Submitted by अनन्या वर्तक on 16 January, 2014 - 10:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
Ground Chicken
कांदा
हिरवी मिरची
कोथिंबीर
आले लसूण पेस्ट
क्रमवार पाककृती:
वरील सर्व घटक चांगले मिक्स करावेत. भांड्यात तेल घेवून त्यात वरील मिश्रण stir fry करून घ्यावे आणि त्यात काळेमिरी आणि मीठ तुमच्या आवडी प्रमाणे घालावे.
आवरणासाठी:
मैद्या मध्ये मीठ घालून कणिक मळून घ्यावे. त्याचे छोटे गोळे करून पातळ लाटून घ्याव्यात. त्यात हे मिश्रण करंजीसारखे भरावे आणि बंद करावे. बांबू स्टीमर असल्यास त्यात हे Dumplings ठेवावे आणि वाफ येऊ द्यावी.
हे Dumplings टोमॅटो, तीळ, लाल मिरची आणि लसूण यांच्या चटणी बरोबर खावे.
English शब्दांना मराठीत काय म्हणतात ते मला माहीत नाहीए त्यामुळे क्षमस्व.
शुद्धलेखनाच्या चुकांसाठी क्षमस्व.
Dumplings चे सगळे श्रेय आकाश ला आणि त्याच्या मदतीला.








माहितीचा स्रोत:
ऑफिस मधील मैत्रीण आणि YouTube
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती छान रेसीपी लिहिलीये. आणि
किती छान रेसीपी लिहिलीये. आणि फोटो, डंपलिंग सुबक. मला हा पदार्थ आवडत नाही म्हणुन मी कधी केला नव्हता. पण इथे वाचून करावासा वाटतोय.

माझ्याकडे मी भारतातून येताना इडली करायचे भांड आणलय. त्यात एक प्लेन थाळी आहे. ढोकळा आणि मोदक करण्यासाठी. त्यात करेन हे .
बांबू स्टीमर वॉलमार्ट मध्ये आहे. तिथेच एक डंपलिंग किंवा तळलेला पदार्थ काढण्याचा वेगळाच झारा आहे. जबरी आहे तो. मी तो आणणार(च) आता.
मी चिकन आधी परतून घेत नाही.
मी चिकन आधी परतून घेत नाही. डंपलिंग्ज थोडावेळ ( २५-३० मिनिटे) फ्रीजरमधे ठेवते अन मग सरळ उकळत्या पाण्यात शिजवते. व्यवस्थित शिजतं चिकन.
मी चाइव्ह्स किंवा कांद्याच्या पातीचा हिरवा भाग, थाय बर्ड चिली, बारीक चिरलेले आले, सॉय सॉस, सेसमी ऑइल, थोडे स्रि रचा सॉस असे घालते
मैदा लाटायला इथे कोणाला त्रास
मैदा लाटायला इथे कोणाला त्रास होत नाही का? (लाट्लेली पोळी परत आक्रसते) मी एकदाच भटुरे केले होते तेव्हापासून कानाला खडा. काही ट्रीक / टीप असेल तर द्या, प्लीज.
फोटो सुंदर आहेत. आकार खूपच
फोटो सुंदर आहेत. आकार खूपच छान जमला आहे.
शाकाहार्यांसाठी चिकनच्याऐवजी सोयाचंक्स उत्तम पर्याय आहे .
मस्त आकार जमलाय !!!
मस्त आकार जमलाय !!!
मी करते असले डम्पलिंग्स.
मी करते असले डम्पलिंग्स. चिकनचे सारण स्टरफ्राय करुन घेतले नाही तरी चालते. मी कधी स्टर्फ्राय केले नाही. सरळ सगळे एकत्र करुन भरते आणि दहा मिनिटे (वरचे आवरण चकचकीत दिसेतो) वाफवते. चिकन शिजते तोवर.
चटणी करुन बघेन. डम्पलिंग्स चवीला थोडेसे ब्लांड लागतात, चटणीसोबत छान लागतील. मी कधीकधी शेजवान सॉसबरोबर देते खायला.
शाकाहार्यांसाठी चिकनच्याऐवजी
शाकाहार्यांसाठी चिकनच्याऐवजी सोयाचंक्स उत्तम पर्याय आहे
+१००० न्युट्रीलाचा सोया चंक्सचा खिमाही येतो. तो वापरत येईल.
डंप्लिंग्स आधी बनवून ठेवले
डंप्लिंग्स आधी बनवून ठेवले दुपारिच आण सन्ध्याकाळी फ्रिज मधुन काढून वाफवले अर चालतील का?
मस्त सुबक बनले आहे !
मस्त सुबक बनले आहे !
अनन्या मस्त आलेत फोटो
अनन्या मस्त आलेत फोटो
मस्त रेसिपी आणि फोटो.
मस्त रेसिपी आणि फोटो. ........
वा वा मस्तच.
वा वा मस्तच.
.
.
हे मोमो सारखं दिसतंय.
हे मोमो सारखं दिसतंय.
सुपर रेसिपी आणि फोटो.
सुपर रेसिपी आणि फोटो.
मस्त
मस्त
मस्तच अनन्या... काल केले
मस्तच अनन्या... काल केले होते.. छान झाले. करुन इडली पात्रात घालून फ्रिजमध्ये ठेवले. मलमलच्या ओलसर कापडाने झाकून. आयत्या वेळी वाफवले. मस्त लागले चवीला. डेल मॉन्टे चा चिलि-गार्लिक सॉस एकदम मस्त लागतो या बरोबर, हे इथे सांगायलाच हवं.
चिकन न चालणार्यांनी उकडलेला
चिकन न चालणार्यांनी उकडलेला बटाटा आणि भरपूर किसलेला मोझरेला चीज असे जिन्नस वापरून बघावे …
Pages