Submitted by मंजूडी on 28 January, 2014 - 02:02
झी मराठी वाहिनीवर सा रे ग म पचे नवे पर्व सुरू झाले आहे - सूर नव्या युगाचा!
यावेळी फक्त १४ स्पर्धक निवडून ही स्पर्धा चालू केलेली आहे -
महेश कंटे, श्रीनिधी घटाटे, कौशिक देशपांडे, जयंत पानसरे, भाग्यश्री टिकले, जुईली जोगळेकर, मनोज क्षिरसागर, रसिका गानू, संज्योती जगदाळे, प्रल्हाद जाधव, शंकर गिरी, मृण्मयी पाठक, रेश्मा कुलकर्णी, गणेश मेस्त्री
परीक्षक आहेत अवधूत गुप्ते आणि तौफिक कुरेशी, तर सूत्रसंचालन करतोय अभिजीत खांडकेकर.
दर सोमवार आणि मंगळवार रात्री साडेनऊ ते साडेदहा झी मराठी वाहिनीवर - "सा रे ग म प - सूर नव्या युगाचा"
पुनःप्रक्षेपण - मंगळवार आणि बुधवार दुपारी चार वाजता आणि शनिवारी रात्री साडेनऊ वाजता.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला प्रोमोज मधलं रिमिक्स
मला प्रोमोज मधलं रिमिक्स नाट्यसंगीत अजिबात आवडलं नव्हतं
या पर्वात अशीच थीम आहे ना/का सगळी?
अभिजित खांडकेकर एकदम डिसेन्ट अँकरिंग करतो, बोलतोही व्यवस्थित. आणि त्याचं कपड्यांचं मॅचिंगही बरं असतं
त्यामुळे पल्लवी मिस करत नाही अजिबातच 
अभिजीत/ अवधूतच्या
अभिजीत/ अवधूतच्या कपड्यांबद्दल बोलणं सध्या राखीव
खांडकेकरची करीअरची सुरुवात
खांडकेकरची करीअरची सुरुवात आरजे म्हणून झाली आहे.. सूत्रसंचानलातली सहजता सहाजिकच आहे.. पुण्यात रेडिओ सिटीवर मस्त बोलायचा तो..
अभिजित खांडकेकर हा मराठीतला
अभिजित खांडकेकर हा मराठीतला सध्याचा सर्वात चांगला सूत्रधार आहे.
हे पर्व छान होइल असं वाटतंय, गाणारे सर्व चांगले आहेत. बघूया.
अभिजित अजिबात आचरटपणा करत
अभिजित अजिबात आचरटपणा करत नाही!

प्रिया बापट काय वाट्टेल ते बोलायची स्टेजवर.. भलेही ते सगळं तिला कोणी लिहून दिलं असेल, पण तरी आचरटपणा होता बरेचदा!
ह्यात महागुरु नाही असं
ह्यात महागुरु नाही असं दिस्तयं...! मग तर नक्कीच बघण्यात येईल.
म्हणजे आपल्या कोकणातली तर
म्हणजे आपल्या कोकणातली तर >>>>>>>>>>.मी पण कोकणातलीच.

हो, तुमच्या लांज्याच्या अगदी जवळच आहे देवरुख>>>>>>>...लांज्याच कोण आहे?
हिम्सकूल >>> तुमच्या यादीत मी
हिम्सकूल >>>
तुमच्या यादीत मी थोडीशी भर टाकते आहे.
१४ स्पर्धकांपैकी ८ स्पर्धक याअगोदर कुठल्यातरी वाहिनीवर वारी करून आलेले आहेत.
केवळ ६ स्पर्धकच नविन आहेत.
स्पर्धक - वाहिनी - मालिका
महेश कंटे - मी मराठी - आवाज महाराष्ट्राचा
श्रीनिधी घटाटे - झी मराठी - सारेगमप ज्युनियर
कौशिक देशपांडे - झी हिंदी - सारेगमप आणि सोनी - इंडियन आयडल
जयंत पानसरे - मी मराठी - आवाज महाराष्ट्राचा
भाग्यश्री टिकले - झी मराठी - सारेगमप ज्युनियर
जुईली जोगळेकर - झी मराठी - सारेगमप ज्युनियर
मनोज क्षिरसागर - कुठेही नाही
रसिका गानू - इ टीव्ही मराठी - गौरव महाराष्ट्राचा
संज्योती जगदाळे - झी मराठी - सारेगमप ज्युनियर
प्रल्हाद जाधव - कुठेही नाही
शंकर गिरी - कुठेही नाही
मृण्मयी पाठक - कुठेही नाही
रेश्मा कुलकर्णी - कुठेही नाही
गणेश मेस्त्री - कुठेही नाही
बरोबर सारिका.चितळे.. जयंत
बरोबर सारिका.चितळे.. जयंत पानसरे आणि महेश कंटे एकाच वेळेस होते...
झी सारेगमप, वेगवेगळया
झी सारेगमप, वेगवेगळया प्रांतांची स्पर्धा झाली होती तेव्हा महाराष्ट्र जिंकला होता, त्यात कौशिक देशपांडे, वैशाली माडे आणि रोहित(लिटील चाम्पस) हि टीम जिंकली होती.
डोंबिवलीची रेश्मा कुलकर्णी आहे आणि दुसरे कोण आहे?
देवरुख म्हणजे माझे माहेरच्या
देवरुख म्हणजे माझे माहेरच्या गावाच्या जवळच आहे.
आता सूर नव्या युगाचा- आमच्या
आता सूर नव्या युगाचा- आमच्या कोकणातला/ देवरुखचा/ डोंबिवलीचा/ देवरुखजवळचा/ रत्नागिरीचा असे सग्गळे सब-धागे सुरू करा. किंवा हेडरमध्ये नावं आहेत ना, त्यांच्याशेजारी त्या स्पर्धकांची गावंही लिहा. प्रतिसाद देतानाही खाली आपले गाव लिहा. होऊद्या खर्च!

पुण्याचं कोण आहे?
पुण्याचं कोण आहे?
पुण्याचं कोण आहे? फिदीफिदी>>
पुण्याचं कोण आहे? फिदीफिदी>> कोण जाणे! असल्या स्पर्धांमध्ये पुणेकर भाग घेत नसतात. त्यांचं टॅलेन्ट वादातीत आहे. स्पर्धांमध्ये सिद्ध करायची गरज नाही

-पुण्याची पौर्णिमा
पौ..
पौ..
काल कौशिक देशपांडेचं गाणं
काल कौशिक देशपांडेचं गाणं ऐकलंत का? >>> ऐकलं, नाही आवडलं. रफीच्या पद्ध्तीत (आवाजात नव्हे) गावे की किशोरच्या अशा गोंधळात पडल्यासारखा वाटला. आणि त्यामुळे त्याचा मूळचा आवाज पण हरवून बसल्यासारखा वाटला (मी त्याला कधी ऐकले नाहीये. पण ऑडीशनमधला त्याचा आवाज आवडला होता मला. त्या मानाने कालचा नाही आवडला).
सुलोचनाबाई, आशा यांच्यासारखा ठसका शोभा गुर्टूंच्या लावणीत नाही. पण त्यात एक वेगळीच नजाकत आहे. ती कालच्या सादरीकरणात अजीबात नव्हती.
पहिला अभंग तर साफच गंडलेला वाटला (काही काही जागा अप्रतिम घेऊनही). भजनी ठेका ही काय चिज असते ते दादने गानभूलीत लिहीलय. तोच वगळला तर अभंग रंगणार कसा?
गाण्यांचे सादरीकरण चांगले असेलही पण ते कानांच्या पचनी पडायला वेळ लागेल. स्पर्धेत एकदाच ऐकून नाही आवडणार. निदान ३-४ वेळा तरी ऐकावे लागेल.
माधवशी सहमत आहे. >>मला हा
माधवशी सहमत आहे.
>>मला हा कन्सेप्ट कितपत झेपणार आहे ते कळत नाहीये. जुन्या १०० नंबरी गाणी मनात इतकी खोलवर रुजली >>आहेत की त्यांच्यावर चढवलेला नविन साज पहिल्या ऐकण्यातच आवडणे कठीण जाणार आहे.
एकदाच ऐकून आवडेलच असं नाही.
अभंगच मला त्यातल्या त्यात बरा वाटला कालच्या गाण्यांत.
गानूच्या गाण्यातली अरेंजमेंट चांगली होती. बासरी, व्हायोलीन जबरदस्त.
त्यामानाने गाणं सुरेल नाही वाटलं. नुस्त्या चाली गाऊन उपयोग नाही... पोटातून यायला हवं ना गाणं....
चांगलं प्रेझेंट करण्याचा आटापिटा करण्यात सुरांशी फारकत घेतली गेली तर शून्य किंमत....
आणि पियूच्या अपेक्षांशीही सहमत..
मराठी स्पर्धा आहे तर मुळात मराठी गाणी हवीत.
एखादा राऊंड ठेवा हवा तर हिंदी गाण्यांसाठी...
आणि तौफिक कुरेशी उत्तम मराठी बोलतात. त्यामुळे, ते आहेत म्हणून हिंदी गाणी वगैरे सबबी तर मान्यच करण्याजोग्या नाहीत...
असो... आत्ता कुठे सुरुवात आहे.... आणि असेही आपल्या बोलण्याचा फार उपयोग होतोच असेही नाही.
तो अभंग गायलेला कोण... तो विजेता होईल असे भाकीत करून ठेवतो आत्ताच... चुकले तर ज्योतिषाचा अभ्यास करेन
अंजु, डोंबिवलीचा दुसरा, कौशिक
अंजु, डोंबिवलीचा दुसरा, कौशिक देशपांडे!!!!!!
अभिजीत ने स्पर्धकांना
अभिजीत ने स्पर्धकांना बोलावताना, यमक साधायचा अट्टाहास टाळला तर फार बरं होईल..ओढून ताणून कशाला विनोद?? ईतर अनेक छान कल्पना यंदा दिसून येत आहेत. पण गाणी मराठीच असली पाहीजेत.
अरे अरे.... असं काय... फक्त
अरे अरे.... असं काय... फक्त मराठी गाणीच गायली तर भविष्यातल्या लता-आशा, सुरेश वाडकर इत्यादी कसे तयार होणार मग?
इतके संकुचित राहू नका.
मराठी चॅनलवर मराठी गाणी असावी
मराठी चॅनलवर मराठी गाणी असावी ही अपेक्षा रास्त आहे. मराठीतून बेला शेंडे आणि वैशाली माडे या आल्याच ना पुढे..
अरे पण म्हणतील की पुढे...
अरे पण म्हणतील की पुढे... आत्ताशी कुठे एकच दिवस तर झालाय...
बेला आणि वैशालीने त्यांच्या पर्वात इतर भाषांतली गाणी म्हटली नव्हती की काय?
म्हणतील की, कुठे नाही
म्हणतील की, कुठे नाही म्हणतोय..फक्त पहिल्या दिवशी खटकलेल्य गोष्टी नमूद केल्या..
बघुया काही माणिक निघतात का
बघुया काही माणिक निघतात का .नवे कोरे सहातून .जुन्यांनी गाणे सोडलं तर बरं .
मागील पर्वातील
माटेगावकर हुशार ठरली .नवीन करिअर अजमावली .भिडे फिजिक्स शिकणार आहे .सुखठणकर पण खूप शिकणार आहे .
कार्यक्रमातील स्तुतीला किती महत्व द्यायचे हे ओळखणारे पुढे जातात .
हल्ली अवधुत चाबूक बोलत नाही .उगाच चाबकाचा शेंडा हलवल्यागत चान चान बोलतो .
ज्यांनी झीच्या हिंदी सारेगमपतील अझमत ,सलमान ,नितीन आणि शेवटचे पाचांची गाणी ऐकली असतील ते लगेच ओळखतील की महाराष्ट्रातील कसलेले पैलवान या सर्कशीत उतरत नाहीत .
मी हा कार्यक्रम पाहणार नाही
मी हा कार्यक्रम पाहणार नाही आहे. (माझ्या आवडत्या गाण्यांची मनावर बसलेली छाप पुसणे, डायल्युट करणे नामंजूर). पण इथे येऊन वृत्तान्त वाचेन आणि प्रतिसादही देईन. चालेल का?
मराठी गाणी गायला सगळ्यात कठीण असतात. ता गायल्यावर हिंदी गाणे म्हणजे ......
असे आदरणीय शंकर महादेवन् यांनी (या चिमण्यांनो परत फिरा रे.....या गाण्यानंतर?) सारेगमपमध्येच कोणे एके काळी म्हटल्याचे आठवते.
वृत्तांत?? अहो भरत मयेकर,
वृत्तांत??

अहो भरत मयेकर, इथे येऊन तुम्ही चर्चावाचन आणि चर्चेवर मतप्रदर्शन करा.
चैतन्य... तो अभंग गाणारा महेश
चैतन्य... तो अभंग गाणारा महेश कंटे.. त्यानी आधीची मी मराठीवरची स्पर्धा जिंकली होती.. तो इथे पण जिंकू शकेल.. पण स्पर्धा तगडी असेल...
पहिल्या भागात तरी सगळी गाणी मराठी अपेक्षित होती..
रोचीन धन्यवाद. आधीच्या
रोचीन धन्यवाद.
आधीच्या सारेगमपमध्ये मराठी गाणी जास्त असायची आणि हिंदी गाण्याचे काही स्पेशल एपिसोड असायचे, तो format चांगला होता.
ऑडीशनमध्ये एक मुलगी सिलेक्ट
ऑडीशनमध्ये एक मुलगी सिलेक्ट झाली होती. अगदी साधीशी पण गळा गोड होता. (मला वाटतं ती भाजी विकत असताना दाखवलेली.) पुढे सिलेक्ट झाली की नाही ते कळालं नाही. आता दिसत नाहीये म्हणजे नसावी. कुणाला माहिती आहे का?
पहिल्या फेरीत स्पर्धकांची आधी
पहिल्या फेरीत स्पर्धकांची आधी तयार असलेली, त्यांच्या आवडीची गाणी होणार म्हणून हिन्दीचं प्रमाण जास्त वाटतय...
पुढच्या फेरीपासून तसं नसावं...
१४ पैकी फक्त ६ जण अगदी नवखे बाकी सगळयांची आधीपासून तयारी आहे म्हणजे पुढच्या फेरीपासून काही दर्जेदार ऐकायला मिळावं ही अपेक्षा...
सूत्र संचालक पण तयारीचा आहे.
अवधूत आधीपासून ओळखीचा आहेच पण तौफिकभाई अवधूत बरोबर दंगा करणार की कसे ते कळेलच...
Pages