Submitted by मंजूडी on 28 January, 2014 - 02:02
झी मराठी वाहिनीवर सा रे ग म पचे नवे पर्व सुरू झाले आहे - सूर नव्या युगाचा!
यावेळी फक्त १४ स्पर्धक निवडून ही स्पर्धा चालू केलेली आहे -
महेश कंटे, श्रीनिधी घटाटे, कौशिक देशपांडे, जयंत पानसरे, भाग्यश्री टिकले, जुईली जोगळेकर, मनोज क्षिरसागर, रसिका गानू, संज्योती जगदाळे, प्रल्हाद जाधव, शंकर गिरी, मृण्मयी पाठक, रेश्मा कुलकर्णी, गणेश मेस्त्री
परीक्षक आहेत अवधूत गुप्ते आणि तौफिक कुरेशी, तर सूत्रसंचालन करतोय अभिजीत खांडकेकर.
दर सोमवार आणि मंगळवार रात्री साडेनऊ ते साडेदहा झी मराठी वाहिनीवर - "सा रे ग म प - सूर नव्या युगाचा"
पुनःप्रक्षेपण - मंगळवार आणि बुधवार दुपारी चार वाजता आणि शनिवारी रात्री साडेनऊ वाजता.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शंकर गिरीचा गोंधळ मस्त झाला
शंकर गिरीचा गोंधळ मस्त झाला आत्ता !
आणि संज्योतीची शुक्राची चांदणी तर काटाकीर्र
पुढे सिलेक्ट झाली की नाही ते
पुढे सिलेक्ट झाली की नाही ते कळालं नाही. >> नाही झाली ती सिलेक्ट.
अरे अरे.... असं काय... फक्त
अरे अरे.... असं काय... फक्त मराठी गाणीच गायली तर भविष्यातल्या लता-आशा, सुरेश वाडकर इत्यादी कसे तयार होणार मग?
इतके संकुचित राहू नका.
>> मग मायबोलीपण संकुचितच म्हणावी लागेल.
पहायची ईच्छा तर आहे, पण घरी
पहायची ईच्छा तर आहे, पण घरी पोचेस्तो अन आवरेपर्यंत २०३० होतात
शनिवारी पहायला हवं...
आजचा एपिसोड उत्तम झाला..
आजचा एपिसोड उत्तम झाला..
ऑनलाइन असणारे का पाहायला??
ऑनलाइन असणारे का पाहायला??
पहिली एक्-दोन गाणी ऐकून कुणीच
पहिली एक्-दोन गाणी ऐकून कुणीच आवडलं नाही.
अभंग वाला तर चक्क कणसुर
अभंग वाला तर चक्क कणसुर गायला.
एका gap नंतर सा रे ग म प
एका gap नंतर सा रे ग म प बघायला मजा येत्येय! Little champs 1 ची जादू ओसरायला (मला) बराच वेळ लागला!
ह्या पर्वात बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत! मी पल्लवी नसतानाचं एकही पर्व पाहिलं नाहीये त्यामुळे तिला थोडं मिस करत्येय! अभिजीत मला फारसा आवडत नाही (फार हातवारे करतो तो!) पण त्याचं मराठी पल्लवीपेक्षा बरंच चांगलं आहे!
श्रुती भावेची वाद्यवृंदातली एन्ट्री आवडली! तिने मध्यतंरी कुठल्याश्या award function मध्ये perform केलं होतं तेव्हाच लक्षात राहिली होती!
तौफिक कुरेशी मस्तच आहेत! अवधूत मला आवडतोच! सो ही परीक्षक जोडी आवडली मला! पण पूर्वीप्रमाणे guest judge बोलावले पाहिजेत नाहीतर फार बोअर होतं!
पहिल्याच एपिसोडला हिंदी गाणी गाणं मलाही फारसं आवडलं नाही! का? मराठी कार्यक्रम आहे ना?
सर्व स्पर्धक चांगले आहेत. बरेच सारे आधी कुठेतरी झळकलेत हे मला माहिती नव्हतं! पण कौशिक देशपांडे last audition ला चांगलं न गाताही select झाला हे खटकलं! बाय द वे, गेल्या आठवड्यात एकूण १२ स्पर्धक निवडले होते ना? मग आता एकदम १४ कसे झाले? what did I miss?
एक लक्षात येतंय का की हे फार छोटं पर्व असणारे! पूर्वी quarters, semis होऊन मग अंतिम १०/१२ स्पर्धकांमध्ये फायनल रंगत होती! प्रेक्षकांचा attention span कमी झालाय की महाराष्ट्रातलं talent?!
जुन्या गाण्यांना नवीन arrangement हा प्रकार देखील आवडला! पण करायचं तर सर्व गाण्यांना करायला हवं होतं!
कुणाला शंकर गिरी मध्ये गिरीश कुलकर्णी (देऊळ) चा भास होतो का? Or it's just me?
निलेश परब आहे ना? त्याचं
निलेश परब आहे ना? त्याचं बडवणं, ऐकायला मजा येते...
वेका - आपली मराठीवरुन लिंक
वेका - आपली मराठीवरुन लिंक घ्या, आहे ऑनलाईन. २-४ उड्या मारुन लिंक मिळेल.
संजोती फारच मस्त गायली
संजोती फारच मस्त गायली काल.
अवधूत लई भारी गाण्याला एक विशीष्ट प्रकारची दाद देतो. डोळे मिटून, तोंडाचा मोठ्ठा"आ" करून जखमी झाल्यावर होतो तसा चेहरा करून, हात समोर लांब करून वर नेऊन मानेला एक झटका देतो. पूर्वी तो खरंच एखादं गाणं असं हृदयात घुसण्याजोगं झालं की करायचा ती अॅक्शन. हल्ली फुटाफुटाला व कोणाकरताही करतो त्यामुळे महा-नाटकी वाटायला लागलाय.
जुईली फारच बेसूर गायली काल तरी एवढे कौतुक का केले? तिने रेखासारखा आवाज लावला होता व त्या गाण्याचा लहेजा उत्तम पकडला होता पण सूरात नव्हते गाणे. गायकीपेक्षा परफॉर्मन्स वर जास्त भर दिसतोय एकंदरीत. जरा भडक वाटते आहे हे शेड्युल.
सुमेधा यांना अनुमोदन. सुरात
सुमेधा यांना अनुमोदन. सुरात नव्हतीच ती.. तिला वन्स मोर??
अजुन एपिसोड बघितले नाहीत पण
अजुन एपिसोड बघितले नाहीत पण प्रोमोज आवडले मला ..
एखाद्या माणसाचे नाव, गाव आणि
एखाद्या माणसाचे नाव, गाव आणि त्याचे गाणे किती मिसमॅच असावे याचे बेश्ट उदाहरण काल पाहीले-
प्रल्हाद जाधव-कोल्हापूर-चुपले चुपके रात दिन!!!! मस्त गायला पोरगा!
जुईलीताईंना डोक्यावर घ्यायचे आधीच ठरलेले दिसते.
एकंदरीतच कारेक्रमाच एक थकेला मूड आहे, तीच तीच गाणी, त्याचत्या 'जागा' आणि अवधूतच्या त्याचत्या लीला!
अशा कार्यक्रमात गायल्या जाणार्या मराठी गाण्यांची संख्याच इतकी लिमिटेड आहे की कंटाळा येतोच.
अजून भावच खायचा तर दोघं
अजून भावच खायचा तर दोघं आमच्या डोंबिवलीतली आहेत. फिदीफिदी
>>>>>>>>>>>>>>>>>
चला लगे हाथ मी पण भाव खाऊन घेतो.......
पण यावेळी तौफिकला घेऊन
पण यावेळी तौफिकला घेऊन केलेल्या कंसेप्टने अजून पकड नाही घेतलेली हे खरय.....
आणि काल चक्क दुनियादारीच्या प्रमोशनसाठी वेळ घालवून दोन स्पर्धकांच्या गाण्यांची कडवीच नाही दाखवली.....
मनोज क्षीरसागर फारच विलंबित गायला "तुला पाहिले मी"..... जम्या नही.... कडवं नाही दाखवलं ते बरंच झालं.... :स्मितः
काही गाणी आवडली कालची तर काही
काही गाणी आवडली कालची तर काही फारच उगाच डोक्यावर घेतल्यासारखी वाटली.
हायला भुंग्या, खरच की काय ती तुझी मेव्हणी आहे? एक फु.स. तिने दिखावेपे जास्त भर न देता तो वेळ गळ्यावर खर्ची केला तर तिचं खरच भलं होईल (इथेच नव्हे एकंदरीतच)
@ कविन - निरोप पोचवतो गं....
@ कविन - निरोप पोचवतो गं....
अगं ती शास्त्रिय संगीतच शिकतेय....
कृपया दिखावे पे मत जाओ.... हे सगळं स्क्रीप्टप्रमाणे करावं लागतं...
तिचा भर गायकीवरच आहे जास्त..... !! तूर्तास इतकंच..... पुढे बघूया काय काय होतंय.
जुईलीचे शास्त्रीय गायन, सुगम
जुईलीचे शास्त्रीय गायन, सुगम व नाट्यसंगीत मी तिच्या लहानपणापासून ऐकते आहे. ती उत्तम गाते, पण अलीकडे ती शास्त्रीय पेक्षा स्टेज शोज जास्त करत असावी कारण ती काल जे काही गायली त्यात गाणे नसून परफॉर्मन्स होता व तो फार चीप होता. हे सगळे स्क्रीप्टनुसार असेल तर सारेगमपवाले खूपच खालच्या पातळीवर चालले आहेत एकंदरीत.
कालचा गोंधळ (म्हणजे पहिले
कालचा गोंधळ (म्हणजे पहिले गाणे) सगळ्यात आवडला. त्यावरची तौफिकमियाँची मल्लिनाथी पण अचूक होती. ह्या पर्वात अशी अचूक आणि कलाकाराच्या सादरीकरणातले सौंदर्य उलगडून दाखवणारी ती पहिलीच दाद होती.
सुमेधाव्ही..... पर्फेक्ट
सुमेधाव्ही..... पर्फेक्ट निरिक्षण..... आय टोटली अॅग्री....!!!
नाही झाली ती सिलेक्ट>> ओके
नाही झाली ती सिलेक्ट>> ओके पियू.
काल फक्त त्या जुईलीचं गाणं
काल फक्त त्या जुईलीचं गाणं नीट बसून ऐकलं. नाहीच आवडलं अजिबात आणि वर म्हणतायत त्याप्रमाणे ते इतकं डोक्यावर का घेतलं ते तर अजिबातच नाही कळलं.
मी जो एपिसोड बघितला त्यात
मी जो एपिसोड बघितला त्यात मराठीसोबतच चुपके चुपके रात दिन वगैरे हिंदी गाणीही होती. आणि ते तौफिक साहेबही हिंदीतच बोलत होते (आणि मधेच उपकार केल्यासारखं एखादं वाक्य मराठीत!).
यामुळे एपिसोड मनातून उतरला. हिंदी भाषेला आणि गाण्यांना विरोध नाही पण- एव्हरीथिंग हॅज अ प्लेस ॲन्ड टाईम.
तरी यावेळी स्पर्धक जास्तीकरुन मराठी वाटत आहेत (नावांवरुन तरी) हीच काय ती जमेची बाजू.
(सूत्रसंचालनात पल्लवी बेश्ट होती.)
बाकी हा हिंदीचा अतिरेक, संशयास्पद निकाल या सगळ्यामुळे झी मराठी सारेगमप एकंदरितच मनातून उतरलंय. (तरी चिवटपणे दरवेळी मी निदान सुरुवातीचे एक-दोन एपिसोड्स बघते.)
हे सगळे स्क्रीप्टनुसार असेल
हे सगळे स्क्रीप्टनुसार असेल तर सारेगमपवाले खूपच खालच्या पातळीवर चालले आहेत एकंदरीत.
>>>>>>>>>>>>>
एकदम जजमेंटल नको..... लेट्स वेट फॉर समटाईम....
आयत्यावेळी गाणी बदलणं......
आयत्यावेळी गाणी बदलणं...... कंफर्टेबल नसलेल्या पट्टीत गायला लावणं.... जो जॉनर नाही त्याचं गाणं आयत्यावेळी देणं असे प्रकार होतीलच आता अजून..... !!!
मी 'चुपके चुपके रात दिन'
मी 'चुपके चुपके रात दिन' पासून पाहिलं काल सारेगमप. 'चुपके चुपके रात दिन' आवडलं. सगळ्या स्पर्धकांना (एस्पेशली मुलींना) एवढा गॉडी मेकअप आणि पेहराव का देतात? काय भयानक रंगवलेल्या आणि नटवलेल्या दिसत होत्या त्या मुली!
रसिका गानू थोड्याश्याच मेकअप मध्ये अशी दिसते.
हल्ली फुटाफुटाला व कोणाकरताही
हल्ली फुटाफुटाला व कोणाकरताही करतो त्यामुळे महा-नाटकी वाटायला लागलाय. >>> +१
जुईलीताईंना डोक्यावर घ्यायचे आधीच ठरलेले दिसते.>>> +१००
ती काल जे काही गायली त्यात गाणे नसून परफॉर्मन्स होता व तो फार चीप होता.>> +१
लिल चॅम्प पर्वाच्या वेळीच सारेगमपचे राजकारण लक्षात आले होते. त्यामुळे त्याबाबतीत अपेक्षा नाहीतच. पण तरीही कार्यक्रमाचे सादरीकरण बाकी कुठल्याही वाहिनीवरच्या अश्या प्रकारच्या कार्यक्रमापेक्षा अव्वल असते त्यामुळे कार्यक्रम बघावासा वाटतो.
अरे अरे.... असं काय... फक्त
अरे अरे.... असं काय... फक्त मराठी गाणीच गायली तर भविष्यातल्या लता-आशा, सुरेश वाडकर इत्यादी कसे तयार होणार मग?
इतके संकुचित राहू नका.>>
नाही संकुचित नाही हो..
पण किमान अपेक्षा आहे ती.
हिंदीला विरोध म्हणून नव्हे, तर मराठी कार्यक्रम आहे म्हणून मराठी गाणीच जास्त असली पाहिजेत.
हवा तर हिंदी गाण्यांचा एखादा राऊंड असावा असेही लिहिले होतेच.
अर्थात, हे वै.मत. आणि आपल्या बोलण्याने/ वाटण्याने काही होत नाहीच... त्यामुळे अति-आग्रहही नाहीच...
अवांतर- बाकी, मराठी कार्यक्रमात मराठी गाणीच हवीत ही अपेक्षा संकुचित कशी ठरते हे मात्र समजले नाही... असो. आणि हिंदी सारेगामापा मध्ये मराठी किंवा इतर भाषिक गाणी होतात की नाही ह्याबद्दल अज्ञ असल्याने काही लिहीत नाही.
या निमित्ताने गिरीश कुबेरांचा २०१३ च्या दसर्याच्या लोकसत्तातला अग्रलेख आठवला... "पराजयदशमी"......
Pages