प्रजासत्ताक दिन परेड - मरीन ड्राईव्ह

Submitted by सावली on 26 January, 2014 - 12:07

प्रजासत्ताक दिन परेड - मरीन ड्राईव्ह

अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध कार्यक्रम. प्रचंड गर्दी असूनही व्यवस्थित सुरक्षा चेक करूनच प्रवेश मिळाला.
खुप क्रिएटीव फोटो नाहीत, जिथे जागा मिळाली तिथुन शक्य होईल तसे काढलेले आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईत मरीन ड्राइव्हवर प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड! काय मस्त वाटलं असेल तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहायला. छान आलेत फोटो. इथे फोटो दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सावली Happy

क्या बात है!!!!
मस्तच प्रचि, सावली Happy
मी, गिरीविहार आणि इंद्रा रस्त्याच्या त्या बाजुला होतो. सर्व चित्ररथ मस्त होते. आमची vintage car rally
मात्र हुकली. Sad

जिथे जागा मिळाली तिथुन शक्य होईल तसे काढलेले आहेत. >>>>>अगदी अगदी. मी सुद्धा Happy

मस्त फोटो सावली!

आम्ही रोज तालिम बघत होतो. एकदा तर लहान मुलांसारभे भान हरपून बघत बसलो आणि ऑफिसात पोचायला उशीर झाला होता. एकूणच हे वातावरण, बँड, शिस्तबद्ध हालचाली सर्व भारावून टाकणारं असतं.
२६ जानेवारीच्या दिवशी रेल्वेचा मेगाब्लॉक होता आणि गाडी घेऊन जायचं तर पार्किगचा मोठाच प्रश्न होता, त्यामुळे आम्ही यायचं रद्द केलं. Sad

मस्त Happy

मस्त फोटो सावली.
ते परेड प्रकरण एकदम फंडु, बँडच्या तालावर पाय हलले नाही असे कधी झाले नाहि आजतागायत.

मंजू, २६ जानेवारीला मेगाब्लॉक नव्हता Happy m-indicator मुळे कळलं. आणि काल मी ठाणा, वांद्रा, किंग्ज सर्कल, ठाणा प्रवास ट्रेनने केला. तुला आधी माहित असतं तर जाऊ शकली असतीस Happy

saheee. mast. mala mahitach navhata (paper wachat nahi mi) pudhachya varshee nakkee.

gypsy photo dakav lavkar.

केश्वे, मला शनिवारीच m-indicator वर मेसेज आला होता की दादर (मध्य रेल्वे) ते भायखळा दरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. परेडसाठी ते रद्द केले असेल तर तसा मेसेज मला आला नाही.

झकास! Happy

मला त्या m-indicator ने शनिवारी आणि रविवारी असे २ मेसेजेस २६ जानेवारीमुळे रेल्वे मेगाब्लॉक नाही असेच पाठवले Uhoh काल गाड्या एकदम रिकाम्या होत्या सकाळ, दुपार, संध्याकाळ.

व्वा! मस्त फ़ोटो. Happy

मी, गिरीविहार आणि इंद्रा रस्त्याच्या त्या बाजुला होतो. सर्व चित्ररथ मस्त होते. >>>>मी शोधत होते तुझे फ़ोटो आले असतील म्हणून. हल्ली तू फ़ोटोंना फ़ार उशीर करतोस हां! Wink

Pages