जायचे ठरतेय. बघुया, कसं जमते ते.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी परमर्थाच्या बाता मारतात पण इगो कसा असतो ना? म्हणे माझी निवृत्ती? कम ऑन! आम्ही काय पूर्वी लोक रामायण मालिके साठी टीव्ही कडे डोळे लावून बसायचे तसे तुमचा प्रतिसाद कधी येतो हे पाहत बसत नाही. पण काय कसा इगो असतो ना वाटतेच की कोणीतरी म्हणावे नका नका नका नका नका जाऊ, तुम्ही जे ज्ञानकण उधळत आहात त्यातला प्रत्येकाने प्रत्येक कण आम्हाला साठवून घ्यायचा आहे. असे आम्हाला असे ताटकळत अर्धवट सोडून जाऊ नका.

बाता मात्र करायच्या मोक्षाच्या साक्षी भावाच्या सुखदुःखांच्या पलीकडे जाण्याच्या आपला इगो नष्ट करण्याच्या वगैरे वगैरे. म्हणे एकदा नाही म्हटले की नाही. सेवंथ स्टैंडर्ड मधली मुलं आहोत काय?

सोकाजीराव, खालील लिंकवर पुस्तक आहे. हे चाळले असता याचीच आवृत्ती असावी असे वाटते. मी वाचले त्याच्या मुखपृष्ठावर किंवा पहिल्या पानावर भिख्खूचे चित्र होते.
https://www.buddhanet.net/pdf_file/anapanasati.pdf

रॉय यांचे सात्विक प्रतिसाद, त्यांची अहंकारमुक्त भाषा त्यांचे ज्ञान, असूयामुक्त संवाद यापासून खूप शिकण्यासारखे आहे. मायबोलीकरांची उत्तम सोय झाली.

एक लेखक,

कसे आहे ही एक सेल्फ फुल फिलिंग फॅलेसी असते. म्हणजे इस्लाम मध्ये म्हणतात की अल्लाहचा शब्द असलेला कुराण हा ग्रंथ अंतिम त्यापेक्षा जगामध्ये कोणतेही मोठे ज्ञान नाही. अर्थात हे म्हणणार कोण तर कुराणच की माझ्यापेक्षा मोठं काहीच नाही. किंवा मोहम्मद रसूल पैगंबर की माझा शब्द म्हणजे अल्लाह चा शब्द आणि मीच शेवटचा प्रेषित. यापुढे कोणीही प्रेषित वगैरे येणार नाही आणि माझे म्हणणे पटत नसेल तर प्रमाण म्हणून माझेच म्हणणे ऐका.

तशीच ही अनुभूतीची भानगड आहे. हे सगळे प्रत्यक्ष अनुभवण्याचे आहे नुसती शाब्दिक चर्चा वायफळ आहे असे म्हटले पुढे काही बोलताच येत नाही कारण अनुभवल्याशिवाय काहीच करता येत नाही. समोरच्याला अगदी गप्प करणारे उत्तर आहे हे. अगदी मला दोनदा खोदून खोदून विचारले की तुम्हाला अनुभव आहे का? नसला असता तर मी जे बोलतोय त्याला काही अर्थच नसला असता जणू! आणि अर्थात जो काही अनुभव आहे तो घेऊन देखील मी जर हेच बोललो तर मी घेतलेला अनुभव हा खरा अनुभवच नव्हता असेही म्हणायला लोक पुढे मागे करणार नाहीत. म्हणजे या सेल्फ फुल फिलिंग फॅलसी मधून बाहेर पडणे अवघड.

एकदा या सबंध बुद्धमय जगाचा अंदाज घेऊन तरी बघा. तुमच्या आजूबाजूचा प्रत्येक माणूस हा स्वतःचा स्वतः दीप झालेला आहे त्याच्या चेहऱ्यावर किंचित मंद असे स्मित झळकत आहे, एखाद्याचे तहाने बाळ जरी गेले तरी तो त्या दुःखाने विचलित होत नाही आणि त्याला ऊर फुटेस्तोवर विलाप करायची इच्छा नाही किंवा गरज नाही किंवा तो त्यापलीकडे पोहोचला आहे. कोणीही कोणावर कुरघोडी करत नाही पडलेली फळे लोक वेचून खातात कोणी कोणावर अन्याय करत नाही. कोणी हातातून रिमोट हिसकावून घेणार नाही, टीनेजर मुलं मुताऱ्यांवर काही बाही लिहिणार नाहीत, त्यांना त्यांचे शिक्षक कानफळवणार नाहीत, लोक वारी बिरीला जाणार नाहीत आणि अतिव गर्दीने दर्शन होणार नाही म्हणून कळसाला बघून मागे फिरणार नाहीत, शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे सुनसान पडलेला असेल कारण कोणीही धार्मिक पर्यटनावर निघणार नाही, काल परवा झिंजा उपटू बघणारी शेजारची बाई आज तुमच्या डोक्यावर नवरत्न तेलाची मालिश करायला आलेली असेल बुद्धमय होऊन..

आणि प्रत्येक माणूस स्वतःच्या मनाच्या अगदी नॅनोस्कॉपिक लेवल ला जाऊन संवेदनानमार्फत झालेले राग अनुरागांचे संस्कार कट करत सदा सर्वकाळ बसलेला आहे जाता येता उठता बसता हगता मुतता.. या सबंध जगात अनुभूती नावाच्या गोष्टीलाच काहीतरी अर्थ राहील का?

असल्या फकडप जगात मला एक क्षणही थांबावेसे वाटणार नाही.

>>रॉय यांचे सात्विक प्रतिसाद, त्यांची अहंकारमुक्त भाषा त्यांचे ज्ञान, असूयामुक्त संवाद यापासून खूप शिकण्यासारखे आहे. मायबोलीकरांची उत्तम सोय झाली.<<

एक लेखक,

सगळे प्रतिसाद वाचले असता एक तरी किमान लक्षात आले असते की मी या सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे निषेध करतो. सात्विक प्रतिसाद असू या मुक्त प्रतिसाद वगैरे वगैरे हे सगळे फ्रॉड असते. आणि मी तर या सर्व मानवी भावभावना असलेला एक श्रुद्र माणूस आहे आणि त्यात पासून मुक्तता मिळवण्याची माझी काडीचीही इच्छा नाही. बाकी तुझ्या तोंडाला लागण्याची ही माझी इच्छा नाही पण काय मला हे टाइमपास करायचाच आहे.

आणि मुळात हाच तर मुद्दा आहे की या सगळ्या मानवी मनाच्या नैसर्गिक प्रॉपर्टीज आहेत आणि त्यांच्यावर मात करत राहण्याची शिकस्त करत राहणे हे थोडेफार क्रूर आहे

>>>>>>>यात संस्कृत सांगणारा ज्ञानी असल्याचा भ्रम होतो आणि चर्चेत त्या व्यक्तीला अधिकारपद मिळते.
Lol Lol
बेकार माणुस - Lol Lol

क्वांटम फिजिक्स/मेकॅनिक्सचा रेफरन्स आलाच आहे तर हे खालचे पुस्तक रिफर करतो, मराठीत आहे. ते वाचल्यावर क्वांटम फिजिक्स/मेकॅनिक्सचा सबंध लक्षात येऊ शकेल.

क्वांटम मेकॅनिक्स - वेध चिरंतन अस्तित्वाचा

तसेच, Federico Faggin, ज्यांनी मायक्रोप्रोसेसरचा, न्यूरल नेटवर्कचा शोध लावला, त्यांचा हा इंटरव्यू नक्की बघा, बराच मोठा आहे, पण तेवढा वेळ सार्थकी लावणारा इंटरव्यू आहे.
https://youtu.be/cXlxCOoNZ7E?si=qOTIlS8gcLZ23aDH

(अभ्यासू) सोकाजी

सोकाजी सहसा माझा अंदाज चुकत नाही. आणि तो इंटरव्यू उघडल्यावर मला अपेक्षा होती की पहिल्या तीन-चार मिनिटातच मला त्यांचा इंटरव्यू घेतला जाणार आहे त्या महाशयांच्या नवीन पुस्तकाबद्दल माहिती मिळेल जेणेकरून मी ते पुस्तक लगेचच्या लगेच खरेदी करावे. आणि दुर्दैवाने तेच झालं. त्या पॉईंटनंतर मी तो इंटरव्यू बंद केला म्हणजे पहिल्या दोन मिनिटातच.
समथिंग्स नेव्हर चेंज.

मी प्रबुद्ध आहे, कृपया पुढच्या आठवड्यात माझे एक नवीन पुस्तक येत आहे तेवढे खरेदी करा. मी प्रबुद्ध आहे, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मला ऍड रेवेन्यू मिळत राहील. मी प्रबुद्ध आहे, मला फॉलो करा म्हणजे फॉलोच बटन दाबा.

आणि हे फादर ऑफ मायक्रोप्रोसेसर फादर ऑफ न्यूरल नेटवर्क बास झाला आता. सासू ऑफ मायक्रोप्रोसेसर ननंद ऑफ न्यूरल नेटवर्क कधी येणार आहेत? काहीतरी व्हेरिएशन द्या.

जेव्हा कुठलाही युट्युबचा व्हिडिओ त्याच्या टायटल मध्ये फादर ऑफ न्यूरल नेटवर्क फादर ऑफ ए आय फादर ऑफ मायक्रोप्रोसेसर फादर ऑफ डाटा सायन्स असे शब्द योजत असेल, सर मी इंटरव्यू किंवा तो पोडकास्ट पाहण्याच्या भानगडीत सहसा पडत नाही. कारण आता हे क्लिकबेट इतके क्लिशे झालेले आहेत की त्याचे अजीर्ण झाले आहे. काहीतरी नवीन इनोव्हेशन पाहिजे राव.

कारण जो तो थेट आता काँटम फिजिक्स वरच बोलायला लागतो. बर ठीक आहे बोल काय प्रॉब्लेम नाही मात्र एवढं प्रकांड ज्ञान मिळूनही अंतिमत: विकायचे असते एखादे पुस्तक. कसले घंट्याचा कॉटम फिजिक्स?

तर आता माझ्याकडे सांगण्यासारखे फारसे काही उरले नाही तरीही मी अधून मधून येथे येत जाईन, कारण आता काय चर्चा अत्यंत टिपिकल मार्गावरून जात आहे आणि या मार्गाचा अंत मला ठाऊक आहे. इट विल गेट सिंपली बोरिंग.

>> त्या पॉईंटनंतर मी तो इंटरव्यू बंद केला म्हणजे पहिल्या दोन मिनिटातच

तुमच्या एकंदरीत प्रतिसादांचा कल, टोन, भाषा आणि खोली बघता त्यामागे चेरी पिकिंग (Cherry-picking) / सिलेक्टिव्ह रीडिंग असू शकेल असं वाटत होतच, ह्या तुमच्या प्रतिसादाने त्याची खात्री पटली. धन्यवाद!

गोयांकाजी, १० दिवसांच्या शिबिराच्या शेवटच्या दिवशी एक गोष्ट सांगतात, तांदळाच्या चविष्ट आणि शुभ्र खिरीत असलेल्या वेलचीच्या काळ्या दाण्याला, दगडाचा खडा समजून, सगळी खीर फेकून देणाऱ्या मुलाची. तो खडा आहे समजून वेलचीचा काळा दाणा काढून टाकला असता फक्त आणि खीर खाल्ली असती तर चविष्ट खिरीचा आस्वाद घेता आला असता. नेमकं इथेही तसंच झालं!

>> सासू ऑफ मायक्रोप्रोसेसर ननंद ऑफ न्यूरल नेटवर्क कधी येणार आहेत?

Federico Faggin यांचे credentials देण्यामागे कारण होतं. त्यामुळे त्यांच्याविषयी जरा माहिती काढून, त्यांचा बायो-डाटा बघून, त्या अनुषंगाने (खोलात जाऊन) त्यांची थियरी काय आहे ते समजून घेता येईल. AI चा पाया न्यूरल नेटवर्क आहे आणि एनालॉग न्यूरल नेटवर्क हा त्यांचा एरिया ऑफ एक्सपर्टीज असल्याने त्यांनी AI conscious होऊ शकेल का ह्यावर त्यांनी संशोधन सुरू केलं आणि त्यातून त्यांना ‘Quantum consciousness’ चा काय बोध झाला, अनुभूतीच्या स्वरूपात, हे बघून तुमच्या मागच्या एका प्रतिसाद आलेल्या, ‘अनुभूती म्हणजे नेमकं काय?’, या प्रश्नाचे उत्तर मिळाले असते. पण दुर्दैवाने चेरी पिकिंगंमुळे (खोलात न जाणे) वरचा प्रश्न पडणं सयुक्तिक आहे!

तर ते असो, तुमच्या एकंदरीत प्रतिसादांवरून, Hitch ह्या माझ्या अत्यंत आवडीच्या सिनेमातला हा ‘डिस्गस्टिंग’ सीन आठवला, नक्की बघा Happy :
https://youtu.be/vO0J6seoXBE?si=Famp8UfhzFftHNXm

>> इट विल गेट सिंपली बोरिंग.

त्या वरच्या व्हिडियोतला अल्बर्टचा शेवटचा डायलॉग, “आय काईंड ऑफ लाईक हिम!” Happy
- (Hitched) सोकाजी

Quatum consciousness बद्दल सभ्य भाषेत बोलायचं तर आभाळ हेपलणाऱ्यांना एखाद्या पॉडकास्ट वर जाऊन पुस्तकाची जाहिरात का बरं करावी लागत असेल एवढाच साधा प्रश्न मला पडला होता. किती मजेशीर आहे ना?

शिवाय अनुभवाची एवढी तारीफ दारी करणाऱ्या तुम्हाला पुस्तकं वाचून खोलात जायची काय बरं गरज आहे? अकॅडमिकॅली खोलात जाऊन चर्चा करायची तरी काय ड्राईव्ह आहे ही? याचा अर्थ तुम्हाला अनुभवाच्या क्षमतेवर विश्वास नाही का? की हा अनुभव या शब्दा भोवती जो भुलभुलय्या आहे तो जाणवू लागला आहे? की अनुभवातून देखील तुम्ही अजून सर्फस वरच तरंगत आहात? अनुभवाच्या खोलीत सूर नाही मारता येत का?

बाकी ही credentials ची ट्रिक काही नवीन नाही. इसरो चे शास्त्रज्ञ् देखील बालाजीच्या चरणी माथा टेकवतात. अगदी कॉमन पॅटर्न आहे हा.

तांदळाच्या खिरीने पोट तर भरतेच पण ती खाल्ल्यावर डायबेटीस सुद्धा होतो म्हणून त्या मुलाने खीर फेकून दिली तर लॉन्ग टर्म मध्ये त्याचाच फायदा आहे. आणि आम्हला तांदळाची सात्विक खीर वगैरे नको आहे, त्यात घातलेले तेवढेच तूप चोळून मस्त ग्रील केलेली चेवापी हवी हवी आहे. ताज्या मांसाची. म्हणजे प्रोटीन आणि b12 वगैरे होऊन हे मूल कोणतीतरी उदास सृजनहिन साधना केलेल्या मरतुकड्या ऍनिमीक साधकापरी दिसू नये.

टवणे सर, काय योगायोग आहे.

डॅन ब्राउनचं 'सिक्रेट ऑफ सिक्रेट्स' वाचतोय. त्याची सेन्ट्रल थीम 'नॉन-लोकल कॉन्शसनेस' हीच आहे. मस्ट रीड कॅटेगरीतलं पुस्तक आहे. किचकट विषय फिक्शन स्वरूपात वाचायला मजा येते.

अवांतरः तुमची अनुदिनी चाळली. the devil ही पोस्ट विशेष आवडली. आय होप, त्यात पडलेल्या प्रश्नांची उत्तर आतापर्यंत मिळाली असावीत Happy
इतरही स्फुट लेखन असलेल्या पोस्ट आवडल्या.

- (नॉन-लोकल कॉन्शस बीइंग) सोकाजी

टवणे सर,

डॉ. पेनरोज यांच्यानंतर या विषयावर नवीन कुणीही काहीही (नव, सृजनशील) बोलू शकत नाही. तो स्टॉप आहे आणि त्यानंतर काहीही नाही. कदाचित कुणाचा तेवढा अधिकारही नसावा. क्रेडेंशियल्सची बातच आली आहे तर.

बाकीच्या लोकांनी नुसती पॉडकास्टवर येऊन त्यांची किरकोळ पुस्तकं विकावीत. आणि इतरांनी ती आपल्याला समजली आहेत आणि त्यातून काहीतरी गुपित गवसलं आहे या अहंतेतून ते पॉडकास्ट सुचवत राहावेत.

सोकाजी,

एक गंमत आहे बघा.
तुम्ही प्रत्येक प्रतिसादाशेवटी तुमचे नाव एक अड्जेक्टिव लावून लिहिता.

इतर शक्यतो आवर्जून तसे कुणी करत नाही. कारण प्रतिसाद कोण देत आहे हे तर स्वयंस्पष्ट असते.

मात्र तुम्ही एक स्टेप पुढे जाता. स्वतःचा स्व आणि अहंता नाजूकपणे कुरवाळता ( नथिंग absolutely रॉंग इन इट, किंबहूना हेच तर आवडते) आणि तेवढावरच ना थांबता स्वतःमधला तो एक विवक्षित ट्रेट मुद्दामहून वेगळे काढू बघता. उदा. (नॉन लोकल बीइंग) सोकाजी.
ही प्रोसेस नीट पाहा. तुमच्या प्रत्येक प्रतिसादात ती आहे. ती नुसतीच आइडियोसिंक्रसी म्हणून सोडून देता येते, अगदी साधी एखादी ट्रेट.

मात्र प्रत्येक प्रतिसादानंतर तुम्ही तुमचा स्व असा खुट्टा रोवून बळकट करत नेता आहात. हा स्वतः बद्दलचा अनुराग तुमच्या संस्कारात नेहमी का जागृत राहत आहे? त्याबद्दल का आसक्ती आहे? हा प्रतिसाद देतानाचा प्रत्येक क्षण अनित्य आहे अनात्म आहे, तरी देखील तिथे तुमच्या स्वचा पुनरुच्चार तुम्हाला का करावासा वाटतो. तुमच्या प्रतिसादाला अनुषंगून तुमची इंडिविजुअल प्रॉपर्टी स्पष्टपणे कंसात असली तरी का सूचवावशीशी वाटते? ही लोभस अहंता एंब्रेस करा.

तुम्ही प्रत्येक प्रतिसादाशेवटी तुमचे नाव एक अड्जेक्टिव लावून लिहिता. >>
माझ्या आठवणीनुसार धोंडोपंत यांनी 'मिसळपाव'वर (आणि त्याआधी आमच्या याहू ग्रूपवर) त्याची सुरुवात केली. आणि तळटीपा लिहिण्याची पद्धत 'न'वी बाजू यांनी 'ऐसीअक्षरे' वर केली आहे.

इथे वाचनमात्र आहे. पण आता आलेले विषय गोंधळात टाकणारे आहेत.
विपश्यनेत येणारी चेतना ही अनुभवातून पाहायची प्रक्रिया आहे; ‘क्वान्टम’ किंवा ‘नॉन-लोकल’ चेतना या वेगळ्या तात्त्विक मांडण्या आहेत. दोन्ही एकाच चौकटीत घालणं आवश्यक नाही.

>> रॉय यांना दुसरं कुणी एव्हढं बोलले असते तर राशनपाणी घेऊन थयाथया नाचले असते, <<

माझा पंगा थेट बुद्धाशीच आहे. (ऑर बुडा फॉर that मॅटर)

- अडाणी गौतम उर्फ नबुद्ध उर्फ मी

>> डॉ. पेनरोज यांच्यानंतर या विषयावर नवीन कुणीही काहीही (नव, सृजनशील) बोलू शकत नाही. तो स्टॉप आहे आणि त्यानंतर काहीही नाही. कदाचित कुणाचा तेवढा अधिकारही नसावा. क्रेडेंशियल्सची बातच आली आहे तर.

रॉजर पेनरोज 'लोकल कॉन्शसनेस' चे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या 'Orch-OR (Orchestrated Objective Reduction)' थियरीचा लोकल कॉन्शसनेस' बेस आहे, 'ऑब्जेक्टीव्ह रिअ‍ॅलिटी'वर बेतलेला '. सो त्या थियरीवर कुणाचा तेवढा अधिकारही नसावा कारण ती त्यांची स्वतःची थियरी आहे.

Federico Faggin 'नॉन-लोकल कॉन्शसनेस' चे पुरस्कर्ते आहेत. हा दुसरा 'स्कूल ऑफ थॉट' आहे, 'सब्जेक्टीव्ह रिअ‍ॅलिटी'ला महत्व देणारा.

असो, आता हे खुपच अवांतर होते आहे ह्या धाग्याच्या मूळ विषयावर.

- (नॉन-लोकल कॉन्शस बीइन्ग) सोकाजी

डियर सोकाजी,

ही या धाग्यावर अजिबात अवांतर गोष्ट नाही कारण आपण मनामध्ये जी गोष्ट वास्तव म्हणून स्वीकारतो तीच जर नुसतीच सिमुलेशन असेल तर आयुष्यातील भोगायला लागलेले सर्व दुःख देखील अन रियल असायला पाहिजे. आशा दुःखाला दूर करण्यासाठी विपश्यना साधना देखील अजिबात गरजेची नसायला पाहिजे कारण हा नवीन पॅराडॉक्स तयार होतो. म्हणून आपल्याला दुःख हे जैविक जीवांना जैविक दृष्ट्या झालेले एक टँजीबल फिजिकल फेनोमेनॉन आहे हे मान्य करावे लागते तरच विपश्यना साधना शक्य आहे. जेव्हाही दुःखाची भावना एवढी रियल असेल तर तिला सहन करणे हे एक वेळ मी समजू शकतो परंतु ती अजिबात डाचूच नये अशा व्हेजिटेटीव्ह अवस्थेपर्यंत पोहोचण्याची धडपड का करावी हा एक प्रश्न आहे. का हा प्रश्न महत्त्वाचा आहे. का चे उत्तर मिळाल्याशिवाय पुढे जाता येत नाही.

दुःख केवळ सहनशील मर्यादेपर्यंतच रहावे ही अपेक्षा असेल तर विपश्यनेची त्यासाठी अजिबात गरज नाही कारण आपण विपश्यना ही केवळ सायकोथेरपी म्हणून बघत नाही आहोत. विपश्यना डी कोड करताना बुद्धाने मनाच्या प्रोसेस डी कोड करायचा प्रयत्न केला आहे. आणि त्या आकलनामुळे आपण कॉन्शसनेस किंवा कॉंटम कॉन्शसनेस किंवा भ्रम किंवा सिमुलेशन या अनेक पातळ्यांवर विचार करायला लागत असू तर विपशनेचे हेतू अतिशय ब्रॉड असायला पाहिजेत. गोयंका गुरुजींच्या विपश्यनेमध्ये मूळ विपशनेला धरून असण्याचे जे दावे आहेत ते दावेच आहेत. आणि मला ती अत्यंत लिमिटेड गोष्ट वाटते. मुळात अनुभवानी आपण ते पाहायला पाहिजे अनुभवानी आपण ते पाहायला पाहिजे असा जो धोशा लावला आहे त्यामधला अनुभव हा इतका संकुचित कन्फाईंड स्पेस मध्ये घेण्याचा असेल असे मला अजिबात वाटत नाही. म्हणून बुद्ध देखील संघ स्थापन करण्यापर्यंत आणि नंतर सगळीकडे ही एक व्यवस्था नेण्यासाठी बराच विचार आणि धडपड करत होता असे दिसते. त्याला एकाच छोट्याशा कृतिपुरते सीमित करणे मला तसे जरासे पटत नाही

रॅाय,

>> जेव्हाही दुःखाची भावना एवढी रियल असेल तर तिला सहन करणे हे एक वेळ मी समजू शकतो परंतु ती अजिबात डाचूच नये अशा व्हेजिटेटीव्ह अवस्थेपर्यंत पोहोचण्याची धडपड का करावी हा एक प्रश्न आहे. का हा प्रश्न महत्त्वाचा आहे. का चे उत्तर मिळाल्याशिवाय पुढे जाता येत नाही.

आता तुमचा नेमका मुद्दा कळला, ह्या प्रश्नावरून. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रतिसाद फक्त पोच. हा विकांत लॅान्ग विकेंड आहे. ह्या प्रश्नाबद्दल मला काय वाटतं ते डिटेलमधे लिहीतो.

स्वगतः सोक्या, आता मस्त चर्चा होईल असं वाटतंय!!

- (अभ्यासू) सोकाजी

>> ती (दुखा:ची भावना) अजिबात डाचूच नये अशा व्हेजिटेटीव्ह अवस्थेपर्यंत पोहोचण्याची धडपड का करावी हा एक प्रश्न आहे.
दु:ख होते तेंव्हा आपण तिथे न थांबता जवळजवळ प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे प्रतिक्रीया देतो, जी सर्वसाधारण सवय आहे. बुध्दाने ताबडतोब प्रतिक्रीया न देता दु:ख आपल्या शरिरात कसे प्रतीत होत आहे हे पहा असे सांगितले असावे. विपश्यना शिबीरात आवर्जून 'व्हेजिटेटीव्ह' अवस्थेला पोहोचणे असा विपश्यनेचा अर्थ नाही असे सांगितल्याचे आठवते.

बाकी चर्चा वाचत आहे ती रोचक होत आहे. सोकाजी यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

क्वांटम फिजिक्स, लोकल - नॉन-लोकल वरून चर्चा मानसिक/मनोकायिक अनुभवांकडे, परिणामांकडे वळत आहे हे चांगले आहे आणि तशीच राहु द्यावी.

>> दुःख हे जैविक जीवांना जैविक दृष्ट्या झालेले एक टँजीबल फिजिकल फेनोमेनॉन आहे हे मान्य करावे लागते

नक्कीच!

आपल्या शरीरातील पाच इंद्रियांद्वारे आपण बाह्य जगात घडणाऱ्या घटना अनुभवतो. भौतिक जगात घडणाऱ्या घटना त्या-त्या इंद्रियांसाठी स्टीम्युली किंवा उद्दीपन असतात. उदाहरणार्थ आपली आवडती भिन्नलिंगी व्यक्ती समोर येणे ती समोर येताच त्या व्यक्तीच्या शरीराचा सुगंध येणे आणि त्या व्यक्तीचं खळखळून हसणं ऐकू येणे ह्या सर्व, कान, नाक आणि डोळे ह्या इंद्रियांसाठी स्टीम्युली किंवा उद्दीपन असतात. हे सर्व शारीरिक पातळीवर होत असतं, अत्यंत सूक्ष्म बायोकेमिकल लेव्हलवर. आपलं मन ह्याच स्टीम्युलींनी उत्तेजित होऊन त्या स्टीम्युलींना प्रतिक्रिया देतं.

पाच इंद्रियांद्वारे बाह्य जगातील स्टीमुलींनी मन उत्तेजित होऊन त्या स्टीम्युलींना प्रतिक्रिया देणे ही जैविक प्रोसेस ऑटो पायलट मोडवर, आपल्या नकळत, चालू असते, सतत, अविरत! ही ऑटो-पायलट मोडवर चालू असलेली जैविक प्रोसेस १. कॉग्निशन (जाणवणे), २. रेकॉग्निशन (ओळखणे) आणि ३. रिऍक्शन (प्रतिक्रिया) या तीन स्टेप्स मध्ये चालू असते.

ह्या बाह्य जगातील स्टीम्युली जेव्हा इंद्रियांना जाणवतात (Cognise) त्यावेळी शरीरावर एक संवेदना तयार होते. अचेतन मन ह्या संवेदना प्रोसेस करतं आणि भूतकाळात ह्या संवेदनांना कसं डील केलं होतं हे स्मरणशक्तीतून शोधून काढतं आणि त्या संवेदनेला 'सुखद' किंवा 'दुःखद' असे लेबल केलं जातं (Recognition). त्यानुसार ती संवेदना सुखद आहे की दुःखद आहे यानुसार रिअँक्शन दिली जाते. ही रिऍक्शन ही भूतकाळातूनच अचेतन मन शोधून काढत आणि त्याप्रमाणे तीच रिऍक्शन (Reaction) वर्तमानात दिली जाते.

मन, ही संवेदना नश्वर आहे हे न समजता (Ignorance), ती सुखद असेल तर त्या सुखद अनुभूतीची लालसा (cravings) आणि दुःखद असेल तर तर त्या दुःखद अनुभूतीची घृणा किंवा तिरस्कार (aversion) करतं. जितकी या संवेदनांची तीव्रता जास्त तितकी लालसा किंवा घृणा जास्त असते. या शरीरावर तयार झालेल्या संवेदनेमुळे वेगवेगळ्या विचारांचा उगम होतो मनात जितके जास्त विचार तितकी संवेदना जास्त तीव्र होत जाते आणि एक दुष्टचक्र चालू होतं आणि अत्यंत वेगाने ही प्रक्रिया चालू असते.ही झाली जैविक प्रोसेस किंवा फिजिकल फ़ेनोमिना. पण यात मग नेमकं दुःख आलं कुठे? किंवा दुःख म्हणजे नेमकं काय काय?

तयार झालेली संवेदना ही नश्वर असते त्यामुळे त्या संवेदनेमुळे झालेली सुखद अनुभूतीची लालसा किंवा दुःखद अनुभूतीची घृणा ही सुद्धा नश्वरच असणार आहे. पण आपले मन हे न समजून त्या संवेदनेशी अटॅच होतं म्हणजे त्या संवेदनेची आसक्ती निर्माण करतं. ही आसक्ती दुःखाला जन्म देते. म्हणजे जे व्हावे असे असे वाटते ते होत नाही (सुखद अनुभूती कायम राहावी) आणि जे होते आहे ते नको व्हावे असे वाटते (दुःखद अनुभूती निघून जावी) तेव्हा जी व्याकुळता येते ते दु:ख.

ही मूलभूत सूक्ष्म बायोकेमिकल प्रक्रिया भौतिक जगात राग, लोभ, मत्सर, भीती, स्ट्रेस, हेवा इत्यादी वेगवेगळ्या भावभावनांच्या (suffering = दु:ख) स्वरूपात मॅनिफेस्ट होते. बुद्धाने हीच मानसिक प्रोसेस डीकोड केली आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितला जो आपोआप अतिशय ब्रॉड होऊन जातो. कारण त्यामार्गाने ते दु:ख कसे उत्पन्न होते आणि त्याचा निरोध कसा करायचा त्याचा अनुभव येतो, शारीरिक पातळीवर, अतिशय सूक्ष्मात बायोकेमिकल लेवलवर. त्या सूक्ष्म लेवलवर गेल्यावर कॉन्शसनेस किंवा कॉंटम कॉन्शसनेस किंवा भ्रम किंवा सिमुलेशन या अनेक पातळ्यांवर विचार करायला न लागता त्यांची ते प्रत्यक्षात अनुभवू शकतो. 10 दिवसांच्या शिबिरात जे भंग अवस्था आल्यावर भंगज्ञान येते म्हटले आहे त्यातच ही अनुभूती आहे.

- (चर्चोत्सुक) सोकाजी

स्पेस सायन्स राहीलं. झालंच तर थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी सुद्धा या चर्चेत आली पाहीजे. जेव्हढं म्हणून ज्ञान ग्रहण केले असेल् ते या चर्चेत आलं पाहीजे. तोपर्यंत थांबू नये.

Pages