२००५ आधीच्या चलनी नोटा बँकेतुन बदलुन घ्यावे..!!

Submitted by उदयन.. on 22 January, 2014 - 09:16

रिझर्व बँकेने प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की ३१ मार्च २०१४ पुर्वी २००५ पुर्वीच्या सर्व चलनी नोटा बँकेतुन बदलुन घ्याव्यात... ५ , १० , २०, ५०, १०० , ५०० , १००० या सर्व किंमतींच्या नोटा बँकेतुन बदलुन मिळतील

या बाबत अधिक माहीती साठी

http://rbi.org.in/scripts/BS_PressReleaseDisplay.aspx?prid=30458

Banknotes issued prior to 2005 to be withdrawn: RBI Advisory
The Reserve Bank of India has today advised that after March 31, 2014, it will
completely withdraw from circulation all banknotes issued prior to 2005. From April 1,
2014, the public will be required to approach banks for exchanging these notes.
Banks will provide exchange facility for these notes until further communication. The
Reserve Bank further stated that public can easily identify the notes to be withdrawn
as the notes issued before 2005 do not have on them the year of printing on the
reverse side. (Please see illustration below)
The Reserve Bank has also clarified that the notes issued before 2005 will
continue to be legal tender. This would mean that banks are required to exchange
the notes for their customers as well as for non-customers. From July 01, 2014,
however, to exchange more than 10 pieces of `500 and `1000 notes, non-customers
will have to furnish proof of identity and residence to the bank branch in which she/he
wants to exchange the notes.
The Reserve Bank has appealed to the public not to panic. They are
requested to actively co-operate in the withdrawal process.

जुलै १ २०१४ नंतर जर तुम्ही २००५ आधीची नोट बदलायला गेलात तर आपल्याला आपले आयडेंटीफिकेशन द्यावे लागेल....

जर नोटे वर मागिल बाजुस साल लिहिलेले नसेल तर ती नोट २००५ आधीची समजण्यात यावी......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुलै १ २०१४ नंतर जर तुम्ही २००५ आधीची नोट बदलायला गेलात तर आपल्याला आपले आयडेंटीफिकेशन द्यावे लागेल....
<<
बस ना?
ब्यांकेत आपले आय्डेंटिफिकेशन द्यायला काय प्रॉब्लेम येणारे?

सिन्धुदुर्गात गोपुरि वसविणार्या आपासाहेब पटवर्धानांनी स्वातंत्रोत्त्रर कालात असाच चलन शुद्धी कार्यक्रम सांगीतलेला होता ...

बेनामी व्यवहार टाळण्यासाठी असेल आयडेंटिफिकेशन.

आता समजा माझ्याकडे काळ्या पैशात हजाराच्या दहा हजार नोटा आहेत. मी त्या बँकेत बदलायला घेऊन गेलो की आपसूक त्याची नोंद होण्याची शक्यता आहे. मग मी इब्लिसन पकडेन. त्यांना सांगेन जरा माझ्या एवढ्या नोटा बदलून आणता का बॅंकेतून?

>>>> मी त्या बँकेत बदलायला घेऊन गेलो की आपसूक त्याची नोंद होण्याची शक्यता आहे <<<<<
३१ मार्च पर्यन्त अशी नोन्द होणे अवघड दिसते. त्यामुले काळा पैसा फ्रीझ करण्याकरताचा उद्देश असेल असे वाटत नाही.
पब्लिकला कुठल्या ना कुठल्या इश्युमधे प्यानिक व्हायला लावण्याचाच हा प्रकार जास्त वाटतो.
अन्यथा, आजवर ब्यान्का, खराब नोटा/चलनी नाणी वगैरे व्यवहारातून काढुन घेतच अस तात. तेव्हा इतका गाजावाजा करुन नेमके काय साध्य करावया चे आहे ते निश्चित होत नसल्याने प्यानिक बनविण्याचा मुद्दा प्रकर्षाने पुढे येतो जसे ग्यास सिलिन्डरच्या अनुदानाबाबत केले गेले आहे.
पब्लिक झुकती है, झुकानेवाला चाहिये बस्स, इतकाच याचा अर्थ.

जुन्या नोटा जमा करण्यार्‍यांनी संधी Happy

बाकी रिजर्व बँकेच चांगलं पाउल. असं दर वर्षी करावं का?

बेफी, आधीचे चालेल, नंतरचे नको Happy

२००५ पुर्वीच्या नोटा आणायच्या कुठुन?

मला कायम पगारच मिळत आलाय आणि तो दर महिन्याला संपतोही Happy Happy २००५ सालातला तेव्हाच संपला. आता सध्या ज्या नोटा आहेत त्या मी कालच बँकेतुन काढल्यात आणि दोनतीन दिवसात त्या संपतीलही.

यात सगळ्यात प्रॉब्लेम होणारे तो ज्यान्नी जीव जीव करुन दहा वीस पन्न्नास रुपड्या साठवल्या असतील, त्या सामान्यान्चाच.
ज्यान्च्याकडे पाचशे/हजारामधला बक्कल पैका आहे, ते कसेही करुन जास्त रकमेच्या अस्लयाने बदलुन घेतिलच, मात्र तीळतीळ करत साठवलेली जीवाची पुन्जी पण रक्कम कमी अशा आडबाजुच्या सामान्य लोकान्चे काय?

इंटरनेट वापरणारे सामान्य लोक घरात रुपया दोन रुपयांची बंडले जमवून सेव्हिंग करतात का? बँकेत अकाउंट उघडत नाहीत का?

पब्लिकला कुठल्या ना कुठल्या इश्युमधे प्यानिक व्हायला लावण्याचाच हा प्रकार जास्त वाटतो.
अन्यथा, आजवर ब्यान्का, खराब नोटा/चलनी नाणी वगैरे व्यवहारातून काढुन घेतच अस तात. तेव्हा इतका गाजावाजा करुन नेमके काय साध्य करावया चे आहे ते निश्चित होत नसल्याने प्यानिक बनविण्याचा मुद्दा प्रकर्षाने पुढे येतो जसे ग्यास सिलिन्डरच्या अनुदानाबाबत केले गेले आहे.
पब्लिक झुकती है, झुकानेवाला चाहिये बस्स, इतकाच याचा अर्थ.

>> +१

आधी आधार कार्ड.. मग सिलेंडर.. आता ह्या नोटा

यात सगळ्यात प्रॉब्लेम होणारे तो ज्यान्नी जीव जीव करुन दहा वीस पन्न्नास रुपड्या साठवल्या असतील, त्या सामान्यान्चाच.
ज्यान्च्याकडे पाचशे/हजारामधला बक्कल पैका आहे, ते कसेही करुन जास्त रकमेच्या अस्लयाने बदलुन घेतिलच, मात्र तीळतीळ करत साठवलेली जीवाची पुन्जी पण रक्कम कमी अशा आडबाजुच्या सामान्य लोकान्चे काय?

???? हल्ली बँकेत खाते उघडणे अतिशय सोप्पे झालेय, आपले पैसे बँकेतुन काढणे हा व्यवहार तर दिवसाच्या २४ तासात कधीही दोन मिनिटात करुन होतो. नाक्यानाक्यावर बँका आणि त्यांच्या एटिएम्स आहेत. घरात पैसे ठेवणे आधीच्यापेक्षा आता जास्त धोकादायक झालेय. अशा वेळी जीव जीव करुन कोण घरात पैसे साठवतोय??

माझी कामवाली बाई ठार अडाणी आहे पण तिचे आणि नव-याचे वेगवेगळे आणि स्वतंत्र अशी तिन अकाऊण्ट्स त्यांच्या घरात आहेत.

पब्लिक झुकती है, झुकानेवाला चाहिये बस्स, इतकाच याचा अर्थ.>>> Uhoh
लोकांचे लॉकर, धान्याच्या कोठ्या इत्यादींवर छापे मारण्यापेक्षा एक सर्क्युलर काढून ते सर्वच उजेडात आणणं सोपं नाही का?

चला निवडणुकीत आता २००५ च्या पुर्वीच्याच नोटा येण्याची जास्त शक्यता.
एक कळत नाही, काळा पैसा काय फक्त नोटांच्याच स्वरुपात असतो का? मला तर वाटते, की नोटांच्या स्वरुपातच नसतो, बाकी जमीन जुमला, वगैरेत जास्त गुंतलेला असावा. म्हणुनच तर महागाईत आणि मंदीतही, जिथे लाखो घरं विकल्या जात नाहीत, तिथे घरांच्या किंमती कमी होत नाहीय. Sad

<माझी कामवाली बाई ठार अडाणी आहे पण तिचे आणि नव-याचे वेगवेगळे आणि स्वतंत्र अशी तिन अकाऊण्ट्स त्यांच्या घरात आहेत.>

ठार अडाणी हा शब्द मागे घ्या. तिच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे विवाहित महिलांनी.
कॉन्व्हेंट एज्युकेटेड, बॉब केलेली, जीन्स टी-शर्ट घालणारी पण रोजच्या खर्चासाठी नवर्‍यापुढे हात पसरणारी आणि बायकांना स्वतंत्र बँक खात्याची काय गरज असे म्हणणारी सुविद्य महिला माझ्या ओळखीत आहे.

हे सगळे काळा पैसा आणि फेक करन्सी बाहेर काढण्यासाठी आहे.. असा कार्यक्रम पूर्वी पण होऊन गेलेला आहे..

तुमच्या कडे असलेल्या नोटा तुम्ही बँकेत घेऊन गेलात की तुम्हाला जुन्या बदलून नवीन मिळतील... कोणालाही काहीही प्रॉब्लेम येणार नाही..

फक्त मोडस ऑपरंडी गंडलेली आहे.. उद्यापासून ५०० आणी १००० च्या नोटा बंद केल्या जातील असे जेव्हा करतील तेव्हा काळा पैसा दडवून ठेवलेल्यांचे धाबे दणाणतील...

सध्याच्या परिस्थितीत त्यांना भरपूर वेळ मिळणार आहे पैसा योग्य पद्धतीत बाहेर काढायला..

उदयन.. नोटा १ एप्रिल २०१४ ते ३० जून २०१४ पर्यंत बदलून घ्यायच्या आहेत.. त्यानंतर बदलून मिळतील पण १० पेक्षा जास्त नोटा असतील तर त्यासाठी ओळखपत्र दाखवावे लागेल. वरचा मराठीत लिहीलेला मजकूर दुरुस्त करा..

>>>> हल्ली बँकेत खाते उघडणे अतिशय सोप्पे झालेय, आपले पैसे बँकेतुन काढणे हा व्यवहार तर दिवसाच्या २४ तासात कधीही दोन मिनिटात करुन होतो. नाक्यानाक्यावर बँका आणि त्यांच्या एटिएम्स आहेत. घरात पैसे ठेवणे आधीच्यापेक्षा आता जास्त धोकादायक झालेय. अशा वेळी जीव जीव करुन कोण घरात पैसे साठवतोय?? <<<<

तुम्ही माझ्या पोस्ट मधील "आडबाजुच्या" हा शब्द नजरेआड केलेला दिसतोय. व पुणेमुम्बै व निवडक शहरे सोडली, तर महाराष्ट्र/देशात शहरे सोडून बाकी सर्व "आडबाजू" असेच समजले जात असावे असा माझा समज आहे.

शहरी अनुभवान्च्या शहाणपणातून बाहेर पडून खरोखरीची बाह्य परिस्थिती बघितली असता तुमच्या वरील प्रश्नान्ची उत्तरे मिळू शकतील. असो.

माझ्या दृष्टीने पब्लिकला "कामाला" लावण्याकरताचा अजुन एक उद्योग या पेक्षा जास्त महत्व या निर्णयामागे आहे असे वाटत नाही.

आडबाजूला पोस्ट हापिसे असतात. ज्यांची अकाउंट उघडण्याची ऐपत नसते त्यांच्याकडे सेव्हिंग तरी किती कसणार? अशा कितीशा नोटा असतीलं त्या बदलून घ्यायला फार त्रास पडणार नाही.
हमारे यहां फटे पुराने नोट लिए जाते हैं अशा पाट्या असतात त्यात व्हरायटी दिसेल.
आता मुंबईतल्या भिकार्‍यांच्या उश्याही लाखांच्या निघतात हेही आहेच.

>>>> फक्त मोडस ऑपरंडी गंडलेली आहे.. उद्यापासून ५०० आणी १००० च्या नोटा बंद केल्या जातील असे जेव्हा करतील तेव्हा काळा पैसा दडवून ठेवलेल्यांचे धाबे दणाणतील...

सध्याच्या परिस्थितीत त्यांना भरपूर वेळ मिळणार आहे पैसा योग्य पद्धतीत बाहेर काढायला..<<<<<<

हिम्या, एक्झॅटली हाच मुद्याचा प्वॉईण्ट आहे. जर पुरेसा वेळ देणारेत, नोटा बदलुन घ्यायच्या प्रोसिजर मधे व्यक्तिच्या नोन्दीची सोय नाहीये, तर मग काळा पैका कसा काय बाहेर काढणार आहेत?
अन जर काळा पैका काढायचाच नसेल, तर पब्लिकला उल्लु कशाला बनवताय? करन्सीमधे असलेल्या यच्चयावत जुन्या फाटक्या तुटक्या नोटा ब्यान्का बाजुला काढतच असतात, त्याचे नियम आहेत, त्यात केवळ ब्यान्कान्नाच निर्देश दिले असते की २००५च्या आधीच्या नोटा बाजुला काढा तरी भागले असते की.
पब्लिकला त्यात कशाला गोवलय?

>>>>>> आडबाजूला पोस्ट हापिसे असतात. ज्यांची अकाउंट उघडण्याची ऐपत नसते त्यांच्याकडे सेव्हिंग तरी किती कसणार? <<<<<
हो असतात पोस्ट हापिसे, पण दुर्दैवाने, तिथे केलेली प्रत्येक गोष्ट गावभर होते, साधे पत्र पाठवले तरी, तेव्हा पोस्टात सेव्हिन्ग करणे हे गावाकडे शक्य नसते, करूही नये, उगाच एखाद दोन अकाऊण्ट्स, त्या एजन्टच्या समाधानाकरता उघडतातही, पण मुख्य बचत रोखीतच असते, रोख किन्वा सोनेनाणे वा जमिन. त्यातिल रोखीची बचत करणारेच जास्त.

>>>>> अशा कितीशा नोटा असतीलं त्या बदलून घ्यायला फार त्रास पडणार नाही. <<<<<< ज्या काही कितीशा अस्तील त्या तुमच्या शहरी वार्षीक लाखो रुपये पगाराच्या आकड्यान्पुढे किस झाडकी पत्ती असल्या तरी त्या त्या परिस्थितीतल्या लोकान्ना ती ती सन्ख्या फार जास्त असते. दुर्दैवाने भारतात परिस्थिती अशी आहे की सचिवालयातल्या एअरकन्डिशन्ड रुममधे बसुन, वर्षाला लाखोन्चे प्याकेज व वरकमाई मिळवित असलेले सरकारी बाबू गरीबीची रेषा ठरविताना मात्र दैनिक २८ रुपड्यान्वर रेषा नेऊन पोहोचवतात, तीच मानसिकता जागोजागी दृगोच्चर होते आहे.

>>>>>>> हमारे यहां फटे पुराने नोट लिए जाते हैं अशा पाट्या असतात त्यात व्हरायटी दिसेल. <<<<< आख्ख्या पुण्यात बुधवार पेठेत एक दोन ठिकाणी या पाट्या आहेत, अजुन कुठे असल्यास पत्ते द्या. ही पुण्यातली परिस्थिति असेल, तर बाकी खेडोपाडीची परिस्थिती काय? निदान पुणे जिल्ह्यात तरी मी पाहिलेल्या तालुका/गावामधे अशा पाट्या "सर्रासपणे नव्हेच" येता जाता क्वचितही पाहिल्या नाहियेत.

>>>>> आता मुंबईतल्या भिकार्‍यांच्या उश्याही लाखांच्या निघतात हेही आहेच. <<<<< माझा कधी मुम्बैच्या रस्त्यावरच्या भिकार्‍यान्शी संबंध आलेला नाहीये, मात्र या देशात प्रत्यक सरकारी ऑफिसमधे असलेल्या ग्रेड वन पासून ग्रेड चार पर्यन्तच्या सरकारि भिकार्‍यान्शी मात्र बरेच वेळा संबंध येतो, हां, आता त्याच्या बेडरुममधे बेडमधे/ बाथरुममधे,/ माळ्यावर/ गिझर वगिअरे ठिकाणी साचलेल्या थप्प्यान्ची काळजी सरकार वहात असेल तर ३० जुन पर्यन्तची मुदत रास्तच आहे असे म्हणवे लागेल, नै?

लिंबूभाऊ तुम्हाला विचारून सरकार निर्णय घेणार नाही

पांढरी पट्टी असणारी नोट जास्त करून 2005 आधीच्या आहेत

त्यांच्यामुळे खोट्या नोटा ओळखतांना अडचण येत आहे. म्हणून या नोटा बाजूला काढल्या जात आहेत (बहूदा)

आणि वेळ हा द्यावाच लागतो... तडकाफडकी निर्णय नाही होत

तुमच्या कडे असल्यास बदलून घ्या नाहीतर ठेवा तुमचा प्रश्न

Pages