२००५ आधीच्या चलनी नोटा बँकेतुन बदलुन घ्यावे..!!

Submitted by उदयन.. on 22 January, 2014 - 09:16

रिझर्व बँकेने प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की ३१ मार्च २०१४ पुर्वी २००५ पुर्वीच्या सर्व चलनी नोटा बँकेतुन बदलुन घ्याव्यात... ५ , १० , २०, ५०, १०० , ५०० , १००० या सर्व किंमतींच्या नोटा बँकेतुन बदलुन मिळतील

या बाबत अधिक माहीती साठी

http://rbi.org.in/scripts/BS_PressReleaseDisplay.aspx?prid=30458

Banknotes issued prior to 2005 to be withdrawn: RBI Advisory
The Reserve Bank of India has today advised that after March 31, 2014, it will
completely withdraw from circulation all banknotes issued prior to 2005. From April 1,
2014, the public will be required to approach banks for exchanging these notes.
Banks will provide exchange facility for these notes until further communication. The
Reserve Bank further stated that public can easily identify the notes to be withdrawn
as the notes issued before 2005 do not have on them the year of printing on the
reverse side. (Please see illustration below)
The Reserve Bank has also clarified that the notes issued before 2005 will
continue to be legal tender. This would mean that banks are required to exchange
the notes for their customers as well as for non-customers. From July 01, 2014,
however, to exchange more than 10 pieces of `500 and `1000 notes, non-customers
will have to furnish proof of identity and residence to the bank branch in which she/he
wants to exchange the notes.
The Reserve Bank has appealed to the public not to panic. They are
requested to actively co-operate in the withdrawal process.

जुलै १ २०१४ नंतर जर तुम्ही २००५ आधीची नोट बदलायला गेलात तर आपल्याला आपले आयडेंटीफिकेशन द्यावे लागेल....

जर नोटे वर मागिल बाजुस साल लिहिलेले नसेल तर ती नोट २००५ आधीची समजण्यात यावी......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त मोडस ऑपरंडी गंडलेली आहे.. उद्यापासून ५०० आणी १००० च्या नोटा बंद केल्या जातील असे जेव्हा करतील तेव्हा काळा पैसा दडवून ठेवलेल्यांचे धाबे दणाणतील...

>> हिम्सकुलला अनुमोदन. ह्या स्वरुपाची एक चर्चा ऐकलेली/पटलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतात जास्तीत जास्त १०० रु.चीच नोट असली पाहिजे. आणि अर्थातच पेमेंट चे क्रेडीत कार्ड/ नेटबँकिंगसारखे पर्याय वापरण्यासाठी सर्व ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर असले पाहिजे तर भ्रष्टाचार नक्की कमी होईल.

त्यांच्या म्हणण्यानुसार भारतात जास्तीत जास्त १०० रु.चीच नोट असली पाहिजे>>> नोटेची व्हॅल्यू कमी असली की ती साठवण्यासाठी जास्त जागा लागते.. १० लाख रुपये १०० च्या नोटांमध्ये ठेवायचे झाले तर १०० बंडल लागतील पण तेच १००० च्या नोटांमध्ये साठवायचे झाले तर फक्त १० बंडलच पुरतात.. ह्यासाठीच बरेच जण फक्त १०० पर्यंतच्या नोटा ठेवा असे म्हणतात.

लिंबुभाऊ, ज्यांच्या बाथरुममधुनही करोडोच्या नोटा बाहेर पडतात त्यांचे जाऊ द्या, पण तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलताहात त्या मध्यम आणि गरीबांकडे दहा वर्षांपुर्वीच्या नोटा कुठेतरी जपुन ठेवलेल्या असतील असे खरेच वाटते का? अगदीच अपवाद असेलही, नाही असे नाही. पण अग्दी गरिबाचाही कल थोडे पैसे हातात आले की त्याचा काहीतरी दागिना घडवावा किंवा काहीतरी टिकावू घ्यावे असा असतो. दागिना अशाकरता की तो अडिअडचणीला गहाण टाकुन पैसे उभे करता येतात.

आणि पोस्ट ऑफिसात सगळ्यांची जमा असते. महिना १०० रुपये जरी टाकता आले तरी लोक प्रयत्न करुन टाकतातच. गावाला बँकांपेक्ष्का पोस्ट ऑफिस जोरात चालते. माझ्या घरी देखील सगळुआंची आहेत, आणि एकमेकांना ती कळू नये याची काळजी घेतली जाते. तरी सगळ्यांना सगळे कळतेच.

ठार अडाणी हा शब्द मागे घ्या.

खरे आहे, माझी बाई ठार अडाणी आहे ती फक्त लिहिण्या वाचण्यात. बाकी इतर गोष्टीत ती भरपुर हुशार आहे.

>>>> असे खरेच वाटते का? <<<<
अगदी बरोबर, पण मग पुढील ४ महिन्यान्ची बदलण्याकरताची विनानोन्दीची मुदत देऊन नेमके काय साध्य करायचे आहे हा प्रश्न आहे. अन त्रास झालाच तर तो त्या अपवादान्नाच होणार आहे असे माझे म्हणणे. म्हणजेच थोडक्यात काय तर गेल्या साली "आधार" झाला, मग ग्यास सिलिन्डर झाले, आता हे नोटान्चे प्रकरण, लक्ष दूसरीकडे वेधण्याच्या प्रकारापलिकडे काहीही नाही असे वाटते.

एक अनुभव म्हणा किंवा किस्सा म्हणा.
आकुर्डीतल्या एका कापड दुकानात काही खरेदी करत होतो.
आमच्या आधीच्या एका लेडी कस्टमरने तिच्या लहान मुलीसाठी काही खरेदी केली. (सिलेक्शनला वेळ लागला असावा असं त्यांच्या आणि मुलीच्या चेहर्‍यावरुन वाटत होतं)
बिल देताना त्यांनी हजारची नोट दिलेली.
दुकानदाराने ती पाहुन "मॅडम ये नोट नही चलेगी" सांगितलं तिला.
त्यावेळी त्याने त्या नोटेवर वर्ष मेन्शन केलेलं नाहिये त्यामुळे ही बनावट होट असु शकते.
आणि आम्ही ही स्वीकारत नाही असे नम्रपणे सांगितलं.
त्याने पुरावा म्हणुन त्यांच्या गल्ल्यातल्या आणि पाकीटातल्या बर्‍याच नोटा दाखवल्या, अगदी दहा पासुन हजार पर्यंतच्या सर्व, त्यावर वर्ष छापलेलं होतं.
त्या मॅडम कडे दुसरे एक्स्ट्रा पैसे नव्हते त्यामुळे त्यानी ते कपडे बाजुला ठेवायला सांगितले.
आणि थोड्या वेळात घरी जाउन पैसे घेवुन येइन, पण कपडे मिक्स करु नका गठ्ठ्यात अशी विनंती केली.
दुकानदार तयार होता असं करायला.

बाकी आपली चुक नसताना हजार रुपयाला फटका म्हणजे बाबौ!!!!!
बॅन्क घेत नाही. फाडुन टाकते.
काही बॅन्का पोलिस केस करतात त्यांच्याकडे अशी नोट गेली तर.
असो.
हा किस्सा घडुन गेला त्याला दिड वर्षे झाले असतील.

नोटांच्या सुरक्षिततेचे निकष २००५ नंतर बदलल्याने त्याआधीच्या नोटा आणि नकली नोटा, यात फरक करणे त्रासदायक होत आहे, म्हणून हा रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. काळा पैसा बाहेर येणे वगैरे यातून शक्य नाही, आणि तो उद्देशही नसावा. हजारच्या नोटेचे आयुष्य बाजारात आल्यानंतर जास्तीत जास्त दोन-अडीच वर्षाचे असते. पाचशेचे साधारण एक वर्ष. दहा-पन्नास वगैरे नोटांचे फक्त काही महिन्यांपुरते असते. अशा परिस्थितीत इतक्या जुन्या नोटा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य (आणि त्यामुळे बाय डिफॉल्ट प्रामाणिक!) असणार्‍या लोकांकडे किती निघतील? आपापली कॅश चेक करा आत्ताच्या आत्ता, म्हणजे समजेल. Happy
प्रत्येक गोष्टीत राजकारण बघायची सवय लागल्यावर... असो.

>>>>> नोटांच्या सुरक्षिततेचे निकष २००५ नंतर बदलल्याने त्याआधीच्या नोटा आणि नकली नोटा, यात फरक करणे त्रासदायक होत आहे, म्हणून हा रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. <<<<<<

२००५ ते २०१४ तब्बल आठ वर्षे गेली की हो मधे, तर जेव्हा "सुरक्षिततेचे निकष बदलले" त्यानन्तर नोटान्चे आयुष्य लक्षात [ हजारच्या नोटेचे आयुष्य बाजारात आल्यानंतर जास्तीत जास्त दोन-अडीच वर्षाचे असते. पाचशेचे साधारण एक वर्ष. दहा-पन्नास वगैरे नोटांचे फक्त काही महिन्यांपुरते असते ] घेऊन पुढील तिन वर्षानन्तर ब्यान्कान्नाच या नोटा चलनातुन बाहेर काढण्यासाठी आदेश देता आला नसता का? अन गेल्या पाच वर्षात सगळ्या नाही तरी किमान ८०/९९% नोटा बाहेर निघाल्या नसत्या का?

जर सुरक्षिततेच्या कारणाने सुरक्षिततेचे निकष बदलुन साल छापायला सुरुवात केली, तर त्याचवेळेस कुणालाच साल न छापलेल्या नोटा रास्त मार्गाने बाहेर काढून घेण्याचे सुचले नाही? यावर विश्वास बसणे कठीण जाते आहे.

@ ज्ञानेश, सुंदर प्रतिसाद. अगदी सहमत.
या शिवाय याला एक वेगळा अँगल ही असावा. आपल्या रिझर्व बँकेची प्रतिमा ही एक स्वतंत्र धोरण असलेली आणि सरकारची फारशी मिंधी नसलेली संघटना अशी आहे. लवकरच सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. आता पैशाचे आणि देवाणघेवाणीचे व्यवहार प्रचंड वाढणार यात शंका नाही. या दरम्यान खोट्या नोटा चलनात येण्याचे प्रमाणही वाढते.(आपल्याकडे नसेल पण यूपी-बिहारमध्ये हा गृहोद्योग आहे, आणि बिहारच्या सीमेवरून खोट्या चलनाची जोरदार तस्करी चालते.) वर्ष न छापलेल्या नोटांची बेकायदा छपाई त्या मानाने सोपी. तसेच छपाईवर्ष आणि नम्बर सीरीज़ यावरून खोट्या नोटा पकडायलाही (त्या मानाने) सोप्या.
म्हणून हे निर्बंध आले असतील कदाचित.
प्रत्येक बाबतीत राजकारण घुसवणे योग्य नव्हे.

लिंबूभाऊ एका वर रहा हो
आधी म्हणतात की ३ महिना का आधी सांगितले
आता स्वतःच म्हणत आहेत लवकर केले पाहीजे
Biggrin
केजरीवाल झाला तुमचा Wink

N

अरे तुम्ही कुणीच पेपर वाचला नाहीये का...
बातमीत असे स्पष्टपणे म्हणले आहे की एटीएम मशिनद्वारा बँकेचे व्यवहार करण्याचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत वाढलेले आहे. जुन्या नोटा ओळखायला आणि वापरताना मशिनला अडचणी येतात. त्या फाटल्या तर अजून कटकट. यासाठी जुन्या नोटा आता चलनातून बाद करणार आहेत. आणि यासाठी १३ लाख कोटीचे चलन रद्द होणार आहे असा अंदाज आहे.
यात काळा पैसा, पांढरा पैसा असा कसलाही मुद्दा नाहीये.

स्पॉयलर अ‍ॅलर्ट. संपूर्ण अवांतर. स्किप करा. वाचू नका.
*
मग मी इब्लिसन पकडेन. त्यांना सांगेन जरा माझ्या एवढ्या नोटा बदलून आणता का बॅंकेतून?
<<
मयेकरजी,
हा माझा एक्झॅक्ट प्रॉब्लेम आहे, की लोक मला पकडतात, अन फारा वर्षांपुर्वीच्या, किंवा फाटक्यातुटक्या चिकटवलेल्या इ. नोटा खपवतात.

ब्यांकेत भरणा करताना दररोज ५०० वा १००० च्या १-२ नोटा जर डुप्लिकेट येऊ लागल्या, तर माझी टोटल वाट लागते.

होतं काय, की अशी नोट आली, तर अकाउंटंट गेलेला असतो पैसे भरायला. पण ब्यांकेतून मला फोन येतो. साहेब, या इथे.

हातातले काम सोडून जावे लागते.

मग माझ्यासमोर विचारणा. तक्रार दाखल करू की नोट जाळू? आता कोणती नोट कुणी दिली याच्या पुराव्यासाठी त्या नोटेवर पेशंटचे नाव गाव पत्ता लिहून सही घेणे हा एकच मार्ग आहे. नाहीतर जमत नाही. मग मी सांगतो जाळा ब्वा...

मग जीव जळताना पहावा लागतो. कारण नकली असली, तरी ती नोट कमवायला कष्ट तितकेच केलेले असतात.

याला उपाय म्हणून २८-३० हजार रुपयांना एक नोटा मोजायचे मशिन मिळते. सिनिक कंपनीचे. नोट डुप्लिकेट असेल तर ते रिजेक्ट करते. ते आणून ठेवलेय बाहेर काऊंटरवर. एक जरी नोट दिली पेशंटने, तरी कॅशियर मशिनमधे टाकते. रिजेक्ट मेसेज आला, तर परत देते. मशीन ऐकत नाय म्हटल्यावर पेशंट ऐकतो Wink

तात्पर्य.
जुनी, खरी नोट द्या. मला ब्यांकेत आयडेंटिटी द्यायला प्रॉब्लेम नाही. बिन्धास्त बदलून आणीन.
(अवांतरः मी १००% कमाईवर ट्याक्स भरतो. जरूरीपेक्षा जास्त असतो ट्याक्स, बट देन अगेन ऑफिशिअली धंदेवाल्यास भरपूर पळवाटा, वजावटी आहेत. उदा. टीशर्ट व जीन्स हा माझा 'ऑफिस युनिफॉर्म' आहे. त्याचे ब्र्यांड्स डिफाईन करून ठेवलेत. सो, वर्षाला ४-६ जोड्या विकत घेणेसाठी ट्याक्समधून वजावट मिळते. Wink इत्यादी. पण, पे द टॅक्स, अँड फ्लाँट युअर इन्कम. इन्व्हेस्ट इट इन व्हाईट, अर्न इन व्हाईट. अशी सोप्पी आयडीया आहे.)

कुठल्या पेपरात?
न्युज चॅनेलची वेबसाइट पाहिली होती.

Although the RBI did not give any reason for withdrawal of pre-2005 currency notes, the move is expected to unearth black money held in cash.

As the new currency notes have added security features, they would help in curbing the menace of fake currency.
लोकसत्तातही हीच दोन्ही कारणे दिलेली आहेत.

आजच बँकेत ५०० च्या ३ नोटा त्या नोटा मोजण्याच्या मशिनमध्ये अडकल्या.
त्या कॅशियर बाईंनी कश्याबश्या बाहेर काढल्या.
मला आजपर्यंत फक्त प्रिंटरमध्ये कागद अडकतो याचा अनुभव होता. Sad

नवीन नोटा चलनात याव्यात म्हणून..
नोटेच्या मूल्याप्रमाणे सरासरी आयुष्य पाच वर्षे ते १0 वर्षे आहे. परंतु हाताळणीमुळे नोटा खराब होतात. पाच किंवा २0 रुपये मूल्याच्या नोटा जुन्या झाल्या तर त्यांच्या देखभालीचा खर्च त्यांच्या मूल्यापेक्षा अधिक होत आहे. तसेच सध्या देशामध्ये नोटांच्या वितरणाचे ६0 टक्क्यांपेक्षा जास्त व्यवहार हे एटीएमच्या माध्यमातून होत आहेत. एटीएम मशिन कोर्‍या किंवा कोन न दुमडलेल्या नोटाच हाताळू शकते. जुन्या नोटा निरुपयोगी ठरतात.

दै. लोकमत...पुणे आवृत्ती

काळा पैसाही येईल बाहेर..
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार जर एखाद्या व्यक्तीकडे २00५ पूर्वीच्या नोटांची रोख रक्कम मोठय़ा प्रमाणावर असेल तर ती बदलून घेताना त्याला पॅन नंबर सादर करावा लागेल. ग्राहकाला जरी त्यावेळी त्या नोटा बदलून मिळाल्या तरी, कालांतराने ती माहिती प्राप्तिकर विभागालाही सहजतेने उपलब्ध होईल. संबंधित व्यक्तीने भरलेले प्राप्तिकराचे विवरण आणि त्याच्याकडील रोख रक्कम जर याचा मेळ जर बसला नाही , तर संबंधित व्यक्तीची डोकेदुखी निश्‍चित वाढणार आहे. (विशेष प्रतिनिधी)

नक्की कारण कळले नाही.
कुणीतरी हे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नक्की कसे उपयोगी पडेल नीट समजावून सांगणार का? २००५ नंतरच्या काळ्या पैशाचे काय?

संता (बँकेच्या काउंटरवर) : माझ्या अकाउंटमधले सगळे पैसे काढता येतिल का?
कर्मचारी: अकाउंट क्लोज करायचा फॉर्म भरा.
संता: नाही हो नोटा बदलुन पुन्हा डिपॉ़झीट करीन म्हणतो.

काल ATM मधून पैसे काढले. रात्री हा धागा वाचून सहज काही नोटा पाहिल्या.काहींवर वर्ष लिहिलं होतं,तर काहींवर वर्ष लिहिलं नव्हते.आता पुढेही ATM मधून अशा नोटा आल्या तर काय करावे?

या सगळ्यांमागे कम्युनिष्ट्/ब्रिगेडी/नक्षली यांचा हात असला पाहिजे असा निष्कर्ष कसा निघाला नाही बुवा??

काल रात्री साधारण ९ नंतर १००.७ FM [All India Radio] वर कोण्या गृहस्थांची मुलाखत होती. नाव काहीतरी C. D. गुप्ता होते
पूर्ण ऐकू नाही शकले पण त्यात हाच विषय होता आणि त्यात ते म्हणाले कि २००५ च्या आधी च्या नोटा बँक सेक्युरिटी कारणांमुळे मागे घेत आहेत.
दिवाळीच्या आधी आम्ही कॉलेज तर्फे RBI ला जाऊन आलो तिथे आपल्या ज्या नोटा आहेत विशेषतः १०, २०, ५०, १००, ५००, १००० यांबद्दल बरीच माहिती दिलेली, तसेही त्यावरचे सेक्युरिटी सिम्बॉल दाखवलेले. तेव्हा तिथे नोटा जुन्या किंवा खराब झाल्या तर कश्या प्रकारे त्या बँक बदलून देतात हेही सांगितलेलं.

त्या कार्यक्रमात ते म्हणाले कि २००५ च्या आधी च्या नोटा रद्द केल्या तर भारताबाहेरून (आता त्या देशांची नावं लक्षात नाहीयेत) ज्या बनावट नोटा येतात त्या पण ओळखू येतील. नंतर पुढे त्यांना 'हा बदल काळा पैसा बाहेर आणण्यासाठी केला आहे का' अश्या आशयाचे विचारले असता ते म्हणाले कि जर लोकांकडे असा पैसा असेलच तर ते आधी वाटून टाकतील, गरिबांना वगरे आणि मग त्या लोकांना बँकेत जाव लागेल त्यामुळे या नोटा कोणाकडे होत्या हे तसे उघड उघड कळणारच नाही.
त्यामुळे काळा पैसा असो वा नसो, फरक कोणालाच नाही पडणार.

त्या कार्यक्रमानंतर आई शी थोडी चर्चा केली आणि पटलेही ते मला.

www.newsonair.nic.in वर अजून तरी ती मुलाखत अपलोड केलेली नाहीये Sad

जर लोकांकडे असा पैसा असेलच तर ते आधी वाटून टाकतील, गरिबांना वगरे आणि मग त्या लोकांना बँकेत जाव लागेल त्यामुळे या नोटा कोणाकडे होत्या हे तसे उघड उघड कळणारच नाही.

गरिबांना नाही वाटणार तर तो सोने वगैरे गोष्टीत कंवर्ट करणार. सोनाराकडुन परत त्या नोटा बदलुन घेतल्या जाणार.

आता निवडणुका येताहेत, ते लक्षात घेऊन काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हे केलेय का या प्रश्नावर निवडणुकातही पैसे वाटलेच जातात. १ कोटी जर १०००० माणसांना वाटले तर परत ती माणसे बँकेत जाऊन बदलुन घेतील नोटा. मुळ नोटा कुठुन आल्या ते कोणालाही कळणार नाही.

शेवटी त्या गृहस्थांनी बँकेने जे कारण दिलेय सिक्युरीटीचे तेच खरे वाट्तेय असे मत दिले. मात्र दहा नोटांच्या वर आयडेंटीफिकेशन द्यावे लागेल याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. कारण यामुळे केवळ ब्यंकेचे काम वाढेल, फायदा असा होणार नाही. ही रक्कम मोठी ठेवायला पाहिजे होती असे त्यांचे मत होते.

गृहस्थ बहुतेक फायनान्स मिनिस्ट्रीचे माजी सेक्रेट्री होते. डिसी गुप्ता.

>>"आहेराच्या पाकीटात २००५ पूर्वीच्या नोटा टाकू नयेत"<<
Biggrin
त्याऐवजी आमच्या देवस्थानाच्या दानपेटीत टाका!

Pages